ग्राहक तक्रार क्र. 87/2013
अर्ज दाखल तारीख : 04/06/2013
अर्ज निकाल तारीख : 26/03/2015
कालावधी: 01 वर्षे 09 महिने 21 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. श्री.दत्तात्रय पि.कृष्णाजी पाटील,
वय-65 वर्षे, धंदा – शेती,
रा.भाटशिरपुरा ता. कळंब, जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. शाखा व्यवस्थापक,
सौ. हेमा अय्यर मॅडम,
दि. न्यु इंडिया अॅश्युरन्स कं. लि.,
शाखा कार्यालय, महालक्ष्मी चेंबर, 2 रा मजला,
प्रभात थेटर जवळ, अप्पा बळवंत चौक, पुणे-30
2. गोपाळ ग्यानबा शेरखाने,
तालूका कृषी अधिकारी,
तालूका कृषी अधिकारी कार्यालय,
पु. सावरगाव कळंब, ता. कळंब जि. उस्मानाबाद.
3. जिल्हा कृषी अधिकारी,
शंकर मारोतराव तोटावार,
जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय,
जुनी जिल्हा परिषद, उस्मानाबाद, ता. जि. उस्मानाबाद.
4. मुख्य सांख्यिक,
कृषी आयुक्तालय,
उमाकांत केशव दांगट,
महाराष्ट्र राज्य शासकिय, मध्यवर्ती इमारत, पुणे.
5. नंदकुमार प्रभाकर देशपांडे,
डेक्कन इन्शुरन्स अॅन्ड रिइन्शूरन्स ब्रोकसी,
प्रा.लि. औरंगाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विदयुलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.एस.एस.रितापूरे.
विरुध्द पक्षकार क्र.1 तर्फे विधीज्ञ : श्री.एस.पी.दानवे.
विरुध्द पक्षकार क्र.2 तर्फे विधीज्ञ : स्वत:.
विरुध्द पक्षकार क्र.3 तर्फे विधीज्ञ : स्वत:.
विरुध्द पक्षकार क्र.4 तर्फे विधीज्ञ : स्वत:.
विरुध्द पक्षकार क्र.5 तर्फे विधीज्ञ : स्वत:.
न्यायनिर्णय
मा. सदस्या सौ.विदयुलता जे. दलभंजन यांचे व्दारा:
अ) 1. तक्रादार दत्तात्रय पाटील हे मौजे भाटशिरपुर ता. कळंब जि. उस्मानाबाद येथील रहिवाशी असून त्यांनी विरुध्द पक्ष (संक्षिप्त रुपात विमा कंपनी) यांचे विरुध्द शेतकरी अपघात विमा रक्कम व नुकसान भरपाईची तक्रार दाखल केलेली आहे.
2. अर्जदार हे (संक्षिप्त रुपात मयत कांताबाई ) यांचे पती आहेत त्यांना मौजे मंगरुळ ता. कळंब जि. उस्मानाबाद येथे जमीन गट नं. 692 क्षेत्र 1 हे. 96 आर. असून ते जमिनीचे मालक आहेत.
3. कांताबाई हा दि.20/04/2011 रोजी सदर शेतामध्ये कापूस वेचत असतांना त्यांच्या मालाकीचा रेडा (हलगट) हा सुटून येऊन मारल्याने त्यांना गंभीर जखमी झाल्या व उपचारापूर्वी मरण पावल्या त्याबाबत शिराढोण पो. स्टे. ता. कळंब यांनी आकस्मीत गून्हा नोंद करुन नं.19/11 रजिस्टर केला. नंतर घटनास्थ्ळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा पोस्ट मार्टम केले.
4. अर्जदाराने दि.28/01/2013 रोजी सर्व कागदपत्राची पुर्तता करुन अनावधानाने तहसील कार्यालय कळंब यांचेकडे शेतकरी अपघात विमा योजनेचा प्रस्ताव दाखल केला परंतू सदर प्रस्ताव तहसील कार्यालयात दाखल करता येत नाही व सदर प्रस्ताव विप क्र.2 (संक्षिप्त रुपात कृषी अधिकारी) यांचेकडे दाखल करावा लागतो अशी माहीती अर्जदारास मिळाले नंतर अर्जदाराचा प्रस्ताव विप क्र.2 (संक्षिप्त रुपात कृषी अधिकारी) यांचेकडे दाखल करावा लागतो अशी माहीती अर्जदारास मिळाले नंतर अर्जदाराचा प्रस्ताव कृषी अधिकारी यांचेकडे उशिराने दाखल केला व उशीर माफीचा अर्ज देखील दाखल केला होता आणि प्रस्ताव उशिरा दाखल केला या कारणावरुन विप क्र.2 (संक्षिप्त रुपात विमा कंपनी) यांनी दि.08/03/2013 रोजी पत्र पाठवून प्रस्ताव नामंजूर केल्याचे कळवले व विमा कंपनी यांनी विप क्र.4 (संक्षिप्त रुपात कृषी आयूक्तालय) यांना कळवले त्यांनतर अर्जदाराने दि.02/05/2013 रोजी विमा कंपनी, कृषी अधिकारी कृषी आयूक्तालय व ब्रोकर यांना विमा रक्कम देण्याची विनंती केली परंतू अद्यापर्यंत काहीही कारवाई केलेली नाही त्यामुळे अर्जदाराने प्रस्तुत तक्रारी मार्फत विमा रक्कम रु.1,00,000/- 15 टक्के व्याजासह आर्थिक मानसिक त्रासापोटी रक्कम रु.20,000/- प्रकरणाच्या खर्चापोटी रु.5,000/- देण्याचा हुकुम व्हावा म्हणून विनंती केलेली आहे.
ब) विप क्र.1 विमा कंपनीने कैफियत अभिलेखावर दाखल केली आहे. त्यांचे म्हणण्यानुसार तक्रार चुकीची आहे. तक्रार नामंजूर व्हावी. प्रस्ताव विलंबाने दाखल केलेला आहे. अर्जदारास माहीत नव्हते हे कथन अमान्य केलेले आहे. विप ने सेवेत कसलीही त्रुटी केलेली नाही. विमा पॉलिसी ही दि.15/08/2010 ते 14/08/2011 या मुदतीत होती व दि.14/11/2008 पर्यंत प्रस्ताव येणे गरजेचे होते परंतू विलंबाने प्रस्ताव दाखल केला कथीत कारणे ही योग्य नाहीत तरी अर्जदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी अशी विनंती विमा कंपनीने केलेली आहे.
क) विप क्र.2 कृषी अधिकारी यांनी कैफियत अभिलेखावर दाखल केलेली आहे. त्यांचे म्हणणेनुसार दि.28/01/2013 रोजी अर्जदारास दत्तात्रय कृष्णाजी पाटील यांनी त्यांचा विमाअर्ज कळंब येथे मुळ प्रस्ताव व दोन साक्षांकीत प्रतीत दाखल व विहित मुदतीत सादर करणे बंधनकारक होते पण तसे न झाल्याने तो परत करण्यात आला. अर्जदाराचा विलंब क्षमापित करणेसाठी अर्ज दि.15/03/2013 रोजी विमा कंपनीकडे पाठवला आहे. या योजनेत समाविष्ट होणेसाठी 14 ऑगस्ट 2011 पर्यंत अर्ज करणे अपेक्षित होते. पण वाढीवर 90 दिवसाची मुदत घेऊन तो अर्ज 14 नोव्हंबर 2011 पर्यंत सादर करणे बंधनकारक होते परंतु तो विहीत मुदतीत प्राप्त न झाल्याने विमा कंपनीकडून नामंजूर करण्यात आला असे कृषी अधिकारी यांनी म्हंटले आहे.
ड) विप क्र.3 जिल्हा कृषी अधिकारी व विप क्र.4 मुख्य सांखीक कृषी आयुक्तालय यांचे म्हणणेनुसार मुळ प्रस्ताव विहित मुदतीत प्राप्त नाही 14 नोंव्हेबर 11 पर्यंत सादर करणे गरजेचे होते परंतू प्रस्ताव विलंबाने प्राप्त झाल्याने, विहीत नमून्यात प्राप्त न झाल्याने विमा कंपनीकडून नामंजूर करण्यात आला.
इ) विप क्र.5 (संक्षिप्त रुपात ब्रोकर) यांचे म्हणण्यानुसार मध्यस्थ म्हणून काम करणारी संस्था आहे. कोणत्याही प्रकारची फि अथवा आर्थिक मदत मागीतलेली नाही तरी दाव्यातून मुक्त करावे.
फ) अर्जदाराने तक्रारी सोबत क्लेम फॉर्मचा पोच पावती दि.28/01/2013 रोजी मतदान कार्ड, मयताचे मृत्यूप्रमाणपत्र, आकस्मिक मृत्यूची खबर, घटनास्थळ पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, 8-अ, सातबारा, 6-क, वारस प्रमाणपत्र, विमा कंपनीने क्लेम नाकारल्या बाबतचे दि.08/03/2013 चे पत्र इ, कागदपत्रे व युक्तिवाद ऐकला असता सदर प्रकरणात खालील प्रमाणे मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1) विमा कंपनीने अर्जदारास विमा रक्कम न देऊन सेवेत त्रुटी केली का ? होय.
2) अर्जदार विमा रक्कम मिळणेस पात्र आहे का ? होय.
3) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रामाणे.
ग) कारणमीमांसा
मुद्दा क्र. 1 व 2
1) अर्जदारास विमा कपंनीकडे विमादावा दाखल करण्यास उशीर झाला म्हणून विमा कंपनीने विमा रक्कम देण्यास नकार दिलेला आहे.
2) वास्तविक पाहता शासन निर्णय (इ) विमा कपंनी 4) शेतक-यांचा विमा प्रस्ताव विहित कागदपत्रांसह विमा योजनेच्या नंतर 90 दिवसापर्यंत विमा प्रस्ताव स्विकारावेत तसेच दोषी वाहन चालक वगळता सर्व अपघातग्रस्त शेतक-यांचे केवळ अपघात झाला या कारणास्तव विम्याचे दावे मंजूर करावे.
3) अपघाती मृत्यू संदर्भात दुर्घटना घडल्याचे सिध्द झाल्यास अनावश्यक घोका पत्करला या कारणास्तव एकही प्रकरण नाकारता येणार नाही असे स्पष्ट नमूद केलेले असतांना सुध्द विमा कंपनीने अत्यंत विलंबाने प्रस्ताव आला हे तांत्रिक कारण पुढे करुन विमा दावा नामंजूर केलेला आहे ही सेवेतील त्रुटी आहे.
4) वास्तविक पाहता अर्जदाराचा विमा प्रस्ताव विलंबाने जरी दाखल झालेला असला तरी तो घेऊन 3 महिन्यात सेटल करुन विमा रक्कम देणे गरजेचे होते परंतू विमा कंपनीने अर्जदारास विमा रक्कमेपासून वंचित ठेवलेले आहे हे स्पष्ट हेाते.
5) अर्जदाराने जे कागदपत्रे दाखल केलेले आहेत त्यामध्ये आवश्यक सर्व कागदपत्रे जोडल्याचा उल्लेख आहे. अर्जदाराच्या विमा दाव्यात कोणत्याही कागदोपत्री त्रुटी नव्हत्या हे स्प्ष्ट होते.
6) मा. महाराष्ट्र राज्य आयोगाने न्यू इंडिया एश्योरन्स कं. लि./ विरुध्द / नानासाहेब हूमंत जाधव 2005 (2) CPR24 या निवाडयातील न्यायिक तत्वाप्रमाणे विहित मुदतीमध्ये दावा सादर करण्याची सुचना केवळ directory असून mandatory असू शकत नाही त्यामुळे केवळ तांत्रिक बाबीकडे लक्ष देऊन विमा पॉलिसीचा उद्देश कसा सफल होऊ शकतो हे पाहणे आणि व्यवसायिक दृष्टीकोणातून विमा पॉलिसीकडे न पाहता विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारदार यांच्या विमा दाव्याचा सकारात्मक विचार कारणे अत्यावश्यक व अपेक्षीत होते असे आम्हाला वाटते.
7) अभिलेखावर दाखल कागदपत्रावरुन मयत कांताबाई यांचा मृत्यू अपघाती असल्याचे सिध्द होते आणि विमा कंपनीस तांत्रिक बाबींचा आधार घेऊन विमा रक्कम मिळविण्याच्या हक्कापासून अर्जदारास वंचित ठेवता येणार नाही विमा कंपनीने अर्जदारास विमा रक्कम न देऊन सेवेत त्रुटी केलेली आहे म्हणून मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
2) विमा कंपनीने अर्जदारास विमा रक्कम रु.1,00,000/- (रुपये एक लक्ष फक्त) क्लेम नाकरलेल्या दिनांकापासून म्हणजेच दि.08/03/2013 पासून 9 टक्के व्याज दराने आदेश पारीत तारखेपासून 30 (तिस) दिवसात दयावेत.
3) विमा कपंनीने अर्जदारास तक्रार खर्चापोटी रक्कम रु.2,000/- (रुपये दोन हजार फक्त) आदेश पारीत तारखेपासून 30 (तिस) दिवसात दयावेत.
4) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस
दिवसात करुन विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा,
सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न
केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज दयावा
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.