जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/70 प्रकरण दाखल तारीख - 26/02/2010 प्रकरण निकाल तारीख – 19/06/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या मा.श्री.सतीश सामते. - सदस्य राजु पि.गुणाजी वाघमारे, वय वर्षे 26, धंदा अटो मालक व चालक, अर्जदार. रा. भिमवाडी, सिडको,नांदेड. विरुध्द. शाखा व्यवस्थापक, गैरअर्जदार. दि.न्यु.इंडिया एशुरन्स कंपनी लिमिटेड, विभागीय कार्यालय – जी.जी.रोड,नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.नसीरोद्यीन फारुखी. गैरअर्जदार तर्फे वकील - अड.एस.व्हि.राहेरकर. निकालपत्र (द्वारा- मा.श्री.सतीश सामते,सदस्य) गैरअर्जदार न्यु.इंडिया एशोरन्स कंपनी यांनी अपघाती इजा झाल्यामुळे झालेली नुकसान भरपाई रु.1,00,000/- व इतर खर्च रु.40,000/- एवढी रक्कम व्याजासह दिली नाही व सेवेत त्रुटी केली. म्हणुन सदरील तक्रार दाखल केली असुन ती खालील प्रमाणे आहे. अर्जदार यांचे ऑटो क्र.एमएच-26/जी-4618 असुन त्यावर त्यांची उपजिवीका आहे. दि.06/08/2009 रोजी सकाळी 11 वाजता हडकोकडुन भिमवाडीकडे जात असतांना ऑटो समोर अचानक डुक्कर आल्याने अटो पल्टी झाला व अपघात झाला व त्यास जबर इजा झाली. यानंतर त्यांनी डॉ.बंडेवार यांचेकडे उपचार घेतला, त्यात त्यांना फ्रॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी सांगीतले व त्यावर उपचार केला व इतकी गंभीर जखम आहे की, आजपर्यंत बरी झाली नाही. गैरअर्जदार यांचेकडुन पॉलिसी कव्हर नोट नं. 826048 असा असुन विमा संरक्षण घेतला आहे. अर्जदार यांना अपघाती जख्मा झाल्यामुळे नुकसान भरपाई रु.1,00,000/- व इतर खर्च रु.40,000/- असे एकुण रु.1,40,000/- ची मागणी केली आहे. गैरअर्जदार हे हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. त्यात त्यांनी प्रथम आक्षेप असा घेतला की, प्रस्तुत तक्रार अपरिपक्व स्वरुपाची आहे. त्यामुळे त्यांनी निर्णयच घेतलेला नाही. अर्जदार हे सरळ मंचाकडे आलेले आहेत. म्हणुन सेवेत त्रुटी होण्याचा प्रश्नच येत नाही. अर्जदाराचे म्हणणे व त्यांनी दाखविलेला खर्च हे गैरअर्जदार अमान्य करतात. सेक्शन 3 पर्सनल अक्सीडेंट कव्हर फॉर ओनर ड्रायव्हर यासाटी एक अवयव शंभर टक्के निकामी झाले असेल तर पन्नास टक्के रक्कम मिळू शकतो. त्यामुळे अर्जदाराचा अर्ज अपरीपक्व असल्या कारणाने तो खारीज करण्यात यावा. अर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र व गैरअर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकार यांनी दाखल केलेले दस्तऐवज बारकाईने तपासुन व वकीला मार्फत केलेला युक्तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदार यांची तक्रार अपरीपक्व आहे काय ? होय. 2. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 – अर्जदार यांनी आपली तक्रार दाखल केलेली आहे व त्यावर तो त्यांच्या तक्रारअर्जाप्रमाणे सरळ मंचात येऊन रु.1,40,000/- ची रक्कम मागतात व गैरअर्जदार यांचेकडे ते गेले होते त्यांनी क्लेम फॉर्म भरला होता. व त्यांनी त्यांना टाळले या विषयीकुठलाच पुरावा ते दाखल करु शकले नाही व गैरअर्जदार यांचा आक्षेप आहे की, ते त्यांचेकडे आलेच नाही. सध्य परिस्थितीत तक्रार ही पुराव्या आभावी अपरीपक्व असल्याचे दिसुन येते. अर्जदारांनी दि.09/09/2009 रोजी पोलिस स्टेशनला सुचना दिली. दि.06/08/2009 रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्या आटोचा अपघात झाला व हा अर्ज दाखल केलेला आहे. ऑटोचे कागदपत्र ड्रायव्हींग लायसन्स दाखल केलेले आहे, साई ऑर्थोपेडीक यांचे वैद्यकिय प्रमाणपत्र दाखल केलेले आहे व घटनास्थळ पंचनामा दाखल केलेला आहे. सोबत फॉर्म कॉम्प बी हे दाखल केलेले असुन यात त्यांच्या हातास 51 टक्के कायमचे अपंगत्व आल्याचे म्हटले आहे. सदरील कागदपत्र क्लेम मागण्यास पुरेशी जरी असले तरी ते गैरअर्जदार यांचेकडे पोहचले नाही म्हणुन अर्जदार यांनी परत क्लेम फॉर्म व आवश्यक सर्व कागदपत्र सोबत जोडुन गैरअर्जदार कंपनीकडे हा दावा सरळ दाखल करावा व यावर गैरअर्जदार यांनी काय तो निर्णय घ्यावा. हा निर्णय त्यांना मान्य नसल्यास त्या मुद्यावर ते परत या मंचामध्ये तक्रार दाखल करु शकतात अशी मुभा त्यांना देण्यात येते. वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अपरिपक्व असल्या कारणाने खालील प्रमाणे मंजुर करण्यात येतो. 2. अर्जदार यांनी आवश्यकत त्या सर्व कागदपत्रासह त्यांचा क्लेम प्रस्ताव गैरअर्जदार कंपनीकडे दाखल करावा व त्यावर प्रस्ताव मिळालेल्या तारखे पासुन 30 दिवसांच्या आंत गैरअर्जदार कंपनीने निर्णय घ्यावा. 3. अर्जदार यांना हा निर्णय मान्य नसल्यास परत त्यांना या मंचात आपली तक्रार दाखल करता येईल. 4. दावा खर्च ज्यांनी त्यांनी आपापला सोसावा. 5. संबंधीत पक्षकार यांना निकालाच्या प्रती देण्यात याव्यात. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुवर्णा.देशमुख) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प.निलमवार.लघूलेखक. |