Maharashtra

Nanded

CC/10/40

Komire Ashok Ushanna - Complainant(s)

Versus

Branch Manager, United India Insurance Com. Ltd. - Opp.Party(s)

ADV. Aaware

18 May 2010

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/10/40
1. Komire Ashok Ushanna Shantinager, Tq.Kanapur, Dist. Adilabad.AdilabadAndhra Pradesh ...........Appellant(s)

Versus.
1. Branch Manager, United India Insurance Com. Ltd. Podutury Complex, N.H.7, Niramal, Dist. AdilabadAdilabadAndhra Pradesh ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 18 May 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
 
प्रकरण क्रमांक :-  2010/40.
                          प्रकरण दाखल तारीख - 04/02/2010
                          प्रकरण निकाल तारीख 18/05/2010
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील           - अध्‍यक्ष
       मा.श्रीमती सुवर्णा देशमूख,             - सदस्‍या.
        मा.श्री.सतीश सामते                  - सदस्‍य
 
कोमीरे अशोक उसन्‍ना
वय 50 वर्षे, धंदा नौकरी                                  अर्जदार रा. शांती नगर, कानापूर पो.मंडळ कानापूर
जि. अदिलाबाद (आंध्र प्रदेश).
                                     
     विरुध्‍द.
 
1.   शाखाधिकारी,
     युनायटेड इंडिया इन्‍शूरन्‍स कं.लि.
     पोदूतूरी कॉम्‍पलेक्‍स, पहिला मजला,
     एन.एच.7, निर्मल -504 106 जि. अदिलाबाद
2.   शाखाधिकारी                                     गैरअर्जदार   युनायटेड इंडिया इन्‍शूरन्‍स कंपनी लि.
     गूरुकृपा कॉम्‍पलेक्‍स, तारासिंग मार्केट,
     नांदेड.
अर्जदारा तर्फे वकील             - अड.आर.एन.आवटे
गैरअर्जदार 1 व 2 तर्फे वकील      - अड.एस.जी.मडडे
 
                               निकालपञ
             (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्‍य )
 
                  गैरअर्जदार युनायटेड इंडिया इंशुरन्‍स कंपनी यांच्‍या सेवेच्‍या त्रुटीबद्यल अर्जदार आपल्‍या तक्रारीत म्‍हणतात की, त्‍यांच्‍या मालकीची गाडी नं.एपी-01/एमए टीआर 7538 यांच्‍या सुरक्षेसाठी गैरअर्जदार यांचेकडे दि.24/10/2007 ते 23/10/2008 या कालावधीसाठी विमा घेतला होता. वाहनाचा अपघात दि.23/05/2008 रोजी अर्जदार यांनी त्‍यांचे मित्र नरेंद्र
 
 
नारायण कौंड रा.चीखली यांना चीखली येथे जाणेसाठी त्‍यांचे वाहन दिले असता, त्‍यांच्‍या वाहनावर नरेंद्र व नरसया हे दोघे मिळुन चीखलीकडे जात असतांना सदरील वाहनाचा समोरुन येणा-या मोटर सायकल क्र.एपी- 01/सी 9534 यांनी जोराची धडकी दिली. या अपघातात त्‍या दोघांचा मृत्‍यु झाला व नरेंद्र व नरसया यांना गंभीर स्‍वरुपाचा मार लागला. यासाठी इस्‍लापुर पोलीस स्‍टेशनला गुन्‍हा नोंदविण्‍यात आला. वाहनाच्‍या नुकसानीसाठी गैरअर्जदारांच्‍या कार्यालयाशी संपर्क साधला असता, त्‍यांनी उज्‍वल इंटप्राईजेस येथे वाहन दुरुस्‍तीसाठी घेउन जा असे सांगीतले त्‍यांनंतर सव्‍हेअर यांनी अपघाताचे फोटो काढुन सर्व्‍हे केला. वाहनाचे रु.15,644/- नुकसान ठरविले, फी म्‍हणुन रु.1,500/- अर्जदारकाकडुन घेतले. गैरअर्जदार यांनी फक्‍त एपी-01 एमएटीआर 7358 च्‍या चालकाने नांव एफआयआरमध्‍ये वेगळे असल्‍या कारणने क्‍लेम नामंजुर केला. गैरअर्जदार यांनी सर्व्‍हे रिपार्ट गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे पाठविला. यात चालकाचे नांव नरेंद्र कौड व एफआयआर मध्‍ये नरेश कौड असे आहे म्‍हणजे ते भिन्‍न आहे. अर्जदार यांनी ड्रायव्हिंग लायंसन व पोलिस स्‍टेशनचे प्रमाणपत्र हे नरेश व नरेंद्र हे एकच आहे असे सांगुन त्‍यांचे म्‍हणण ग्राहय न धरता क्‍लेम नाकारला. गैरअर्जदाराने असे करुन सेवेत त्रुटी केली म्‍हणुन अर्जदाराची मागणी आहे की, नुकसान भरपाई रु.17,144/- मानसिक व आर्थीक त्रासापोटी रु.5,000/- व दावा खर्च म्‍हणुन रु.2,000/- मंजुर करावेत असे म्‍हटले आहे.
     गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे वकीला मार्फत हजर झाले त्‍यानी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. अर्जदार यांना कागदोपत्री पुरावा आधारे सर्व मजुकर सिध्‍द करावे लागेल. अर्जदाराचे नविन वाहन ज्‍या नोंदणी क्रमांक नसलेला पंरतु इंजिन क्र. JANBPF 05668 व चेसिस क्र.MD 2DSGBZZPWF 06332 बजाज XCD 125 DTSSI असा विमा काढलेला आहे. अर्जदाराने सदर वाहनाच्‍या सबंधी आरटीओ ला दिलेले आरसी बुक दाखल केलेले नाही. सदर वाहनाचे आरटीओ संबंधी रजिस्‍ट़्रेशन झालेल नव्‍हते. अपघात हा दि.23/05/2008 रोजी झाला व वाहनाची नोदंणी  आरटीओ यांचेकडे दि.16/10/2008 रोजी केली. म्‍हणुन अर्जदाराची तक्रार खोटी आहे शिवाय अर्जदाराने सदर मोटर सायकल नरेश यांच्‍या नांवाचे व्‍यक्तिला विना परवाना दिले होते. सदर अपघाताच्‍या दिवशी ते वाहन चालवित होते. नरेश यांच्‍याकडे मोटर सायकलचा परवाना वैध नव्‍हता त्‍यामुळे अर्जदार हे सदर अपघाताचे फौजदारी कार्यवाही पासुन स्‍वतःला वाचविण्‍यासाठी व पोलिसांना हाताशी धरुन सदर मोटार सायकलचा चालक नरेंद्र यास दाखविण्‍याचा प्रयत्‍न करीत आहे जे की, खोटे आहे. नरेश हे
 
 
अपघाताच्‍या दिवशी मोटरसायकल चालवित नव्‍हते नरेद्र हे मोटर सायकल चालवित होते ज्‍याची एफआयआरमध्‍ये नोंद आहे. नरेद्र हे मोटरसायकलच्‍या पाठी मागे बसलेले होते. पोलिस स्‍टेशन इस्‍लापुर येथे दि.25/05/2008 ला फीर्याद दिली. यात सदर मोटर सायकल हे नरेश नांवाचे व्‍यक्ति चालवित होते. अपघातामध्‍ये सदर वाहनाचे किरकोळ स्‍वरुपाचे नुकसान झाले आहे. या संदर्भात सुचना मिळाल्‍याबरोबर त्‍यांनी सर्व्‍हेअर पाठविला व सर्व्‍हे केला. अपघात झाल्‍यासंबंधी मोटर सायकलचे कोणते पार्ट व त्‍याचे नुकसान ठरविले व बिल चेक रिपोर्ट दिला. मोटर सायकलची सर्व बाबी वगळुन एकुण नुकसान रु.13,000/- चे झालेले आहे. सर्व्‍हेअरला रु.1,500/- फिस दिलेली नाही. अर्जदार सांगतात ते नुकसान झालेले आहे. अपघाताच्‍या वैध व प्रभावी वाहन परवाना नसल्‍यामुळे तसेच मोटर वाहन अक्‍टची कलम रुल्‍स मोडल्‍यामुळे अर्जदारास दंड लावावा. अर्जदार यांचे चार्जसिटमध्‍ये सुध्‍दा नरेश या नांवाचा उल्‍लेख आहे. पोलिस स्‍टेशन इस्‍लापुर यांना कोणतेही प्रमाणपत्र देण्‍याचा अधिकार नाही तो अधिकार राजपत्रीत अधिका-यांनाच असतो. पोलिस स्‍टेशनचे सहायक निरीक्षक यांनी खोटे प्रमाणपत्र दिले आहे ते ग्राहय धरणे योग्‍य नाही. सबब अर्जदाराचा तक्रारअर्ज खर्चासह फेटाळण्‍यात यावा असे म्‍हटले आहे.
 
     अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे, दोन्‍ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला युक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
                 
          मूददे                                       उत्‍तर
1.                 गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदार
     सिध्‍द करतात काय ?                          होय.
2.    काय आदेश ?                       अंतिम आदेशाप्रमाणे.
                      कारणे
मूददा क्र. 1 ः-
     अर्जदार यांची बजाज एक्‍ससीडी 125 डिटीएसएसआय ज्‍याचा तात्‍पुरता नं.एपी 01/ एमएटीआर 7538 असुन इंजि नं.JANBPF 05668 व चेसिस क्र.MD 2DSGBZZPWF 06332 आहे. अर्जदाराने जी पॅकेज पॉलिसी दाखल केलेली आहे ती अशोक कोमीरे यांच्‍या नांवाने असुन वाहन नं.एपी 01/ एमएटीआर 7538 असुन इंजि नं.JANBPF 05668 व चेसिस क्र.MD
 
 
2DSGBZZPWF 06332 असा आहे. वाहनाचे रजिस्‍ट्रेशन अर्जदार यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे दि.16/10/2008 रोजी मंचेरियाल आंध्र प्रदेश येथे करण्‍यात आले त्‍यानुसार त्‍याचे नोदंणीक्रमांक देण्‍यात आला. तक्रारअर्जात उल्‍लेख केल्‍याप्रमाणे वाहनाची खरेदी ही दि.23/10/2007 करण्‍यात आली पॉलिसीमध्‍ये या तारखेचा उल्‍लेख केलेला आहे. म्‍हणजे अर्जदाराने जवळपास वाहनाचे रजिस्‍ट्रेशन एक वर्षानी केलेले आहे. अर्जदार यांनी आपली मोटर सायकल त्‍यांचे मित्र नरेंद्र यांना चीखली येथे जाण्‍यासाठी दिली होती त्‍यांचे सोबत नरसया हे होते. ते दोघ मिळुन चीखलीकडे जात असतांना चीखली कंचीलीचे दरम्‍यान मोटर सायकल क्र. एपी-01 / सी 9534 यांनी समोरुन येवुन जोराची धडक दिली त्‍यात ते दोघेही जखमी झाले. गैरअर्जदार यांना सुचना दिल्‍यानंतर त्‍याचे सर्व्‍हेअरने येवुन सर्व्‍हे केला व यानुसार रु.13,000/- वाहनाची नुकसान भरपाई ठरिवली. अर्जदार यांचे मते ती रु.15,644/- असुन सर्व्‍हे चार्जेस म्‍हणुन रु.1,500/- हे वेगळे घेतलेले आहे. गैरअर्जदार यांचा जो आक्षेप आहे तो अपघाताच्‍या दिवशी म्‍हणजे दि.23/05/2008 रोजी वाहन हे नरेशच चालवित होत व त्‍यांच्‍या मागे नरेंद्र हे बसलेले होते. एफआयआर मध्‍ये नरेश कौड असे नाव दिलेले आहे. अपघात हा दि.23/05/2008 चा असुन यानुसार एफआयआर दिलेला असुन पंचनामा करुन चार्जसिट दिलेले आहे. यातही नरेश वाहन चालविणा-याचे नांव हे विना पासिंग मोटर सायकल  श्रीराम चित्‍तलवार हे त्‍याचे ताब्‍यातील मोटर सायकल एपीझेड 9534 हे निष्‍काळजीपणे चालवून समोरासमोर धडक दिली असे म्‍हटले आहे. अपघात झाला ही गोष्‍ट खरी आहे गैरअर्जदार यांनी दि.02/02/2009 रोजी अर्जदार यांना पत्र लिहीले व त्‍यात बजाज एक्‍ससीडी 125 डीटीएसएसआय यांच्‍या दि.23/05/2008 अपघात झाला त्‍यावेळेस नरेश नांवाचे व्‍यक्ति वाहन चालवित होते व एफआयआरमध्‍ये नरेंद्र हे आले असल्‍याने नरेश हा व्‍यक्ति वेगळा आहे त्‍यांचेकडे लायसन्‍स नव्‍हते या सबबीवर क्‍लेम नाकारले आहे. पॉलिसी गैरअर्जदार यांना मान्‍य आहे. वाहन अर्जदाराने माही मोटर्स कडून खरेदी केलेले बददल दि.23.10.2007 रोजीचे सेल प्रमाणपञ व इनव्‍हाईस हे ही दाखल आहे. अपघाताचे दिवशी अर्जदाराच्‍या मते नरेद्र जे वाहन चालवित होता त्‍यांचे वाहन चालविण्‍याचा परवाना आहे. तो व्‍हॅलिड असून तो दि.16.11.1996 ते 15.11.2016 पर्यत आहे. या बददल ही वाद नाही. गैरअर्जदार म्‍हणतात त्‍याप्रमाणे नरेद्र व नरेश हे दोन वेगवेगळे व्‍यक्‍ती आहेत परंतु अर्जदाराने दाखल केलेले पूरावे पाहिले असता पोलिस स्‍टेशन इस्‍लापूर यांचे सहायक पोलिस निरीक्षक यांनी हे प्रमाणपञ दाखल केले की, नरेश व नरेद्र हे दोन्‍ही व्‍यक्‍ती एकच आहेत.
 
 
 
गैरअर्जदाराचा असाही आक्षेप आहे की, त्‍यांना असे प्रमाणपञ देण्‍याचा अधिकार नाही परंतु जे तपासणीक अधिकारी आहेत त्‍यांनी वाहनाचा अपघात बघितला व त्‍यांनी पंचनामा केला यात त्‍यांना सत्‍य काय आढळले त्‍या अनुषंगाने  ते प्रमाणपञ देऊ शकतात. या व्‍यक्‍तीरिक्‍त पोलिस पाटील यांनी ही नरेंद्र व नरेश हे त्‍यांचे गांवचे रहिवासी आहेत व ते एकच व्‍यक्‍ती आहेत. तसेच सरंपच व ग्रामविकास अधिकारी यांनी देखील नरेश व नरेंद्र हे दोन नांवे असलेले व्‍यक्‍ती एकच आहेत. एवढया प्रमाणपञाच्‍या आधारे पॉलिसी ही नरेंद्र यांचे नांवाने असली व एफ.आय.आर. मध्‍ये दूस-या एखादया व्‍यक्‍तीने  नरेश नांव दिले असेल तर नरेश नांव हे टोपन नांव असेल त्‍याअनुषंगाने या दोन नांवाचे एकच व्‍यक्‍ती हे सिध्‍द होते. वाहनाच्‍या नूकसान भरपाई बददल जे प्रपोजल दिलेले आहे त्‍यात चालकांचे नांव म्‍हणून नरेद्र असेच नांव दिलेले आहे. एवढे सर्व पूरावा असताना तो व्‍यक्‍ती एकच आहे असे सिध्‍द होते. शिवाय सर्व्‍हेअरनी जो सव्‍हे रिपोर्ट दि.11.9.2008 रोजीला दिलेला आहे यात देखील ड्रायव्‍हरचे नांव म्‍हणून नरेंद्र असाच उल्‍लेख आहे. तेव्‍हा अर्जदार खोटे सांगत आहेत असे वाटत नाही. गैरअर्जदारांनी पञाद्वारे आक्षेप घेऊन दावा नामंजूर केला तो आता एवढया पूराव्‍यानंतर सिध्‍द झालेला आहे. नरेश व नरेंद्र या दोन नांवाची एकच व्‍यक्‍ती आहे हे सिध्‍द झालेले आहे. गैरअर्जदारांनी विमा पॉलिसी देऊन वाहनाच्‍या सूरक्षेची जबाबदारी घेतली होती तेव्‍हा ते आता या जबाबदारीतून मूक्‍त होऊ शकत नाही. गैरअर्जदाराचा एक आक्षेप असा आहे की, त्‍यांचे वाहनाचे रजिस्‍ट्रेशन झालेले नव्‍हते व अपघातानंतर पाच महिन्‍याने वाहनाचे रजिस्‍ट्रेशन झाले. अपघात हा पॉलिसीच्‍या कालावधीतीच झालेला आहे. आरटीओ नियमाप्रमाणे  नवीन वाहन हे जोपर्यत रजिस्‍ट्रेशन होत नाही तोपर्यत ते रोडवर आणता येत नाही हा नियम जरी असला तरी  वाहनाचे रजिस्‍ट्रेशन झाले नसेल व ते गैरअर्जदार यांना दिले नसेल तरी गैरअर्जदार यांनी त्‍यांना एक नोटीस पाठवून तूमच्‍या वाहनाचे रजिस्‍ट्रेशन अजून आलेले नाही त्‍यामूळे तूमची पॉलिसी रदद का करु नये   अशा प्रकारचे पञ देणे आवश्‍यक होते ते पञ त्‍यांनी दिले नाही. म्‍हणून आता ते या जबाबदारीत अडकलेले आहे व क्‍लेम नाकारण्‍याचे कारण त्‍यांनी जो आक्षेप घेतला आहे तो त्‍यात लिहीलेला नाही. वाहनाची नोंद  जर झाली नसेल तर त्‍यासाठी वेगळा गून्‍हा दाखल करण्‍याची पोलिस व आरटीओ यांना मूभा आहे. आता ही ते कारवाई करु शकतात. त्‍यामूळे गैरअर्जदार  यांना जबाबदारीतून मूक्‍त होता येणार नाही.
 
              दूसरे सर्व्‍हेअरने जाऊन वाहनाची तपासणी करुन जो सर्व्‍हे रिपोर्ट दिला त्‍याप्रमाणे वाहनाचे नूकसान हे रु.13,056/- चे झाले म्‍हणून
 
 
 
गैरअर्जदार यांचे रु.13,056/- देण्‍याची जबाबदारी आहे.  हा सर्व्‍हे रिपोर्ट वर अर्जदाराने चॅलेज केलेले नाही. त्‍यामूळे सर्व्‍हे रिपोर्ट प्रमाणे अर्जदाराला नूकसान भरपाई देणे योग्‍य राहील. त्‍यामूळे गैरअर्जदाराने रक्‍कम न देऊन सेवेत ञूटी केलेले आहे.
वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश देत आहोत.
 
                 आदेश
1.                                         अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्‍यात येतो.
 
2.                                         गैरअर्जदार यांनी हा निकाल लागल्‍यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना रु.13,056/- व त्‍यावर दावा नाकारल्‍याची दि.2.2.2009 पासून 9 टक्‍के व्‍याजाने पूर्ण रक्‍कम मिळेपर्यत व्‍याजासह दयावेत, असे न केल्‍यास
          यानंतर दंडणीय व्‍याज म्‍हणून 12 टक्‍के व्‍याजाने पूर्ण     
          रक्‍कम मिळेपर्यत व्‍याजासह दयावेत.
3.                                         गैरअर्जदार यांनी केलेली कारवाई ही त्‍यांचे विमा पॉलिसीच्‍या अंतर्गत त्‍यांना करणे भाग असल्‍यामूळे मानसिक ञास देण्‍यात येत नाही परंतु दावा खर्च म्‍हणून रु.2,000/- मंजूर करण्‍यात येतात.
 
4.                                         निकालाच्‍या प्रति पक्षकारांना देण्‍यात याव्‍यात.
 
 
 
 
श्री.बी.टी.नरवाडे पाटील                                    श्रीमती सुवर्णा देशमूख                                    श्री.सतीश सामते     
            अध्‍यक्ष                                                             सदस्‍या                                                         सदस्‍य
 
 
 
 
 
 
जे.यू.पारवेकर.
लघूलेखक.