जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच लातूर यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक – 56/2012 तक्रार दाखल तारीख – 31/03/2012
निकाल तारीख - 18/05/2015
कालावधी - 03 वर्ष , 01 म. 18 दिवस.
भारत रावसाहेब पवार,
वय – 42 वर्षे, धंदा – शेती,
रा. सारसा, ता.जि. लातुर. ....अर्जदार
विरुध्द
शाखा व्यवस्थापक,
युनायटेड इंडिया इंन्शुरंन्स कं.लि.,
गोरक्षण समोर, टिळक नगर,
मेन रोड, लातुर. ..गैरअर्जदार
को र म - श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
श्री अजय भोसरेकर, सदस्य
श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- अॅड. ए.के.जवळकर.
गैरअर्जदारातर्फे :- अॅड. के.एच.मुगळीकर.
निकालपत्र
(घोषितव्दारा – श्री अजय भोसरेकर,मा.सदस्य )
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार हा सारसा ता.जि.लातुर येथील रहिवाशी असून स्वत:च्या व कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शेती व्यवसाय करतो. तक्रारदाराने सामनेवाले यांच्याकडे दि. 16/02/2010 रोजी युनिव्हर्सल हेल्थ इन्शुरंन्स पॉलीसी खरेदी केली होती. त्याचा विमा हप्ता रु. 585/- भरणा करुन त्यात कुटुंबातील प्रत्येकाचा आरोग्य विमा संरक्षण रु. 30,000/- प्राप्त केले. त्याचा विमा पॉलीसी क्र. 231100/48/09/66/00000762 असा आहे. त्यात कुटुंबातील तक्रारदार स्वत:, पत्नी सौ.नंदा, मुलगा मनोज, दुसरा मुलगा शुभम यांचे संरक्षण दि. 16/02/2010 ते 15/02/2011 या कालावधीसाठी प्राप्त केले होते.
तक्रारदाराच्या डाव्या तळपायास एक प्रकारची गाठ झाली होती. त्याचा विलाज खुप केला. परंतु त्यावर उपाय होईना म्हणून देशमुख हॉस्पीटल लातुर येथे सर्व तपासण्या केल्यानंतर शस्त्रक्रीया करुन गाठ काढावी लागेल असा सल्ला दिल्यावरुन तक्रारदार दि. 05/02/2011 रोजी डॉ. देशमुख हॉस्पीटल यांच्याकडे अॅडमिट झाले. तक्रारदार दि. 05/02/2011 ते 12/02/2011 या कालावधी मध्ये अंतररुग्ण म्हणून देशमुख हॉस्पीटल मध्ये अॅडमिट असताना दि. 09/02/2011 रोजी सामनेवाले यांना सदर शस्त्रक्रियेसाठी देशमुख हॉस्पीटल मध्ये अॅडमिट असल्याचे लेखी कळविले असे म्हटले आहे. तक्रारदाराने शस्त्रक्रियेसाठी रु. 12,800/-, औषध उपचाराचा खर्च रु. 5241/- असा एकुण रु. 18,041/- खर्च झाला.
दि. 14/02/2011 रोजी तक्रारदाराने सामनेवाले यांच्याकडे क्लेम फॉर्म भरुन देवून त्यास आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडुन क्लेमची मागणी केली. तक्रारदाराने मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे सामनेवाले यांना तक्रारदाराचा विमा दावा प्राप्त झाल्यापासुन 3 महिन्याच्या आत निकाली काढला पाहिजे असे असताना तक्रारदारास विमा दावा रक्कम दिली नाही. म्हणून दि. 23/01/2012 रोजी तक्रारदाराने सामनेवाले यांना कायदेशीर नोटीस पाठविली. सामनेवाले यांनी नोटीस मिळूनही तक्रारदाराची विमा क्लेम रक्कम दिली नाही व नोटीसचे उत्तरही दिले नाही. म्हणून तक्रारदाराने सदर तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे.
तक्रारदाराने शस्त्रक्रियेचा खर्च रक्कम रु. 18,041/- त्यावर दि. 05/02/2011 रोजी 15 टक्के व्याज, शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु. 10,000/-, तक्रारीच्या खर्चापोटी रु. 5,000/- मिळण्याची मागणी केली आहे.
तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्ठयर्थ शपथपत्र व एकुण 36 कागदपत्रे दाखल केली आहेत.
सामनेवाले यांना न्यायमंचाची नोटीस दि. 31/08/2012 रोजी प्राप्त झाली असुन, सामनेवाले यांनी दि. 08/10/2012 रोजी हजर होण्यासाठी व वकीलपत्र दाखल करण्यासाठी पुरसीस दाखल केली आहे. यावर सामनेवाले यांनी दि. 18/06/2014 रोजी लेखी म्हणणे दाखल केले असून ते रिड अॅन्ड रेकॉर्ड दि. 15/11/2014 रोजी करण्यात आले आहे. त्यात त्यांनी तक्रारदाराचा युनिव्हर्सल हेल्थ इंन्शुरंन्स पॉलीसी घेतली असल्याचे मान्य केले आहे. आणि तक्रारदाराची संपुर्ण तक्रार अमान्य केली आहे असे म्हटले आहे. आज पावेतो सामनेवाले यांनी वकीलपत्र दाखल करण्यात आलेले नाही. त्यामुळे सामनेवाले यांचे लेखी म्हणणे ग्राहय धरता येवू शकत नाही.
तक्रारदाराने दाखल केलेले लेखी म्हणणे, सोबतचे शपथपत्र, पुराव्याचे शपथपत्र याचा विचार करता सामनेवाले यांनी तक्रारदाराचा विमा संरक्षण घेतले असल्याचे मान्य केले आहे. सामनेवाले यांनी तक्रारदाराची तक्रार अमान्य केली आहे. यावरुन तक्रारदारास विमा क्लेमची रक्कम न देवून सेवेत त्रुटी केली आहे. ही बाब प्रथम दर्शनी सिध्द होते. तक्रारदार यांनी केलेली मागणी युनिव्हर्सल हेल्थ इन्शुरंन्स पॉलीसी अंतर्गत देशमुख हॉस्पीटल येथे शरीक असताना शस्त्रक्रियेसाठी केलेला खर्च रु. 18,041/-, तक्रारदारास झालेल्या मानसिक, शारिरीक त्रासापोटी रु. 3,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु. 2,000/- मंजुर करणे योग्य व न्यायाचे होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
2) सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास रक्कम रु. 18,041/-(अक्षरी
अठरा हजार एकेचाळीस रुपये फक्त) त्यावर तक्रार दाखल तारखेपासुन द.सा.द.शे.
9 टक्के व्याज आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30 दिवसाच्या आत देण्यात यावेत.
3) सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास मानसीक व शारिरीक
त्रासापोटी रु. 3,000/- (अक्षरी तीन हजार रुपये फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.
2,000/-(अक्षरी दोन हजार रुपये फक्त) आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30
दिवसाच्या आत देण्यात यावेत.
(श्री.अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते)
सदस्य अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर.