Maharashtra

Chandrapur

CC/15/222

Shri Ganesh Gulab Bagade At Maher - Complainant(s)

Versus

Branch Manager Vidarbh Kokan Gramin Bank Branch Bramhapuri - Opp.Party(s)

Adv. Chilbule

19 Jul 2017

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL FORUM
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/15/222
 
1. Shri Ganesh Gulab Bagade At Maher
At Maher Post Khemakta Tah Bramhapuri
Chandrapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Branch Manager Vidarbh Kokan Gramin Bank Branch Bramhapuri
Bramhapuri
Chandrapur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. UMESH V.JAWALIKAR PRESIDENT
 HON'ABLE MRS. Kirti Gadgil (Vaidya) MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 19 Jul 2017
Final Order / Judgement

::: नि का   :::

मंचाचे निर्णयान्‍वये,  उमेश वि. जावळीकर मा. अध्‍यक्ष

१.         सामनेवाले यांनी, तक्रारदारांस ग्राहक संरक्षण अधिनियम अन्‍वये तरतुदीनुसार सेवासुविधा पुरविण्‍यात कसूर केल्‍याने प्रस्‍तूत तक्रार दाखल केली आहे. 

२.         तक्रारदारांनी, सामनेवाले यांच्‍याकडे दिनांक ०९.०२.२०१५ रोजी तक्रारदार यांची पत्नी गौरी हिचे रक्कम रु. १०० अदा करुन बचत खातेची सेवा घेतली. सदर बचत खात्यामध्ये तक्रारदार यांची पत्नी रोजगार हमी योजनेमध्ये केलेल्या मोबदल्याची रक्कम जमा करीत होती. तक्रारदार यांच्या पत्नीचे दिनांक २०.०९.२०१५ रोजी निधन झाले. सामनेवाले यांच्याकडे बचत खाते सुरू केल्यानंतर तक्रारदार यांच्या पत्नीने प्रधान मंत्री जीवन ज्योती योजनेचा लाभ घेणेसाठी सामनेवाले यांच्यासोबत दिनांक २९.०५.२०१५ रोजी करार केला होता. सदर कराराप्रमाणे सामनेवाले यांनी दिनांक ०१.०६.२०१५ रोजी रक्कम रु. ३३०/- सदर बचत खात्यामधून वजा करुन घेणे आवश्यक होते. प्रधान मंत्री जीवन ज्योती योजनेचा लाभ देणेसाठी सामनेवाले यांनी दिनांक ०१.०६.२०१५ रोजी सदर रक्कम वजा न केल्याने योजनेचा लाभ तक्रारदारास न मिळाल्याने सामनेवाले यांनी तक्रारदारास दिनांक १४.१०.२०१५ रोजी वकिलामार्फत नोटीस पाठवून, सदर नोटीस सामनेवाले यांना दिनांक १८.१०.२०१५ रोजी प्राप्त होवूनदेखील सामनेवाले यांनी विमा दावा रक्कम तक्रारदारास अदा न केल्याने तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करून सामनेवाले यांनी विमा रक्कम तसेच शारिरीक, मानसीक त्रासापोटी व तक्रार खर्चापोटी दंडात्‍मक रक्‍कम तक्रारदारांस अदा करावी अशी विनंती तक्रारदार यांनी केली आहे. 

३.         सामनेवाले यांना मंचाची नोटीस पाठविली असता, सामनेवाले यांनी तक्रारीतील मुद्द्यांचे खंडन करुन, तक्रारदार यांच्या पत्नीचे बचत खातेमध्ये दिनांक ३०.०५.२०१५ रोजी रक्कम रु. ३३०/- शिल्लक नसल्यामुळे विमा करार वैध राहिला नाही. योजनेच्या अटी व शर्ती प्रमाणे दिनांक ३०.०५.२०१५ रोजी रक्कम वजा करणे आवश्यक होते. परंतु तक्रारदार यांच्या पत्नीने नमूद दिनांकास पर्याप्त रक्कम विमा करार वैध राहण्यासाठी जमा न केल्याने तक्रारदार यांच्या पत्नीस विमा संरक्षण प्राप्त झाले नाही. सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्या नोटीसला प्रतीउत्तर पाठविले असून सामनेवाले यांनी विमा कराराच्या नियमाप्रमाणे सर्व अटी व शर्तीचे पालन केले असून, दिनांक ३०.०५.२०१५ रोजी विमा रक्कम अदा न केल्याने विमा करार रद्द करणे न्यायोचित असल्याने, तक्रार खर्चासह अमान्य करण्यात यावी, अशी विनंती सामनेवाले यांनी केली आहे.

 ४.        तक्रारदारांची तक्रार, कागदपत्रे, पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद तसेच सामनेवाले यांचा लेखी जवाब, कागदपत्रे,  व  उभय पक्षांचा तोंडी युक्तिवाद यावरून तक्रार निकाल कामी खालील मुद्दे कायम करण्‍यांत येतात. 

            मुद्दे                                                            निष्‍कर्ष 

१.   सामनेवाले यांनी तक्रारदारास कराराप्रमाणे

     सेवासुविधा पुरविण्‍यात कसूर केल्याची बाब

     तक्रारदार सिद्ध करतात काय ?                            होय               

२.    आदेश ?                                                               अंशतः मान्‍य 

                       

कारण मिमांसा

मुद्दा क्रं. १ 

५.         तक्रारदार यांच्या पत्नीचे बचत खातेमध्ये दिनांक ३०.०५.२०१५ रोजी रक्कम रु. ३३०/- शिल्लक नसल्यामुळे विमा करार वैध राहिला नाही. योजनेच्या अटी व शर्ती प्रमाणे दिनांक ३०.०५.२०१५ रोजी रक्कम वजा करणे आवश्यक होते परंतु सदर योजनेच्या माहिती पुस्तीकेचे अवलोकन केले असता योजनेचा कालावधी १ जुन ते ३१ मे असा असून प्रथम सहभागी होण्यासाठी प्रथम विमा रक्कम १ जुन ते ३१ मे या कालावधीमध्ये जमा करणे आवश्यक आहे. तक्रारदार यांच्या पत्नीने दिनांक २९.०५.२०१५ रोजी विमा करार केला असून रक्कम बचत खात्यामधून वजा करणेची जबाबदारी सामनेवाले यांची होती. सदर रक्कम दिनांक ०१.०६.२०१५ रोजी वजा न केल्याने तक्रारदार यांच्या पत्नीचा विमा करार वैध राहिला नाही. सामनेवाले यांनी सदर योजनेच्या अंमलबजावणी बाबत हेतुतः निष्काळजीपणा करुन विमा करार सुरुवात व नुतनीकरण यासाठी असलेल्या भिन्न दिनांकाबाबत वेगवेगळे निष्‍कर्ष  नमूद असूनदेखील त्याचे पालन न केल्याची बाब सामनेवाले यांनी तक्रारदाराच्या पत्नीचा विमा करार न्यायोचित कारणाशिवाय अवैध ठरविल्याने, सामनेवाले यांनी तक्रारदारास विमा कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्‍यात कसूर केल्‍याची बाब सिद्ध होते. सामनेवाले यांनी योजनेच्या अंमलबजावणीसाठी पर्याप्त स्वरुपात विमाधारक प्राप्त व्हावेत यासाठी  तक्रारदाराच्या पत्नीचा विमा करार दिनांक २९.०५.२०१५ रोजी केला. परंतु दिनांक ०१.०६.२०१५ रोजी तक्रारदाराच्या पत्नीच्या बचत खात्यावरून रक्कम वजा न केल्याने प्रस्तुत तक्रारीमध्ये तांत्रिक स्वरूपाचा बचाव घेऊन सदर योजनेच्या नुतनीकरण यासाठी असलेल्या दिनांकाचा संदर्भ देऊन तक्रारदाराच्या पत्नीचा विमा दावा न्यायोचित कारणाशिवाय नाकारल्याची बाब कागदोपत्री पुराव्यावरून सिध्‍द होते. सादर तांत्रिक स्वरूपाचा बचाव प्रस्तुत तक्रारीतील वाद्कथनास लागू होत नसल्याने अमान्य करण्यात येतो. तक्रारदाराच्या पत्नीस दिलेल्या विमा कराराबाबतचा आक्षेप लेखी स्वरुपात सादर करून तक्रारदार यांनी विमा रक्कमेची मागणी तात्काळ केल्याची बाबही कागदोपत्री पुराव्‍यावरून सिध्‍द होते. ग्राहक संरक्षण अधिनियम कलम २ (१)(ओ) अन्‍वये “सेवा” या संज्ञेची व्‍याप्‍ती पाहता वैध विमा करार सेवेबाबतची तक्रार मंचाकडे दाखल करता येते, असे न्‍यायतत्‍व आहे. सबब, तक्रारदार यांची तक्रार वर नमूद निष्‍कर्षावरून, तक्रारदारांनी सदर तक्रार वैध विमा करार सेवेबाबत दाखल केल्‍याने व ही बाब कागदोपत्री पुराव्‍याने सिध्‍द झाल्‍याने, सामनेवाले यांनी तक्रारदारास विमा कराराबाबत सेवा सुविधा पुरविण्‍यात कसूर केल्याची बाब सिध्‍द झाल्‍याने मुद्दा क्रं. १ चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्‍यात येते. 

मुद्दा क्रं. २ 

६.          मुद्दा क्रं. १ च्‍या विवेचनावरुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.

आदेश

 

      १. ग्राहक तक्रार क्र. २२२/२०१५ अंशतः मान्‍य करण्‍यात येते.

           २.  सामनेवाले यांनी, तक्रारदाराच्या पत्नीस ग्राहक संरक्षण अधिनियम        अन्‍वये तरतुदीनुसार विमा संरक्षण कराराबाबत सेवासुविधा                    पुरविण्‍यात कसूर केल्‍याची बाब जाहीर करण्यात येते.

       ३. सामनेवाले यांनी, तक्रारदाराच्या पत्नीचा जीवन ज्योती योजने                अंतर्गत दिनांक २९.०५.२०१५ रोजी केलेला विमा करार वैध असल्याचे          जाहीर केल्याने विमा रक्कम रु. २,००,०००/- तक्रारदार यास या               आदेशप्राप्ती दिनांकापासून ३० दिवसात अदा करावे.

       ४. सामनेवाले यांनी, तक्रारदारास मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रासापोटी          व तक्रार खर्चापोटी एकत्रित रक्कम रु. २५,०००/- या आदेशप्राप्ती          दिनांकापासून ३० दिवसात अदा करावे.     

             ५.  उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्‍काळ पाठविण्‍यात यावी.

 

 

 

 श्रीमत श्रीमती. कल्‍पना जांगडे  श्री. उमेश वि. जावळीकर   श्रीमती. किर्ती गाडगीळ         

       (सदस्‍या)          (अध्‍यक्ष)                (सदस्‍या)          

 

 
 
[HON'BLE MR. UMESH V.JAWALIKAR]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Kirti Gadgil (Vaidya)]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.