:: नि का ल प ञ:::
मंचाचे निर्णयान्वये, किर्ती वैदय ( गाडगीळ) मा.सदस्य
१. गैरअर्जदार हे वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँक विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक असून त्यांच्या बँकेच्या शाखा मार्फत बचत खाते, कर्ज जमा खाते ठेवि ,तसेच पैशाचे लेन देन व्यवहार चालतात. अर्जदाराने दि.४.०६.२०१२ रोजी गैरअर्जदाराकडे रु. ५०,०००/- दोहरा लाभ जमा प्रमाणपत्र या योजनेअंतर्गत तीन वर्षाच्या कालावधीकरता दसादशे ९.४०% प्रमाणे प्रमाणपत्र करिता नगद ५०,०००/- चा भरणा केला. त्यावेळी गैरअर्जदार कमांक १ यांनी अर्जदारास सदरच्या जमा रकमेबाबत त्याच दिवशी दिनांक ०४.०६.२०१२ रोजी २४२५० क्रमांकाचे अर्जदाराला जमा प्रमाणपत्र अर्जदारास दिले. त्यानंतर सदर प्रमाणपत्राचा तीन वर्षांचा कालावधी दि.०४.०६.२०१५ रोजी संपला. त्याच दिवशी गैरअर्जदार क्रमांक १ कडे जाऊन अर्जदाराने सदरहू दोहरा जमा प्रमाणपत्रानुसार दिनांक ६६,०७३.०२ /- रकमेची मागणी केली तेव्हा गैरअर्जदार क्रमाक १ ने आमच्या वरिष्ठांच्या अहवालानंतर सदरची रक्कम रुपये ६६,०७३.०२ /- दहा बारा दिवसांनी मिळेल असे सांगितले. वास्तविक ठराविक कालावधी संपल्यानंतर एक दिवस सुद्धा रकमेचे भुगतान करण्याकरता आगाऊ वेळ नियमानुसार घेता येत नाही. अर्जदार बाई दिनांक रोजी मागणी केली असता गैर अर्जदाराने पुन्हा पुढील तारखेस अर्जदार बाई येण्यास सांगितले म्हणून अर्जदार बाईने दिनांक २१.०३.२०१६ रोजी गैरअर्जदार क्रमांक १ ला दुसऱ्याच्या मदतीने लेखी पत्र लिहून दिले परंतु सदर पत्रावर गैरअर्जदार कोणतीच कारवाई न करता अर्जदार बाईला तारखा दिल्या त्यानंतर अर्जदार बाईने गैरअर्जदार क्रमांक 1 यांना दिनांक २८.०६.२०१६ रोजी लेखी पत्र दिले सदर पत्र त्यांना दिनांक ०१.०७.२०१६ रोजी प्राप्त झाले. गैरअर्जदार क्रमांक १ यांनी त्यांना त्यांच्याच दिनांक ०७.०७,२०१६ रोजी अर्जदाराला पत्रात कबूल करून कळवले की आमचे क्षेत्रीय कार्यालयामार्फत कार्यालयात चौकशी सुरू आहे प्राप्त होणाऱ्या निर्णयानुसार आपल्याला रुपये ५०,०००/-हजार मुदत ठेवी बाबत कळवण्यात येईल. अर्जदार बाईने वाट बघितली परंतु मुदत संपल्यानंतरही गैरअर्जदारानी रक्कम दिली नाही. अर्जदाराने दिनांक २०.११.२०१६ रोजी वकिलामार्फत गैरअर्जदार नोटीस पाठवला व रकमेची मागणी केली परंतु नोटीस प्राप्त होऊनही गैरअर्जदारानी त्याची दखल घेतली नाही सबब अर्जदार बाईने सदर तक्रार मंचात गैरअर्जदारा विरुद्ध दाखल केलेली आहे.
तक्रारीत अर्जदाराने मागणी अशी केली की ६६,०७३.०२/-दोहरा लाभ प्रमाणपत्र अंतर्गत गैर अर्जदारा कडून दि ०४.०६.२०१५ रोजी पाप्त होणारी रक्कम ,तसेच रु. १०,००५.००/-उपरोक्त रकमेवर आज्पार्यांचे द. स. द.शे १५% व्याज, ३०००/- प्रति गैर अर्जदाराला पाठविलेल्या नोटीसचा खर्च , २५,०००/- मानसिक शारीरिक त्रासापोटी झालेला खर्च, अर्जदाराला मिळण्यात यावा.
२. प्रस्तुत तक्रार स्वीकृत करून गैरअर्जदार १ ते २ यांना नोटीस पाठवण्यात आले गैरअर्जदार क्रमांक १ ते २ यांनी प्रस्तुत तक्रारीत उपस्थित होऊन त्यांचे लेखी उत्तर केले त्यात त्यांनी नमूद केले की अर्जदाराने दिनांक ०४.०६.२०१२ रोजी गैर अर्जदाराच्या दुहेरी लाभ योजनेअंतर्गत नक्की रुपये ५०,०००/- जमा केलेले नसून सदर अर्ज सदर अर्जदार महिलेने दिनांक ३१ मे२०१२ रोजी तिचे बचत खाते मध्ये ५०,०००/- नगदी जमा केलेले होते. त्याच दिवशी त्यांनी दुहेरी लाभ योजनेअंतर्गत सदर रक्कम गुंतवण्याच्या दृष्टीने दुहेरी लाभ योजने ९.४०% व्याजदराने रक्कम गुंतवण्यात करता आवश्यक तो अर्ज रुपये ५०,०००/ व रक्कम जमा करण्याची स्लिप भरून दिली होती. त्याच दिवशी बँकेत गर्दी असल्यामुळे त्यांनी सदर मौखिक विनंती केली होती की जेव्हा आपणास वेळ मिळेल तेव्हा माझी दुहेरी लाभ घेऊन अंतर्गत गुंतवणूक करून ठेव पावती मला देण्यात यावी. अर्जदाराच्या दिनांक ३१ मे २०१५ च्या पत्रावर दि.०४.०६.२०१२ रोजी कार्यवाही करण्यात आली असून त्याचे दुहेरी लाभ मिळण्याचे खाते क्रमांक ४०२०४५११०००००७५ उघडण्यात आले व त्यांना ठेव पावती क्रमांक २४२५०पासून जारी करण्यात आली. परंतु त्यात सदर रक्कम रुपये ५०,०००/- दुहेरी लाभ जमा योजना खात्यात जमा करण्याचे अनवधानाने राहून गेले. ठेव पावती नुसार उल्लेखित कालावधी दिनांकाचा २०.०५.२०१५ रोजी संपला. व मुदतीपर्यंत देय राशिरु. ६६,०७३.०२ /- देय आहे ही वस्तुस्थिती आहे. जेव्हा दि.०४.०६.२०१५ अर्जदाराने गैरहजर क्रमांक १ कडे मुदती उपरांत देय राशि ची मागणी केली तेव्हा गैरअर्जदराने संगणकांमध्ये त्यांचे खाते तपासले असता त्या खात्यात रक्कम जमा नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ते गोंधळून गेले कारण दिनांक ०४.०६.२०१२ रोजी व दिनांक ०४.०६.२०१५ रोजीचे शाखा प्रबंधक वेगवेगळे व्यक्ती होते .त्यामुळे विद्यमान शाखा प्रबंधकांनी अर्जदार बाईला परिस्थिती समजून सांगितली सदर घटना कशी घडली याबाबत अंतर्गत चौकशी करण्याच्या कामामुळे या प्रकरणात प्रशासकीय विलंब होऊ शकतो. अर्जदाराने दुहेरी लाभ योजनेअंतर्गत मिळण्याची रक्कम रु. ५०,०००/- दिनांक ०४.०६.२०१२ रोजी नगदी जमा असल्या बदल केलेला आरोप चुकीचा असल्याने सदर रक्कम दिनांक ३१ मार्च २०१२ रोजी बचत खात्यात जमा केली होती. व ती रक्कम दुहेरी लाभ प्रमाणपत्र योजनेच्या त्यांच्या खात्यात वळती झाली नसल्याने वेळोवेळी सदर बाब माहिती माहित असून सुद्धा खात्यातून काढून घेतली याबाबत वस्तुस्थिती अर्जदारांनी बँकेच्या निदर्शनास आणून द्यावयास हवी होती .अर्जदाराने दुहेरी लाभ योजने योजनेची गुंतवणुकीची रक्कम ५०,०००/- दि. ०४.०६.२०१२ रोजी जमा केली असल्याबाबतचा आरोप मुळातच चुकीचा आहे. सादर रक्कम त्यांनी दिनांक ०४.०६.२०१२ रोजी नगदी जमा केली असल्यास त्यांचा जवळ सदर रकमेचे व्यवहार झाल्याची स्थळ प्रत काउंटर फाईल असली पाहिजे. सदर पावती त्याचे म्हणणे सिद्ध करण्याच्या दृष्टीने सादर करावी सबब गैरअर्जदार तर्फे सेवा देण्यात कोणतीही न्यूनता झालेली नसल्यामुळे सदर तक्रार खारीज करण्यात यावी. गैरअर्जदाराच्या वरील झालेल्या चुकीमुळे आम्ही अर्जदाराला दुहेरी लाभ योजने दि. ०४.०६.२०१२ ते ०४.०६..२०१५ या कालावधीकरता कराराप्रमाणे ९.४०%द्यावयाचे व्याज दुहिरी लाभ योजनेत देय असलेल्या व्याज दराने
बचत खात्यातील शिल्लक रकमेवर दिलेल्या व्याजाची रक्कम वजा करून फरकाची रक्कम देण्यास तयार आहोत.
३. गैरअर्जदार ३ व ४ ह्यांनी प्रस्तुत तक्रारीत गैरअर्जदार क्रमाक १ व २ ह्यांनी दाखल केलेले उत्तर हेच त्याचे उत्तर समजण्यात यावे अशी पुरसीस दाखल केली.
४. तक्रारदाराची तक्रार कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद, गैरअर्जदार यांचे कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद यांचे अवलोकन केले असता तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहे.
मुद्दे निष्कर्ष
१. गैरअर्जदार १ ते ४ यांनी तक्रारदारास कराराप्रमाणे
सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब
तक्रारदार सिद्ध करतात काय ? होय
२. गैरअर्जदार १ ते ४ तक्रारदारास नुकसानभरपाई अदा
करण्यास पात्र आहेत काय ? होय
३. आदेश ? अंशतः मान्य
कारण मिमांसा
मुद्दा क्र. १ :
५. सदर प्रकरणात अर्जदार बाई गैरअर्जदार बँकेकडे बचत खाते आहे.अर्जदार बाईने तिचेजवळचे रु. ५०,००० /- गैरअर्जदाराचे दोहरा लाभ जमा योजनेत टाकण्याचे ठरवले. सदर योजनेअंतर्गत तीन वर्षाच्या कालावधीकरिता ९.४०%टक्के प्रमाणे चे प्रमाणपत्र गैरअर्जदाराने अर्जदाराला दिले. सदर दौहरा लाभ योजना ही दिनांक ०४.०६.२०१५ रोजी संपत होती. या योजनेअंतर्गत अर्जदार बाईला प्रमाणपत्रानुसार रुपये ६६,०७३.०२/- .रक्कम मिळणार होती. गैरअर्जदार ह्यांनी तक्रारीत दाखल केलेल्या उत्तराचे अवलोकन केले असता असे दिसून येते की अर्जदार बाई ज्यावेळी सदर योजनेंतर्गत रु. ५०,०००/- तिच्या बचत खात्यातून वळती करून सदर योजनेत भरण्यास सांगितले असता बँकेतील कर्मचा-यांनि सांगितले बँकेत गर्दी असल्यामुळे रक्कम नंतर वळती करण्यात येईल . सबब गैरअर्जदाराने अर्जदाराचा अंगठा रक्कम ५०,०००/- काढण्याच्या पावतीवर घेऊन अर्जदार बाई ला दोहरा योजनेचे प्रमाणपत्र दिले. सदर प्रमाणपत्र तक्रारीत दाखल असून गैरअर्जदाराने रक्कम ५०,०००/-तिच्या बचत खात्यातून वळती करण्यासाठी अर्जदार बाई चा अंगठा असलेली रक्कम काढण्याबद्दलची पावती तक्रारीत दाखल केलेली आहे. गैरअर्जदार क्र. १ व ४ च्या उत्तराचे अवलोकन केले असता असे स्पष्ट होत आहे की अर्जदार बाई ज्या दिवशी योजनेत रक्कम भरावयास केली त्या दिवशी बँकेत गर्दी असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी सदर रक्कम ५०,०००/- तिच्या खात्यातून नंतर योजनेत वळती करू असे सांगून तिला प्रमाणपत्र देऊ केले तसेच पुढेही असे मान्य केलेले आहे की त्यानंतर बँकेतील कर्मचाऱ्यांच्या अनवाधनामुळे सदर रक्कम रुपये ५०,०००/- अर्जदाराच्या बचत खात्यातून सदर योजनेत वळती करणे राहून गेले आहे. परंतु अर्जदार बाई योजनेनुसार तीन वर्षांनी गैर अर्जदाराकडे रकमेची मागणी केल्यानंतर सदर बाब लक्षात येताच गैरअर्जदारांनी अर्जदारांना रक्कम देण्याबद्दल कारवाई चालू असल्याबाबतचे पत्र पाठविले.यावरून असे दिसून येत आहे कि गैरअर्जदार यांच्या चुकीमुळे तीन वर्षांनंतर अर्जदार बाई रकमेचा लाभ घेऊ शकली नाही. ही बाब गैर अर्जदाराने अर्ज दारा प्रती अवलंबिलेली सेवेत न्यूनता आहे. गैरअर्जदारांनी त्यांच्या उत्तरात चूक कबूल करीत दोहरा योजनेतील व्याज दराने बचत खात्यातील शिल्लक रकमेवर दिलेल्या व्याजाची ची रक्कम वजा करून फरकाची रक्कम देण्यास तयार आहे असे मान्य केलेले आहे. सबब मंच या निष्कर्षाला आले आहे की गैरअर्जदार यांनी अर्जदारास रुपये ५०,०००/- वर दोहरा लाभ योजने अंतर्गत ठरलेल्या व्याज दराप्रमाणे व्याज रक्कम देणे योग्य राहील. सवव गैर अर्जदाराने अर्जदाराची रक्कम रुपये ५०,०००/- दोहरा लाभ योजने अंतर्गत रक्कम न गुंतवून अर्जदार बाईस मिळणाऱ्या दोहरा लाभापासून अनवधनाने का होईना वंचित ठेवल्यामुळे गैरअर्जदार क्र .१ ते ४ ह्यांनी अर्जदार बाईस सेवेत न्यूनता आहे ही बाब सिद्ध होत आहे सबब मुद्दा क्रमांक १ व २ व उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
मुद्दा क्र. ३ बाबत :
६. सबब मुद्दा क्र. १ व २ च्या विवेचनावरून मंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
१. ग्राहक तक्रार क्र. ३२/२०१७ अंशत: मान्य करण्यात येते.
२. गैरअर्जदार क्र.१ ते ४ यांनी वैयक्तिक व संयुक्तीकपणे, अर्जदार बाईस रु. ५०,०००/- वर दोहरा योजने अतर्गत असलेल्या व्याज दराप्रमाणे बचत खात्यातील व्याज वगळता उर्वरित व्याजाची रक्कम या आदेश प्राप्ती दिनांकापासुन ३० दिवसात अदा करावे.
३. गैरअर्जदार क्र.१ व ४ यांनी वैयक्तिक व संयुक्तीकपणे यांनी अर्जदारास मानसिक, शारीरीक त्रासापोटी व तक्रार खर्चापोटी एकत्रित रक्कम रु. १०,०००/- या आदेश प्राप्ती दिनांकापासुन ३० दिवसात अदा करावी.
४. ग्राहक संरक्षण अधिनीयम कलम १४ (फ) अन्वये तृटीपूर्ण सेवेची पुनरावृत्ती होऊ नये, याची दक्षता घेण्याचे निर्देश गैरअर्जदार क्र.१ व ४ यांना देण्यात येतात.
५. न्यायनिर्णयाची प्रत उभय पक्षाना तात्काळ पाठविण्यात यावी.
श्रीमती कल्पना जांगडे श्रीमती कीर्ती(वैद्य)गाडगीळ श्री. उमेश वि.जावळीकर
(सदस्या) (सदस्या) (अध्यक्ष)