(मंचाचे निर्णयान्वये, श्री.सादिक मो.जव्हेरी, मा.सदस्य) (पारीत दिनांक : 08.04.2011) अर्जदाराने, सदर दरखास्त गैरअर्जदार/आरोपी यांनी तक्रार क्र.58/10 आदेश दि.21.8.10 चे पालन केले नाही, म्हणून ग्राहक सरंक्षण कायद्याचे कलम 27 अन्वये गैरअर्जदारास जास्तीत जास्त दंडात्मक शिक्षा होण्याकरीता दाखल केली आहे. दरखास्त नोंदणी करुन गैरअर्जदार/आरोपी यास समन्स काढण्यात आले. परंतू, दरखास्त मंचात न्यायप्रविष्ठ असतांना आणि गैरअर्जदार/आरोपी हजर होण्याचे पूर्वीच अर्जदार व त्याचे वकील यांनी हजर होऊन नि.5 नुसार पुरसीस दाखल करुन, दरखास्त पुढे चालवयाची नसल्याचे सांगितले. अर्जदारास, नि.5 मधील मजकुराबाबत विचारणा केले असता, त्यांनी मान्य केले. अर्जदाराने, नि.5 चे पुरसीस नुसार दरखास्त, आरोपी/गैरअर्जदार यांचे विरुध्द पुढे चालवू इच्छित नसल्यामुळे परत घेण्याची परवानगी मागीतले आहे. सबब, अर्जदाराने दरखास्त परत घेतल्यामुळे दरखास्त अंतिमतः निकाली काढून खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यांत येत आहे. // अंतिम आदेश //
अर्जदाराची दरखास्त परत घेतल्यामुळे खारीज. (By way of withdrawal )
| | [HONABLE MRS. Adv. Varsha Jamdar] MEMBER[HONORABLE Shri Anil. N.Kamble] PRESIDENT[HONORABLE Shri Sadik M. Zaweri] Member | |