ग्राहक तक्रार क्र. 140/2013
अर्ज दाखल तारीख : 17/10/2013
अर्ज निकाल तारीख: 07/03/2015
कालावधी: 01 वर्षे 04 महिने 21 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1) नंदकुमार देवराव जगताप,
वय.सज्ञान, धंदा – व्यापार,
रा.कडकनाथवाडी, ता.वाशी, जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1) शाखा व्यवस्थापक,
बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तेरखेडा,
ता.वाशी, जि. उस्मानाबाद.
2) शाखा व्यवस्थापक,
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
मर्या. सोलापुर शाखा काटेगाव ता. बार्शी जि. सोलापूर. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विदयुलता जे.दलभंजन. सदस्य.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.एस.बी. शिंदे.
विरुध्द पक्षकार क्र.1 तर्फे विधीज्ञ : श्री पी.डी. देशमूख.
विरुध्द पक्षकार क्र.2 तर्फे विधीज्ञ : स्वत:.
न्यायनिर्णय
मा. सदस्य श्री.मुकुंद बी.सस्ते, यांचे व्दारा :
अ) 1) तक्रारदाराच्या तक्रारी अर्जाचे थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे :
तक्रारकर्ता (तक) हे मौजे कडकनाथवाडी येथील रहिवाशी असुन विप क्र.1 यांचे ग्राहक आहेत. त्यांचा ग्राहक क्रमांक 20249631659 असा आहे. श्री पी.एस. गाढवे यांचे सोबत आर्थीक स्वरुपाचे व्यवहार होते. तक यांनी पी.एस.गाढवे यांना रु.50,000/- विप क्र. 2 च्या बँकेतील खाते क्र.101 चा धनादेश क्र.666016 संपुर्ण लिहुन त्यांवर स्वाक्षरी करुन दि.22/11/2012 रोजी अर्जदाराच्या हक्कात दिला तो धनादेश वटण्यासाठी दि.01/12/2012 रोजी विप क्र.1 च्या बँकेमध्ये स्वत:च्या खाते क्र.20249631659 मध्ये जमा केला त्यावेळी विप क्र.1 यांनी सदर रक्कम आठ दिवसात अर्जदाराच्या खात्यावर जमा होईल असे आश्वासन दिले. त्यांनतर अर्जदाराने अनेकवेळा संपर्क साधला असात सदर रक्कम जमा झाली नाही असे सांगितले. तक विप क्र.1 कडे मार्च 2013 मध्ये चौकशीसाठी गेले असता विप क्र.2 यांचे मेमोसह सदर धनादेश अर्जदाररास परत दिला. मेमोमध्ये विप क्र.2 यांनी out of date असे कारण नमुद केले आहे व त्याबाबत अर्जदाराने विप क्र.1 यांना विचारणा केली असता व मी धनादेश मुदतीमध्ये जमा केला असे सांगितले असता, विप क्र.1 यांनी अरेरावीची भाषा वापरुन बँकेमधून हाकलुन लावले. म्हणून तक यांनी विप यांना दि.22/04/2013 रोजी विधिज्ञांमार्फत नोटीस पाठवली व धनादेशाची रक्कम रु.50,000/- व मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासाच्यापोटी रक्कम रु.25,000/- अर्जदारास 08 दिवसात देण्याची मागणी केली. सदरची नोटीस विप यांना मिळाली परंतु विप नी नोटीसीस खोटे व चुकीचे उत्तर दिले म्हणून सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले. म्हणून विप यांचेकडून तक यांना धनादेशावरील रक्कम रु.50,000/- धनादेश अनादरित झालेपासुन रक्कम मिळेपर्यंत 12 टक्के व्याजासह तसेच झालेल्या मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- अशी नुकसान भरपाई देण्याचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे.
ब) 1) सदर प्रकरणात मा. मंचा मार्फत विप क्र.1 यांना नोटीस बजावण्यात आली असता त्यांनी आपले म्हणणे दि.24/09/2014 रोजी दाखल केले असून ते पुढीलप्रमाणे.
2) अर्जदार यांची तक्रार कायदेशीर नाही, तक विप चा ग्राहक नाही. तक ने सदर धनादेश वटण्यासाठी दि.01/12/2012 रोजी प्रस्तुत विप बँकेमध्ये स्वत:च्या खात्यामध्ये जमा केलेबाबतचा मजकूर मान्य केला आहे. विप ने सदर धनादेश जमा केल्यानंतर वटविणेकरीता विप क्र.2 बँकेकडे ‘’प्रोफेशनल कुरीअर’’, उस्मानाबाद यांचे मार्फत विप क्र.2 बँकेकडे पाठविला होता. परंतु संबंधीत कुरीअर कंपनीने सदरील धनादेश ‘विना तामील’ या कारणास्तव प्रस्तूत विप यांना दि.15/02/2013 रोजी परत केला. सदरहू धनादेशाची मुदत संपत आल्याने तक यांना लगेच कळविले व स्वत: घेऊन जाणेस सांगितले मात्र तक ने नकार दिल्यामुळे विप ने दि.16/02/2013 रोजी आर.पी.ए.डी.ने विप क्र.2 बँकेकडे क्लिअरिंग करीता पाठविला आहे. विप क्र.2 यांना सदर चेक मुदतीत प्राप्त झाला होता. तसेच तक यांना विधीज्ञा मार्फत दि.06/05/2013 रोजी रितसर नोटीस देऊन सत्यपरीस्थिती कळविली. विप यांनी सेवेत त्रूटी केली नसून विप ने तक यांस अरेरावीची भाषा वापरली हे मान्य व कबूल नाही. म्हणून सदरची तक्रार रदद करण्यात यावी असे नमूद केले आहे.
क) 1) सदर प्रकरणात मा. मंचा मार्फत विप क्र.2 यांना नोटीस बजावण्यात आली असता त्यांनी आपले म्हणणे दि.11/11/2013 रोजी पोष्टामार्फत दाखल केले असून ते पुढीलप्रमाणे.
2) अर्जदार यांनी चेक क्र.666016 रु.50,000/- पी. एस. गाढवे अर्जदार देणे असलेल्या रकमेपोटी पाठविला होता.
3) चेक क्र.666016 रु.50,000/- दि.18/02/2013 रोजी येरमाळा पोष्ट ऑफिस मधून रजिष्टर केलेला अहे. हे रजिष्ट्रर दि.23/02/2013 रोजी काटेगाव शाखेस मिळाला आहे.
4) चेकवरती तारीख 22/11/2012 आहे परंतु बँक ऑफ महाराष्ट्र ने आमचे कडे दि.16/02/2013 रोजी रजिष्टर केलेला आहे. जमेला घेतलेला चेक त्या दिलेल्या मुदतीत पाठविलेला नाही. चेकची कालमर्यादा 3 महिने असल्याने मुदत संपल्यानंतर आमचेकडे दि.23/02/2013 रोजी मिळालेला आहे तेव्हा त्यांचे 94 दिवस झालेले हेाते म्हणजे चेकची कालावधी संपलेली होती. मेमोत आम्ही दिलेले कारण बरोबर आहे.
5) सदरचा चेक आमचेकडे बँक ऑफ महाराष्ट्राने मुदतीतमध्ये पाठविला नसल्याने चेक वटलेला नाही.
6) सदरचे चेक पुस्तक खातेदार पी.स. गाढवे यांनी 9 वर्षापुर्वी घेतलेले आहे.
7) विप क्र. 2 यांनी सोबत रजिष्टर केकेले पाकीट झेरॉक्स प्रत पाठविली आहे.
ड) तक्रारदाराची तक्रार त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, विप यांचे म्हणणे त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे व उभयतांचा युक्तिवाद, यांचे सुक्ष्म अवलोकन केले असता आमचे विचारार्थ सदर प्रकरणात खालीलप्रमाणे मुद्ये उपस्थित होतात.
मुद्दे. उत्तर.
1) तक्रारदार विप चा ग्राहक आहे काय ? होय.
2) तक्रारदार यांना देण्यात येणा-या सेवेत
विरुध्द पक्ष यांनी त्रुटी केली काय ? होय.
3) तक्रारदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे का ? होय.
4) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
इ) मुद्दा क्र.1 :
1) सदरची तक्रार ही मुदतीत चेक जमा करुनही clearing साठी पाठवण्यास झालेल्या दिरंगाईबाबतची आहे व त्यामुळे तकच्या झालेल्या नुकसान भरपाईबाबत आहे.
2) अभिलेखावर दाखल झालेले चेक क्र.666016 सोलापुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक दि.12/11/2012 चा चेक व सोबत जोडलेली स्लीप दि.01/12/2012 हे दर्शवितात की चेक तीन महीन्याच्या कालावधीच्या आत दाखल केला आहे. त्यानंतर विप क्र.2 कडे हा चेक दि.23/02/2013 रोजी मिळाल्याचे विप क्र.2 ने सांगितले आहे. अर्थात त्याच सोबत सदरचे रकानेबाबत संशय व्यक्त करुन चेक देणा-याने चेक हरवलेबाबतची तक्रारर बँकेस दिल्याचेही नमुद केले आहे याचा अर्थ हा चेक ऑनर होणारच नव्हता तथापि विप क्र.1 ने सदरचा चेक उशीरा पाठवल्याचे कारण कुरीयरची दिरंगाई असे नमुद केले तरी तो त्याच्या उत्तर दायित्वातुन मुक्त होत नाही त्यामुळे विप क्र. 1 ने सेवेत त्रुटी केली आहे याबाबत या मंचाचे दुमत नाही. तसेच विप क्र.2 ने जो त्याच्या खातेदाराचा खुलासा ( श्री गाढवे यांचा) तोही अत्यंत मोधम व संशयीत आहे कारण हरवलेल्या चेकबुकचा नंबर, हरवलेल्या काही चेकचे नंबर असे काहीही नमुद केलेले दिसुन येत नाही व दिलेले पत्र दि.06/12/2010 चे असताना पुढे दि.26/02/2013 पर्यंत या खात्यावर काहीच व्यवहार झाले नाहीत का ? या बाबत स्पष्टता नाही. त्यामुळे उशीरा क्लिअरींगला गेलेला चेक विप क्र.1 ने Revalidate करावा व पुन्हा तारीख बदलून दाखल करुन घ्यावा व विप क्र.2 कडे पाठवावा विप क्र.2 ने त्यावर नियमीत व्यवहारातील चेक संदर्भात जी कार्यवाही करतो ती करावी.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2) विप क्र.1 ने सदर चेक Revalidate करावा व पुन्हा तारीख बदलून दाखल करुन घ्यावा व विप क्र.2 कडे पाठवावा. विप क्र.2 ने त्यावर नियमीत व्यवहारातील चेक संदर्भात जी कार्यवाही करतो ती करावी.
3) विप क्र.1 यांनी तक्रारदार यांना झालेल्या मानसिक, शारीरिक त्रासापोटी व तक्रारीच्या खर्चापोटी रु.5,000/- दयावे.
4) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस दिवसात करुन, विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा, सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज दयावा.
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (मा.विदयुलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.