ग्राहक तक्रार क्र. 83/2014
अर्ज दाखल तारीख : 02/04/2014
अर्ज निकाल तारीख : 22/05/2015
कालावधी: 01 वर्षे 01 महिने 21 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1) रमेश शंकर बोंदर,
वय - 27 वर्ष, धंदा – शेती,
रा. देवधानोरा ता. कळंब, जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1) शाखाधिकारी,
द न्यु इंडीया, एश्योरन्स कंपनी लि.
शाखा कार्यालय, नाईक निवास,
शिवाजी चौक, उस्मानाबाद,
ता. व जि. उस्मानाबाद.
2. सचिव,
तांत्रिक वीज कामगार सहकारी,
पतसंस्था मर्या. आनंदनगर, उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्य.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.एस.जी.देशपांडे.
विरुध्द पक्षकार क्र.1 तर्फे विधीज्ञ : श्री.ए.व्ही. मैंदरकर.
विरुध्द पक्षकार क्र.2 तर्फे विधीज्ञ : श्री.एस.व्ही.तांबे.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा :
अ) आपले विद्यूत लाईनमन वडील यांचा कर्मचारी संस्थेतर्फे विरुध्द पक्षकार क्र.2 (विप) अपघात विमा काढला असतांना वडीलांचे अपघाती मृत्यू नंतर विमा कंपनी विप क्र. 1 यांनी विमा रक्कम देण्याचे नाकारुन सेवेत त्रुटी केल्याबद्दल भरपाई मिळावी म्हणून ही तक्रारकर्ता (तक) ने ही तक्रार दाखल केलेली आहे.
1. तक चे तक्रारीतील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे....
तक चे वडील शंकर विद्यूत वितरण कंपनी कडे नळदूर्ग येथे लाईनमन पदावर काम करत हाते. विप क्र.2 वीज कामगार सहकारी पतसंस्था यांचा शंकर हा सभासद होता विप क.2 तर्फे सर्व सभासदांचा विमा कंपनी विमा क्र.1 कडे विमा ऊतरविला होता. वैयक्तिक अपघात पॉलिसी दि.28/05/2011 रोजी घेतलेली होती. दि.27/10/2011 रोजी शंकर यांचा अपघात झाला व तो दि.02/11/2011 रोजी मरण पावला दि.17/02/2012 रोजी तक ने विप क्र.2 मार्फत विप क्र.1 कडे विमा प्रस्ताव पाठवला. विप क्र.1 ने विमा रक्कम दिली नाही व सेवेत त्रुटी केली. शेवटी दि.31/03/2013 चे विप क्र.1 ने विप क्र.2 ला पत्र लिहून विमा प्रस्ताव नाकारल्याचे कळविले. त्यांनतर दि.26/04/2013 रोजी विप क्र.2 ने विप क्र.1 यांना पत्र पाठविले पण काही उपयोग झाला नाही. तक ने दि.20/12/2013 रोजी विप क्र.1 ला नोटीस दिली पण प्रतिसाद आला नाही. विमा रक्कम रु.1,00,000/- नुकसान भरपाई रु.20,000/- व मानसिक त्रासापोटी रु.20,000/- व तक्रारीचा खर्च मिळावा म्हणून ही तक्रार तक ने दि.02/04/2014 रोजी दाखल केलेली आहे.
2. तक्रारीसोबत तक ने विमा काढल्याची पावती, विमेदारांच्या नावाची यादी, विप क्र.2 दि.26/04/2013 चे पत्र, विप क्र.1 चे नकाराचे पत्र, दि.10/12/2013 चे नोटीस इत्यादी कागदपत्रांच्या प्रती हजर केल्या आहेत.
ब) विप क्र.1 ने हजर होऊन लेखीजबाब दि.04/06/14 रोजी दिला त्याप्रमाणे करारातील अटीनुसार तक ने शंकर याचे ड्रायव्हींग लायसेंस हजर करणे जरुर होते तसे त्याला कळवूनही तक ने ते हजर केले नाही. त्यामुळे या विप ने सेवेत कोणतीही त्रुटी केली नाही. तक ने परवाना हजर करतो असे कळविले होते मात्र परवाना हजर केला नाही. पुन्हा दि.31/01/2013 चे पत्र देऊन विप क्र.1 ने विप क्र.2 कडून परवान्याची मागणी केली. परवाना दाखल न झाल्यामुळे दि.31/03/2013 रोजी पत्र देऊन फाईल बंद केल्याचे कळविले. जर तक ने शंकर याचा वाहन चालविण्याचा परवाना दाखल केला असता तर तक्रार दाखल करण्यास कारण निर्माण झाले नसते. तक ने मागितलेली नुकसान भरपाई चुकीची आहे त्यामुळे तक्रार रद्द होण्यास पात्र आहे असे नमुद केले आहे.
क) विप क्र.2 यांनी दि.30/04/2014 रोजी लेखी म्हणणे दाखल केले आहे. तक कडून आलेला क्लेम व कागदपत्रे विप क्र.1 कडे दाखल केल्याचे म्हंटले आहे. विप क्र.1 ने क्लेम नाकारण्यास विप क्र.2 जबाबदार नाही असे म्हंटले आहे.
ड) तक ची तक्रार त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे व विप चे म्हणणे व त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे यांचे अवलोकन केले असता आमचे विचारार्थ खालीलप्रमाणे मुद्दे निघतात त्यांची उत्तरे त्यांच्यासमोर त्यांच्या खाली दिलेल्या कारणांसाठी लिहली आहे.
मुद्दे उत्तर
1) विप यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय.
2) तक अनुतोषास पात्र आहे काय ? होय.
3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
इ) मुद्दा क्र.1 व 2 :
1. तक चे वडील वीज कंपनीत लाईनमन असल्यामुळे विप क्र.2 पतसंस्थेचे सभासद होते याबद्दल वाद नाही. विप क्र.2 ने आपल्या सभासदाचा तसेच तक चे वडीलांचा विप क्र.1 कडे विमा उतरला होता याबद्दल वाद नाही. तक चे वडीलांचा दि.27/10/2011 रोजी अपघात झाला व दि.02/11/2011 रोजी मृत्यू झाला या बद्दल वाद नाही. तक ने तो अपघात कसा झाला याबद्दल काहीच म्हंटले नाही. अपघाती मृत्यूची पोलिसांकडे नोंद झाली तसेच वैद्यकीय उपचार व शवचिकित्सा झाली हे दाखविण्यास कोणतीही कागदपत्र तक ने दाखल केली नाहीत.
2. विप क्र.1 चे म्हणण्याप्रमाणे मयत शंकर याचा वैध वाहन परवाना हजर करणे जरुर आहे. याचा अर्थ असा होतो की शंकर याचा वाहन अपघात झाला. कोणते वाहन होते कोण चालवत होते कोठे अपघात झाला याबद्दल दोन्ही बाजूंनी मौन बाळगले आहे. विप क्र.1 चे म्हणण्याप्रमाणे तक ने कळवले की त्याचे वडीलांचा परवाना मिळून येत नाही. मागणी करुनही तक ने परवाना हजर न केल्यामुळे विप क्र.1 ने सदर फाईल बंद केली.
3. विप क्र.1 तर्फे पॉलिसी डॉक्यूमेंट हजर करण्यात आले. अपवादांमधील कलम पाच इ. कडे आमचे लक्ष वेधण्यात आले आहे. त्याप्रमाणे कायद्याचे मुद्दामहून गुन्हेगारी उद्देशाने उल्लंघन केलेले असेल तर विप क्र.1 भरपाई देण्यास जाबाबदार नाही. असे मानले की मयताकडे वाहन चालवण्याचा परवाना नसतांना अपघात समयी तो वाहन चालवत होता तरी गुन्हेगारी उद्देश कसा शाबीत होतो हे कळून येत नाही. कदाचित मयताकडे वाहन चालवण्याचा परवाना असू शकेल केवळ त्याच्या वारसाला परवाना सापडत नाही यावरुन काहीच सिध्द होत नाही. मयताचा गुन्हेगारी उददेश होता हे शाबीत करण्याची जबाबदारी विप क्र.1 ची होती ती त्याने पार पाडली नाही. तांत्रिक कारण पुढे करुन तक ला विमा रक्कम देण्याचे टाळले म्हणून विप क्र.1 ने सेवेत त्रुटी केली असे आमचे मत आहे म्हणून तक अनूतोषास पात्र आहे म्हणून मुद्दा क. 1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश पारीत करतो.
आदेश
तक ची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
1) विप क्र. 1 ने वाहन परवान्याची मागणी सोडून देऊन तक चे क्लेम वर दोन महिन्यात निर्णय द्यावा.
2) विप क्र.1 ने तक ला तक्रारीचा खर्च म्हणून रु.3,000/-(रुपये तीन हजार फक्त) द्यावे.
3) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस
दिवसात करुन विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा,
सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न
केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज दयावा
4) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.