Maharashtra

Bhandara

CC/19/100

TULSI VIJAY SONEKAR - Complainant(s)

Versus

BRANCH MANAGER. L.I.C. BHANDARA - Opp.Party(s)

MR.S.J.CHAUHAN.

27 Nov 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
PINCODE-441904
 
Complaint Case No. CC/19/100
( Date of Filing : 01 Oct 2019 )
 
1. TULSI VIJAY SONEKAR
R/O KASTURBA GANDHI WARD, BHANDARA TAH. BHANDARA
BHANDARA
MAHARASHTRA
2. MAYURI VIJAY SONEKAR
R/O KASTURBA GANDHI WARD, BHANDARA TAH. BHANDARA
BHANDARA
MAHARASHTRA
3. DIVYANI VIJAY SONEKAR
R/O KASTURBA GANDHI WARD, BHANDARA TAH. BHANDARA
BHANDARA
MAHARASHTRA
4. VARSHALI VIJAY SONEKAR
R/O KASTURBA GANDHI WARD, BHANDARA TAH. BHANDARA
BHANDARA
MAHARASHTRA
5. AYUSH VIJAY SONEKAR
R/O KASTURBA GANDHI WARD, BHANDARA TAH. BHANDARA
BHANDARA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. BRANCH MANAGER. L.I.C. BHANDARA
LIFE INSURANCE CO. BRANCH BHANDARA TAH. BHANDARA
BHANDARA
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE MEMBER
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
PRESENT:MR.S.J.CHAUHAN. , Advocate for the Complainant 1
 
Dated : 27 Nov 2020
Final Order / Judgement

                                                   (पारीत व्‍दारा- श्रीमती वृषाली गौरव जागीरदार, मा. सदस्‍या)

01    उपरोक्‍त नमुद तक्रारकर्ती क्रं-1) आणि तिची मुले तक्रारदार क्रं 2 ते 5 यांनी प्रस्‍तुत तक्रार विरुध्‍दपक्ष भारतीय जीवन बिमा निगम कंपनी शाखा भंडारा यांचे विरुध्‍द तक्रारकर्ती क्रं 1 हिचे मृतक पती आणि तक्रारदार क्रं 2 ते 5 यांचे वडील यांचे मृत्‍यूःपश्‍चात विमा दाव्‍याची रक्‍कम मिळणे साठी ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, भंडारा यांचे समोर दाखल केलेली आहे.

तक्रारी मधील थोडक्‍यात तपशिल खालील प्रमाणे-

02.  तक्रारकर्ती क्रं 1) हिचे पती तसेच तक्रारदार क्रं 2 ते 5 याचे वडील मृतक श्री विजय व.प्‍यारेलाल सोनेकर हे नगर परिषद, भंडारा येथे सफाई कामगार म्‍हणून नौकरीत होते, त्‍यांचे प्रकृतीमध्‍ये अचानक बिघाड आल्‍यामुळे त्‍यांना जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय भंडारा येथे वैद्दकीय उपचारार्थ भरती करण्‍यात आले होते आणि उपचारा दरम्‍यान त्‍यांचा दिनांक-21.11.2014 रोजी मृत्‍यू ृत्‍यू झाला होता, त्‍यांचे मृत्‍यू पःश्‍चात तक्रारदार क्रं 1 ते 5 हे त्‍यांचे कायदेशीर वारसदार आहेत.

   तक्रारदार यांनी पुढे असे नमुद केले की, मृतक श्री विजय प्‍यारेलाल सोनेकर यांनी ते हयातीत असताना विरुध्‍दपक्ष भारतीय जीवन बिमा निगम कंपनी शाखा भंडारा यांचे कडून दिनांक-28 मार्च, 2012 रोजी जॉईन्‍ट लाईफ नावाची विमा पॉलिसी क्रं-973670276 काढली होती व ते हयातीत असताना त्‍यांनी नियमित विमा पॉलिसीचे हप्‍ते भरले होते परंतु त्‍यांनी वा विमा पॉलिसीचे एजंटने सदर विमा पॉलिसी संबधात त्‍यांचे कुटूंबास कोणतीही कल्‍पना दिलेली नव्‍हती, त्‍यामुळे श्री विजय सोनेकर यांचे मृत्‍यू नंतर विहित मुदतीत विमा दावा दाखल करता आलेला नाही. परंतु ज्‍यावेळेस तक्रारदारांना विमा पॉलिसीची माहिती मिळाली तेंव्‍हा त्‍यांनी विमा पॉलिसीचे दस्‍तऐवजाचा शोध घेऊन एजंटचे मार्फतीने विरुध्‍दपक्ष विमा कंपनी कडे विमा दावा दाखल केला परंतु विरुध्‍दपक्ष भारतीय जीवन बिमा निगम कंपनीने त्‍यांची कोणतीही बाजू न ऐकता त्‍यांचा विमा दावा दिनांक-15.12.2018 रोजी फेटाळून लावला व दोषपूर्ण सेवा दिली परंतु विमा दावा नामंजूरीचे पत्र आज पर्यंत तक्रारदारांना दिलेले नाही. ऑगस्‍ट, 2019 मध्‍ये तक्रारदारांनी विरुध्‍दपक्ष जीवन बिमा निगमचे कार्यालयास भेट दिली असता दिनांक-15.12.2018 रोजीचे आदेशान्‍वये विमा दावा नामंजूर केल्‍याचे सांगितले. तक्रारदारांचे असे म्‍हणणे आहे की,  दिनांक-15.12.2018 रोजीचा विमा दावा रद्द आदेश चुकीचा आहे व तो त्‍यांना मान्‍य नाही. तक्रारदारांनी वकील श्री एस.एस.चव्‍हाण यांचे मार्फतीने दिनांक-30.08.2019 रोजीची रजिस्‍टर्ड नोटीस विरुध्‍दपक्ष विमा कंपनीला पाठवून त्‍याव्‍दारे विमा पॉलिसीची रक्‍कम रुपये-50,000/- व्‍याजासह देण्‍याची मागणी केली परंतु विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने नोटीसला उत्‍तर दिले नाही वा प्रतिसाद दिला नाही. म्‍हणून शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन त्‍याव्‍दारे विरुध्‍दपक्ष विमा कंपनी विरुध्‍द खालील प्रमाणे मागण्‍या केल्‍यात-

  1. विरुध्‍दपक्ष भारतीय जीवन बिमा निगम कंपनीला आदेशित करण्‍यात यावे की, त्‍यांनी मृतक श्री विजय प्‍यारेलाल सोनेकर यांचे मृत्‍यू पःश्‍चात विमा पॉलिसी क्रं-973670276 अनुसार विमा पॉलिसीची रक्‍कम रुपये-50,000/- आणि सदर रकमेवर पॉलिसीधारकाचा मृत्‍यू दिनांक-21.11.2014 पासून वार्षिक-18 टक्‍के दराने व्‍याज अशा रकमा तक्रारदारांना देण्‍यात याव्‍यात.
  2. विरुध्‍दपक्ष भारतीय जीवन बिमा निगम कंपनीच्‍या दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारदारांना झालेल्‍या आर्थिक,  शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-30,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये-20,000/- अशा रकमा विरुध्‍दपक्षा कडून तक्रारदारांना देण्‍याचे आदेशित व्‍हावे.
  3. या शिवाय योग्‍य ती दाद तक्रारदारांच्‍या बाजूने मंजूर करण्‍यात यावी.

03.   विरुध्‍दपक्ष  भारतीय जीवन बिमा निगम कंपनी तर्फे लेखी उत्‍तर ग्राहक आयोगा समक्ष पान क्रं 36 ते 46 वर दाखल करण्‍यात आले. त्‍यांनी मृतकाची असलेली विमा पॉलिसी रेकॉर्डचा भाग असल्‍याचे नमुद केले व प्राथमिक आक्षेप घेतला की, मृतक विमाधारकाचा मृत्‍यू हा दिनांक-20.11.2014 रोजी झालेला आहे त्‍यामुळे तक्रारीचे कारण हे मृत्‍यू दिनांकास घडलेले आहे परंतु प्रस्‍तुत तक्रार ही ग्राहक मंचा समोर सप्‍टेंबर-2019 मध्‍ये दाखल केलेली असून मृत्‍यू दिनांका पासून जवळजवळ 04 वर्ष 10 महिन्‍यांनी दाखल केलेली असल्‍याने ती मुदतबाहय आहे कारण ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदी प्रमाणे तक्रारीचे कारण घडल्‍या पासून दोन वर्षाचे आत तक्रार दाखल करणे जरुरीचे होते, सबब तक्रार खारीज करण्‍यात यावी.

      विरुध्‍दपक्ष विमा कंपनी तर्फे पुढे असे नमुद करण्‍यात आले की, तक्रारदारांना विमा दावा फॉर्म हा दिनांक-02.12.2015 रोजी प्राप्‍त झालेला असताना सुध्‍दा त्‍यांनी विरुध्‍दपक्ष विमा कंपनी मध्‍ये विमा दावा हा सन-2018 मध्‍ये दाखल केला यावरुन तक्रारदारांच्‍या हेतू बद्दल शंका निर्माण होते. तक्रारदारांनी ईतर तीन विमा पॉलिसीचे दावे विहित मुदतीत दाखल केले होते, त्‍या विमा दाव्‍यांची रक्‍कम दिनांक-17.12.2014 रोजी दिलेली आहे. तक्रारदारांनी तक्रार दाखल करण्‍यास झालेला विलंब माफ व्‍हावा यासाठी विलंब माफीचा अर्ज सुध्‍दा ग्राहक मंचा समोर दाखल केले नाही.

       परिच्‍छेद निहाय उत्‍तरा मध्‍ये मृतक श्री विजय प्‍यारेलाल सोनेकर यांनी ते हयातीत असताना विरुध्‍दपक्ष भारतीय जीवन बिमा निगम कंपनीचे भंडारा येथील शाखे मधून दिनांक-28 मार्च, 2012 रोजी जॉईन्‍ट लाईफ नावाची नमुद क्रमांकाची पॉलिसी काढल्‍याची बाब मान्‍य केली परंतु विमा पॉलिसी काढल्‍याची बाब त्‍यांचे कुटूंबास दिली नव्‍हती ही बाब विरुध्‍दपक्ष नाकारत आहेत याचे कारण असे आहे की, तक्रारदारांना तक्रारी मध्‍येच नमुद केलेले आहे की, सदर पॉलिसी ही जॉईन्‍ट लाईफ पॉलिसी होती. सदर विमा पॉलिसीचा प्रस्‍ताव फॉर्म हा मृतक श्री विजय आणि त्‍यांची पत्‍नी तक्रारकर्ती क्रं 1 यांनी भरला होता आणि त्‍यावर तक्रारकर्ती क्रं 1 यांची सही सुध्‍दा आहे. तसेच सदर पॉलिसी काढते वेळी तक्रारकर्ती क्रं 1 यांची सुध्‍दा वैद्दकीय तपासणी सुध्‍दा झालेली होती. यावरुन तक्रारदार यांना विमा पॉलिसीची माहिती नसल्‍याने विहित मुदतीत विमा दावा दाखल करता आला नाही हे तक्रारदारांचे म्‍हणणे संपूर्णतः खोटे असल्‍याचे दिसून येते. तक्रारदार यांना विमा दावा फॉर्म 2015 मध्‍ये मिळाले होते ही बाब जमा केलेल्‍या फॉर्म-बी व ई वरुन सिध्‍द होते. हॉस्‍पीटल कडून भरावयाच्‍या फार्मवर दिनांक-02.05.2015 ही तारीख नमुद असून त्‍यात विमाधारक श्री विजय सोनेकर यांना पुन्‍हा टी.बी.उलटल्‍याचे सिध्‍द होते. या शिवाय नियोक्‍ता यांचे कडून भरावयाच्‍या फॉर्म –ई मध्‍ये सुध्‍दा वर्ष-2010 मध्‍ये श्री विजय सोनेकर यांनी 169 दिवसांची रजा घेतल्‍याचे नमुद केलेले आहे. 04 वर्ष उलटून गेल्‍या नंतर या बाबींची शहानिशा करणे विरुध्‍दपक्ष विमा कंपनीला शक्‍य होत नाही कारण हॉस्‍पीटल व नियोक्‍ता यांचेकडील रेकॉर्ड नष्‍ठ करण्‍यात आलेला असतो. परिणामी विरुध्‍दपक्ष विमा कंपनीस आपले म्‍हणणे सिध्‍द करण्‍यासाठी दसतऐवजी पुरावा उपलब्‍ध होत नाही. तक्रारदारांनी हेतुपुरस्‍पर विमा दावा फॉर्म उशिराने विरुध्‍दपक्ष विमा कंपनीकडे दाखल केलेला आहे. तक्रारदारांनी विमा दावा प्रपत्र आणि मूळ विमा पॉलिसीचा दस्‍तऐवज विरुध्‍दपक्ष विमा कंपनीकडे सन-2018 मध्‍ये दाखल केला ही बाब मान्‍य आहे परंतु तक्रारदारांची बाजू ऐकून न घेता खोटे कारण दर्शवून दिनांक-15.12.2018 रोजी विमा दावा फेटाळून लावला ही बाब नामंजूर करण्‍यात येते.

     विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने पुढे असे नमुद केले की, अन्‍य विमा पॉलिसी क्रं-972638789, क्रं-973440516, क्रं-972639226 चे पेमेंट रुपये-1,52,079/- विमा क्‍लेम वेळेत दाखल केलेले असल्‍याने दिनांक-17.12.2014 रोजी विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने दिलेले आहे. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तक्रारदारांना पत्राव्‍दारे विमा दावा रद्द झाल्‍या बाबत कळविले नव्‍हते ही बाब नामंजूर करण्‍यात येते. तक्रारकर्ती क्रं 1 यांनी विमा दावा विमाधारकाचे मृत्‍यू पासून तीन वर्षाचे आत दाखल न केल्‍यामुळे सदर विमा दावा मुदतबाहय झालेला आहे. विमाधारकाचा मृत्‍यू दिनांक-21.11.2014 रोजी झालेला होता आणि विमा पॉलिसीचे क्‍लेम पेपर्स विरुध्‍दपक्षास दिनांक-06.12.2018 रोजी मिळाले म्‍हणजे जवळ जवळ 04 वर्षानी मिळाले असल्‍याने विमा दावा हा मुदतबाहय झालेला असल्‍याने खारीज करण्‍यात आला होता व त्‍या अनुषंगाने दिनांक-15.12.2018 रोजीचे पत्रा नुसार तक्रारकर्ती क्रं 1 यांना कळविले होते. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने दिनांक-15.12.2018 रोजी पारित केलेला आदेश तक्रारदारांवर बंधनकारक नाही ही बाब नामंजूर आहे. तक्रारदारांची नोटीस विरुध्‍दपक्ष विमा कंपनीला दिनांक-30.08.2019 रोजी मिळालेली असून त्‍या नोटीसचे उत्‍तर विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने दिनांक-07.10.2019 रोजी दिलेले आहे, त्‍या नोटीसचे उत्‍तराची प्रत तक्रारकर्तीने स्‍वतः तक्रारी सोबत दाखल केलेली आहे. तक्रारदारांनी हेतुपुरस्‍पर विमा दावा फॉर्म उशिराने विमाधारकाचे मृत्‍यू नंतर 04 वर्षानी उशिराने विरुध्‍दपक्ष विमा कंपनीकडे दाखल केलेला असल्‍याने विमा दावा मुदतबाहय झालेला असून कोणतीही रक्‍कम देय नाही.  आपले विशेष कथनात नमुद केले की, सदर पॉलिसीचा क्‍लेम हा Early Claim होता आणि अशा Early Claim ची विरुध्‍दपक्ष विमा कंपनी कडून तपासणी केली जाते आणि तपासणी मध्‍ये विमाधारकाचा नियोक्‍ता आणि हॉस्‍पीटल मध्‍ये असलेले विमाधारकाचे दस्‍तऐवज विचारात घेतले जातात परंतु विमा दावा 04 वर्षा नंतर उशिराने दाखल केलेला असल्‍याने नियोक्‍ता आणि हॉस्‍पीटल मधील दसतऐवज उपलब्‍ध होत नाहीत. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने आपले कथनाचे पुष्‍टयर्थ मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोग यांचे समोरील रिव्‍हीजन पिटीशन क्रं-1346/2003 एल.आय.सी.-विरुघ्‍द आसाकरण बजाज या न्‍यायनिवाडयावर भिस्‍त ठेवली. सबब तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती विरुध्‍दपक्ष भारतीय जीवन बिमा निगम कंपनी कडून करण्‍यात आली.

04.   तक्रारदारांनी पान क्रं 09 वरील दस्‍तऐवज यादी प्रमाणे विरुध्‍दपक्ष विमा कंपनीस रजिस्‍टर पोस्‍टाने पाठविलेल्‍या नोटीसची प्रत, रजि.पोस्‍टाची पोच, विमाधारकाचे मृत्‍यू प्रमाणपत्र्, विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तक्रारदारांना  विमा दावा रद्द बाबत दिलेले पत्र, तक्रारदारांच्‍या आधारकॉर्डच्‍या प्रती अशा दसतऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात. तसेच विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने नोटीसला दिलेले दिनांक-07.10.2019 रोजीचे पत्र दाखल केले. तक्रारकर्ती क्रं 1 यांनी पान क्रं- 60 ते 62 वर पुराव्‍याचे शपथपत्र दाखल केले. तसेच मौखीक युक्‍तीवादा बाबत पुरसिस दाखल केली.

05.   विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने लेखी उत्‍तर पान क्रं- 36 ते 46 वर दाखल केले. तसेच पान क्रं- 48 वरील दस्‍तऐवज यादी नुसार तक्रारकर्ती क्रं 1 ने विम्‍याची रक्‍कम मिळण्‍या बाबत केलेला अर्ज, विमाधारकाचे मृत्‍यू प्रमाणपत्र, नियोक्‍ता प्रमाणपत्र, मेडीकल अटेंडस प्रमाणपत्र, हॉस्‍पीटल ट्रीटमेंट प्रमाणपत्र, निवेदन, दाहसंस्‍कार प्रमाणपत्र अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने पान क्रं- 63 ते 67 वर पुराव्‍याचे शपथपत्र दाखल केले. तसेच मौखीक युक्‍तीवादा बाबत पुरसिस दाखल केली.

06.    तक्रारदारांची तक्रार, विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे उत्‍तर, उभय पक्षां तर्फे दाखल दस्‍तऐवज व दाखल पुरावा ईत्‍यादीचे काळजीपूर्वक अवलोकन जिल्‍हा ग्राहक आयोगा तर्फे करण्‍यात आले, त्‍यावरुन जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर सदर तक्रार न्‍याय निवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात-

अक्रं

मुद्दा

उत्‍तर

01

तक्रारदार यांनी जिल्‍हा ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेली तक्रार मुदतीत आहे काय

-होय-

02

तक्रारदार यांनी विरुध्‍दपक्ष विमा कंपनी मध्‍ये दाखल केलेला विमा दावा हा विरुध्‍दपक्ष यांचे म्‍हणण्‍या प्रमाणे मुदतबाहय ठरतो काय

-नाही-

03

विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तक्रारदारांचा विमा दावा रद्द करुन दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते काय

-होय-

04

काय आदेश

अंतीम आदेशा नुसार

                                    -कारणे व निष्‍कर्ष-

मुद्दा क्रं 1

07.   विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे लेखी उत्‍तरातील परिच्‍छेद क्रं 03 मधील उत्‍तरात नमुद आहे की, त्‍यांनी दिनांक-15.12.2018 रोजीचे पत्रा नुसार तक्रारकर्ती क्रं 1 यांना वादातील विमा पॉलिसी रद्द करण्‍यात आल्‍याचे कळविले होते. सदर विमा दावा रद्द केल्‍या बाबतचे पत्राची प्रत तक्रारदारांनी दाखल केलेली आहे, त्‍या पत्रामध्‍ये  विमा दावा मुदतबाहय झालेला असल्‍याने (Time Bar Limitation) रद्द करण्‍यात आल्‍याचे नमुद केलेले आहे. तक्रारदारांनी प्रस्‍तुत तक्रार ग्राहक मंचा समोर दिनांक-01.10.2019 रोजी दाखल केलेली आहे. जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मता प्रमाणे विमा दावा नामंजूरीचे दिनांका पासून तक्रारीस कारण घडलेले असून ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदी प्रमाणे तक्रारीचे कारण घडल्‍या पासून 02 वर्षाचे आत तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर दाखल केलेली आहे. विमा दावा नामंजूरीचे पत्र दिनांक-15.12.2018 रोजीचे आहे आणि त्‍या दिनांका नंतर दिनांक-01.10.2019 म्‍हणजेच साडेनऊ महिन्‍या नंतर तक्रार दाखल केलेली असल्‍याने तक्रार मुदतीत दाखल केलेली आहे. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे म्‍हणण्‍या प्रमाणे विमाधारकाचे मृत्‍यू दिनांकास तक्रारीचे कारण घडले यात जिल्‍हा ग्राहक आयोगास कोणतेही तथ्‍य दिसून येत नाही. विमा दावा नामंजूरी नंतर ग्राहक तक्रार दाखल करण्‍यास कारण घडले अशा आशयाची अनेक निकालपत्रे वेळोवेळी मा.वरिष्‍ठ ग्राहक न्‍यायालयांनी पारीत केलेली आहेत.

.           प्रस्‍तुत प्रकरणात ग्राहक आयोगात तक्रार दाखल करण्‍यास जो उशिर झालेला आहे त्‍या संदर्भात जिल्‍हा ग्राहक आयोगा तर्फे खालील मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाचे निवाडयावर भिस्‍त ठेवण्‍यात येत आहे-

Hon’ble N.C.D.R.C. New-Delhi-Revision Petition No.-1179 of 2015 Decided on-01st December, 2015-“Divisional Manager, Oriential Insurance Company-Versus-Damni & 2 others.

 

उपरोक्‍त नमुद आदरणीय राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयात स्‍पष्‍टपणे नमुद केलेले आहे की, विमा दावा नाकारल्‍याचे दिनांका पासून मुदत सुरु होते. आमचे समोरील प्रकरणात विमा दावा नामंजूरीचे पत्र दिनांक-15.12.2018 रोजीचे आहे आणि त्‍या दिनांका नंतर दिनांक-01.10.2019 म्‍हणजेच साडेनऊ महिन्‍या नंतर तक्रार दाखल केलेली असल्‍याने तक्रार मुदतीत दाखल केलेली आहे.सदर न्‍यायनिवाडा आमचे समोरील प्रकरणात अंशतः लागू होतो असे आमचे मत आहे. त्‍यामुळे प्रस्‍तुत तक्रार ही विहित मुदतीत दाखल केलेली नाही या विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे म्‍हणण्‍यात जिल्‍हा ग्राहक आयोगास कोणतेही तथ्‍य दिसून येत नाही म्‍हणून आम्‍ही मुद्दा क्रं 01 चे उत्‍तर होकारार्थी नोंदवित आहोत.

मुद्दा क्रं 2

08.   विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने आपले लेखी उत्‍तरात परिच्‍छेद क्रं 3 मधील उत्‍तरात नमुद केलेले आहे की, त्‍यांनी  अन्‍य विमा पॉलिसी क्रं-972638789, क्रं-973440516, क्रं-972639226 चे पेमेंट रुपये-1,52,079/- विमा क्‍लेम वेळेत दाखल केलेले असल्‍याने दिनांक-17.12.2014 रोजी दिलेले आहे. वादातील जॉईन्‍ट लाईफ पॉलिसी क्रं-973670276 संदर्भात विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे असे म्‍हणणे आहे की,  विमाधारकाचा मृत्‍यू दिनांक-21.11.2014 रोजी झालेला होता आणि विमा पॉलिसीचे क्‍लेम पेपर्स विरुध्‍दपक्षास दिनांक-06.12.2018 रोजी मिळाले म्‍हणजे जवळ जवळ 04 वर्षानी मिळाले असल्‍याने विमा दावा हा मुदतबाहय झालेला असल्‍याने खारीज करण्‍यात आला होता व त्‍या अनुषंगाने दिनांक-15.12.2018 रोजीचे पत्रा नुसार विमा दावा रद्द केल्‍या बाबत तक्रारकर्ती क्रं 1 यांना कळविले होते. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने पुढे असे नमुद केले की, तक्रारदारांना विमा दावा फॉर्म हा दिनांक-02.12.2015 रोजी प्राप्‍त झालेला असताना सुध्‍दा त्‍यांनी विरुध्‍दपक्ष विमा कंपनी मध्‍ये विमा दावा हा सन-2018 मध्‍ये दाखल केला यावरुन तक्रारदारांच्‍या हेतू बद्दल शंका निर्माण होते.

09.  या संदर्भात जिल्‍हा ग्राहक आयोगाचे असे मत आहे की, ज्‍याअर्थी विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने विमाधारकाच्‍या अन्‍य विमा पॉलिसी क्रं-972638789, क्रं-973440516, क्रं-972639226 चे पेमेंट रुपये-1,52,079/- विमा क्‍लेम वेळेत दाखल केलेले असल्‍याने दिनांक-17.12.2014 रोजी दिलेले आहे, त्‍याअर्थी त्‍यांनी वादातील जॉईन्‍ट लाईफ पॉलिसी क्रं-973670276 संदर्भात स्‍वतःहून तक्रारकर्ती क्रं 1 हिला वादातील पॉलिसी बाबत लेखी सुचना देऊन त्‍या संबधात योग्‍य ती कार्यवाही करण्‍यास सुचित करावयास हवे होते परंतु त्‍यांनी तसे काही केल्‍याचे दिसून येत नाही वा अशी लेखी सुचना दिल्‍या बाबत कोणताही पुराव्‍याचा दस्‍तऐवज दाखल केलेला नाही. तक्रारकर्तीचे मृतक पती व विमाधारक हे सफाई कामगार म्‍हणून कार्यरत होते ही बाब येथे लक्षात घेणे गरजेचे आहे, त्‍यामुळे अनावधानाने व विमाधारकाचे मृत्‍यू पःश्‍चात दुःखातून सावरल्‍या नंतर तिने वादातील जॉईन्‍ट लाईफ पॉलिसी क्रं-973670276  संबधात विरुध्‍दपक्ष विमा कंपनीला दिनांक-03.10.2018 रोजीचे पत्रान्‍वये विमा दावा मिळण्‍या बाबत विनंती केली. हा सर्व घटनाक्रम बघता तक्रारकर्ती क्रं 1 हिने विमा दाव्‍या संबधीची सुचना उशिराने दिल्‍यामुळे तिचा विमा दावा रद्द केल्‍या बाबतची विरुध्‍दपक्ष विमा कंपनीची कृती ही दिलेली दोषपूर्ण सेवा ठरते.
तक्रारकर्ती क्रं 1 हिला  विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने  वादातील जॉईन्‍ट लाईफ पॉलिसी क्रं-973670276  संबधात विमा दावा दाखल करण्‍यास लेखी सुचित करावयास हवे होते परंतु तसे काहीही विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने केलेले नाही अशा परिस्थितीत तक्रारकर्ती क्रं 1 हिने वादातील विमा पॉलिसी बाबत केलेला दावा हा उशिराने दाखल केलेला असल्‍याने तो मुदतबाहय ठरतो हे विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे कथन व त्‍याच कारणावरुन विमा दावा रद्द केल्‍या बाबतची कृती ही नियमा नुसार नाही असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे. तक्रारकर्ती क्रं 1 हिने वादातील विमा पॉलिसी संबधात दाखल केलेला विमा दावा हा मुदतबाहय ठरत नसल्‍याने आम्‍ही विमा दावा हा मुदतबाहय ठरतो काय या प्रश्‍नाचे उत्‍तर नकारार्थी नोंदवित आहोत.

 मुद्दा क्रं 3

10.  विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे लेखी उत्‍तरातील परिच्‍छेद क्रं 03 मधील उत्‍तरात नमुद आहे की, त्‍यांनी दिनांक-15.12.2018 रोजीचे पत्रा नुसार तक्रारकर्ती क्रं 1 यांना वादातील विमा पॉलिसी रद्द करण्‍यात आल्‍याचे कळविले होते. सदर विमा दावा रद्द केल्‍या बाबतचे पत्राची प्रत तक्रारदारांनी दाखल केलेली आहे, त्‍या पत्रामध्‍ये  विमा दावा मुदतबाहय झालेला असल्‍याने (Time Bar Limitation) रद्द करण्‍यात आल्‍याचे नमुद आहे.  या संदर्भात मुद्दा क्रं 2 मध्‍ये आम्‍ही सखोल विवेचन केलेले आहे. ज्‍याअर्थी विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने विमाधारकाच्‍या अन्‍य विमा पॉलिसी क्रं-972638789, क्रं-973440516, क्रं-972639226 चे पेमेंट रुपये-1,52,079/- विमा क्‍लेम वेळेत दाखल केलेले असल्‍याने दिनांक-17.12.2014 रोजी दिलेले आहे, त्‍याअर्थी त्‍यांनी वादातील जॉईन्‍ट लाईफ पॉलिसी क्रं-973670276 संदर्भात स्‍वतःहून तक्रारकर्ती क्रं 1 हिला वादातील पॉलिसी बाबत लेखी सुचना देऊन त्‍या संबधात योग्‍य ती कार्यवाही करण्‍यास सुचित करावयास हवे होते परंतु त्‍यांनी तसे काही केल्‍याचे दिसून येत नाही वा अशी लेखी सुचना दिल्‍या बाबत कोणताही पुराव्‍याचा दस्‍तऐवज दाखल केलेला नाही.

तक्रारकर्तीचा मृतक पती व विमाधारक हा सफाई कामगार म्‍हणून कार्यरत होता ही बाब येथे लक्षात घेणे आवश्‍यक आहे. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने दिनांक-15.12.2018 रोजीचे वादातील विमा पॉलिसी रद्द केल्‍याचे पत्रात केवळ विमा दावा हा उशिराने दाखल केलेला असल्‍याने तो रद्द करण्‍यात येतो एवढेच कारण दर्शविलेले आहे आणि सदर तक्रार ग्राहक मंचा समोर दाखल केल्‍या नंतर मागाहून जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर दाखल केलेल्‍या लेखी उत्‍तरात विमाधारक श्री विजय सोनेकर यांना पुन्‍हा टी.बी.उलटल्‍याचे सिध्‍द होते. या शिवाय नियोक्‍ता यांचे कडून भरावयाच्‍या फॉर्म –ई मध्‍ये सुध्‍दा वर्ष-2010 मध्‍ये श्री विजय सोनेकर यांनी 169 दिवसांची रजा घेतल्‍याचे नमुद आहे या कारणांमुळे सुध्‍दा वादातील जॉईन्‍ट विमा पॉलिसीची रक्‍कम देय नाही असा उजर घेतलेला आहे. सदरचा उत्‍तरातील घेतलेला उजर हा विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने मागाहून पःश्‍चात बुध्‍दीतून घेतल्‍याचे दिसून येते. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने  विमा रद्द केल्‍या बाबतचे पत्रात विमा पॉलिसीधारकास पुन्‍हा टी.बी.उलटल्‍याचे तसेच दिर्घ रजा घेतल्‍याची बाब नमुद केलेली नाही. ज्‍याअर्थी विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने मृतक विमाधारकाचे अन्‍य तीन पॉलिसीचे क्‍लेम दिलेले आहेत, त्‍याअर्थी वादातील पॉलिसीचा क्‍लेम उशिराने सादर केल्‍यामुळे विमा क्‍लेम रद्द झाल्‍या बाबतचा घेतलेला निर्णय हा चुकीचा असून त्‍यास कोणताही आधार दिसून येत नाही. तसेच विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने आपले लेखी उत्‍तरात स्‍वतःहून मान्‍य केलेले आहे की, वादातील जॉईन्‍ट पॉलिसीचा प्रस्‍ताव फॉर्म भरते वेळी मृतक विमाधारक आणि तक्रारकर्ती क्रं 1 हिची सुध्‍दा वैद्दकीय तपासणी झालेली होती. मृतक विमाधारकास विमा पॉलिसी घेतेवेळी पूर्वी पासूनच क्षयरोग(Tuberculosis) होता व त्‍याने जाणूनबुजून ही बाब लपवून ठेवलेली होती ही बाब विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने योग्‍य तो पुरावा देऊन सिध्‍द केलेली नाही. वरिल सर्व विवेचना वरुन विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने वादातील विमा पॉलिसीचा दावा मुदतबाहय असल्‍याचे एकमेव कारण दर्शवून रद्द केल्‍याची कृती व मागाहून लेखी उत्‍तरात पःश्‍चात बुध्‍दीतून घेतलेले उजर पाहता मृतक विमाधारकाचा वादातील जॉईन्‍ट विमा पॉलिसी क्‍लेम रद्द करण्‍याची कृती ही दिलेली दोषपूर्ण सेवा ठरते आणि म्‍हणून आम्‍ही मुद्दा क्रं 03 चे उत्‍तर होकारार्थी नोंदवित आहोत. मुद्दा क्रं 03 चे उत्‍तर होकारार्थी आल्‍याने आम्‍ही मुद्दा क्रं -04 नुसार प्रस्‍तुत तक्रारीत आदेश पारीत करीत आहोत.

11.     उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन, आम्‍ही प्रस्‍तुत तक्रारी मध्‍ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-

                      -आदेश-

  1.  तक्रारदार क्रं 1 ते 5 यांची विरुध्‍दपक्ष भारतीय जीवन बिमा निगम कंपनी तर्फे शाखा व्‍यवस्‍थापक, शाखा भंडारा यांचे विरुध्‍दची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  1. विरुध्‍दपक्ष भारतीय जीवन बिमा निगम कंपनीला आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी मृतक विमाधारक श्री विजय व.प्‍यारेलाल सोनेकर यांचे जॉईन्‍ट विमा पॉलिसी क्रं-973670276 अनुसार विमा रक्‍कम रुपये-50,000/- (अक्षरी रुपये पन्‍नास हजार फक्‍त) तक्रारदार क्रं 1 ते 5 तर्फे तक्रारकर्ती क्रं-1 हिला अदा करावी आणि सदर रकमेवर तक्रार दाखल दिनांक-01.10.2019 पासून ते रकमेच्‍या प्रतयक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9 टक्‍के दराने येणारी व्‍याजाची रक्‍कम तक्रारकर्ती क्रं 1 हिला अदा करावी.
  1.  तक्रारदार यांना झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) विरुध्‍दपक्ष भारतीय जीवन बिमा निगम कंपनीने तक्रारदार क्रं 1 ते 5 तर्फे तक्रारकर्ती क्रं 1 हिला दयावेत.
  1.  सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष भारतीय जीवन बिमा निगम भंडारा तर्फे शाखा व्‍यवस्‍थापक यांनी सदर आदेशाची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे. तसे न केल्‍यास वरील रकमेवर 15% द.सा.द.शे. व्‍याज देय राहील.                                        (05)    प्रस्‍तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत उभय पक्षांना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन देण्‍यात यावी.                                                                (06)   तक्रारदारांना ब व क संचाच्‍या फाईल्‍स परत करण्‍यात याव्‍यात.

 

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.