निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 03/09/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 06/03/2010 तक्रार निकाल दिनांकः- 24/01/2011 कालावधी 10 महिने 18 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. संताबाई रामराव पौळ. अर्जदार वय 30 वर्षे.धंदा निरंक. अँड.एस.जी.सुतार. संभाजी नगर,दादाराव प्लॉट, परभणी ता.जि.परभणी. विरुध्द ब्रँच मॅनेजर, गैरअर्जदार. वैद्यनाथ को-ऑपरेटिव्ह बँक लि. अँड.जी.आर.सेलूकर. शिवाजी नगर,बसमतरोड,परभणी. ------------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – श्री.सी.बी.पांढरपट्टे.अध्यक्ष.) संजिवनी बँकेत मुदत ठेवीत गुंतवलेल्या रक्कमा ठेव पावती वरील व्याजदरा प्रमाणे व्याजासह विलिनिकरण केलेल्या गैरअर्जदार बँकेने परत करण्याच्या बाबतीत केलेल्या सेवा त्रुटी बद्दल प्रस्तुतची तक्रार आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदाराचे वडील रामराव भरोसे त्यांच्या हयातीत मालमत्तेची वाटणी झालेली होती वाटणी झाल्यानंतर अर्जदाराच्या वडीलांची जमीन व अर्जदाराची जमीन विकून आलेली रक्कम दि.6/7/01 रोजी अर्जदाराच्या नावे रक्कम रु.2,00,000/- (खाते क्रमांक 13/127 ) व रु.1,00,000/- ( अकाऊंट क्रमांक 29/36 ) 2 वर्षांसाठी व द.सा.द.शे. 15 % व्याजदराने संजिवनी अर्बन को.ऑप.बँकेत मुदत ठेवीमध्ये गुंतविले होते. सदरील रक्कमेवर मिळणा-या व्याजावर ती उदरनिर्वाह करीत होती.उत्पन्न मिळण्याचा अन्य मार्ग उपलब्ध नसल्यामुळे अर्जदार पूर्णपणे सदरील रक्कमाच्या मिळणा-या व्याजावरच तिचा उदरनिर्वाह अवलंबुन होता. परंतु संजिवनी बँकेच्या अनागोंदी कारभारामुळे रिजर्व्ह बँक ऑफ इंडीयाने सदरील बँकेवर निर्बंध लादल्यामुळे व्याजापोटी मिळणारी रक्कम ही अर्जदारारस मिळू शकली नाही त्यामुळे अर्जदारावर उपासमारीची वेळ आली.दरम्यान संजिवनी अर्बन को.ऑप.बँकेचे वैद्यनाथ अर्बन को.ऑप.बँकेमध्ये विलिनीकरण झाले तदनंतर गैरअर्जदारास सदरची रक्कम देण्याची विनंती अर्जदाराने अनेक वेळा केली परंतु गैरअर्जदाराने अर्जदारांच्या असाह्य परिस्थितीचा गैरफायदा घेतला व अर्जदाराकडून विविध बॉंडवर व्याज न मागण्याच्या शर्तीवर अर्जदारास फक्त मुळ रक्कम दिली.दि.22/12/2008 रोजी गैरअर्जदारास लेखी अर्ज देवुन सदरच्या रक्कमे वरील व्याज देण्याची विनंती केली अन्यथा उपोषणला बसणार असल्याचीही नोटीसीव्दारे कळविले.परंतु गैरअर्जदाराने याकडे पूर्णपणे कानाडोळा केला म्हणून अर्जदाराने मंचासमोर तक्रार दाखल करुन गैरअर्जदाराने दि.6/7/2005 पासून ते दि.5/1/2009 पर्यंत रक्कम रु.2,00,000/- वरील व्याजापोटी रक्कम रु. 1,07,500/- तसेच मानसिकत्रासा पोटी रु.10,000/- व अर्जाचा खर्च रु.5000/- मिळावा अशी मागणी केली आहे. अर्जदाराने तक्रार अर्जासोबत शपथपत्र (नि.2) व पुराव्यातील कागदपत्रात नि.5 लगत ठेव पावत्यांच्या छायाप्रती व गैरअर्जदाराला तारीख 20/01/2009 रोजी दिलेल्या अर्जाची स्थळप्रत वगैरे 11 कागदपत्र दाखल केले आहेत. मंचाची नोटीस गैरअर्जदारास मिळाल्यानंतर त्याने लेखी निवेदन तारीख 15/12/2010 रोजी ( नि.11) दाखल केले आहे. अर्जदाराचे कथन बहुतअंशी अमान्य केले आहे. गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, दि.6/7/2001 रोजी अर्जदाराने रक्कम रु.2,00,000/- 2 वर्षांसाठी व द.सा.द.शे. 15 टक्के व्याजदराने संजिवनी अर्बन को.ऑप. बँकेमध्ये मुदतठेवी मध्ये गुंतविले होते.त्याचा खाते क्रमांक 13/127 व पावती क्रमांक 288 होता.परंतु अर्जदाराने सदरची रक्कम मुदत संपल्यानंतर व्याजासह काढून घेतली रक्कम रु.2,00,000/- वर 15 टक्के व्याजदराने 2 वर्षांकरीता अर्जदारास प्रतिमहा हप्ता रु.2500/- या प्रमाणे एकुण व्याजापोटी रक्कम रु.60,000/- देण्यात आली.दि.6/7/2001 पासून ते दि.5/7/2003 पर्यंत व्याजापोटी प्रतिमहा 2500/- प्रमाणे तिच्या बचत खात्यामध्ये ( खाते क्रमांक 2550 ) ट्रान्सफर केली व 2 वर्षांसाठी एकुण रक्कम रु.60,000/- अर्जदाराने काढून घेतली.पुढे सदरच्या मुदतठेव पावतीची मुदतवाढ दि.6/7/2005 पर्यंत व द.सा.द.शे.11 टक्के व्याजदराने करण्यात आली. व अर्जदारास प्रतिमहा रु.1833/- या प्रमाणे व्याज देण्यात आले व शेवटी दि.17/11/2005 रोजी म्हणजे मुदत संपल्यानंतर अर्जदाराची मुळ रक्कम बचत खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आली व ती रक्कम अर्जदाराने काढून घेतली.त्यावेळेस अर्जदाराने कोणत्याही प्रकारचा वाद उपस्थित केला नव्हता.उलटपक्षी अर्जदाराने शपथपत्र देवुन कोणत्याही प्रकारचा वाद सदरच्या रक्कमे बाबत नसल्याचे मान्य केले होते.आता अशा प्रकारची मागणी करण्याचा अर्जदारास कसलाही अधिकार पोहंचत नाही.पुढे गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, सुरवातीस रामराव भरोसे याने रक्कम रु. 1,00,000/- संजिवनी बँकेत दि.6/7/2001 ते दि.6/7/2003 पर्यंत म्हणजे 2 वर्षांसाठी मुदतठेवीमध्ये गुंतविले होते त्याचा खाते क्रमांक 29/36 व पावती क्रमांक 2617 होता.तदनंतर सदरच्या रक्कमेवरचे व्याज हे प्रतिमहा या प्रमाणे देण्यात आले.मुदत संपल्यानंतर सदरच्या मुदतठेव पावतीस दि.29/8/2006 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली नसल्यामुळे वास्तविक पाहता दि.6/7/2003 नंतर सदरच्या रक्कमेवर व्याज देण्याचे काहीच प्रयोजन नव्हते,परंतु दि.29/8/2006 रोजी मुदतठेव पावतीस 38 महिण्याच्या कालावधीसाठी 12 % व्याजदराने मुदतवाढ देण्यात आली.सदर प्रकरणात गम्मतशीर बाब अशी आहे की, दि.29/8/2006 रोजी सदर मुदत ठेव पावतीस मुदत वाढ दि.6/9/2006 पर्यंत देण्यात आली म्हणजे फक्त 8 दिवसांसाठीच मुदतवाढ देण्यात आल्याचे यावरुन स्पष्ट होते,परंतु ही मुदतवाढ 38 महिण्यासाठी देण्यात आल्याचे बेकायदेशिररित्या दर्शविण्यात आले.रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शन तत्वानुसार 14 दिवसांच्या आत जर मुदतठेव पावती रिन्युव्ह केली नाही तर त्या रक्कमेवर व्याज देता येत नाही.या प्रकरणात तर 3 वर्षां पेक्षा अधिक काळानंतर मुदतठेव पावतीचे नुतनिकरण करण्यात आले. तदनंतर पुन्हा सदरची मुदतठेव पावतीस दि.6/12/2008 पर्यंत बेकायदेशिररित्या व रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांची अंमलबजावणी न करता मुदतवाढ देण्यात आली.तदनंतर मुदतठेव मध्ये गुंतविलेली मुळ रक्कम रु.1,00,000/- अर्जदाराच्या बचत खात्यामध्ये दि.2/1/2009 रोजी ट्रान्सफर करण्यात आली व ती रक्कम अर्जदाराने काढून घेतली.परंतु संजिवनी बँकेचे लेजर रेकॉर्ड वर तशा प्रकारच्या नोंदी दर्शविण्यात आलेल्या नाहीत.मुदतठेव पावतीवर कोणी मुदतवाढ दिली.त्याची नावे नमुद करण्यात आलेली नाहीत. तसेच दि.17/11/2005 रोजी संजिवनी बँकेकडून अर्जदारास मुदतठेवीची रक्कम बेनिफीटसह मिळाली त्या वेळेस अर्जदाराने विना तक्रार त्या रक्कमेचा स्वीकार केला.दि.20/10/2008 रोजी संजिवनी बँकेचे विलीनिकरण वैद्यनाथ बँकेत झाले.व आता 3 वर्षांच्या कालावधिनंतरअर्जदाराने केलेली उपरोक्त मागणी मुदत बाहय आहे.तसेच गैरअर्जदाराने लेखी जबाबात तक्रार अर्जाबाबत आक्षेप घेवुन असाही कायदेशिर मुद्दा असा उपस्थित केला आहे की, ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 2(1) (d) प्रमाणे अर्जदार हा गैरअर्जदार बँकेचा ग्राहक नाही. तसेच सदरच्या प्रकरणात संजिवनी बँकेच्या मॅनेजर किंवा संचालकास आवश्यक पक्षकार न केल्यामुळे अर्जदाराची तक्रार आवश्यक पक्षकारा अभावी अयोग्य आहे.म्हणून वरील सर्व कारणामुळे अर्जदाराची तक्रार रक्कम रु.25,000/- च्या कॉम्पेंन्सेटरीकॉस्टसह फेटाळण्यात यावी. अशी विनंती गैरअर्जदाराने मंचासमोर केली आहे. गैरअर्जदाराने लेखी निवेदनाचे पुष्टयर्थ शपथपत्र (नि.12) आणि पुराव्यातील कागदपत्रे नि.17/1 ते 17/4 दाखल केले आहे. निर्णयासाठी उपस्थित होणारा मुद्दे. मुद्दे. उत्तर. 1 प्रस्तुतच्या तक्रारीस Res Judicata या कायदेशिर तत्वाची बाधा येते काय ? होय. 2 ग्राहक मंचापुढे वरील परिस्थितीत तक्रार अर्ज चालणेस पात्र आहे काय ? नाही. 3 निर्णय ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे. मुद्दा क्रमांक 1 ते 3 अर्जदाराने प्रस्तुत प्रकरणा मध्ये उपस्थित केलेल्या वाद विषया संबंधीची तक्रार याच ग्राहक मंचात या पूर्वी तक्रार क्रमांक 13/2010 केलेली होती.त्याचा निकाल 28/6/2010 रोजी मंचाने दिलेला आहे.असे असतांनाही अर्जदाराने पुन्हा त्याच वाद विषया संबंधी प्रस्तुतची तक्रार ग्राहक मंचापुढे केलेली असल्याचे गैरअर्जदाराने प्रकरणात नि.15 लगत दाखल केलेले आहे.नि.15/14 वरील मंचाच्या निकालपत्राचे अवलोकन केले असता स्पष्ट दिसते. सिव्हील प्रोसिजर कोड कलम 11 व 12 मधील तरतुदी नुसार एखाद्या वाद विषयाचा निर्णय कोर्टाने दिल्या नंतर त्याच वाद विषया संबंधी वादी/तक्रार दारास पुन्हा त्याच कोर्टात तो वाद उपस्थित करता येणार नाही त्याला Res Judicata या कायदेशिर तत्वाची बाधा येते.आणि अशी पुन्हा त्याच वाद विषया संबंधी वादी / अर्जदारास दाद मागता येणार नाही.अशी कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे.या कायद्यातील तरतुदी संदर्भात मा.सवौच्च न्यायालयाने, मा.उच्च न्यायालयाने तसेच राष्ट्रीय आयोगाने देखील अनेक प्रकरणात निर्णय दिलेले आहेत.अर्जदाराने या ग्राहक मंचात पुर्वी दाखल केलेल्या प्रकरण क्रमांक 13/2010 मध्ये उपस्थित केलेल्या वाद विषयाचा सकारण निर्णय दिलेला आहे.तोच वाद विषय प्रस्तुत प्रकरणात उपस्थित केलेला आहे.त्यामुळे वर नमुद केलेल्या कायदेशिर तत्वानुसार प्रस्तुतच्या तक्रारीचा निर्णय पुन्हा देता येणार नाही व तक्रार अर्ज फेटाळण्यात पात्र ठरते.सबब मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी व मुद्दा क्रमांक 2 चे उत्तर नकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोंत. आदेश 1 अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येत आहे. 2 पक्षकारांनी आपला खर्च आपण सोसावा. 4 दोन्ही पक्षांना निकालाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. श्रीमती अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी. श्री.सी.बी.पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |