जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच लातूर यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक – 332/2011 तक्रार दाखल तारीख – 21/12/2011
निकाल तारीख - 06/02/2015
कालावधी - 03 वर्ष , 01 म. 15 दिवस.
- उषाबाई भ्र. धोंडीराम तोरसले,
वय – 40 वर्षे, धंदा – घरकाम,
- शंकर पिता धोंडीराम तोरसले,
वय – 25 वर्षे, धंदा-मजुरी,
- तानाजी पिता धोंडीराम तोरसले,
वय – 22 वर्षे, धंदा – मजुरी,
सर्व रा. महादेव नगर, चिंचोलीराव गाडी,
लातुर, ता.जि.लातुर. ....अर्जदार
विरुध्द
शाखा व्यवस्थापक,
नॅशनल इन्शुरन्स कंपनी मर्या.
हनुमान चौक, मेन रोड,
लातुर. ..गैरअर्जदार
को र म - श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
श्री अजय भोसरेकर, सदस्य
श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- अॅड. डि.एस.हुरदळे/एम.एन.जाधव.
गैरअर्जदारातर्फे :- अॅड.एस.जी.पाटील.
निकालपत्र
(घोषितव्दारा - श्रीमती ए.जी.सातपुते, मा.अध्यक्षा )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
अर्जदाराचे पती मयत धोंडीराम गोविंद तोरसले यांनी त्यांच्या नावे असलेला ट्रक ज्याचा रजि नं. एम.एच. 23/2479 हा गैरअर्जदार कंपनीकडे इन्शुअर्ड केला होता. सदर ट्रक गैरअर्जदार कंपनीकडे इन्शुअर्ड दि. 22/07/2005 ते 21/07/2006 या कालावधीकरीता केला होता. त्याचा पॉलीसी क्र. 630001222 हा होता. विशेषकरुन सदरील ट्रक अपघातात आग लागून संपुर्णपणे जळून गेला होता. त्या अपघताचा दि 09/09/2005 असा आहे. परंतु धोंडीराम गोविंद तोरसले ट्रक मालक हा दि. 24/06/2007 रोजी मयत झाला. म्हणून गैरअर्जदाराचे अर्जदार हे ग्राहक आहेत. धोंडीराम गोविंद तोरसले हा एम.एच. 23/2479 ट्रकचा मालक असल्या कारणाने दि. 08/09/05 रोजी नागपुर येथून चना डाळ, हरभरा डाळचा लोड घेवून बुट्टीबोरी मार्गे सोलापुरला जात असताना दि. 09/09/2005 रोजी ट्रक क्र. 04. जी. 5296 ने समोरुन धडक दिली. त्या कारणाने गाडीस आग लागली आणि गाडीमध्ये हरभरा डाळ, असल्या कारणाने आगीचा आणखीनच भडका उडाला. त्यात ट्रकचे जळून 100 टक्के नुकसान झाले. त्याबाबतचा बोरी स्टेशनला ता. नागपुर ला नोंद झाली. त्याचा एफ.आर.आर नं. 133/05 असा आहे. या अपघातात सदरील ट्रक सी.जी. 04-जी-5296 या ट्रकने एम.एच. 31. 5418 या ट्रकला सुध्दा धडक दिली. सदरील धोंडीराम तोरसले यांनी गैरअर्जदार ट्रकचे अपघातात झालेले नुकसानी बाबत दि. 14/09/2005 रोजी कळविले. त्याचप्रमाणे प्रतिवादी कंपनीच्या सांगण्याप्रमाणे गैरअर्जदार कंपनीस क्लेम फॉर्म भरुन सोबत कागदपत्रे जोडुन दिलेली आहेत. व नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. ज्याचा क्लेम नं. 15/2005 असा आहे. गैरअर्जदाराने सुरुवातीस केवळ तीन कागदपत्रांची पुर्तता करण्यास सांगितले होते. प्रतिवादी कंपनीने सदरील धोंडीराम तोरसले यास दि. 28/10/2005 रोजी पत्राद्वारे कळवले की, सोबत क्लेम फॉर्म पाठवला आहे. फॉर्म भरुन इस्टीमेट पाठवून त्याचे सोबत मागितलेली कागदपत्रे (1) रिपेअर करण्याचे इस्टीमेट (2) नुकसान दाखवणा-या गाडीचे फोटो (3) पोलिस पंचनामा तसा अर्जदाराच्या पतीने सर्व क्लेम फॉर्म भरुन कागदपत्रासह पाठवला विशेष करुन सर्व कागदपत्रे धोंडीराम तोरसले यांनी लातुर येथील इन्शुरन्स कंपनीला दिली. व 100 टक्के जळालेल्या ट्रकला पुन्हा दुरुस्त केले तसे कागदपत्रे जोडून कंपनीला दिले आहेत. तसेच ट्रक ड्रायव्हरचे जागीच लायसंस जळाल्याची नोंद देखील कंपनीस कळविले. परंतु कंपनीने ड्रायव्हींग लायसन्सची मागणी करुन अर्जदाराचा क्लेम दिला नाही. दि. 24/06/2007 रोजी सदरील धोंडिराम तोरसले हे अचानक मयत झाले. यासाठी गैरअर्जदार कंपनीने अर्जदारास काळी कळवले नाही. म्हणून दि. 23/07/11 रोजी कंपनीला नोटीस देवून सदरचा दावा दाखल केला. म्हणून गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास सदरील ट्रकची नुकसान भरपाई रु. 4,50,000/- 18 टक्के व्याजाने दयावी. तसेच शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु. 1,00,000/- मिळवून दयावे.
तक्रारदाराने तक्रारी सोबत रजिस्ट्री परत पावती, इंन्शुरन्स कं. पाठविलेली नोटीस, वारसाचे प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, एफ.आय.आर, इन्क्वेष्ट पंचनामा, मोटार वाहन अपघाता बाबतचा अहवाल, घटनास्थळ पंचनामा, ट्रक दुरुस्तीचा खर्च, इंन्शुरन्स कंपनीचे पत्र, तोरसले यांनी इंन्शुरन्स कं. पाठविलेले पत्र, इंन्शुरन्स कंपनीचे पत्र, अपघातग्रस्त ट्रकचे फोटो इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदाराच्या म्हणण्यानुसार अर्जदाराच्या पतीचा ट्रक क्र. एम.एच. 23 – 2479 हा दि. 09/09/2005 रोजी पुर्णत: जळाला होता. व अर्जदाराच्या पतीचा मृत्यू हा दि. 24/06/2007 रोजी झाला ही बाब गैरअर्जदारास माहिती नाही. व सदरचा ट्रक हा सोलापुरला जात असताना त्यात सर्व प्रकारच्या डाळी भरलेला होता. व त्या ट्रकचा अपघात झाल्यानंतर घटनेची नोंद नागपुर पोलीस स्टेशनला 133/05 असा आहे. तसेच अर्जदाराने विमा कंपनीस तक्रार अर्ज व कागदपत्रे दिले होते हे म्हणणे बरोबर नाही. तसेच सदरचा ट्रक हा अपघातात 100 टक्के जळाला होता हे म्हणणे ही बाब अर्जदाराने सिध्द करावी. व अर्जदाराने विमा कंपनीकडे कागदपत्रे पाठवली व त्याच्या क्लेमचे काहीही उत्तर आले नाही हे म्हणणे सुध्दा चुकीचे आहे. म्हणून अर्जदाराने रु. 4,50,000/- चा जो तक्रार अर्ज केलेला आहे तो खोटा आहे. तरी ही सदरची तक्रार फेटाळण्यात यावी. तसेच सदरची तक्रार ही 2 वर्षे सात महिन्यानंतर दाखल झाली. दि. 29/03/2007 रोजी अर्जदारास कागदपत्रे दाखल करण्यासाठी पत्र पाठवले होते. परंतु अर्जदाराने ती कागदपत्रे दाखल केले नाही. म्हणून सदरची तक्रार योग्य नाही. म्हणून फेटाळण्यात यावी.
मुद्दे उत्तरे
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? होय
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असून अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे. अर्जदाराच्या पतीची गाडी क्र. एम.एच. 23/2479 हीचा विमा पॉलीसी गैरअर्जदाराकडे काढली होती. व त्याचा विमा संरक्षीत केला होता ही बाब गैरअर्जदारास मान्य आहे. तसेच अपघाताच्या वेळेस सदरची पॉलिसी जीवंत होती ही बाब मान्य आहे.
मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असून अर्जदाराच्या पतीचा मृत्यू दि. 24/06/2007 या दिवशी झाला व अर्जदाराच्या मयत पतीच्या ट्रकचा अपघात दि. 09/09/2005 रोजी बोरखेडी कँप वर्धा रोडवर टाटा सुमो आणि मोटार सायकल यांच्यात अपघात झाला असून, जख्मी रोडवर पडुन आहे. माहिती मिळाल्याने घटनास्थळ बोरखेडी कँपकडे गस्त करीत असताना धवळपेठ शिवारात वर्धेकडुन नागपुरकडे ट्रक क्र. CG-04-G-5296 चालकाने लोखंडी अँगल लोड असलेला ट्रक क्र. एम.एच. 31 डब्ल्यू -5418 हा नागपुर वरुन वर्धेकडे जात असता त्या ट्रकचे मागचे उजवे चाकास जोरदार धडक दिल्याने चाकाची लोखंडी डिश वाकली व टायर बर्स्ट झाल्या. लोखंडी अँगलने भरलेल्या ट्रक मागे चना दाळेने लोड असलेला ट्रक क्र. एम.एच. 23 – 2479 चे समोरील ड्रायव्हर भागास जोरदार धडक होवून दोन्ही ट्रकने एकदम पेट घेतला. चना डाळ भरलेल्या ट्रक मधील चालक व कंडक्टर यांनी केबिनमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला त्यामधून कंडक्टर यास आम्ही पोलीस स्टॉफच्या मदतीने केबिनमधुन बाहेर काढले. दोन्ही ट्रकने जास्त पेट घेतल्याने चना डाळ ट्रक मधील ड्रायव्हर हा स्टेरींगमध्ये फसल्याने स्टेरींगमध्ये जागीच मरण पावला अशी घटना घडलेली होती. यात खरोखरच अर्जदाराचा ट्रक हा संपुर्णत: जळालेला होता. सदर केसमध्ये धोंडीराम तोरसले यांनी विमा दावा मिळण्यासाठी भरपुर प्रयत्न केले. परंतु गैरअर्जदाराने दि. 29/03/2007 रोजी कागदपत्रांची मागणी केलेली दिसुन येते. दि. 24/06/2007 रोजी अर्जदाराच्या पतीचा मृत्यू झाला. अर्जदाराच्या पतीने सर्व कागदपत्रे पाठवलेली आहेत. असेच त्यांचे पत्र आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराच्या गाडीचा अपघात दि. 09/09/2005 रोजी झाला. गैरअर्जदाराने कागदपत्रांची मागणी दि. 29/03/2007 रोजी केली. हे विमा कंपनीने दिड वर्षाचा कालावधी कशासाठी लावला हे कळत नाही. तसेच हिच कागदपत्रे पाहिजे होती. तर अर्जदारास क्लेम फॉर्म आल्यानंतर एका महिन्यात मागावयास हवी होती. तसेच सदर कागदपत्रांची मागणी झाल्यानंतरही गैरअर्जदाराने सदरचा क्लेम हा बंद केलेला नाही किंवा फेटाळल्याचे पत्र नाही. म्हणून सदरचा क्लेम हा आजही जीवंत आहे असेच समजण्यात येते. अर्जदारास 2 वर्षे 7 महिन्यानी सदरच्या क्लेमची माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी विलंब माफीचा अर्ज दिलेला आहे. त्यात तिने सदर विमा पॉलिसीच्या मागणी बाबत अनभिज्ञ असल्याचे म्हटले आहे. व या क्लेम बाबत अर्जदारास कळावयास उशीर झालेला आहे. सदरची अर्जदार ही महिला असून, विधवा आहे. त्यामुळे तिचा विलंब माफीचा अर्ज मंजुर यासाठीकरत आहोत की, सज्ञान असलेल्या विमा कंपनीस कागदपत्रांची मागणी अर्जदारास करावयास दीड वर्षाचा कालावधी लागतो व त्यानंतर क्लेमचे उत्तर दिले जात नाही तर निरक्षर व्यक्तीस एवढा उशीर लागणारच हे ग्राहय धरुन अर्जदाराचा विलंब रु. 500/- कॉस्ट लावून मंजुर करत आहोत. पहिले पत्र इन्शुरन्स कंपनीने गाडी रिपेअर करुन बिले दयावेत. व त्यानंतर परत दि. 29/03/2007 रोजी पुन्हा कागदपत्रे दिड वर्षानंतर मागितले यावर गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केल्याचे निष्पन्न होते व अर्जदाराच्या पतीस परत गाडी रिपेअर करण्यास जो खर्च लागला तो रु. 4,50,000/- त्याची बिले अर्जदाराने दाखल केलेली आहे. म्हणून हे न्यायमंच अर्जदाराचा अर्ज मंजुर करत आहे. रु. 4,50,000/- अर्जदारास दि. 28/10/2005 या तारखेपासुन 9 टक्के व्याज देय राहील. जर आदेश प्राप्तीपासुन 30 दिवसात न भरल्यास 12 टक्के व्याज लागू होईल व शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु. 5,000/- देण्यात यावा.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
2) गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास रक्कम रु. 4,50,000/- (अक्षरी
चार लाख पन्नास हजार रुपये फक्त) त्यावर दि. 28/10/2005 या तारखेपासुन 9
टक्के व्याज आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30 दिवसाच्या आत देण्यात यावेत.
3) गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्र. 2 चे पालन मुदतीत न
केल्यास तक्रार दाखल तारखेपासुन त्यावर द.सा.द.शे. 12 टक्के व्याज
देण्यास जबाबदार राहतील.
4) गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास मानसीक व शारिरीक
त्रासापोटी रु. 5,000/-(अक्षरी पाच हजार रुपये फक्त)आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30
दिवसाच्या आत देण्यात यावेत.
(श्री.अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्षा सदस्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर.