जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/211 प्रकरण दाखल तारीख - 31/05/2010 प्रकरण निकाल तारीख – 22/11/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या श्री.तुकाराम पि.सोपान गोवंदे, वय वर्षे 32 वर्षे, धंदा लेबर, रा.डोंगरगांव,ता.मुदखेड,नांदेड. अर्जदार. विरुध्द. 1. शाखा प्रबंधक, युनायटेड इंडिया इंशुरन्स कंपनी लि, गैरअर्जदार शाखा लाहोटी कॉम्पलेक्स, वजीराबाद,नांदेड. 2. मुख्याध्यापक, जिल्हा परीषद प्राथमिक शाळा डोंगरगांव, ता.मुदखेड जि.नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.जाधव आर.जी. गैरअर्जदार क्र.1 तर्फे वकील - अड. एस.जी.मडडे. गैरअर्जदार क्र 2 तर्फे वकील - अड.पांगरे निकालपत्र (द्वारा- मा.श्री.बी.टी.नरवाडे पाटील,अध्यक्ष) अर्जदार हे मौजे डोंगरगांव ता.मुदखेड जि.नांदेड येथील रहिवाशी असून त्यांची मुलगी कु.साक्षी गोवंदे ही जिल्हा परीषद प्राथमिक शाळा डोंगरगांव येथे शिक्षण घेत होती. दि.15/06/2007 रोजी अर्जदाराच्या मुलीचे शाळेत नांव नोंदणी झाली व ती पहील्या वर्गात शीकत होती दि.16/05/2009 रोजी अर्जदाराच्या मुलीचा तलावात पडुन मृत्यु झाला त्यानंतर अर्जदाराने पाठपुरावा केला पण त्यास राजीव गांधी संरक्षण विमा योजना अंतर्गत असलेल्या अपघात विमा नुकसान भरपाई मिळाली नाही म्हणुन अर्जदाराने सदरची तक्रार मंचात दाखल केली. दि.15/05/2009 रोजी अर्जदाराची मुलगी ही पहिल्या वर्गात शिक्षण घेत होती. अचानक तलावात बुडून मृत्यू पावली त्या वेळेस तीचे वय 08 वर्षाचे होते शाळेत शिक्षण घेत असल्यामुळे राजीव गांधी संरक्षण विमा योजनेस ती पात्र होती होती. त्यामुळे अर्जदाराने या पॉलिसी संदर्भात शाखा प्रबंधक युनायटेड इंडिया इंशुरन्स कं.लि.यांचेकडे विमा दावा मंजुरी करीता शपथपत्रासह दाखल केले. त्यावेळेस अर्जदाराने मृत्यु प्रमाणपत्र निवेदन अहवाल हजेरीपट प्रवेश रजीस्टर विमा योजनेचा क्लेम, एफ.आय.आर.इ.कागदपत्र दाखल केले ते सर्व दाखल करुनही विमा संरक्षण आजपर्यंत क्लेम दिलेले नाही. म्हणुन अर्जदारास मंचात यावे लागले या विमा योजने संदर्भात क्लेम फॉर्म मुख्याद्यापक जिल्हा परीषद प्राथमीक शाळा डोंगरगांव यांनी योग्य कागदपत्र दाखल करुन घेतली व तो अर्ज विमा कंपनीकडे पाठवून दिले. गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे हजर झाले व त्यांनी आपले म्हणणे मांडले दि.25/10/2010 रोजी गैरअर्जदार यांनी रु.30,000/- चे चेक मंचासमोर दाखल केला तक्रार दाखल केल्या पासुन आजपर्यंत अर्जदार एकदाही मंचात आलेले नाही किंवा कुठलीही मागणी किंवा विनंती नाही. राजीव गांधी संरक्षण योजनेप्रमाणे रु.30,000/- एवढी रक्कम मिळाण्यासच विद्यार्थी पात्र असतात व ती रक्कम गैरअर्जदार यांनी मंचात भरलेली आहे. सदरचा चेक अर्जदाराच्या नांवे असुन अर्जदार, गैरहजर असल्यामुळे मंचात दाखल करावे लागले. सदरील चेक न्याय मंचातुन अर्जदार केंव्हाही उचलुन घेऊ शकतात. गैरअर्जदार यांनी जमा केलेले रु.30,000/- चा चेक उचलण्याची परवानगी अर्जदारास देण्यात येते व केस बंद करण्यात येते. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुवर्णा.देशमुख) अध्यक्ष सदस्या गो.प.निलमवार.लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |