निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 04/07/2011
तक्रार नोदणी दिनांकः- 19/07/2011
तक्रार निकाल दिनांकः- 09/04/2012
कालावधी 08 महिने.21.दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B.
सदस्या सदस्या
सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc.
आशोक पिता नागोराव धबाले. अर्जदार
वय 42 वर्ष.धंदा.शेती. अड.राहूल सराफ.
रा.जांब ता.जि.परभणी.
विरुध्द
शाखा व्यवस्थापक. गैरअर्जदार.
अलाहाबाद बँक.शाखा मौजेजांब.ता.जि.परभणी. अड.विनोद पाटील.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष.
2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
-------------------------------------------------------------------------------------------------------
(निकालपत्र पारित व्दारा श्रीमती. अनिता ओस्तवाल.सदस्या.)
गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिल्याच्या आरोपावरुन अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की,
अर्जदार हा शेतकरी असून त्याची मौजे जांब ता.जि.परभणी येथे गट क्रमांक 279 मध्ये 01 हेक्टर.21 आर शेतजमीन आहे.वर्ष 2002 मध्ये त्याने गैरअर्जदार बँकेत क्रेडीट लोन अकाउंट उघडले होते त्याचा लोन अकाउंट क्रमांक 218 व किसान क्रेडीटकार्ड क्रमांक 0244 प्रदान करण्यात आला त्याने नियमितपणे कर्ज रक्कमेची योग्य प्रकारे परतफेड केली.वर्ष 2007 मध्ये अर्जदारास त्याच्या पूर्वीच्या लोन अकाउंट क्रमांक 218 यास नवीन खाते क्रमांक 10283 प्रदान करण्यात आला.वर्ष 2008-2009 या अर्थसंकल्पात केंद्र सरकाने शेतकरी कर्ज माफी संदर्भातील घोषणा केली. त्यानुसार अर्जदार हा अल्प भुधारक शेतकरी या संज्ञेत मोडतो.तसेच किसान क्रेडीटकार्ड या योजनेतील कर्जमाफी योजनेत समाविष्ट असल्या कारणामुळे अर्जदार यांना सदर योजनेचा लाभ मिळणे क्रमप्राप्त ठरते.दिनांक 29/02/2008 रोजी खात्यावर असणारी अर्जदाराची संपूर्ण कर्जाऊ रक्कम त्याच्या व्याजासह उपरोक्त योजने नुसार कर्जमाफीसाठी पात्र ठरते.सदर कर्जमाफीसाठी अर्जदाराचे कर्ज रक्कम रु.25,000/- आहे.अर्जदाराने अनेक वेळा कर्जमाफी प्रदान करण्यासाठी संपर्क साधला असता गैरअर्जदारांनी त्यास कसलाही प्रतिसाद दिलेला नाही.म्हणून अर्जदाराने मंचासमोर तक्रार दाखल करुन गैरअर्जदाराने अर्जदारास कर्जमाफी प्रदान करावी तसेच शारिरीक व मानसिकत्रास दिल्या बद्दल व सेवात्रुटीपोटी एकुण रक्कम रु.40,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.5,000/- अर्जदारास मिळावे अशा मागण्या मंचासमोर केल्या आहेत.
अर्जदाराने तक्रार अर्जासोबत शपथपत्र नि.2 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.5/1 ते नि.5/8 मंचासमोर दाखल केले.
मंचाची नोटीस गैरअर्जदारास तामील झाल्यानंतर व संधी देवुनही मंचासमोर लेखी निवेदन दाखल न केल्यामुळे त्यांच्या विरोधात No W.S. आदेश पारीत करण्यात आला.
अर्जदाराच्या कैफीयती वरुन खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे. उत्तर
1 अर्जदाराची तक्रार कायदेशिर मुदतीत आहे काय ? नाही.
2 गैरअर्जदाराने अर्जदारास त्रुटीची सेवा दिल्याचे
शाबीत झाले आहे काय ? नाही.
3 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे
मुद्दा क्रमांक 1, 2 व 3.
अर्जदाराने वर्ष 2002 मध्ये किसान क्रेडीटकार्ड या योजनेखाली वेळोवेळी कर्ज घेतले व त्याची नियमितपणे परतफेड केली.अर्जदाराच्या खाते उता-यानुसार दिनांक 29/02/2008 रोजी त्याच्या खात्यावर रक्कम रु.25,000/- होती व तो अल्प भुधारक असल्यामुळे व किसान क्रेडीटकार्ड या योजनेखाली कर्ज घेतल्यामुळे त्यास केंद्र व महाराष्ट्र राज्य सरकारने जाहिर केलेल्या कर्जमाफी धोरणाचा फायदा मिळावयास हवा होता व त्यानुसार गैरअर्जदार बँकेने त्याचे कर्जमाफ केले नाही. अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे.यावर मंचाचे असे मत आहे की, अर्जदाराची तक्रार कायदेशिर मुदतीत दाखल झालेली नाही. ग्राहक संरक्षण कायदा कलम 24(अ)(1) नुसार वादास कारण घडल्यापासून 2 वर्षाच्या आत अर्जदाराने तक्रार मंचासमोर दाखल करावयास हवी होती. अर्जदाराच्या कथना नुसार दिनांक 29/02/2008 रोजी अर्जदाराच्या खात्यावर कर्ज रक्कम 25,000/- होती व अर्जदाराने तक्रार जून 2011 रोजी मंचासमोर दाखल केलेली आहे.त्यामुळे अर्जदाराची तक्रार मुदतबाह्य आहे.तसेच अर्जदाराने त्याचे कथन ठोसपणे शाबीत केलेले नाही.त्याचे कर्ज किसान क्रेडीटकार्ड योजने अंतर्गत कर्जमाफी मिळण्यास पात्र ठरते, या संदर्भातील कोणताही पुरावा अथवा शासनाचे परिपत्रक मंचासमोर दाखल केलेले नाही.सबब मुद्दा क्रमांक 1 व 2 चे उत्तर नकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
2 दोन्ही पक्षांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे
सदस्या सदस्या अध्यक्ष.