जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/51 प्रकरण दाखल तारीख - 08/02/2010 प्रकरण निकाल तारीख – 07/05/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या मा.श्री.सतीश सामते. - सदस्य व्यंकटी पि.विठठलराव नादरगे, वय वर्षे 55, धंदा शासकीय नौकरी, अर्जदार. रा. स्नेहनगर, नांदेड. विरुध्द. शाखाधिकारी, गैरअर्जदार. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी मर्या, गुरु कॉम्प्लेक्स, जी.जी.रोड, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.आर.के.मालेगावकर. गैरअर्जदार तर्फे वकील - अड.श्रीनिवास मद्ये. निकालपत्र (द्वारा- मा.श्री.सतीश सामते,सदस्य) गैरअर्जदार युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी यांनी अपघाती विम्याची रक्कम रु.1,00,000/- अर्जदारास न देऊन सेवेत त्रुटी केली. म्हणुन अर्जदार यांनी आपली तक्रारअर्ज दाखल केला असुन ते आपल्या तक्रारीत म्हणतात ते शासकीय सेवेत असतांना दि.18/10/2004रोजी वसमत फाटा येथे समोरुन येणारी एक ट्रक क्र.आर.जे.21 जी 2858 ने निष्काळजीपणाने त्यांना धडक दिली व ते गंभीर जखमी झाले व त्यात त्यांना तीन फ्रॅक्चर झाले व कायमचे अपंगत्व आले. गंभीर दुःखापतीमुळे दि.18/02/2004 ते दि.25/05/2006 पर्यंत ते बाहय रुग्ण म्हणुन उपचार घेत होते. गैरअर्जदार यांचे जनता वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी क्र.161400/47/51/001020 दि.09/02/2009 पर्यंत वैध्य आहे. गैरअर्जदाराकडे नुकसान भरपाईबद्यलची माहीती दिली त्यांनी ते दिले नाही. म्हणुन विम्याची रक्कम 12 टक्के व्याजासह मिळावी अशी त्यांची मागणी आहे. गैरअर्जदार हे वकीला मार्फत हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. प्रस्तुत तक्रार ही जनता वैयक्तिक अपघात विमा पॉलिसीच्या नियमांच्या विरुध्द आहे. प्रस्तुत तक्रारीतील मजकुर सदरील विमा पॉलिसीशी जुळत नाही. तसेच तक्रार दाखल करण्यामध्ये झालेला विलंब प्रस्तुत तक्रारीत कुठेही उल्लेख नाही, संबंधीत कलमानुसार कोणतीही तक्रार उदभवलेल्या दिवसापासुन पुढील येणारे दोन वर्षाचे आंत दाखल करावे लागेल. प्रस्तुत तक्रारअर्ज अपघाताच्या दिवसा पासुन म्हणजे दि.18/10/2004 पासुन पुढील येणारे दोन वर्षाचे आंत दाखल करावयास पाहीजे होते ते केले नाही. म्हणुन सदरची तक्रार मुदतीमध्ये येत नाही म्हणुन तक्रारअर्ज फेटाळण्यात यावा असे म्हटले आहे. दि.18/10/2004 रोजी वसमत येथे कुठलाही अपघात झाला नाही. तसेच दि.18/10/2004 पासुन दि.25/05/2006 पर्यंत अर्जदार बाहय रुग्ण म्हणुन कुठेही उपचार घेतलेले नाही असे दाखवीणारे कुठलेही कागदपत्र दाखल केलेले नाही. अपघात झालेल्या दिवसा पासुन पुढे येणा-या एक महिन्यात गैरअर्जदाराकडे अपघाता बाबत सुचना देणे आवश्यक आहे व क्लेम दाखल करणे आवश्यक आहे. सदर पॉलिसीच्या नियमाप्रमाणे अर्जदार म्हणतात त्याप्रमाणे हाड मोडणे किंवा फ्रॅक्चर ही कायम स्वरुपी अपंगत्व या व्याख्येमध्ये मोडत नाही. अपघातात एखादा अवयव पुर्णतः निकामी होणे व ही जखम झाल्या पासुन ते सहा महिन्याच्या आंत होणे गरजेचे आहे किंवा शरीरा पासुन तो अवयव वेगळा होणे आवश्यक आहे, असे झाले तरच विम्याची रक्कम मिळू शकते. एकाचा विमा कालावधीमध्ये एक किंवा एका पेक्षा अधिक विमा कंपनीमये जनता वैयक्तिक अपघाती विमा पॉलिसी घेतली असेल तरी सुध्दा विमा रक्कमेची मर्यादा सुध्दा एक विमा पॉलिसीच्या रक्कमे एवढीच राहील. अर्जदाराने स्वतःचे कायम स्वरुपी अपंगत्व असल्याबद्यलचे सिध्द केले नाही. म्हणुन अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र, तसेच गैरअर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केलेले आहेत. दोन्ही पक्षकार यांनी दाखल केलेले दस्तऐवज बारकाईने तपासुन व वकीला मार्फत केलेला युक्तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदाराची तक्रार मुदतीत आहे काय? नाही. 2. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 - अर्जदार हे शासकीय सेवेत असतांना दि.18/10/2004 रोजी वसमत फाटा येथे समोरुन एक ट्रक क्र. आर.जे.21 जी 2858 या ट्रकेने धडक देऊन जखमी केले व त्यात त्यांचे तीन फ्रॅक्चर झाले. अर्जदाराने प्रकरण क्र.52/2010 मध्ये दि.न्यु इंडिया एशुरन्स कंपनीची जनता वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी घेतली आहे व तशीच पॉलिसी परत दुस-या युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडुनही घेतली आहे. दि.19/10/2004 रोजी त्यांना शासकीय सेवेत असतांना वसमत फाटा येथे समोरुन येणारा एक ट्रक क्र.आर.जे.21 जी 2858 ने धडक देऊन जखमी केले. प्रकरण क्र.52/2010 मध्ये त्यांनी प्रतिवादीकडे 2004 ला अपघाताची सुचना देणारा अर्ज क्लेम फॉर्मसह नेलेला होता व प्रकरण क्र. 52/2010 मध्ये विमा कंपनी दुसरी आहे, त्यांना सुचना दिलेली नव्हती. दोन्ही प्रकरणांत अर्जदारह हे एकच आहे. जनता वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी ही दोन कंपनीकडुन घेतलेल्या आहेत.विमा कंपनीच्या नियमाप्रमाणे, अर्ज दाखल करण्यासाठी एक महिन्याची मुदत आहे. अर्जदार यांनी तब्बल सहा वर्षापर्यंत म्हणजे 2010 पर्यंत आपली अपघात झाल्याची सुचना या विमा कंपनीस दिली नाही व क्लेम फॉर्म भरुन दिला नाही. प्रस्तुत प्रकरणांत विलंब झाला हे आपल्या तक्रारअर्जात म्हणत नाही शिवाय विलंब माफीचा अर्ज देखील दाखल केलेला नाही किंवा विलंब किती झाला याचा समर्पक खुलासा देखील तक्रारअर्जात केलेला नाही. सहा वर्षाचा कालावधी हा फारच मोठा कालावधी आहे व गैरअर्जदाराने आपल्या लेखी म्हणण्यात प्रथमतः हा दावा मुदत बाहय आहे असाच आक्षेप घेतला आहे. विमा पॉलिसीचा कालावधी जरी म्हटलेला नसले तरी अपघात केंव्हा झाला हे बघने महत्वाचा आहे. एकाच विमा कंपनीला ते सुचना देतात व दुस-या कंपनीला सुचना देतच नाही व सहा वर्षानंतर क्लेम मागतात हे कायदयाला अपेक्षित नाही. म्हणुन गैरअर्जदाराचा आक्षेप ग्राहक संरक्षण कायदा 1986 याप्रमाणे तक्रार दाखल करण्यासाठी जरी दोन वर्षाचा कालावधी आहे त्या कालावधीत अर्जदाराने तक्रार दाखल केलेले नाही. म्हणुन ही तक्रार मुदतीत नाही या निर्णयाप्रत आम्ही आलेलो आहोत. वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदाराचा तक्रारअर्ज फेटाळण्यात येतो. 2. दावा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा. 3. संबंधीत पक्षकार यांना निकालाच्या प्रती देण्यात याव्यात. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुवर्णा.देशमुख) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प.निलमवार.लघूलेखक. |