जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच लातूर यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक – 323/2011 तक्रार दाखल तारीख – 21/12/2011
निकाल तारीख - 27/03/2015
कालावधी - 03 वर्ष , 03 म. 06 दिवस.
1) मे.अरोमा,
द्वारा भागीदार,
श्री केतन चंद्रकांत सालिया,
वय – 35 वर्षे, धंदा – व्यापार,
रा. 508/10/1, सालिया सदन,
सिग्नल कॅम्प, लातुर.
2) श्रीमती पुजा अजय ठक्कर,
भागीदार क्र. 2, वय – 43,
धंदा – व्यापार, रा. 4/7/555-1,
मातोश्री, मोती नगर,
लातुर. ....अर्जदार
विरुध्द
शाखा व्यवस्थापक,
भारतीय स्टेट बँक,
चंद्रनगर, काकूसेठ उक्का मार्ग,
बस स्टँड जवळ,
लातुर. ..गैरअर्जदार
को र म - श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
श्री अजय भोसरेकर, सदस्य
श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- अॅड. अनिल क. जवळकर.
गैरअर्जदारातर्फे :- अॅड.एच.जी.हिरास.
निकालपत्र
(घोषितव्दारा - श्रीमती ए.जी.सातपुते, मा.अध्यक्षा )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
अर्जदार हा लातुर येथील रहिवाशी असुन त्यांनी लातुर येथे स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी भागीदारीत सौ. पुजा अजय ठक्कर यांच्या सोबत मे. अरोमा या नावाने हॉटेलचा व्यवसाय संपुर्ण कागदपत्रांची पुर्तता करुन योग्य ते परवाना काढून कायदेशीरपणे सुरु केला. अर्जदाराने व त्यांच्या भागीदाराने गैरअर्जदार यांची भेट घेऊन विचारणा केली की, त्यांना आपल्या बँकेत मे. अरोमा या नावाने खाते उघडावयाचे आहे. तेव्हा गैरअर्जदाराने सांगितले की, तुमचा हॉटेलचा व्यवसाय आहे आणि आम्ही मोठया व्यवसायीकांना कर्ज पुरवठाही करतो तेव्हा तुम्ही आमच्या बँकेत कॅश क्रेडीट खाते उघडा असे सांगितल्यामुळे, अर्जदाराने संपुर्ण कागदपत्राची पुर्तता केल्यानंतर गैरअर्जदाराने अर्जदाराचा व्यवहार पाहून अर्जदारास रु. 50,00,000/- ची कॅश क्रेडीटची लिमीट दिली.
अर्जदाराने गैरअर्जदाराच्या बँकेत उघडलेल्या कॅश क्रेडीट खात्याचा क्र. 30847212283 असा होता.
अ.क्र. | दिनांक | धनादेश क्र. | नांव | रक्कम | कशासाठी | चेक परत करण्याचे कारण |
1 | 28/09/2009 | 745710 | आनंद मिल्क एजन्सी | 18,525/- | दुध पनीर | रेफर टु ड्राव्हर |
2 | 14/10/2009 | 745725 | आनंद मिल्क एजन्सी | 30,515/- | दुध पनीर | रेफर टु ड्राव्हर |
3 | 11/10/2009 | 745726 | एच.आर.जगताप | 10,000/- | पगार | एक्सीड अरेंजमेन्ट |
4 | 30/09/2009 | 745708 | स्वस्तीक गॅस एजन्सी | 3,678/- | गॅससाठी | रेफर टु ड्राव्हर |
5 | 12/09/2009 | 81684 | ए.एस.पराशर | 8,955/- | किराणामाल | रेफर टु ड्राव्हर |
6 | 11/10/2009 | 745709 | अजिज पटेल | 7,000/- | पगार | एक्सीड अरेंजमेन्ट |
7 | 12/10/2009 | 745722 | चौधरी मुहम्मद अली रहीम शेख | 12,360/- | फळे आणि भाजी | रेफर टु ड्राव्हर |
8 | 20/10/2009 | 745729 | प्रमोद गॅस एजन्सी | 34,048/- | गॅस सिलेंडर | रेफर टु ड्राव्हर |
9 | 03/10/2009 | 745711 | ब्रीज एजन्सी | 13,750/- | मिनरल वॉटर | रेफर टु ड्राव्हर |
10 | 13/10/2009 | 745724 | पी.व्ही.आर सिनेमा | 10,000/- | जाहीरात | रेफर टु ड्राव्हर |
11 | 17/10/2009 | 745730 | महादेव भालेराव | 9,499/- | भाजीपाला | रेफर टु ड्राव्हर |
अर्जदाराचा व्यवसायासाठी, गॅस, भाजीपाला, फळे, दुध, दही, तुप, पनीर, किराणा माल, मिनरल पाणी बॉटल, याची आवश्यकता असते. अर्जदार वेळोवेळी वरील वस्तु बाजारातुन आणत असतो त्यांच्या किंमती पोटी कॅश क्रेडीट खात्यावरील धनादेश देत असतो. तसेच अर्जदार हा स्वत:च्या हॉटेलची जाहीरात व्हावी व ग्राहक वर्ग वाढावा म्हणुन लातुर येथील नामांकित पि.व्ही.आर सिनेमात जाहीरात देत असतो त्याची बिले सुध्दा तो धनादेशाने देत असतो. असे ही त्यांनी दिलेले आहेत. या आगोदर सुध्दा अर्जदाराने अशी बिले धनादेशाद्वारे अदा केली आहे. व ते धनादेश गैरअर्जदाराने वेळेत सुध्दा वटविले आहेत. गैरअर्जदाराने वरील उल्लेखीत वेगवेगळया तारखेचे धनादेश खात्यावर पुरेशी रक्कम असताना रेफर टु ड्राव्हर, एक्सीड अरेन्जमेंट, म्हणून वटवले नाही. एवढा मोठा माणुस असे खोटे धनादेश कसा काय देऊ शकतो असे म्हणू लागले. त्यामुळे अर्जदाराचे आर्थिक नुकसान झाले. पगारीपोटी दिलेला धनादेशची रक्कम न मिळाल्यामुळे सदरील स्टाफ मधील व्यक्ती कामावर आले नाहीत. परिणामी हॉटेलसाठी मनुष्यबळ कमी पडु लागले. हे केवळ गैरअर्जदाराच्या चुकीमुळे झाले. अर्जदाराने गैरअर्जदारांना दि. 24/10/2009 रोजी लेखीपत्र कळविले की कॅश क्रेडीट खात्याची अंतिम सिमा यायच्या आतच आमचे पेमेंट आहे तरी देखील आपण धनादेश वटविले नाहीत.
गैरअर्जदाराने न वटविलेल्या धनादेशापोटी लावलेले सर्व व्याज व दंड व्याज बँक चार्जेस लावू नये असा आदेश गैरअर्जदारांना करण्यात यावा. अर्जदारास झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 20,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु. 5,000/- असे एकूण रक्कम रु. 25,000/- देण्याचा आदेश गैरअर्जदारांना करण्यात यावा.
गैरअर्जदाराच्या म्हणण्यानुसार अर्जदाराचा अर्ज या न्यायमंचात चालण्यास योग्य नाही. अर्जदाराचे बँक अकाऊंट मुंबई येथे ट्रान्सफर झालेले असल्यामुळे अर्जदार हा इथे केस दाखल करु शकत नाही. म्हणून अर्जदाराची केस ही खारीज करण्यात यावी. अर्जदारास गैरअर्जदाराने कॅश क्रेडिट कर्ज 50 लाखा पर्यंत मान्य केले होते. त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे गैरअर्जदाराने अर्जदाराकडुन मागविली होती. तसेच गैरअर्जदाराकडुन आर्थिक नुकसान झाले होते. हे अर्जदाराचे म्हणणे चुकीचे आहे ही गोष्ट खरी आहे की, अर्जदाराचे 11 चेक परत केले होते कारण त्याच्या खात्यावर बॅलेंस 0 होते व ही बाब अर्जदारास माहिती असताना सुध्दा अर्जदाराना त्यावेळेस चेक इश्यू करायला पाहिजे नव्हते. अर्जदाराच्या खात्यात ज्यावेळेस 0 बॅलेंस असताना त्याने कुणालाही चेक दयायला नाही पाहिजे. त्यामुळे जे चेक इश्यू केले त्याचे पैसे बँकेने दिले नाही. यात बँकेने कोणतीही सेवेत त्रुटी केलेली नाही. म्हणून सदरची केस ही खोटया तथ्यावर आधारित असल्यामुळे ती फेटाळण्यात यावी.
मुद्दे उत्तरे
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? होय
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असुन, अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे. व त्याचा गैरअर्जदाराच्या बँकेत कॅश क्रेडिट खात्याचा क्र. 30847212283 असा होता.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर होय असुन, अर्जदारास स्वत: सांगतो की, त्याला सदर बँकेत कॅश क्रेडीटची लिमीट 50 लाखापर्यंत दिली होती. मात्र ती गैरअर्जदाराने पाळली नाही. म्हणून न्यायमंचात त्रुटी केल्याबद्दल अर्जदाराची तक्रार आहे. अर्जदारास कॅश क्रेडिट चे 50 लाखाची सहमती गैरअर्जदाराने दिली ही बाब मान्य असली तरी अर्जदाराच्या खात्यात चेक देताना त्याच्या नावे रक्कम जमा असणे गरजेचे आहे. किंवा त्याचे stock statement बँकेला देणे गरजेचे आहे, त्या दिवशी जर बँकेत अर्जदाराच्या नावे पैसे जमा रु. 30,76,469/- आहेत. त्यामुळे सदरचे चेकची रक्कम गैरअर्जदारानी अर्जदारास दयायला पाहिजे होती. त्याचा गैरव्यवहार होवू शकतो जर बँकेने ते पैसे दिले नाहीत तर असा गैरव्यवहार टाळलेला आहे. यात गैरअर्जदाराची त्रुटी नाही दुसरी बाब अशी अर्जदार हा व्यवसायिक आहे. व त्याने आपल्या बँकेच्या व्यवहारासाठी सदरचे खाते काढलेले आहे. सदर व्यवहार करताना जी limit बँकेने त्यास दिली त्या मर्यादेपर्यंतची रक्कम बँकेत जमा असणे गरजेचे आहे. किंवा त्याच्या व्यवसायात व दुकानात stock किती आहे याचा पुर्ण तपशील बँकेला देणे गरजेचे आहे. तसेच बँकेनेही अर्जदाराला refer drawee लिहीण्यापुर्वी अर्जदाराला नोटीस देणे गरजेचे आहे. जर अशा प्रकारची रक्कम जमा नाही आणि अर्जदाराने अकरा चेक अकरा व्यक्तींच्या नावे काढले व आपल्या खात्यातुन वळती करण्यास सांगितले. परंतु सदर चेक वळती करण्यास पुरेशी रक्कम जर जमा नसेल तर बँकेस ती रक्कम देता येणार नाही. परंतु जमा असताना ती दिली गेली नाही असे दिसते. म्हणून गैरअर्जदार बँकेने सदरच्या cheque वर Refer to drawee असे लिहिलेले आहे. जेव्हा cheque Refer to drawee होतो त्यावेळेस अर्जदाराने गैरअर्जदाराला stock statement दयावयास पाहिजे तर त्याचे cash credit loan 50 लाखाचे चालू राहते. व त्याच्या स्टॉक नुसार समोरच्या व्यक्तीला पैसा दिला जातो. यात असे stock statement अर्जदाराने बँकेला दिलेले दिसुन येत नाही. परंतु त्याच्या खाती दिलेला चेकच्या दिवशी अर्जदाराच्या खात्यात पैसे शिल्लक असताना ते न देणे हे अर्जदाराच्या सेवेत गैरअर्जदाराने केलेली त्रुटी होय.
सदर केसमध्ये बँकेने दिलेल्या अर्जदाराच्या खात्यावर दि. 03/10/2009 रोजी cheque draw in favour of Hardware inspite of telephone written instruction stock statement not submitted earlier stock statement not submitted दि. 12/10/2009 रोजी देखील stock statement not submitted असे लिहिलेले दिसुन येते. दि. 10/10/2009 रोजी cheque stopped करण्यात आलेला आहे. दि. 17/10/2009 च्या चेकवरुन post date cheque no credits in the A/C as complain to debits inadequate करतो खरतर ही उघड उघड गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत केलेली त्रुटी होय, कारण अर्जदाराच्या खात्यावर 30,76,469/- जमा दाखवते असे असताना अर्जदारास पैसे न देणे हे बँकेने केलेली त्रुटी निष्पन्न होते. म्हणून हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
2) अर्जदाराच्या 11 चेकचे गैरअर्जदाराने व्याज, दंडव्याज व बँक चार्जेस लावू नयेत.
3) गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास मानसीक व शारिरीक
त्रासापोटी रु. 5,000/- (अक्षरी पाच हजार रुपये फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.
2,000/-(अक्षरी दोन हजार रुपये फक्त) आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30
दिवसाच्या आत देण्यात यावेत.
4) गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्र. 3 चे पालन मुदतीत न
केल्यास तक्रार दाखल तारखेपासुन त्यावर द.सा.द.शे. 9 टक्के व्याज
देण्यास जबाबदार राहतील.
(श्री. अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर.