निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 27/01/2010 तक्रार नोदणी दिनांकः-10/02/2010 तक्रार निकाल दिनांकः-09/09/2010 कालावधी 07 महिने11दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे,B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशीB.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. जगदीश गोविंदराव देशपांडे अर्जदार वय 58 वर्षे धंदा निवृत्त रा. त्रिमूर्तीनगर, अड.आर.एस.तिवारी परभणी जि.परभणी431401. --विरुध्द – शाखा व्यवस्थापक गैरअर्जदार बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमीटेड, अड.बि.ए.मोदानी जि.इ.प्लॉझा एअरपोर्ट रोड, येरवडा पुणे 411006. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा .श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. ) इन्शुअर्डड कारची अपघातात झालेली नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रस्तूतची तक्रार आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात हकीकत खालीलप्रमाणे अर्जदाराच्या मालकीची कार रजि.नं. एम.एच.22/एच-1987 चा गैरअर्जदाराकडून दिनांक 13.04.2009 ते 12.04.2010 या मुदतीचा सर्वसमावेशक नुकसान भरपाईचा विमा उतरविला होता. दिनांक 17.10.2009 रोजी जिंतूर – परभणी रोडवरुन कार जात असताना पाठीमागून मोटारसायकल स्वार ओव्हरटेक करीत अचानक कार समोर आल्यामुळे त्याला वाचविण्यासाठी कार ड्रायव्हरने गाडी बाजूला घेत असताना रोड दुभाजकला धडकली व कारचे अपघातात नुकसान झाले. अर्जदाराने त्याची माहिती गैरअर्जदारास कळविल्यावर दिनांक 18.10.2009 रोजी कंपनीच्या सर्व्हेअरने घटनास्थळी भेट देवून फोटो काढले व नुकसानीचा सर्व्हे केला त्यानंतर कार दिवेकर आटो मोटार्स पदमपूरा, औरंगाबाद गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी नेली. दुरुस्तीसाठी संबंधीत गॅरेज मालकाने रुपये 3,82,445/- इस्टीमेंट दिले होते ते आणि इतर आवश्यक ती सर्व कागदपत्रासह गैरअर्जदाराकडे माहे डिसेंबर 2009 मध्ये विमा क्लेम दाखल केला होता. परंतू तो मंजूर न करता अपघाताचे वेळी कार ड्रायव्हरकडे कायदेशीर ड्रायव्हींग लायसंन्स नव्हते या कारणास्तव नुकसान भरपाई देण्याचे नाकारले म्हणून ग्राहक मंचात प्रस्तूतचा तक्रार अर्ज दाखल करुन रुपये 3,82,445/- नुकसान भरपाई द.सा.द.शे 12 % व्याजासह मिळावी. याखेरीज मानसिक त्रास व सेवा त्रूटीची नुकसान भरपाई रुपये 50,000/- गैरअर्जदाराकडून मिळावी अशी मागणी केली आहे. तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदाराचे शपथपत्र ( नि.2) दाखल केले आहे. पुराव्यातील कागदपत्रात नि.4 लगत विमा नाकारल्याचे पत्र, ड्रायव्हींग लायसंन्सची छायाप्रत व आर.टी.ओ.कडील ड्रायव्हींग लायसंन्सचे रेकॉर्ड दाखल केले आहे. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करणेसाठी गैरअर्जदारास मंचातर्फे नोटीस पाठविल्यावर तारीख 10/05/2010 रोजी प्रकरणात लेखी जबाब ( नि.15) दाखल केला. अर्जदाराने तक्रार अर्जात नमूद केल्याप्रमाणे त्याच्याकडून विमा उतरविला होता हे त्याना मान्य आहे. अपघाता संबंधी बाकीचा मजकूर त्यानी अमान्य केला आहे. अतिरीक्त लेखी जबाबात त्यानी असा खुलासा केला आहे की, अपघाता संबंधी माहीती मिळाल्यानंतर सर्व्हेअरने घटनास्थळी भेट देवून नुकसानीचा सर्व्हे केला होता परंतू त्यानंतर अधिक चौकशी केली असता कार ड्रायव्हरच्या निष्काळजीपणा मुळे अपघात झाला होता. त्यामुळे त्याच्या विरुध्द पोलीसानी गु.र.क्रमांक 168/2009 नोंदविला होता. अर्जदाराने नुकसान भरपाई संबंधी केलेला क्लेम सोबत आवश्यक ती सव कागदपत्रे दिलेली नव्हती. विशेषतः कार ड्रायव्हर सिध्दार्थ वाळके यानी दिलेले ड्रायव्हींग लायसन्स कायदेशीर नसल्याचे तपासात आढळून आले. आर.टी.ओ. ने दिलेले लायसन्स संबंधी विमा कंपनीने माहीती मागविली असता ड्रायव्हर वाळके याला दिनांक 24.09.2003 रोजी दिलेले लायसन्स एल.एम.व्ही. प्रकारातील होते त्याची मुदत दिनांक 24.09.2003 ते 23.09.2006 अखेर होती. कारचा अपघात दिनांक 17.10.2009 रोजी झाला असल्यामुळे अपघाताचे दिवशी त्याच्याकडे असलेले ड्रायव्हींग लायसन्स कायदेशीर मुदतीत नव्हते. अर्जदाराकडून पॉलीसी नियम व अटीचे उलघंन झालेले असल्यामुळे नियमाप्रमाणे अर्जदाराचा क्लेम नामंजूर केलेला आहे याबाबतीत त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारे सेवा त्रूटी झालेली नाही सबब तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबाचे पुष्टयर्थ पुराव्यातील कागदपत्रात नि. 17 लगत सर्व्हे रिपोर्ट दाखल केला आहे. प्रस्तूतचे प्रकरण अंतिम सुनावणीसाठी प्रलंबित असताना अर्जदार आणि त्याचे वकिल तसेच गैरअर्जदारातर्फे नेमलेले आथोराइजड सिगनेटरी व त्याचे वकिल यानी मंचापुढे दिनांक 06.09.2010 रोजी तडजोड पुरशीस ( नि.26) दाखल करुन उभयंतामध्ये नुकसान भरपाई क्लेम संबंधी संबंधीतामध्ये आपसात तडजोड झालेली असून अर्जदाराच्या करची नुकसान भरपाई रुपये 1,10,000/- ची रक्कम फूल अण्ड फायनल सेटलमेंट ( व्याज आणि खर्चासह ) देण्याचे एकमेकानी मान्य केले आहे व त्याप्रमाणे प्रकरणात अवॉर्ड करावे असे नमूद केले आहे आदेश झाल्यानंतर गैरअर्जदार विमा कंपनी आदेश तारखेपासून 1 महिन्याचे आत वर नमूद केलेली रक्कम त्यानी देण्याचे तडजोडीत कबूल केले आहे. पुरशीस दाखल करते वेळी मंचापुढे अर्जदार व गैगेरअर्जदार यांचे वकिल हजर होते ( नि.26) वरील तडजोडीत नमूद केलेली कारची नुकसान भरपाई स्विकारण्यास अर्जदार तयार असल्यामुळे तडजोड पुरशीसला अनुसरुन आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आ दे श 1 अर्जदाराच्या तक्रार अर्जातील तडजोड पुरशीस ( नि.26) प्रमाणे गैरअर्जदाराने आदेश तारखेपासुन 30 दिवसांच्या आत अर्जदाराच्या मालकीची कार एम.एच.22/एच 1987 ची अपघातातील नुकसान भरपाई रुपये 1,10,000/- दयावी. 2 अर्जदार व गैरअर्जदार यानी आपला आपला खर्च आपण सोसावा. 3 पक्षकाराना आदेशाच्या प्रती मोफत पुरावाव्यात सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |