Maharashtra

Bhandara

CC/19/70

GEETA NARENDRA KOTHA - Complainant(s)

Versus

BRANCH MANAGER. AXIX BANK. BHANDARA - Opp.Party(s)

MR. JAYESH BORKAR

09 Jul 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
PINCODE-441904
 
Complaint Case No. CC/19/70
( Date of Filing : 13 Jun 2019 )
 
1. GEETA NARENDRA KOTHA
R/O. PRAGATI COLONY STATION ROAD. BHANDARA. TAH BHANDARA
BHANDARA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. BRANCH MANAGER. AXIX BANK. BHANDARA
STATION ROAD, TAH. BHANDARA
BHANDARA
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE MEMBER
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 09 Jul 2021
Final Order / Judgement

                                                                                     :: निकालपत्र ::

                (पारीत व्‍दारा श्री भास्‍कर बी.योगी, मा.अध्‍यक्ष)

                                                                             (पारीत दिनांक-09 जुलै, 2021)

   

01.      तक्रारकर्तीने प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 खाली विरुध्‍दपक्ष अॅक्‍सीस बॅंक, शाखा भंडारा यांचे विरुध्‍द दोषपूर्ण सेवा आणि इतर अनुषंगीक मागण्‍यांसाठी दाखल केलेली आहे.

02.     तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-      

       तक्रारकर्ती ही पेट्रोल पंप चालविण्‍याचा व्‍यवसाय करते तर विरुध्‍दपक्ष एक्‍सीस बॅंक आहे. तक्रारकर्तीचे असे म्‍हणणे आहे की, तिला दिनांक-13.03.2019 रोजी दुपारी 1.30 ते 2.00 वाजताचे दरम्‍यान एका ग्राहकाचा फोन आला की,  त्‍या ग्राहकाचे वाहना मध्‍ये डिझेल भरण्‍यास त्‍याचे ड्रायव्‍हर जवळ पैसे कमी आहेत, त्‍यामुळे त्‍या ग्राहकाच्‍या मुनीम जवळ तक्रारकर्तीचा बॅंक अकाऊंट क्रमांक देण्‍यात यावा. त्‍यानंतर त्‍या ग्राहकाचे मुनीमचा फोन तक्रारकर्तीला आला व त्‍याने ऑनलाईन पेमेंट करतो असे सांगून तिचे जवळ QR Code ची मागणी केली त्‍यानुसार तिने लगेच तिचा QR Code त्‍याला  दिला. त्‍यानंतर लगेच ग्राहकाने तक्रारकर्तीचे मोबाईलवर Payment Request पाठविली असता तिने सदर Request Accept केल्‍या नंतर Transaction Fail झाल्‍याचे ग्राहकाने सांगितले व पुन्‍हा Transaction करतो  असे सांगून एकूण 04 वेळेस Transaction केले परंतु सदर  Transaction यशस्‍वी न झाल्‍याने दुसरी कडून व्‍यवस्‍था करतो असे ग्राहकाने तिला सांगितले व लगेच फोन बंद केला. तेंव्‍हा लगेच तक्रारकर्तीने आपले बॅंक खाते तपासले असता तिला  तिचे बॅंक खात्‍यातून खालील प्रमाणे रकमा डेबीट (कमी) झाल्‍याचे आढळून आले-

Transaction Date

Details of Transaction

Debited Amount

13/03/2019

UPI/PZM/9072377672584/19744201

Rs.-25,000/-

13/03/2019

UPI/PZM/907237690464/19744201

Rs.-25,000/-

13/03/2019

UPI/PZM/907237697026/19744201

Rs.-25,000/-

13/03/2019

UPI/PZM/907237709774/19744201

Rs.-25,000/-

 

Total Debited Amount

Rs.-1,00,000/-

            तक्रारकर्तीचे असे म्‍हणणे आहे की, उपरोक्‍त नमुद केल्‍या प्रमाणे तिचे बॅंकेच्‍या खात्‍यातून एकूण रुपये-1,00,000/- कमी झाल्‍याचे तिचे लक्षात आले. तिच्‍या खात्‍या मध्‍ये सदर रक्‍कम जमा न होता उलट संबधित ग्राहकाच्‍या खात्‍यामध्‍ये तिचे खात्‍या मधील रक्‍कम जमा झाली म्‍हणून तिने संबधित ग्राहकास फोन लावला असता त्‍याने‍ शिवीगाळ करुन फोन बंद केला. तिने  त्‍याच दिवशी दिनांक-13.03.2019 रोजी पोलीस स्‍टेशन भंडारा येथे आणि विरुध्‍दपक्ष बॅंके मध्‍ये लेखी तक्रार दिली व संपूर्ण घटनाक्रम नमुद केला.

     तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिने विरुध्‍दपक्ष बॅंके मध्‍ये लेखी तक्रार केल्‍या नंतर विरुध्‍दपक्ष बॅंकेने तिचे  अॅक्‍सीस बॅंकेतील खाते क्रमांक-912010000897157 मध्‍ये दिनांक-22.03.2019 रोजी खालील प्रमाणे रकमा जमा केल्‍यात, त्‍याचा तपशिल खालील प्रमाणे आहे-

Date

Details of Transaction

Credited Amount

22/03/2019

UPI/907237709774/19489

Rs.-25,000/-

22/03/2019

UPI/907237672584/19489

Rs.-25,000/-

22/03/2019

UPI/907237690464/19489

Rs.-25,000/-

22/03/2019

UPI/907237697026/19489

Rs.-25,000/-

 

Total Credited  Amount in the Bank Account of Complainant.

Rs.-1,00,000/-

            तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, अशाप्रकारे वर नमुद केल्‍या प्रमाणे तिचे बॅंकेच्‍या खात्‍यात विरुध्‍दपक्ष बॅंकेनी रुपये-1,00,000/- जमा केल्‍या नंतर पुढे विरुध्‍दपक्ष बॅंकेनी तिला कोणतीही पूर्वसुचना न देता दिनांक-22.04.2019 रोजी सदर रक्‍कम रुपये-1,00,000/- परस्‍पर काढून घेतली त्‍यामुळे तक्रारकर्तीने पुन्‍हा दिनांक-24.04.2019 रोजी पोलीस स्‍टेशन भंडारा येथे तक्रार केली. त्‍यानंतर तिने वेळोवेळी लेखी आणि मौखीक स्‍वरुपात विरुध्‍दपक्ष बॅंकेला सदर रक्‍कम तिचे खात्‍यामध्‍ये जमा करण्‍याची विनंती केली परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अशाप्रकारे विरुध्‍दपक्ष बॅंकेनी तिला दोषपूर्ण सेवा दिलेली आहे, त्‍यामुळे तिने विरुध्‍दपक्ष बॅंके विरुध्‍द जिल्‍हा ग्राहक आयोगा मध्‍ये प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन त्‍याव्‍दारे विरुध्‍दपक्ष बॅंके विरुध्‍द खालील प्रमाणे मागण्‍या केल्‍यात-

  1. विरुध्‍दपक्ष बॅकेनी तिचे बॅंक खात्‍या मधून काढलेली रक्‍कम रुपये-1,00,000/-  दिनांक-22.04.2019 पासून वार्षिक-20 टक्‍के दराने व्‍याजासह बॅंकेनी तिला देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

  1. विरुध्‍दपक्ष बॅंकेनी दिलेल्‍या सेवेतील त्रृटीमुळे तिला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-1,00,000/- तसेच  तक्रारीचा खर्च  रुपये-20,000/-  विरुध्‍दपक्ष बॅंके कडून तिला अदा करण्‍याचे आदेशित व्‍हावे. या शिवाय योग्‍य ती दाद तिचे बाजूने मंजूर करण्‍यात यावी.

 

03.      विरुध्‍दपक्ष अॅक्‍सीस बॅंके तर्फे  तिचे शाखा व्‍यवस्‍थापकांनी लेखी उत्‍तर  जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले. विरुध्‍दपक्ष बॅंकेनी आपले लेखी उत्‍तरात तक्रारकर्ती ही उपरोक्‍त नमुद पत्‍त्‍यावर राहते आणि पेट्रोलपंपाचा व्‍यवसाय करते ही बाब मान्‍य केली. तक्रारकर्तीचे तक्रारी प्रमाणे दिनांक-22.03.2019 रोजी तिला एका ग्राहकाचा फोन आला, त्‍याचे ड्रायव्‍हर जवळ डिझेल भरण्‍यास पैसे नसल्‍याने त्‍याने फोनवरुन केलेल्‍या विनंतीवरुन  सदर ग्राहकाचे मुनीमजी जवळ फोनवरुन तक्रारकर्तीने तिचा अकाऊंट नंबर दिला,  सदर मुनीमने ऑन लाईन पेमेंट करतो असे सांगितल्‍याने तक्रारकर्तीने त्‍याचे मागणी प्रमाणे त्‍याचे जवळ क्‍यु.आर. कोड दिला या बाबी  विरुध्‍दपक्ष बॅंकेनी माहिती अभावी नामंजूर केल्‍यात. संबधित ग्राहकाने पेमेंट रिक्‍वेस्‍ट पाठविल्‍या नंतर तक्रारकर्तीने रिक्‍वेस्‍ट स्विकारली आणि त्‍यानंतर संबधित ग्राहकाने एकूण चार वेळा ट्रॉन्‍झीक्‍शन केल्‍या नंतरही ट्रॉन्‍झीक्‍शन झाले नसल्‍याने दुसरी कडून व्‍यवस्‍था  करतो  असे  तिला सांगितले या बाबी  विरुध्‍दपक्ष बॅंकेनी माहिती अभावी नामंजूर केल्‍यात.

           विरुध्‍दपक्ष अॅक्‍सीस बॅंके तर्फे पुढे असे नमुद करण्‍यात आले की, दिनांक-13.03.2019 रोजी तक्रारकर्तीने तक्रारीत नमुद केल्‍या प्रमाणे तिचे बॅंकेच्‍या खात्‍यातून प्रत्‍येकी रुपये-25,000/- प्रमाणे चार व्‍यवहारामध्‍ये एकूण रुपये-1,00,000/- एवढी रक्‍कम वजावट झाली ही बाब विरुध्‍दपक्ष  बॅंकेला मंजूर आहे मात्र तक्रारकर्तीने पेमेंट रिक्‍वेस्‍ट स्विकारल्‍यामुळेच तिच्‍या बॅंक खात्‍या मधून क्‍यु.आर. कोडच्‍या आधारे तिने दिलेल्‍या अकाऊंट क्रमांका मध्‍ये सदर रकमा या ट्रान्‍सफर (वळती) झालेल्‍या आहेत. सदर बाब लक्षात आल्‍या नंतर तक्रारकर्तीने संबधित ग्राहकास फोन लावला असता त्‍याने शिवीगाळ केली ही बाब विरुध्‍दपक्ष बॅंकेला माहिती नाही. तसेच त्‍याच दिवशी दिनांक-13.03.2019 रोजी तिने पोलीस स्‍टेशन भंडारा येथे तक्रार दिली ही बाब बरोबर आहे. तक्रारकर्तीने सदर ट्रॅन्झिक्‍शनस बाबत दिनांक-13.02.2019 रोजी विरुध्‍दपक्ष बॅंकेमध्‍ये लेखी तक्रार केल्‍या नंतर विरुध्‍दपक्ष्‍ बॅंकेनी त्‍यांचे नियमा प्रमाणे सदर रक्‍कम रुपये-1,00,000/- तिचे बॅंक खात्‍यात प्रकरणाची संपूर्ण चौकशी होई पर्यंत तात्‍पुरत्‍या स्‍वरुपात जमा केली होती. पुढे विरुध्‍दपक्ष बॅंकेनी त्‍यांच्‍या फ्रॉड कंट्रोल युनिट कडून चौकशी केली असता  तक्रारकर्तीने तिचे ग्राहकाच्‍या अकाऊंट मधून आलेली पेमेन्‍ट रिक्‍वेस्‍ट स्विकारल्‍यामुळे संपूर्ण ट्रॉन्झिक्‍शन  होऊन तिचे खात्‍यातून प्रत्‍येक वेळी रुपये-25,000/- या प्रमाणे चार वेळासाठी एकूण रुपये-1,00,000/- रकमेची वजावट झालेली आहे. या संपूर्ण प्रकारात विरुध्‍दपक्ष बॅंकेची  कोणतीही चुक नसल्‍यामुळे विरुध्‍दपक्ष बॅंकेनी तक्रारकर्तीचे बॅंक खात्‍यात तात्‍पुरती जमा केलेली रक्‍कम  रुपये-1,00,000/- दिनांक-22.04.2019 रोजी तिचे खात्‍यामधून परत काढून घेतली. तिने पुन्‍हा दिनांक-22.04.2019 रोजी पोलीस स्‍टेशन भंडारा येथे  तक्रार दिल्‍याची माहिती त्‍यांना नाही. या संपूर्ण प्रकरणा मध्‍ये विरुध्‍दपक्ष बॅंकेनी तक्रारकर्ती कडून कधीही क्‍यु.आर.कोडची मागणी केलेली नाही. तक्रारकर्तीने स्‍वतःचेच तक्रारी मध्‍ये मान्‍य केलेले आहे की, तिने संबधित ग्राहकाने मागणी केल्‍या प्रमाणे क्‍यु.आर.कोड दिला व पेमेंट रिक्‍वेस्‍ट  अॅक्‍सेप्‍ट (Payment Requested Accepted by Complainant)  केले, यामध्‍ये तिचीच संपूर्ण चुक आहे. तिने पेमेंट रिक्‍वेस्‍ट स्विकारल्‍यामुळे तिच्‍या खात्‍यामधून दुस-या व्‍यक्‍तीच्‍या खात्‍यात रक्‍कम जमा झालेली आहे आणि त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष बॅंकेनी तिला व्‍याजासह रक्‍कम परत करण्‍याचा प्रश्‍नच उदभवत नाही. विरुध्‍दपक्ष बॅंकेनी चौकशी होई पर्यंतच तात्‍पुरत्‍या स्‍वरुपात तिचे खात्‍या मध्‍ये रुपये-1,00,000/- जमा केलेले होते आणि त्‍या रकमेवर लिन असल्‍यामुळे ती रक्‍कम तिला काढता येत नव्‍हती.     

           आपले विशेष कथनात विरुध्‍दपक्ष बॅंकेनी असे नमुद केले की, ऑन लाईन बॅंकींग व्‍यवहारा मध्‍ये बॅंकेचा कुठलाही सहभाग नसतो. विरुध्‍दपक्ष बॅंकेच्‍या फ्रॉड कंट्रोल युनिटने चौकशी केली असता असे दिसून आले की, पेमेंट रिक्‍वेस्‍ट करणा-याने पेएटीएम व्‍दारे पेमेंट रिक्‍वेस्‍ट केल्‍या नंतर तक्रारकर्तीच्‍या  मोबाईल क्रमांक-9923408230 वर चार वेळेस  प्रत्‍येक वेळी रुपये-25,000/- तुमच्‍या खात्‍या मधून कमी होतील असा मजकूर  विरुध्‍दपक्ष बॅंके कडून पाठविण्‍यात आला होता आणि चारही वेळा तिच्‍या खात्‍या मधून रक्‍कम कमी झाल्‍या बाबतचा मजकूर  सुध्‍दा तिचे मोबाईलवर पाठविण्‍यात आलेला आहे. तक्रारकर्तीने पेमेंट रिक्‍वेस्‍ट अॅक्‍सेप्‍ट(Payment Requested Accepted by Complainant) केल्‍या नंतरच तिचे खात्‍या मधून प्रत्‍येक वेळी रुपये-25,000/- या प्रमाणे एकूण चार वेळा रक्‍कम कमी (Amount Debited) झाली व या बाबतचा  मॅसेज तिचे मोबाईल क्रमांकावर पाठविण्‍यात आलेला आहे. तक्रारकर्तीचे खात्‍या मधून जेव्‍हा पहिल्‍यांदा रुपये-25,000/-  एवढी रक्‍कम वजावट झाल्‍याचा मॅसेज तिचे मोबाईलवर आला असताना सुध्‍दा तिने पुढील तीन ट्रॉन्झिक्‍शनचे प्रत्‍येकी रुपये-25,000/- प्रमाणे रिक्‍वेस्‍ट पेमेंट केलेले आहे, यावरुन तिनेच ऑनलाईन ट्रॉन्झिक्‍शन करताना स्‍वतःच चुक केलेली आहे. ट्रॉन्झिक्‍शन फेल झाल्‍यास तसा मॅसेज मोबाईलवर पाठविण्‍यात येतो परंतु ट्रॉन्झिक्‍शन फेल झाल्‍या बाबतचा कुठलाही मॅसेज तिला पाठविण्‍यात आलेला नाही. या सर्व प्रकारावरुन असे दिसून येते की, तक्रारकर्तीने स्‍वतःच चुकीचे ऑन लाईन पेमेंट केल्‍यामुळे यासाठी तिच स्‍वतः जबाबदार आहे या संपूर्ण व्‍यवहारात विरुध्‍दपक्ष बॅंकेचा कुठलाही सहभाग नसल्‍यामुळे त्‍यांनी कोणतीही दोषपूर्ण सेवा तक्रारकर्तीला दिली नसल्‍याचे  नमुद करण्‍यात आले.

 

04.      तक्रारकर्तीने दस्‍तऐवज यादी प्रमाणे तिचे विरुध्‍दपक्ष अॅक्‍सीस बॅंकेत असलेल्‍या बॅंक खात्‍याचा उतारा प्रत,  तिने पोलीस स्‍टेशन भंडारा येथे दोन वेळेस केलेल्‍या तक्रारीच्‍या प्रती,तिने विरुध्‍दपक्ष बॅंकेकडे केलेली लेखी तक्रार अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात.

 

05.      विरुध्‍दपक्ष बॅंकेनी लेखी उत्‍तरा सोबत युपीआय ट्रॉन्झिक्‍शनस बाबत तक्रारकर्तीचे मोबाईल क्रमांकावर पाठविलेले आठ मॅसेजची प्रत, तसेच पुराव्‍या दाखल शपथपत्र  आणि लेखी युक्‍तीवाद दाखल केला.

 

06.      प्रकरणात उभय पक्षां तर्फे दाखल दस्तऐवज, विरुध्‍दपक्ष बॅंकेचा साक्षी पुरावा व  लेखी युक्‍तीवाद ईत्‍यादीचे  काळजीपूर्वक अवलोकन जिल्‍हा ग्राहक आयोगा व्‍दारे करण्‍यात आले.  तसेच विरुध्‍दपक्षाचे वकील श्री देशमुख यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला, त्‍यावरुन जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर खालील मुद्दे न्‍यायनिर्णयासाठी उपस्थित होतात-

 

अक्रं

  मुद्दा

उत्‍तर

01

तक्रारकर्ती ही विरुध्‍दपक्ष अॅक्‍सीस बॅंकेची ग्राहक आहे काय?

होय

02

तक्रारकर्तीची तक्रार मंजूर होण्‍यास पात्र आहे काय?

नाही

03

काय आदेश

अंतिम आदेशा नुसार

 

                                                                                  ::कारणे व मिमांसा::

 

मुद्दा  क्रं 1  बाबत-

07.      तक्रारकर्तीचे बॅंक खाते विरुध्‍दपक्ष अॅक्‍सीब बॅंके मध्‍ये असल्‍याने ती विरुध्‍दपक्ष बॅंकेची ग्राहक होते या मुळे मुद्दा क्रं 1 चे उत्‍तर होकारार्थी  नोंदवित आहोत.

मुद्दा क्रं 2 बाबत-

08.      तक्रारकर्तीने पोलीस स्‍टेशन भंडारा येथे दिनांक-13.03.2019 रोजी दिलेल्‍या तक्रारीचे अवलोकन केले असता  त्‍यामध्‍ये‍ तिने नमुद केले की, तिला आज दिनांक 13.03.2019 रोजी मोबाईल क्रमांक-8905041160 मधून कॉल आला की, त्‍यांना त्‍यांचे ट्रकसाठी रुपये-50,000/- चे डिझेल पाहिजे परंतु त्‍यांचे ड्रायव्‍हरजवळ तेवढी रक्‍कम नाही, त्‍यामुळे ते तक्रारकर्तीचे बॅंक खात्‍यात तेवढी रक्‍कम वळती करतील तरी कृपया ड्रायव्‍हर जवळ डिझेल दयावे.  तक्रारकर्तीने आपले बॅंक अकाऊंटचा नंबर मोबाईल क्रमांकावर कळवावा, जेणे करुन ते  मोबाईल अॅप व्‍दारे पैसे देतील, त्‍यानुसार तिने तिचे गुगल पे चा क्‍यु.आर.कोड दिला. त्‍यानंतर थोडयाच वेळात तिला  प्रत्‍येकी रुपये-25,000/- प्रमाणे तिचे खात्‍यामधून एकूण रुपये-1,00,000/- यु.पी.आय.व्‍दारे ट्रॉन्‍सफर झाल्‍याचा संदेश आला. अशाप्रकारे कोणीतरी तिचे बॅंकेच्‍या खात्‍यामधून मोबाईल अॅप व्‍दारे रकमा चोरी केलेल्‍या आहेत. या मध्‍ये एक व्‍यक्‍ती मालक असून दुसरा त्‍याचा अकाऊंटट  असून त्‍यांचे मोबाईल क्रमांक-8905041160 आणि मोबाईल क्रमांक-7310619694 असे  असल्‍याचे  तिने पोलीस स्‍टेशनला दिलेल्‍या तक्रारी मध्‍ये नमुद केले. या पोलीस स्‍टेशन मध्‍ये केलेल्‍या लेखी तक्रारी वरुन या संपूर्ण व्‍यवहारात विरुध्‍दपक्ष अॅक्‍सीस बॅंकेचा कोणताही सहभाग दिसून येत नाही.

09.       तक्रारकर्तीने विरुध्‍दपक्ष बॅंके मध्‍ये दिनांक-13.03.2019 रोजी जो Cardholder Dispute Form  भरुन दिलेला आहे, त्‍यामध्‍ये तिचा Debit/Credit Card Number-5366 1000 1130 8898 आणि अॅक्‍सीब बॅंके मध्‍ये असलेला अकाऊंट नंबर-912010000897157 असा नमुद केलेला असून प्रत्‍येकी रुपये-25,000/- या प्रमाणे एकूण चार वेळेच्‍या झालेल्‍या व्‍यवहाराचे डिटेल्‍स दिलेले आहेत.

10.      तक्रारकर्तीने पोलीस स्‍टेशन भंडारा येथे दिनांक-24.04.2018 रोजी दिलेल्‍या तक्रारी मध्‍ये असे नमुद केले की, ती पेट्रोलपंप चालविते.  तिला संबधित ग्राहकाचा दिनांक-13.03.2019 रोजी दुपारी दिड ते दोनच्‍या सुमारास फोन आला की, त्‍याचे गाडीत डिझेल भरावयास त्‍याचे ड्रायव्‍हर जवळ पैसे कमी आहेत. तुम्‍ही तुमचा अकाऊंट नंबर त्‍याचे मुनीमजी जवळ दयावा, तो तुम्‍हाला आता फोन करेल. त्‍यानंतर थोडयाच वेळात त्‍या ग्राहकाचे मुनीमचा फोन तिला आला, त्‍याने ऑनलाईन पेमेंट करतो असे सांगनू क्‍यु.आर.कोडची  मागणी तिचे जवळ केली असता तिने तिचा  क्‍यु.आर.कोड दिला असता त्‍याने ताबडतोब रुपये-25,000/- टाकले आणि तिला प्रोसिड करायला सांगितले, त्‍यावेळी तिचे लक्षात काहीही आले नसल्‍याने तिने ते प्रोसीड केले असता त्‍याने ट्रान्‍झीक्‍शन फेल झाले मी परत करतो असे सांगून  चार वेळा केले आणि म्‍हणाला की होत नाही मी काही तरी दुसरी व्‍यवस्‍था करतो आणि लगेच फोन बंद केला, तेंव्‍हा तिने पाहिले की, तिच्‍या खात्‍यातले पैसे गेले आले नाही, तिने ताबडतोब बॅंकेला फीर्याद केली आणि खाते ब्‍लॉक केले आणि पोलीस तक्रार सुध्‍दा केली. तिने त्‍या व्‍यक्‍तीला फोन केला असता तो शिविगाळ करुन फोन बंद करतो, त्‍या व्‍यक्‍तीचा फोन क्रमांक-7310619694 असा आहे असे नमुद केले.

11.               विरुध्‍दपक्ष अॅक्‍सीस बॅंकेनी तक्रारकर्तीचे मोबाईलवर पाठविलेल्‍या मॅसेजची प्रत दाखल केली त्‍याचे विवरण खालील प्रमाणे आहे-

 

Mission

Message

Application Date and Time

Vendors Submit Date and Time

Deliver Update Time

91992340823

Your A/C No.-897157 has been debited Rs.25000/-

UPI/PZM/907237697026/19744201000007

Call18605005555  if you have not done this transaction.

13.03.19

13:52:54

13.03.19

13:52:55

13.03.19

13:52:59

91992340823

Your A/C No.-897157 has been debited Rs.25000/-

UPI/PZM/907237709774/19744201000007

Call18605005555  if you have not done this transaction.

13.03.19

13:52:54

13.03.19

13:52:55

13.03.19

13:53:17

91992340823

Paytm has requested you money on your Google Pay UPI app. On approving the request, Rs.25000/- will be deducted from your account

13.03.19

13:50:15

13.03.19

13:50:15

13.03.19

13:50:17

 

Paytm has requested you money on your Google Pay UPI app. On approving the request, Rs.25000/- will be deducted from your account

13.03.19

13:49:16

13.03.19

13:49:17

13.03.19

13:53:22

91992340823

Your A/C No.-897157 has been debited Rs.25000/-

UPI/PZM/907237672584/19744201000007

Call18605005555  if you have not done this transaction.

13.03.19

13:48:06

13.03.19

13:48:07

13.03.19

13:48:27

 

Your A/C No.-897157 has been debited Rs.25000/-

UPI/PZM/907237690464/19744201000007

Call18605005555  if you have not done this transaction.

13.03.19

13:48:07

13.03.19

13:48:07

13.03.19

13:48:12

 

Paytm has requested you money on your Google Pay UPI app. On approving the request, Rs.25000/- will be deducted from your account

13.03.19

13:47:58

13.03.19

13:47:58

13.03.19

13:48:14

 

Paytm has requested you money on your Google Pay UPI app. On approving the request, Rs.25000/- will be deducted from your account

13.03.19

13:47:19

13.03.19

13:47:19

13.03.19

13:47:21

 

            उपरोक्‍त नमुद दस्‍तऐवजां वरुन ही बाब सिध्‍द होते की, तक्रारकर्तीला मोबाईल अॅप वरुन व्‍यवहार करते वेळी तिचे मोबाईलवर विरुध्‍दपक्ष बॅंके कडून  व्‍यवहाराचा मॅसेज आला होता आणि तिने त्‍यानंतरही पुढे ऑन लाईन व्‍यवहार केलेला दिसून येतो. ऑन लाईन व्‍यवहारा मध्‍ये विरुध्‍दपक्ष बॅंकेचा कोणताही सहभाग दिसून येत नाही. तक्रारकर्तीचे असे म्‍हणणे आहे की, संबधित ग्राहकाचे मुनीमने तिला फोनवरुन प्रत्‍येक वेळेस ट्रॉन्झिक्‍शन फेल झाल्‍याचे सांगितले व प्रत्‍येक वेळेस प्रोसीड करण्‍यास सांगितले असे चार वेळा केल्‍यामुळे प्रत्‍येकी रुपये-25,000/- प्रमाणे एकूण रुपये-1,00,000/- रक्‍कम तिचे खात्‍यामधून कमी झाली. या संबधात विरुध्‍दपक्ष बॅंकेनी तक्रारकर्तीचे फोनवर केलेल्‍या मॅसेजची प्रत दाखल केली त्‍यामध्‍ये वादातील चार व्‍यवहारा पैकी कुठल्‍याही व्‍यवहारा मध्‍ये ट्रॉन्झिक्‍शन फेल असा कुठलाही मॅसेज तिचे फोनवर विरुध्‍दपक्ष बॅंके तर्फे पाठविण्‍यात आलेला दिसून येत नाही.  दुसरी बाब अशी आहे की, विरुध्‍दपक्ष बॅंके तर्फे तक्रारकर्तीचे फोनवर जे मॅसेज पाठविण्‍यात आलेत त्‍यावरुन वादातील एकूण 04 व्‍यवहार ताबडतोब घडले असल्‍याचे दिसून येतात व त्‍वरीत वादातील चारही व्‍यवहार पूर्ण झाल्‍याचे दिसून येते. संबधित ग्राहकाचे मुनीमने ट्रॉन्झिक्‍शन फेल झाल्‍याचे सांगितल्‍या वरुन तक्रारकर्तीने एकूण चार वेळेस ट्रॉन्झिक्‍शन केले, जे चुकीचे दिसून येते. तक्रारकर्तीची संबधित ग्राहकाच्‍या मुनीमने ऑन लाईन व्‍यवहारात फसवणूक करुन रक्‍कम अफरातफर केलेली आहे आणि तिने या बाबत पोलीस स्‍टेशन भंडारा येथे लेखी तक्रार सुध्‍दा केलेली आहे. तक्रारकर्तीने डिझेलची उधारीवर विक्री ज्‍या ग्राहकास केली त्‍या ग्राहकाची तक्रारकर्ती ही ग्राहक होऊ शकत नाही.  तक्रारकर्ती सोबत ज्‍या ग्राहकाचे मुनीमने ऑन लाईन व्‍यवहार करुन रकमेची अफरातफर केली तो मुनीम सुध्‍दा तक्रारकर्तीचा ग्राहक होऊ शकत नाही. ईतकेच नव्‍हे तर तक्रारकर्तीने सदर प्रकरणात ज्‍या व्‍यक्‍तींनी ऑन लाईन रकमेची अफरातफर केलेली आहे त्‍यांना या प्रतिपक्ष केलेले नाही. अशा परिस्थितीत तक्रारकर्ती ही जरी विरुध्‍द पक्ष बॅंकेची ग्राहक होत असली तरी विरुध्‍द पक्ष बॅंकेनी तिला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब प्रकरणातील दाखल दस्‍तऐवजी पुराव्‍यांवरुन सिध्‍द होत नाही.  त्‍यामुळे मुद्दा क्रमांक 2 चे उत्‍तर नकारार्थी नोंदविण्‍यात येते. त्‍यामुळे तक्रारकर्तीची तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे. तक्रारकर्तीचे खात्‍यातील रकमेचे ऑनलाईन अफरातफरीचे प्रकरण हे पोलीस तपासामध्‍ये प्रलंबित आहे त्‍यामुळे पुढे तक्रारकर्ती ही सक्षम न्‍यायालयात जाऊन तेथे आपली बाजू मांडू शकते असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.

12.      उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थिती आणि दाखल दस्‍तवेजी पुरावे यांचा विचार करुन आम्‍ही प्रस्‍तुत तक्रारी मध्‍ये खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत-

                                                                                        ::अंतिम आदेश::

 

 

  1.           तक्रारकर्तीची विरुध्‍दपक्ष अॅक्‍सीस बॅंक, शाखा भंडारा तर्फे व्‍यवस्‍थापक यांचे  विरुध्‍दची तक्रार  खारीज करण्‍यात येते.

 

  1.           खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.

 

  1.           तक्रारकर्तीच्‍या खात्‍यातील ऑनलाईन व्‍यवहारा व्‍दारे अफरातफरीचे प्रकरण  हे पोलीस तपासा मध्‍ये प्रलंबित असल्‍याने पुढे तक्रारीकर्ती तिची बाजू योग्‍य त्‍या सक्षम न्‍यायालयात मांडू शकते.

 

  1.           निकालपत्राच्‍या  प्रथम प्रमाणित प्रती उभय पक्षांना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन   देण्‍यात याव्‍यात.

 

  1.           उभय पक्षांनी दाखल केलेले अतिरिक्‍त संच त्‍यांनी जिल्‍हा आयोगाचे   कार्यालयातून परत घेऊन जावे.

 

 

 

                                       

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.