निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 05/07/2013
तक्रार नोदणी दिनांकः- 12/07/2013
तक्रार निकाल दिनांकः-01/03/2014
कालावधी 07 महिने 26 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष - श्री प्रदीप निटुरकर, B.Com.LL.B.
सदस्या - सौ.अनिता ओस्तवाल M.Sc.
जिवन पि.राधाकिशन भराडीया अर्जदार
वय 45 वर्षे, धंदा व्यापार, अWड.जी.बी.भालेराव
रा.भावना स्टील सेंटर, मानवत,
ता.मानवत, जि.परभणी.
विरुध्द
1 शाखाधिकारी, गैरअर्जदार
युनायटेड इंडिया इंशुरंस कंपनी लि. अWड.जी.एच.दोडीया
दयावान कॉम्प्लेक्स, स्टेशन रोड, (गै.अ.क्र.1 व 2 करिता)
परभणी, मु.पो.ता.परभणी
2 शाखाधिकारी,
युनायटेड इंडिया इंशुरंस कंपनी लि.
गांधी चौक, जुना जालना,
मु.पो.ता.जि.जालना
3 शाखाधिकारी,
स्टेट बँक ऑफ हैद्राबाद, अWड.डी.एन.देशपांडे
मेन रोड, मु.पो.मानवत,
ता.मानवत, जि.परभणी.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.प्रदीप निटुरकर, अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल, सदस्या.
-------------------------------------------------------------------------------------------------------
(निकालपत्र पारित व्दारा – सौ.अनिता ओस्तवाल, सदस्या)
गैरअर्जदार क्र.1, 2 व 3 यांनी ञुटीची सेवा दिल्याच्या आरोपावरुन अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की,
अर्जदाराने इंडिका व्हीस्टा कार नो.क्र.एम.एच.-22-व्ही-3132 ची विमा पॉलिसी गैरअर्जदार क्र.2 कडुन घेतली होती. त्या पॉलिसीचा कालावधी दिनांक 10.11.2012 ते दिनांक 09.11.2013 पर्यंत होता. दिनांक 16.11.2012 रोजी सदर वाहनाचा मोरेगाव ता.जि.सेलु येथे अपघात झाला. सदरील घटनेची माहिती अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना कळविली. तदनंतर विमा कंपनीने सर्व्हे करण्यासाठी सर्व्हेअर श्री गोविंद उत्तरवार यांना नियुक्त केले व त्यांनी क्षतिग्रस्त वाहनाच्या नुकसानीचे मुल्यांकन रक्कम रुपये 89,000/- करुन सर्व्हे रिपोर्ट गैरअर्जदार विमा कंपनीकडे दाखल केला. वास्तविक पाहता सदर वाहनाच्या दुरुस्तीसाठी अर्जदारास रक्कम रुपये 1,39,930/- एवढा खर्च करावा लागला. परंतु दिनांक 27.11.2012 रोजी विमा कंपनीने पञाव्दारे असे कळविले की, आपला चेक कलेक्शन होवुन आलेला नसल्यामुळे सदरची पॉलिसी रद्द करण्यात आली आहे. अर्जदाराने सामनेवाला गैरअर्जदार क्र.3 कडे या संदर्भात चौकशी केली असता त्यांच्याकडे चेक पास करण्यासाठी आलेला नसल्याचे कळले. जर चेक बँकेकडे आला असता तर तो नक्कीच पास झाला असता कारण अर्जदाराच्या खात्यात त्यावेळी 1,70,000/- रुपये बॅलेन्स होते. नंतर दिनांक 24.12.2012 रोजी अर्जदाराने प्रतिवादी क्र.2 यांना सविस्तर पञ दिले की, चेक बँकेकडे पाठवा व प्रिमीयमची रक्कम घेवुन जा. परंतु अपघात झाल्याचे कळाल्यानंतर गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचा चेक गैरअर्जदार क्र.3 कडे पाठविण्याची तसदी घेतली नाही. यात अर्जदाराची काहीही चुक नसताना त्याला क्षतीग्रस्त वाहनाची नुकसान भरपाई मिळाली नाही म्हणुन अर्जदाराने मंचात तक्रार दाखल करुन गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदाराची कार नों.क्र.एम.एच22 व्ही-3132 च्या झालेल्या नुकसानीपोटी रक्कम रुपये 89000/- अपघात झालेल्या तारखेपासुन म्हणजे दिनांक 16.11.2012 रोजी पासुन 12 टक्के व्याजदराने अर्जदारास द्यावी तसेच मानसीक व शारीरीक ञासापोटी रक्कम रुपये 5000/- व तक्रारीच्या खर्चाबद्दल रक्कम रुपये 3000/- अर्जदारास देण्यात यावे अशा मागण्या अर्जदाराने मंचासमोर केल्या आहेत.
अर्जदाराने तक्रार अर्जासोबत शपथपञ नि.2 वर व पुराव्यातील कागदपञ नि.4वर मंचासमोर दाखल केले.
मंचाची नोटीस गैरअर्जदार क्र.1, 2 व 3 यांना तामील झाल्यानंतर त्यांनी लेखी निवेदन अनुक्रमे नि.13 व नि.17 वर मंचासमोर दाखल करुन अर्जदाराचे कथन बहुतअंशी अमान्य केले आहे. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे म्हणणे असे की, अर्जदाराने प्रिमीयमपोटी दिलेला रक्कम रुपये 12963/- चा चेक त्याचे बँकर स्टॅण्डर्ड चार्टर बँक जालना येथे जामा केला होता. परंतु त्या बँकेने exceeds arrangement या कारणास्तव सदरचा चेक मेमोसहीत दिनांक 26.11.2012 रोजी परत पाठविला. त्यामुळे गैरअर्जदार विमा कंपनीस प्रिमीयमची रक्कम मिळालेली नसल्यामुळे अर्जदारास दिलेली पॉलिसी आपोआपच रद्द झाली व ही बाब अर्जदारास व RTO परभणी यांना नोटीसीव्दारे कळविण्यात आली होती व दिनांक 10.01.2013 च्या पञाव्दारे विमा दाव्याची रक्कम देण्यास गैरअर्जदार विमा कंपनीने असमर्थता दाखविली होती. म्हणुन अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्याची विनंती गैरअर्जंदार क्र.1 व 2 यांनी मंचासमोर केली आहे.
गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी लेखी निवेदनासोबत शपथपञ नि.14 वर व पुराव्यातील कागदपञ नि.21 वर मंचासमोर दाखल केली.
गैरअर्जदार क्र.3 चे म्हणणे असे की, अर्जदाराचा धनादेश त्यांच्याकडे आलाच नाही. जर तो वठविण्यासाठी आला असता तर धनादेशाची रक्कम गैरअर्जदार विमा कंपनीस नक्कीच मिळाली असती कारण अर्जदाराच्या खात्यात त्यावेळेस रक्कम रुपये 1,70,000/- जमा होते. सदरच्या प्रकरणात काहीही चूक नसतांना त्यांना विनाकारण गोवण्यात आलेले आहे. त्यामुळे अर्जदाराची तक्रार त्यांच्याविरुध्द रक्कम रुपये 10,000/- नुकसानीसह खारीज करावी अशी विनंती गैरअर्जदाराने मंचासमोर केली आहे. गैरअर्जदाराने लेखी निवेदनासोबत शपथपञ नि.18 वर मंचासमोर दाखल केले.
दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्ये उत्तर
1 गैरअर्जदार विमा कंपनीने योग्य कारणास्तव
अर्जदाराच्या क्षतीग्रस्त वाहनाच्या विमा दाव्याची
रक्कम देण्यास नकार दिलेला आहे काय ? नाही
2 अर्जदार कोणती दाद मिळण्यास पाञ आहे ? अंतीम आदेशाप्रमाणे
कारणे
मुद्दा क्रमांक 1 व 2 -
अर्जदाराने इंडिका व्हीस्टा कारची विमा पॉलिसी गैरअर्जदार विमा कंपनीकडुन घेतली होती. त्या पॉलिसीच्या प्रिमीयमसाठी अर्जदाराने रक्कम रुपये 12,963/- चा चेक गैरअर्जदार विमा कंपनीकडे दिला होता. दिनांक 16.11.2012 रोजी सदर वाहनाचा अपघात झाला. या अपघाताची सुचना गैरअर्जदार कंपनीला दिल्यानंतर त्यांनी सर्व्हेअरची नेमणुक केली. सर्व्हेअरने क्षतीग्रस्त वाहनाच्या नुकसानीचे मुल्यांकन रक्कम रुपये 89,000/- करुन सर्व्हे रिपोर्ट गैरअर्जदार विमा कंपनीकडे दाखल केला. परंतु अर्जदाराने दिलेला चेक जमा न झाल्याच्या कारणास्तव सदरची पॉलिसी रद्द करण्यात आल्याचे गैरअर्जदाराने अर्जदारास कळविले. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.3 कडे या संदर्भात विचारणा केली असता सदरचा चेक पास होण्यासाठी त्यांच्याकडे आला नसल्याचे बँकेने अर्जदारास कळविले. दिनांक 24.12.2012 रोजी अर्जदाराने गैरअर्जदारास पुन्हा चेक बँकेकडे पाठवुन प्रिमीयमची रक्कम घेवुन जाण्याची विनंती केली परंतु गैरअर्जदार विमा कंपनीने तेवढी तसदी घेतली नाही त्यामुळे अर्जदारास विमा दाव्याची रक्कम मिळाली नाही अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे. यावर गैरअर्जदार विमा कंपनीचे म्हणणे असे की, अर्जदाराने प्रिमीयमपोटी दिलेला चेक जमा न झाल्यामुळे अर्जदाराची पॉलिसी आपोआपच रद्द झालेली आहे. त्यामुळे विमा दाव्याची रक्कम देण्यास गैरअर्जदार विमा कंपनी बांधील नाही. मंचासमोर अर्जदार व गैरअर्जदाराने दाखल केलेल्या पुराव्यातील कागदपञांचे अवलोकन केले असता खालील बाबी स्पष्ट होतात. अर्जदाराने प्रिमीयमपोटी दिलेला चेक गैरअर्जदार विमा कंपनीने त्यांचे बँकर असलेल्या स्टॅन्डर्ड चार्टर बँकेच्या जालना शाखेत जमा केला परंतु त्या बँकेने exceeds arrangementया कारणास्तव सदरचा चेक मेमोसहीत परत केला. कारण अर्जदाराचे खाते स्टेट बँक ऑफ हैद्राबाद मानवत शाखेत होते. परंतु चेक हा स्टेट बँक ऑफ हैद्राबाद जालना शाखेत पास होण्यासाठी पाठविण्यात आल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे साहजिकच चेक न वटता exceeds arrangement या मेमोसहीत परत आला यात अर्जदाराकडुन काही चूक झाली असे मंचास वाटत नाही. ही बाब अर्जदारास कळाल्यानंतर त्याने दिनांक 24.12.2012 रोजी पञाव्दारे पुन्हा चेक बँकेकडे पाठवुन प्रिमीयमची रक्कम गैरअर्जदार विमा कंपनीने वसूल करावी अशी विनंती केल्याचे दिसुन येते. परंतु सदरच्या वाहनाला अपघात झालेला असल्यामुळे विमा दाव्याची रक्कम अर्जदारास देणे लागू नये यासाठी गेरअर्जदाराने चेक पुन्हा बँकेत जमा केला नाही असे मंचाचे मत आहे. गैरअर्जदार क्र.3 ने अर्जदाराच्या खात्यात रक्कम रुपये 1,70,000/- शिल्लक होती व प्रिमीयमचा चेक हा सहजगत्या जमा झाला असता असे लेखी निवेदनात नमुद केले आहे व त्याच्या पृष्टयर्थ शपथपञ देखील मंचासमोर दाखल केले आहे. त्यामुळे निव्वळ जबाबदारी टाळण्यासाठी विमा कंपनीने तकलादू स्वरुपाचे कारण दाखवुन अर्जदारास विमा दाव्याची रक्कम मिळण्यापासुन वंचीत ठेवले असे मंचाचे स्पष्ट मत आहे. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अशंतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी संयुक्तीकरित्या वा वैयक्तीकरित्या निकाल कळाल्यापासुन 30 दिवसाच्या आत विमा दाव्याच्या रक्कमेतुन म्हणजे रुपये 89000/- तुन प्रिमीयमची रक्कम रुपये 12,963/- कपात करुन उर्वरीत रक्कम रुपये 76,037/- अर्जदारास द्यावी.
3 दोन्ही पक्षांना आदेशाच्या प्रती मोफत पुरावाव्यात
सौ.अनिता ओस्तवाल श्री.प्रदीप निटुरकर
सदस्या अध्यक्ष