निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 08/03/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 18/03/2010 तक्रार निकाल दिनांकः- 11/08/2010 कालावधी 04 महिने 24 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. श्रध्दा बालाजीराव कळसकर, अर्जदार वय 19 वर्षे.धंदा शिक्षण. अड.एस.एन.वेलणकर. रा.बी.अँड.सी.क्वाटर्स,जि.परभणी. विरुध्द शाखाधिकारी. गैरअर्जदार. बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कं.लि. अड.बी.ए.मोदानी. औरंगाबाद शाखा,राजेंद्र भवन, दुसरा मजला, रत्नप्रभा मोटर्स समोर,अदालत रोड,औरंगाबाद. ------------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा श्रीमती अनिता ओस्तवाल.सदस्या. ) गैरअर्जदार विमा कंपनीने त्रुटीची सेवा दिल्याच्या आरोपावरुन अर्जदाराने हि तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार ही एक विद्यार्थीनी आहे. दिनांक 10/07/2008 रोजी अर्जदाराच्या वडीलांनी श्रध्दा-ई-बाईक सहारा बिल्डींग वसमत रोड परभणी यांचे कडून हिरो अल्ट्रा मोटर्स कंपनीची व्हॉलोसीटी – रेड हे मॉडेल रक्कम रु. 34020/- एवढया किमतीला खरेदी केली त्याचा नोंदणी क्रमांक MH 22/K 8661 होता.सदर वाहनाचा विमा गैरअर्जदार कंपनीने उतरवला व पॉलीसी क्रमांक 06-09-2007-1802-00002289 अन्वये रु.958/- एवढा प्रिमीयम घेऊन दिनांक 10/07/08 पासून दिनांक 10/07/09 या एक वर्षाच्या कालावधीसाठी उतरवला.दिनांक 06/07/2009 रोजी अर्जदाराचे वडीलांनी त्याचेकडे आलेल्या पाहूण्यांना तपोवन एक्सप्रेस या गाडीने सोडण्याकरीता सदर वाहन रेल्वे स्टेशन परभणी येथे आणले होते. व स्टेशन मध्ये येणा जाणा-या रस्त्यावरील बादशहापान सेंटर ह्या दुकानाचे बाजुला व्यवस्थीतपणे पार्क करुन स्टेशन मध्ये गेले असता पाहूण्यांना सोडून बाहे आले तो ठेवलेल्या ठिकाणी दुचाकी मिळून आली नाही म्हणून सर्वत्र शोध घेण्यास सुरुवात केली.पण वाहन मिळून न आल्याने शेवटी दिनांक 13/07/2009 रोजी नवा मोंढा पोलीस स्टेशन परभणी येथे क्रमांक 178/09 अन्वये फिर्याद दिली व त्या प्रमाणे पोलीसांनी अज्ञात इसमानी वाहन चोरी केले म्हणून भा.द.वि. 379 अन्वये गुन्हा दाखल नोंदविला तदनंतर गैरअर्जदार कंपनीकडे या चोरी बाबत क्लेम क्रमांक OC-10-2006-1802-00000-320 नोंदविल्या नंतर दिनांक 11/08/2009 रोजी अर्जदारास पत्र पाठवुन आवश्यक त्या कागदपत्राची पुर्तता करण्यास गैरअर्जदार कंपनीने सुचविले त्यानुसार अर्जदाराने आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता केली,परंतु गैरअर्जदार कंपनीने वारंवार पत्र पाठवुन अर्जदारास आणखी कागदपत्र व मुळ 2 चावींचा सेट दाखल करावयाची सुचना केली.अर्जदाराने तीच्या जवळ असणारी डुप्लीकेट चावी व कागदपत्र गैरअर्जदार विमा कंपनीकडे दाखल केल्यानंतर दिनांक 14/12/2009 रोजी गैरअर्जदाराने पत्र पाठवुन त्यात अर्जदाराने 2 री मुळ चावी न देता डुप्लीकेट चावी दिली आहे.याचाच अर्थ आपणास सहकार्य करायचे नसून आपणास क्लेम मध्ये स्वारस्य नाही हे सपष्ट होते म्हणून 5 दिवसात पुर्तता करा अन्यथा क्लेम नाकारल्या जाईल असे नमुद केले त्यावर अर्जदाराने दिनांक 18/1/2010 रोजी सविस्तर उत्तर पाठवुन सर्व बाबींचा खुलासा केला तरी देखील गैरअर्जदाराने दिनांक 20/01/2010 रोजी अर्जदाराने गाडी पार्क करतांना योग्यती खबरदारी घेतलेली नसल्याने पॉलीसीच्या अटी व शर्तींचा भंग केल्याच्या कारणास्तव अर्जदाराचा क्लेम नाकारला म्हणून अर्जदाराने मंचासमोर तक्रार दाखल करुन गैरअर्जदाराने अर्जदारास वाहनाची किंमत व इतर टॅक्स व खर्चापोटी एकुण रु. 37000/- दिनांक 20/01/2010 रोजी पासून 12 टक्के व्याजासह द्यावेत.तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5000/- व तक्रारीच्या खर्चाबद्दल रक्कम रु.3000/- द्यावे. अशा मागण्या केल्या आहेत.अर्जदाराने तक्रार अर्जा सोबत शपथपित्र नि.2 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.4/1 ते नि.4/16 व नि.18, नि.19 वर मंचासमोर दाखल केली आहेत. मंचाची नोटीस मिळाल्यानंतर गैरअर्जदाराने लेखी निवेदन नि.10 वर दाखल करुन अर्जदाराचे कथन बहूत अंशी अमान्य केले आहे.गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, अर्जदाराकडून क्लेम बद्दल सुचना मिळाल्यानंतर गैरअर्जदार विमा कंपनीने त्वरीत इनव्हेस्टीगेटर अड संदीप सरोदे यांची नियुक्ती करुन सदर प्रकरणाचा तपास केला त्याने अर्जदार व तिच्या वडीलांचे जबाब घेतले गैरअर्जदार विमा कंपनीने अनेक वेळा अर्जदारास पत्र पाठवुन 2 री मुळ चावी व आवश्यक कागदपत्राची पुर्तता करण्याची सुचना केली होती,परंतु अर्जदाराने अद्याप पावेता त्याची पुर्तता केलेली नाही.इनव्हेस्टीगेटरने गैरअर्जदार विमा कंपनीकडे दाखल केलेल्या रिपोर्ट नुसार अर्जदार हिने गडबडीत सदर गाडीची चावी गडबडीत गाडीलाच विसरुन राहिल्याने विमेधारकाने इन्शुअर्ड गाडीची आवश्यक काळजी घेतली नसल्याने पॉलीसीच्या अटी व शर्तीचा भंग केल्यामुळे गैरअर्जदार कंपनीने अर्जदाराचा क्लेम नाकारुन अर्जदारास त्रुटीची सेवा दिल्याचे अमान्य केले आहे.पुढे गैरअर्जदार विमा कंपनीने मा.सर्वोच्च न्यायालयाने रिपोर्टेड केस Ravind singh Bagga V/s Kalm Royal Dotch Air lines (2000) 1 SCC 66 मध्ये मा.सर्वोच्च न्यायालयाने असे मत व्यक्त केले आहे की, The Deficiency in service cannot be alleged. Without aftributing fault imperfection, shortcoming or inadecavag in the quality, nature and manner of performance wiche is requried to be performed by a person in pursvance of a contract or otherwise in relation to any service याचा दाखला दिला आहे. व सदर प्रकरणात गैरअर्जदाराने सेवात्रुटी केल्याचे अर्जदारास शाबीत करता न आल्याने त्याने सदरचा वाद या मंचासमोर उपस्थित करावयास नको होता.म्हणून वरील सर्व कारणास्तव अर्जदाराचा तक्रार अर्ज कॉम्पेसेंटरी कॉस्ट रक्कम रु. 15000/- सह खारीज करण्यात यावा अशी विनंती गैरअर्जदाराने मंचासमोर केली आहे. गैरअर्जदाराने लेखी निवेदना सोबत शपथपत्र नि. 11 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.13/1 ते 15/1 व नि.21/1 मंचासमोर दाखल केले आहे. दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर. 1 सदरचा वाद या मंचासमोर चालण्यास पात्र आहे काय ? नाही. 2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे. मुद्दा क्रमांक 1 व 2 अर्जदाराच्या वडीलांनी दिनांक 10/07/2008 रोजी श्रध्दा -ई-बाईक सहारा बिल्डींग वसमत रोड परभणी यांचेकडून हिरो अल्ट्रा मोटर्स कंपनीची व्हीलॉसीटी-रेड हे मॉडेल रक्कम रु. 34000/- ला खरेदी केले होते. त्याचा नोंदणी क्रमांक MH-22/K8661 होता सदर वाहनाचा विमा गैरअर्जदार कंपनीने उतरवला व पॉलीसी क्रमांक 06-09-2007-1802-0002289 अन्वये रु.958/- एवढा प्रिमियम घेवुन दिनांक 10/07/2008 पासून दिनांक 10/07/2009 या एका वर्षाच्या कालावधीसाठी उतरविला होता. दिनांक 06/07/2009 रोजी अर्जदाराचे वडीलांना त्यांचेकडे आलेल्या पाहुण्यांना तपोवन एक्सप्रेस या गाडीने सोडण्याकरीता सदर वाहन रेल्वे स्टेशन परभणी येथे आणले होते. व त्या ठिकाणाहून सदर वाहन चोरीला गेले. दिनांक 13/07/2009 रोजी नवा मोंढा परभणी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली त्यानंतर अर्जदाराने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन चोरीला गेलेल्या वाहनाची नुकसान भरपाई मिळण्यासाठी दावा गैरअर्जदार विमा कंपनीकडे दाखल केल्यानंतर गैरअर्जदार कंपनीने वारंवार अर्जदाराकडे कागदपत्राची व गाडीची मुळ चावी देण्याची मागणी केली अर्जदाराने गैरअर्जदाराच्या सुचनेनुसार सर्व कागदपत्राची पुर्तता करुन व सर्व बाबींचा खुलासा करुन देखील गैरअर्जदार विमा कंपनीने दिनांक 20/01/2010 रोजी अर्जदाराने गाडी पार्क करतांना योग्यती खबरदारी न घेतल्यामुळे पॉलीसीच्या अटी व शर्तीचा भंग झाल्याच्या कारणास्तव अर्जदाराचा क्लेम नामंजुर केला अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे यावर गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, गैरअर्जदार कंपनीच्या इनव्हेस्टीगेटरने केलेल्या तपासामध्ये अर्जदाराने रेल्वे स्टेशन जवळ गाडी पार्क करतांना गडबडीत चावी गाडीलाच विसरुन राहिल्याचे शाबीत झाल्यामुळे पॉलीसीच्या अटी व शर्तीचा भंग झालेला आहे व तसेच वारंवार मागणी करुन ही अर्जदाराने गाडीची दुसरी मुळ चावी व कागदपत्राची पुर्तता केलेली नाही.सदर प्रकरणाचा निर्णय घेतांना मंचासमोर अर्जदार व गैरअर्जदार विमा कंपनीने दाखल केलेल्या कागदपत्राची पाहाणी केली असता काही बाबी आढळून आल्या त्या येथे नमुद करणे गरजेचे आहे. त्या अशा (1) तक्रार अर्जात, शपथपत्र (नि.2) व पहिली खबर( नि.4/4) अर्जदाराचे वडील त्यांच्या पाहुण्यांना सोडण्यासाठी सदर वाहन घेवुन गेल्याचे व तेथून ते चोरीला गेल्याचे नमुद केले आहे अर्जदार तिच्या वडीला सोबत घटनास्थळी दिनांक 06/07/2009 हजर असल्याचे कुठेही नमुद करण्यात आलेले नाही. परंतु गैरअर्जदाराने नियुक्त केलेल्या इनव्हेस्टीगेटरने अर्जदार व तिच्या वडीलांच्या घेतलेल्या जबाबाच्या झेरॉक्सप्रती अनुक्रमे नि.13/2 व नि.13/3 वर मंचासमोर दाखल केल्या आहेत यात अर्जदार ही तीच्या वडीला सोबत दिनांक 06/07/2009 रोजी घटनास्थळी हजर असल्याचे नमुद केले आहे तसेच नि.13/4 वर डिक्लेरेशन फॉर्मची झेरॉक्सप्रत लावली आहे.यात ही कॉलम नं 10 मध्ये Name Address, Contact No of the person who parked the vehicle before theft या समोर Self ेेेअसे नमुद करण्यात आले आहे.यावरुन अर्जदार स्वतः दिनांक 06/07/2009 रोजी घटनास्थळी हजर असल्याबाबत साशंकता निर्माण होते. दुसरे असे की, गैरअर्जदाराने सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी इनव्हेस्टीगेटर म्हणून अड. संदीप सरोदे यांची नियुक्ती केली होती व त्यांनी अर्जदार व तिच्या वडीलाचा जबाब घेतले त्याच्या झेरॉक्स प्रती अनुक्रमे 13/2 व 13/3 वर मंचासमोर दाखल केल्या आहेत. त्यात असे नमुद करण्यात आले आहे की, सदर गाडी रेल्वे स्टेशनच्या आवारात उभी केली होती व गडबडीत गाडीची चावी गाडीलाच विसरुन राहिली तदनंतर अर्जदाराने व तिच्या वडीलांनी शपथपत्र ( अनुक्रमे नि.18 व नि.19 ) देवुन सदर विधानाचा इनकार केलेला आहे. परंतु नि.13/4 वर दाखल केलेल्या डिक्लेरेशन फॉर्म वर कॉलम न.11 मध्ये Vehicle was Locked or unlocked या कॉलमच्या समोर unlockedअसे स्पष्टपणे नमुद करण्यात आलेले आहे म्हणजे सदरची गाडी चोरीला गेली त्यावेळेस गाडी Locked होती किंवा unlocked होती हेही मंचासमोर स्पष्ट झालेले नाही.तसेच इनव्हेस्टीगेटर अड.एस.जी.सरोदे यांनी अर्जदाराचे व तिच्या वडीलांचा जबाब दिनांक 11/07/2009 रोजी घेतल्याचे व अनुक्रमे नि.13/2 व नि.13/3 वरुन दिसून येते परंतु त्याने शपथपत्र नि.15/1 वर दाखल केले त्यात दिनांक 17/07/2009 या रोजी अर्जदाराचे व तिच्या वडीलांचे जबाब घेतल्याचे नमुद केले आहे. म्हणजे जबाब नेमके कोणत्या तारखेस घेण्यात आले हे सुध्दा स्पष्ट झालेले नाही. तसेच सदर घटना दिनांक 06/07 2009 रोजी घडली म्हणजे त्या दिवशी सदर वाहानाची चोरी झाली परंतु दिनांक 13/07/2009 रोजी नवा मोंढा पोलीस स्टेशन परभणी येथे फिर्याद दाखल केली म्हणजे घटना घडल्यानंतर तब्बल 7 दिवसांनी फिर्याद दाखल केलेली आहे हा विलंब वाजवी पेक्षा जास्त झालेला असल्यामुळे वस्तुस्थिती मंचासमोर येऊ शकली नाही असे मंचास वाटते म्हणून सदरच्या प्रकरणाचा निर्णय घेतांना सखोल तोंडी पुराव्याची आवश्यकता असल्यामुळे अशी प्रकरणे मंचच्या संक्षिप्त चौकशीचा विषय होऊ शकत नाही.असे मंचाचे मत आहे. मा.राष्ट्रीय आयोगाने रिपोर्टेड केस 2009 CTJ /NC/1651(Feb)- Rajcello Chem Products Vs Punjab sind Bank – Proceedings before forum are summary- Complex factual position should be examind by appropriate court of laws. यामध्ये व्यक्त केलेले मेत सदर प्रकरणातही लागु होते.अर्जदाराच्या वतीने (1) मा.राष्ट्रीय आयोगाचे रिपोर्टेड केस 2007(3) CPR 1 NC पंजाब राज्य आयोग रिपोर्टेड केस 1998(2) CPR 48 (3) मा.प.बंगाल राज्य आयोग रिपोर्टेड केस IV (2008) CPJ 506 मंचासमोर दाखल करण्यात आलेल्या आहेत.तसेच गैरअर्जदारच्या वतीने मा.महाराष्ट्र राज्य आयोग मा.राष्ट्रीय आयोग व मा.सर्वोच्च न्यायालयाचे सायटेशन दाखल केलेले आहे.परंतु मंचाने प्रकरणाचा मेरीटवर अंतिम निकाल दिलेला नसल्यामुळे व प्रस्तुत वादाचा दिवाणी कोर्टामार्फत दाद मागणे न्यायोचित असल्याचे मंचाचे मत झाल्यामुळे दोन्ही बाजूकडचे दाखल केलेले केसलॉ विचारात घेतलेले नाही. परंतु त्यासर्व रिपोर्टेड केसमध्ये व्यक्त केलेल्या मतांचा आदर राखून आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोंत. आदेश 1 अर्जदार याने योग्य त्या न्यायालयात प्रकरण दाखल करुन दाद मागावी. 2 संबंधीतांना आदेश कळविण्यात यावा. श्रीमती अनिता ओस्तवाल. सौ.सुजाता जोशी. श्री.सी.बी.पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |