निकाल
(घोषित व्दारा - श्री.सुहास एम.आळशी, सदस्य)
दि. 28.09.2016
तक्रारदार याने त्याच्या तक्रार अर्जात असे नमुद केले आहे की, गैरअर्जदार हे ऑनलाईनद्वारे वस्तु विक्री करतात, तक्रारदाराने गैरअर्जदार यांच्या वेबसाईटवर दिनांक 18.2.2016 रोजी भेट के.एल.व्ही. 40 आर 5, 62 सी. 101, 6 से.मी फूल एच.डी. स्मार्ट एल.ई.डी टि व्ही ज्याची किंमत रु. 2199 मध्ये डिस्काऊंट किमतीत विक्री करण्याची जाहिरात प्रसिध्द केली त्यानुसार तक्रारदाराने सदर टि.व्ही ची किंमत रु. 2199 ऑनलाईनवरुन गैरअर्जदार यांना एस.बी.आय. बॅकेतील खात्याद्वारे दिली, गैरअर्जदाराने तक्रारदारास 5 टक्के डिसकाऊंट रक्कम देऊन 2089 एवढी रक्कम स्विकारली. गैरअर्जदाराने तक्रारदारास दिलेला ऑर्डर क्र.आय.डी.क्र. 9772626 असा आहे.
त्यानंतर दि. 19.12.2016 रोजी गैरअर्जदार यांनी तक्रारदारास मोबाईलवर संदेश पाठविला व काही तांत्रिक कारणाने तक्रारदाराने दिलेली ऑर्डर रद्द केली व 5 ते 7 दिवसांनी तक्रारदाराची रक्कम परत करण्यात येईल असे सांगितले. गैरअर्जदार याने दि. 23.02.2016 रोजी तक्रारदारास रक्कम रु. 2089 परत पाठविले व टि.व्ही. दिला नाही त्यामुळे तक्रारदारास वर वर्णनित टी.व्ही रु. 2199 ही रक्कम स्विकारुन देण्यात यावा, शारीरीक मानसिक त्रासापोटी 25000 व प्रकरणाचाखर्च रु. 5000 देण्यात यावा, अशी तक्रारदाराची तक्रार आहे. सदर तक्रारीसोबत तक्रारदाराने ऑर्डर कन्फर्मेशन मेसेजेसच्या कॉपिज व इतर दस्त जोडले आहेत.
या बाबत गैरअर्जदार यांना नोटीस काढण्यात आली त्यांनी सदर प्रकरणात त्याचे लेखी म्हणणे न दिल्याने त्यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्यात आले.
सदर प्रकरणात तक्रारदार यांनी दाखल केलेल्या दस्तऐवजांचे व लेखी जबाबाचे अवलोकन केले असता खालील मुद्दे मंचासमक्ष विचारार्थ येतात.
मुददे उत्तर
1) गैरअर्जदार यांनी तक्रारदारास चुकीची सेवा
दिली आहे काय? होय.
2) आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमीमांसा
मुद्दा क्र. ः- 1 तक्रारदार यांनी जी तक्रार दाखल केलेली आहे त्याचे अवलोकन केले असता असे दिसते की, तक्रारदार व गैरअर्जदार यांचा वाद गैरअर्जदार यांच्या वेबसाईटवर दिनांक 18.2.2016 रोजी के.एल.व्ही. 40 आर 5, 62 सी. 101, 6 से.मी फूल एच.डी. स्मार्ट एल.ई.डी टि व्ही ज्याची किंमत रु. 2199/- मध्ये डिस्काऊंट किमतीत विक्री करण्याची जाहिरात प्रसिध्द केली, तक्रारदाराने टि.व्ही ची किंमत रु. 2199/- ऑनलाईनवरुन गैरअर्जदार यांना एस.बी.आय. बॅकेतील खात्याद्वारे दिली, गैरअर्जदाराने तक्रारदारास 5 टक्के डिसकाऊंट रक्कम देऊन 2089/- एवढी रक्कम स्विकारली, दि. 19.12.2016 रोजी गैरअर्जदार यांनी तक्रारदारास मोबाईलवर संदेश पाठविला व काही तांत्रिक कारणाने तक्रारदाराने दिलेली ऑर्डर रद्द केली व दि. 23.02.2016 रोजी तक्रारदारास रक्कम रु. 2089/- परत पाठविले व टि.व्ही. दिला नाही, या बाबत आहे. तक्रारदाराने दि. 18.02.16 रोजी रक्कम पाठविल्यानंतर त्वरीत दि. 19.02.16 रोजी गैरअर्जदार यांनी मेसेज पाठवुन तांत्रिक कारणाने तक्रारदाराची रक्कम परत करण्यात येत असल्याबाबत कळविले आहे.दि. 23.02.16 रोजी रक्कम रु. 2089 परतही केलेली आहे. त्यामुळे गैरअर्जदार यांनी त्यांची झालेली चुक कबुल केलेली आहे व तक्रारदाराशी व्यवहार करतेवेळी त्यांनी जाणूनबुजून सदरची चुक केली असे दिसुन येत नाही. परंतु गैरअर्जदार यांनी चुकीची जाहिरात दिल्यामुळे तक्रारदाराने सदर रक्कम पाठविली व ती गैरअर्जदार यांनी दि. 18..02.16 ते 23.2.16 या कालावधीत वापरली आहे. त्यामुळे थोडयाफार प्रमाणात गैरअर्जदार यांची चुक आहे, असे मंचाचे मत आहे. त्यामुळे मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी देऊन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
2) गैरअर्जदार यांची रक्कम रु. 2080/- दि. 18..02.16 ते 23.2.16 या
कालावधीत वापरली व त्याला मानसिक त्रास झाला त्यामुळे एकत्रित नुकसान
भरपाई रु. 1000/- द्यावे.
3) तक्रारीच्या खर्चापोटी गैरअर्जदार यांनी तक्रारदारास रु. 500/- द्यावेत.
4) वरील आदेशाचे पालन या आदेशाचे दिﵔनांकापासून 30 दिवसाचे आत करावे.
श्रीमती एम.एम.चितलांगे श्री. सुहास एम.आळशी श्री. के.एन.तुंगार
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जालना