Maharashtra

Kolhapur

CC/17/75

Suresh Maruti Gharal - Complainant(s)

Versus

Branch Manager,Bajaj Aliance Insurance Co.Ltd. - Opp.Party(s)

R.N.Powar

29 Nov 2018

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/17/75
( Date of Filing : 15 Feb 2017 )
 
1. Suresh Maruti Gharal
Gharalwadi,Tal.Karad,
Satara
...........Complainant(s)
Versus
1. Branch Manager,Bajaj Aliance Insurance Co.Ltd.
D/3,4,2nd floor,Royal Prastidge,Syics Extenssion,
Kolhapur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 29 Nov 2018
Final Order / Judgement

न्‍या य नि र्ण य

(व्‍दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्‍या)

 

1.     तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे.  तक्रार अर्जातील थोडक्‍यात कथन पुढीलप्रमाणे—

  

      तक्रारदार यांचे मालकीची स्‍वीफ्ट कार क्र.एमएच-46-एन.4874 असून तिचा विमा वि.प.विमा कंपनीकडे उतरविलेला आहे.  सदर पॉलिसीचा क्र. ओजी-16-1905-18010000-1523 असा असून कालावधी दि. 13/6/15 ते 12/6/16 असा होता.  सदरची कार तक्रारदार यांनी श्री योगेश पै यांचेकडून खरेदी केली होती. त्‍यामुळे सदरची विमा पॉलिसीही श्री योगेश पै यांनी उत‍रविलेली होती.  तक्रारदारांनी सदरची कार खरेदी केलेनंतर सदर विमा पॉलिसी स्‍वतःचे नावावर होणेकरीता वि.प. यांचे सातारा शाखेत दि. 11/3/16 रोजी कळविले होते.  ता. 15/3/16 रोजी सदरचे कारचा अपघात झाला.  त्‍यामध्‍ये कारचे नुकसान झाले.  सदरची बाब विमा कंपनीला कळविलेनंतर त्‍यांनी सर्व्‍हेअर नेमून कारची पाहणी केली. त्‍यांनी कारचे रु.1,20,000/- इतके नुकसान झालेबाबत रिपोर्ट सादर केला.  तदनंतर तक्रारदार यांनी विमा कंपनीकडे विमा क्‍लेम सादर केला.  परंतु वि.प. कंपनीने दि. 4/11/16 रोजीच्‍या पत्राने पॉलिसीप्रमाणे सर्व्‍हेअर यांना गाडीचा मालक बदलतेवेळी पूर्वतपासणीचे वेळी दाखविलेली गाडी व अपघातानंतर तपासणीच्‍या वेळी नुकसान झालेली गाडी वेगळीच दाखविली आहे अशी त्रुटी दाखवून नुकसानभरपाई देण्‍याचे टाळले आहे.  सदरची गाडी आजरोजी ओम गणेश मोटर्स, कोल्‍हापूर येथे विनादुरुस्ती पडलेली आहे.  त्‍याचा दुरुस्‍ती खर्च कोटेशनप्रमाणे रक्‍कम रु.5,29,000/- दर्शविलेला आहे. सदरचे वाहनाची Insured Declared Value रु.2,65,497/- इतकी आहे.  त्‍यामुळे वि.प. कंपनीने सदरची रक्‍कम गाडी दुरुस्‍तीकरिता तक्रारदारांना देणे आवश्‍यक आहे.  सबब, तक्रारदारास विमा कंपनीडून नुकसान भरपाईपोटी रु.2,65,497/- मिळावेत, सदर रकमेवर 12 टक्‍केप्रमाणे व्‍याज मिळावे, मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.20,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु. 10,000/- देणेचा आदेश वि.प. यांना व्‍हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. 

 

2.    तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्‍हीट, कागदयादी सोबत क्‍लेम नामंजूरीचे पत्र, तक्रारदाराने वि.प. यांना मालकी हक्‍क बदलाबाबत दिलेले पत्र  इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.  तसेच तक्रारदाराने पुराव्‍याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.

 

3.    वि.प. यांनी याकामी दि.20/4/17 रोजी तक्रारदाराचे तक्रारअर्जास म्‍हणणे दाखल केले आहे.  वि.प. यांचे कथनानुसार, तक्रारदाराने वि.प. यांना तथाकथित नुकसानीबाबत उशिरा कळविले व वाहन जागेवरुन काढलेले होते. त्‍यामुळे वि.प. यांना वस्‍तुस्थिती पाहायची संधीच मिळाली नाही.  तसेच जो सर्व्‍हे झाला तो गॅरेजमध्‍ये त्रयस्‍थ सर्व्‍हेअरने केला होता.  तक्रारदाराने कोणत्‍याही प्रकारची पोलीसमध्‍ये अपघात नोंद केली नव्‍हती. अपघातात कोणीही जखमी झालेले दिसले नाही व तशा प्रकारची कागदपत्रेही तक्रारदाराने दिलेली नाहीत. क्‍लेमची कारवाई करता असे आढळले की, तक्रारदाराचे नांवे पॉलिसी करणेपूर्वी वाहनाची तपासणी करताना दाखवलेले वाहन व तथाकथित अपघातग्रस्‍त वाहन हे वेगवेगळे आहेत.  सबब, तक्रारदार चुकीचा क्‍लेम मिळवायचा प्रयत्‍न करत होते व आहेत.  म्‍हणून वि.प. यांनी याबाबत दि. 20/10/16 व 4/11/16 रोजी पत्र पाठवून तक्रारदाराकडून स्‍पष्‍टीकरण मागविले परंतु त्‍याबाबत कोणताही खुलासा तक्रारदाराने न केल्‍याने तक्रारदाराचा क्‍लेम योग्‍य कारणासाठी वि.प. यांनी नाकारला आहे.  योग्‍य कायदेशीर कारणांसाठीच तक्रारदारांचा क्‍लेम देण्‍यास वि.प. जबाबदार नाही.  सबब, तक्रारअर्ज खर्चासह नामंजूर करण्‍यात यावा अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.

 

4.    वि.प. यांनी याकामी कागदयादीसोबत एकूण 13 कागदपत्रे व वाहनाचे फोटोही दाखल केले आहेत.  तसेच पुराव्‍याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.

 

5.   तक्रारदारांचा तक्रारअर्ज, वि.प. यांचे म्‍हणणे, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, पुराव्‍याचे शपथपत्र यांचा विचार करता निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

अ. क्र.

                मुद्दा

उत्‍तरे

1

वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्‍या सेवेत त्रुटी केली आहे काय ?     

होय.

2

तक्रारदार हे नुकसान भरपाईची रक्‍कम मिळणेस पात्र आहेत काय ?

होय.

3

तक्रारदार हे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्‍कम मिळणेस पात्र आहेत काय ?

होय.

4

अंतिम आदेश काय ?

अंशतः मंजूर.

 

कारणमिमांसा

 

मुद्दा क्र. 1

 

6.    तक्रारदार यांचे मालकीची स्‍वीफ्ट कार क्र.एमएच-46-एन.4874 असून तिचा विमा वि.प.विमा कंपनीकडे उतरविलेला आहे.  सदर पॉलिसीचा क्र. ओजी-16-1905-18010000-1523 असा असून कालावधी दि. 13/6/15 ते 12/6/16 असा होता.  सदरची कार तक्रारदार यांनी श्री योगेश पै यांचेकडून खरेदी केली होती. त्‍यामुळे सदरची विमा पॉलिसीही श्री योगेश पै यांनी उत‍रविलेली होती.  तक्रारदारांनी सदरची कार खरेदी केलेनंतर सदर विमा पॉलिसी स्‍वतःचे नावावर होणेकरीता वि.प. यांचे सातारा शाखेत दि. 11/3/16 रोजी कळविले होते.  ता. 15/3/16 रोजी सदरचे कारचा अपघात झाला.  त्‍यामध्‍ये कारचे नुकसान झाले.  सदरची बाब विमा कंपनीला कळविलेनंतर त्‍यांनी सर्व्‍हेअर नेमून कारची पाहणी केली. त्‍यांनी कारचे रु.1,20,000/- इतके नुकसान झालेबाबत रिपोर्ट सादर केला.  तदनंतर तक्रारदार यांनी विमा कंपनीकडे विमा क्‍लेम सादर केला.  परंतु वि.प. कंपनीने दि. 4/11/16 रोजीच्‍या पत्राने पॉलिसीप्रमाणे सर्व्‍हेअर यांना गाडीचा मालक बदलतेवेळी पूर्वतपासणीचे वेळी दाखविलेली गाडी व अपघातानंतर तपासणीच्‍या वेळी नुकसान झालेली गाडी वेगळीच दाखविली आहे अशी त्रुटी दाखवून नुकसानभरपाई देणेचे टाळले.  सबब, तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे विमा हप्‍त्‍याची रक्‍कम भरुन देखील वि.प. यांनी तक्रारदार यांना सदर वाहनाचे नुकसान भरपाईची रक्‍कम देणेस टाळाटाळ करुन तक्रारदार यास द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ?  हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो.  त्‍याअनुषंगाने दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी पूर्व मालक श्री योगेश पै यांचेकडून सदरचे वाहन खरेदी केलेले असून ता. 15/1/16 रोजी तक्रारदार यांचे नावाची आर.टी.ओ. पत्रकी मालक या सदराखाली नोंद झालेचे पत्र तक्रारदार यांनी दाखल केलेले आहे.  त्‍यानुसार ता.11/3/16 रोजी वि.प. कंपनी सातारा येथे सदरची पॉलिसी तक्रारदार यांचे नावे होणेबाबत रितसर कळविलेचे पत्र दाखल केलेले आहे.  सदरची कागदपत्रे वि.प. यांनी नाकारलेली नाही.  त्‍याकारणाने सदरचे वाहन तक्रारदार यांचे मालकीचे होते हे स्‍पष्‍टपणे दिसून येते.

 

7.    वि.प. यांचे लेखी म्‍हणणेचे अवलोकन केले असता सदरचे अपघाताची माहिती तक्रारदार यांनी उशिरा दिली. वाहन अपघात स्‍थळावरुन काढलेले होते, त्‍यामुळे वि.प. यांना वस्‍तुस्थिती पहायची संधी मिळाली नाही.  तक्रारदार यांनी अपघात नोंद केलेली नाही. त्‍या प्रकारची कागदपत्रे तक्रारदार यांनी दिली नाहीत.  वि.प. यांनी ता. 6/1/18 रोजी दाखल केलेल्‍या पत्राचे अवलोकन केले असता, सदरचे पत्र तक्रारदार यांनी वि.प. यांना ता. 25/4/16 रोजी पाठविलेले असून सदर पत्राने तक्रारदार यांनी वि.प. यांना सदर पत्राने अपघाताचे इंटीमेशन दिलेले आहे.  I was alone in car and while proceeding, front going truck stopped suddenly, Consequently, in panic, I steered aside to avoid dash but lost control and dashed on roadside.  I was occupied with some another familiar problem which was so serious than car accident.  सदर पत्रावरुन तक्रारदार यांनी वि.प. यांना सदरचे अपघाताची कल्‍पना दिलेली आहे.  सदर अपघातात तक्रारदार हे एकटेच होते हे दिसून येते.  सदरचे वादातील वाहनाचा अपघात झालेची बाब वि.प. यांनी नाकारलेली नाही.      तक्रारदार यांनी सदर अपघाताची नोंद उशिरा कळविलेने पॉलिसीतील अटींचा भंग केलेला आहे.  सदर मुद्याचे अनुषंगाने हे मंच तक्रारदार याने दाखल केलेल्‍या पुढील न्‍यायनिवाडयांचा आधार घेत आहे.

 

  1. 2017 ACJ 2747 (SC)

Om Prakash Vs. Reliance General Insurance Co.Ltd.

 

Motor insurance – whether the Forum under Consumer Protection Act were justified in rejecting the complaint of owner when delay in giving information to insurance company was due to unavoidable circumstance and satisfactorily explained – Held Yes – Insurance company is directed to pay Rs. 7,85,000/- towards claim and Rs.50,000/- towards compensation.

 

  1. IV (2015) CPJ 428 (NC)

Bajaj Allianz General Life Insurance Co.Vs. Krishna Devi

 

सदर तक्रारीमध्‍ये तक्रारदार यांनी वि.प. यांना सदरचे अपघाताची इंटीमेशन उशिरा देणेस का विलंब झाला हे कळविले होते.  त्‍या कारणाने सदरच्‍या मा. उच्‍च न्‍यायालयाच्‍या निवाडयाचा विचार करता तक्रारदार यांचा क्‍लेम वि.प. यांना केवळ Delay information या कारणास्‍तव नाकारता येणार नाही असे या मंचाचे मत आहे.

 

8.    वि.प. यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणेमध्‍ये तक्रारदारांचे नावे पॉलिसी काढणेपूर्वी वाहनाची तपासणी (Pre-inspection) करताना दाखविलेले वाहन व अपघाती वाहन हे वेगवेगळे होते.  त्‍याअनुषंगाने वि.प. यांनी दि. 6/1/18 रोजी अ.क्र.4 ला तक्रारदार यांचे नावे पॉलिसी काढणेपूर्वी वाहनाची तपासणी करताना दाखवलेले वाहनाचे फोटो दाखल केलेले आहेत.  सदरचे फोटो ता.10/3/16 रोजीचे आहेत.  ता.19/7/18 रोजी वि.प. यांनी पुराव्‍याचे शपथपत्रासोबत सर्व्‍हेअर यांनी घेतलेले फोटो दाखल केले आहेत.  वि.प. यांनी त्रयस्‍थ सर्व्‍हेयर सरदार पाटील यांचेकडून सदरचे वाहन तपासून तांत्रिक रिपोर्ट दाखल केला आहे व त्‍यानुसार पुरावा शपथपत्र दाखल केले आहे.  सदर तांत्रिक रिपोर्टचे मंचाने अवलोकन केले असता सदर वाहनाचे बाहयस्थिती वेगवेगळे दिसतात जसे की, (अ) तपासणी करताना दाखवलेल्‍या कारच्‍या दरवाजाला वरील बाजून Door Sun Visor आहेहत जे की अपघातग्रस्‍त वाहनाला नाहीत.   (आ) तपासणी करताना दाखवलेल्‍या कारच्‍या दरवाजाला मध्‍यावर असलेले Door Moldings हे बारीक व थोडे निघत असलेले दिसतात पण अपघातग्रस्‍त वाहनाला जाड आहेत. (इ) तपासणी करताना दाखवलेल्‍या कारच्‍या पुढील बाजूच्‍या डाव्‍या हाताच्‍या चाकाच्‍या वरील पार्ट LH Fender चेपलेला आहे व अपघातग्रस्‍त वाहनाचा तोच पार्ट नीट आहे. (ई) तपासणी करताना दाखवलेल्‍या कारच्‍या फयूएल कॅप (Fuel Lead Cap) वर स्‍टीकर नाही जे की अपघातग्रस्‍त वाहनाला आहे.  (उ) तपासणी करताना दाखवलेल्‍या कारच्‍या पुढील बाजूच्‍या काचेवर डाव्‍या हाताच्‍या वरील बाजूस स्‍टीकर आहे जे की अपघातग्रस्‍त वाहनाला नाही.  असे सदरचे तांत्रिक रिपोर्टमध्‍ये नमूद आहे. तथापि सदर साक्षीदार सरदार पाटील यांचे पुराव्‍याचे शपथपत्राचे अवलोकन केले असता सदरचे वाहनाची मी केवळ तांत्रिकदृष्‍टया तुलना केली आहे व याकामी सदरचे वाहनाचे आर.टी.ओ. कागदपत्रे अथवा रजिस्‍ट्रेशन नंबर अथवा इंजिन, चासीस नंबर याची मला माहिती नाही असे नमूद आहे.

 

9.    प्रस्‍तुतकामी मंचाने वि.प. यांनी दाखल केलेल्‍या Pre-inspection report, provisional Survey Report यांचे अवलोकन केले असता सदरचे वाहनाचा Chasis No. 705662, Engine No. 1629365  असा एकसारखा आहे.   वादातील वाहनाचे सदरचे चासीस नंबर व इंजिन नंबर वि.प. यांनी नाकारलेले नाहीत.  त्‍याकारणाने तक्रारदारांचे नांवे पॉलिसी काढणेपूर्वी वाहनाची तपासणी करताना दाखवलेले वाहन व अपघाती वाहन हे वेगवेगळे आहेत ही वि.प. यांची कथने केवळ सदर वाहनाचे तांत्रिक रिपोर्टवरुन केलेली आहेत, त्‍यास कोणताही सबळ पुरावा नाही.  सदरचे आर.टी.ओ. कागदपत्रे, रजिस्‍ट्रेशन नंबर, चासीस नंबर व इंजिन नंबर यावरुन पॉलिसी करणेपूर्वी तक्रारदारांचे नावे असलेले वाहन व अपघाती वाहन हे एकच असलेचे शाबीत होते.  त्‍याकारणाने वि.प. यांनी अपघातानंतर तपासणीचे वेळी नुकसान झालेले वाहन वेगळे दाखविलेले आहे अशी त्रुटी दाखवून तक्रारदारास सदर वाहनाचे अपघातापोटी नुकसान भरपाई आजतागायत अदा न करुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.  सबब, मुद्दा क्र.1 चे उत्‍तर हे मंच होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.2 व 3     

 

10.   उपरोक्‍त मुद्दा क्र.1 मधील विस्‍तृत विवेचनाचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे.  प्रस्‍तुतकामी वि.प. यांनी गॅरेजमध्‍ये केलेल्‍या सर्व्‍हेप्रमाणे रु.1,20,487/- इतकी प्रोव्‍हीजनल असेसमेंट केलेली आहे.  सदरचा provisional Survey Report वि.प. यांनी मंचात दाखल केलेला आहे.  त्‍याचे अवलोकन केले असता, Due to heavy frontal impact, there is a possibility of engine parts damages.  The kept open parts are not considered in the assessment.  The IDV of above accidental IV is Rs.2,65,497/- so kindly advice subjected to your confirmation.  We have sending you the preliminary survey report without dismantling the IV.  The cost of parts quoted are approx. and are subject to submission and verification of final bill or cash receipt.  सदर अहवालावरुन सर्व्‍हेअर यांनी अधिकृत गॅरेजने दिलेली रिपेअरी इस्टिमेट संयुक्तिक कारण न देता नाकारलेचे दिसून येते.  त्‍याअनुषंगाने हे मंच तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या पुढील न्‍यायनिवाडयाचा आधार घेत आहे. 

 

1)  2009 (4) CPJ 230 (NC)

     Oriental Insurance Co.Ltd. Vs. Mehar Chand

 

      Surveyor’s report – motor accident claim – vehicle badly damaged – Estimated cost of repairs given by authorized garage not accepted by surveyor – contention authorised garages normally give inflated estimate, not acceptable – surveyor required to give sound and cogent reasons for disallowing estimate claim – No reason given by surveyor disallowing estimated claim given by authorized garage – claim allowed by State Commission.

 

2)  IV 2009 ACC 356 (SC)

     New India Assurance Co.Ltd. Vs. Pradeep Kumar

 

     Surveyor report has not last and final word – It may be basis for settlement of claim but neither binding upon insurer nor insured. - Complainant’s claim accepted by Consumer Fora as duly supported by original vouchers, bills and receipts – No interference required in appeal.

 

प्रस्‍तुत न्‍यायनिवाडयातील तत्‍वे ही सदरचे तक्रारीस साम्‍य दर्शवितात याचा विचार करता, सदरचा सर्व्‍हेअर यांनी दिलेला अहवाल हे मंच ग्राहय धरीत नाही.

 

11.   प्रस्‍तुतकामी दाखल विमा पॉलिसी प्रतीवरुन अपघातग्रस्‍त वाहनाची Insured Declared Value (IDV) रु. 2,65,497/- इतकी असून सदर रकमेनुसार तक्रारदार यांनी प्रिमियम भरलेला आहे.  प्रस्‍तुतकामी ओम गणेश मोटार यांचे ता. 25/4/16 रोजीचे सदरचे वाहन दुरुस्‍तीकरिता रु.5,29,000/- चे इस्टिमेट दाखल केलेले आहे.  तक्रारदाराने त्‍यांचे पुराव्‍याचे शपथपत्रामध्‍ये सदरचे वाहनाचे संपूर्ण नुकसान झालेचे कथन केले आहे.  प्रस्‍तुतकामी सदरचे अपघातग्रस्‍त वाहन तक्रारदार यांनी दिलावर गुलाब हकीम यांना रक्‍कम रु.90,000/- या किंमतीस व्रिक्री केलेची कागदपत्रे दाखल केली आहेत.  सदरची विक्री केलेची बाब वि.प. यांनी नाकारलेली नाही.  त्‍या कारणाने तक्रारदार यांचे सदर वाहनाचे Insured Declared Value (IDV) रु. 2,65,497/- (वजा) रु.90,000/- = रु.1,75,497/- इतके नुकसान झालेचे स्‍पष्‍टपणे दिसून येते.  सबब, तक्रारदार हे वि.प. यांचेकडून अपघातग्रस्‍त वाहनाची नुकसान भरपाईची रक्‍कम रु.1,75,497/- इतकी मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.  प्रस्‍तुत कामी वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने तक्रारदार यांना मानसिक त्रास व शारिरिक त्रास झाला तसेच सदरचे तक्रारअर्जासाठी खर्च करावा लागला.  त्‍याकारणाने तक्रारदार हे वि.प. यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.8,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.3,000/- मिळणेस पात्र आहेत.  सबब, मुद्दा क्र.2 व 3 चे उत्‍तर हे मंच होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.4  -  सबब आदेश.

 

 

- आ दे श -                     

 

 

  1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो. 

 

  1. वि.प.यांनी तक्रारदारास अपघातग्रस्‍त वाहनाचे नुकसान भरपाईपोटी रक्‍कम रु. 1,75,497/- अदा करावी व सदर रकमेवर दाखल तारीख 20/07/17 पासून सदरची संपूर्ण रक्‍कम तक्रारदार यास मिळेपावेतो द.सा.द.शे. 9 टक्‍के प्रमाणे व्‍याज अदा करावे.

 

  1. वि.प. यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.8,000/- (रक्‍कम रुपये आठ हजार मात्र) व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.3,000/- (रक्‍कम रुपये तीन हजार मात्र) अदा करावी. 

 

  1. वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.

 

  1. विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 25 व 27 प्रमाणे वि.प. विरुध्‍द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.

 

  1. आदेशाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठवाव्‍यात.

 

 

 

 
 

 

 
 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.