जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/52 प्रकरण दाखल तारीख - 08/02/2010 प्रकरण निकाल तारीख – 07/05/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या मा.श्री.सतीश सामते. - सदस्य व्यंकटी पि.विठठलराव नादरगे, वय वर्षे 55, धंदा शासकीय नौकरी, अर्जदार. रा. स्नेहनगर, नांदेड. विरुध्द. शाखा व्यवस्थापक, गैरअर्जदार. दि.न्यु.इंडिया एशुरन्स कंपनी मर्या, अर्जदारा तर्फे वकील - अड.आर.के.मालेगावकर. गैरअर्जदार तर्फे वकील - अड.एस.व्हि.राहेरकर. निकालपत्र (द्वारा- मा.श्री.सतीश सामते,सदस्य) गैरअर्जदार यांनी दि.न्यु इंडिया एशुरन्स कंपनी यांनी अपघात विम्याची रक्कम रु.1,00,000/- न दिल्यामुळे सेवेत त्रुटी झाली त्यामुळे अर्जदारांनी तक्रार दाखल केलेली असुन ते आपल्या तक्रारीत म्हणतात दि.18/10/2004 रोजी शासकीय सेवेत असतांना वसमत फाटा येथे ट्रक क्र. आर.जे.21 जी 2858 ने निष्काळजीपणे धडक दिल्यामुळे त्यात ते गंभीर जखमी झाले व तीन प्रकारचे फ्रॅक्चर झाले. दि.18/10/2004 पासुन दि.25/05/2006 पर्यंत बाहय रुग्ण म्हणुन उपचार घेतला. गैरअर्जदाराची जनता वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी क्र.160900/47/04/0048 असुन ज्याची मुदत दि.01/07/2004 ते दि.30/06/2009 पर्यंत आहे. विम्याची रक्कम 12 टक्के व्याजाने मिळावी अशी त्यांची मागणी आहे. गैरअर्जदार हे वकीला मार्फत हजर झाले त्यांनी आपल लेखी म्हणणे दाखल केलेले असून त्यात त्यांचा पहीला आक्षेप की, अर्जदाराने अपघात झाल्याबद्यलची सुचना कंपनीला दि.25/11/2004 रोजी दिली व कंपनीकडुन क्लेम फॉर्म घेऊन गेले व परत गैरअर्जदाराकडे आलेच नाही. त्यामुळे गैरअर्जदारांनी अर्जदाराला दि.31/01/2005 व दि.11/02/2005, दि.25/02/2005 व दि.01/09/2005 रोजी नोंदणीकृत पोष्टाने कळविले असतांना त्यांनी पॉलिसीतील नियम व तरतुदीप्रमाणे आवश्यक ती कागदपत्र व क्लेम फॉर्मसह दाखल करण्याची जबाबदारी पुर्ण केली नाही. त्यामुळे गैरअर्जदार यांनी नो क्लेम व फाईल क्लोज असे म्हणुन फिर्याद बंद केली. म्हणुन फिर्याद ही आता मुदत बाहय असल्या कारणाने तक्रार ही जवळपास सहा वर्षानी दाखल केलेली आहे. प्रस्तुतचा अर्ज हा प्रिमॅच्युअर्ड असुन यावर निर्णय झालेला नाही. अर्जदारास अपंगत्वाचे प्रमाणपत्रानुसार 30 टक्के एवढे अपंगत्व आहे. क्लेम देण्यासाठी शंभर टक्के अपंगत्व आले असले पाहिजे म्हणजे अपघातात एखादा अवयव पुर्णतः गेला असेल तरच विमा कंपनी नियमाप्रमाणे काही पैसे देणे लागते. म्हणुन अर्जदार हा स्वच्छ हाताने मंचा समोर आला नाही म्हणुन त्यांची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी. अर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र तसेच गैरअर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केलेले आहेत. दोन्ही पक्षकार यांनी दाखल केलेले दस्तऐवज बारकाईने तपासुन व वकीला मार्फत केलेला युक्तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदाराची तक्रार मुदतीत आहे काय? नाही. 2. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 - अर्जदार हे पोलिस कॉन्स्टेबल असुन ते शासकीय सेवेत असतांना दि.18/10/2004 रोजी वसमत फाटा येथे एका ट्रकने धडक दिल्यामुळे त्यांच्या पायास तीन फ्रॅचर झाले त्यात त्यांना कायमचे अपंगत्व आले ही सुचना त्यांनी गैरअर्जदारांना एक लेखी अर्ज देऊन दि.25/11/2004 रोजी कळविले आहे ते अर्ज या प्रकरणांत दाखल आहे. गैरअर्जदाराने आपल्या लेखी म्हणण्यात आक्षेप घेतला की, अर्जदार यांनी अपघाताबद्यलची माहीती दि.25/11/2004 रोजी व कंपनीने सांगीतल्याप्रमाणे क्लेम घेऊन गेले यानंतर प्रतिवादीकडे आलेच नाही यासाठी स्मरणपत्र अर्जदाराला दि.31/01/2005 व दि.11/02/2005 व दि.25/02/2005 व दि.01/09/2005 रोजी चार पत्र पाठविले तरीही त्यांनी आवश्यक ते कागदपत्र दाखल केले नाही. म्हणुन कंपनीने यावर फाईल क्लोज नो क्लेम म्हणुन बंद केले यावरुन हे स्पष्ट आहे की, अर्जदाराने दि.25/11/2004 रोजी कंपनीला सुचना दिली व यानंतर 2010 पर्यं सहा वर्ष गप्प बसले. त्यांनी क्लेम मिळण्यासाठी कुठलाही क्लेम फॉर्म किंवा आवश्यक ती कागदपत्र गैरअर्जदार यांना दिली नाही व आता 2010 मध्ये तीच तक्रार घेऊन ते या मंचात आलेले आहेत. गैरअर्जदारांचा आक्षेप मान्य करुन ही तक्रार मुदत बाहय आहे असे आम्ही ठरवितो, या प्राथमीक मुद्यावर अर्जदाराच्या पुढील फिर्यादीमध्ये सविस्तर न जाता या मुद्यावर त्यांची तक्रार खरीज करण्याचा निर्णय घेत आहोत. वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रारअर्ज खारीज करण्यात येतो. 2. दावा खर्च ज्यांनी त्यांनी आपापला सोसावा. 3. संबंधीत पक्षकार यांना निकालाच्या प्रती देण्यात याव्यात. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुवर्णा.देशमुख) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प.निलमवार.लघूलेखक. |