जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच लातूर यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक – 120/2012 तक्रार दाखल तारीख – 06/09/2012
निकाल तारीख - 13/05/2015
कालावधी - 02 वर्ष , 08 म. 07 दिवस.
श्रीमती शांताबाई बापुराव बिरादार,
वय – 55 वर्षे, धंदा – शेती,
रा. हैबतपुर, ता. उदगीर,
जि. लातुर. ....अर्जदार
विरुध्द
- शाखा व्यवस्थापक,
दि न्यु इंडिया एश्योरन्स कंपनी लि.,
चंद्रनगर, शाहु कॉलेज जवळ,
लातुर.
- शाखा व्यवस्थापक,
दि न्यु इंडिया एश्योरन्स कंपनी लि.,
महालक्ष्मी चेंबर्स, दुसरा मजला,
प्रभात सिनेमाजवळ, पुणे-411030.
- दि न्यु इंडिया एश्योरन्स कंपनी लि.,
मुख्य कार्यालय,
न्यु इंडिया एश्योरन्स बिल्डींग,
87, एम.जी.रोड, फोर्ट,
मुंबई – 400001.
- जिल्हा कृषी अधिकारी,
कृषी विभाग, जिल्हा परिषद,
लातुर. ..गैरअर्जदार
को र म - श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
श्री अजय भोसरेकर, सदस्य
श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- अॅड. अनिल.क.जवळकर.
गैरअर्जदार क्र. 1 ते 3 तर्फे :- अॅड.एस.जी.दिवाण.
निकालपत्र
(घोषितव्दारा - श्रीमती ए.जी.सातपुते, मा.अध्यक्षा )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
अर्जदार ही मौजे हैबतपुर येथील रहिवासी असून तिचे कुटुंबात गट क्र. 170 व 171 मध्ये 1 हेक्टर 47 आर व 13 आर एवढी शेतजमीन आहे. गैरअर्जदार क्र. 1 ते 4 यांच्याकडे शेतकरी जनता अपघात विमा या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने संपुर्ण शेतक-यांची विमा पॉलीसी काढलेली आहे. अर्जदाराने तिच्या कुटुंबात 2011 सालच्या रबीच्या पिकात तुर या पिकाची लागवड केली होती. अर्जदाराच्या शेतात तुरीचे पीक चांगले आले होते. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडयात शेतात तुरीवर औषध फवारणी चालू होती. दि. 01/11/11 रोजी अर्जदाराचे पती व मुलगा किशोर व भागवत तेलंगपुरे हे तुरीच्या पिकावर औषध फवारणी करत होते, दिवसभर औषध फवारणी करुन औषध फवारत असताना अर्जदाराच्या पतीच्या श्वासावाटे औषध पोटामध्ये औषध गेले. साधारणत: 6.30 वाजता काम बंद करुन घरी आले व अर्जदारास सांगितले की, माझे नाका तोंडात फवारणीच्या वेळी औषध गेल्याने डोके जड पडले आहे असे सांगून ते झोपी गेले. दि. 02/11/2011 रोजी पती सकाळी लवकर न उठल्याने अर्जदाराने तिचा मुलगा माधव यास झोपेतुन उठवले व सांगितले की, तुझे वडील उठत नाहीत. अर्जदार व तिच्या मुलाने पतीस उठवण्याचा प्रयत्न केला परंतु न उठल्याने वाहनात घालून सरकारी दवाखाना उदगीर येथे शरीक केले. अर्जदाराच्या पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर पोलीस स्टेशनला उदगीर येथे सदर घटनेची माहिती दिली. व सर्व कागदपत्र तयार करुन विमा दावा गैरअर्जदार विमाकंपनीकडे पाठवून दिला दि. 27/06/12 रोजीच्या पत्रान्वये विमा कंपनीने कळविले की, अर्जदाराने दिलेल्या पोस्ट मार्टमच्या रिपोर्ट प्रमाणे मयताच्या पोटात 1 लीटर औषध सापडले व आम्ही केलेल्या चौकशी प्रमाणे मयताने आत्महत्येच्या पोटी मयताने औषध घेतले असल्याने सदरचा विमा दावा नाकारला आहे.
त्यामुळे गैरअर्जदार विमा कंपनी यांनी अर्जदाराचा विमा दावा फेटाळून त्यांच्या सेवेत त्रुटी केली आहे. म्हणून गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी अर्जदारास रु. 1,00,000/- अपघाताच्या तारखेपासुन 15 टक्के व्याजाने दयावेत. मानसिक व शारिरीक खर्चापोटी रु. 15,000/- , दाव्याचाखर्च रु. 10,000/- देण्यात यावेत.
तक्रारदाराने तक्रारी सोबत कव्हरींग लेटर,क्लेम फॉर्म पार्ट – 3, क्लेम फॉर्म पार्ट – 1, अतिरिक्त क्लेम फॉर्म पार्ट – 1, क्लेम फॉर्म पार्ट – 2, वारसाचे प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, बँक पासबुक, ओळखपत्र, प्रतिज्ञापत्र, फेरफार, धारण जमिनीची नोंदवही, गांव नमुना सात, गाव नमुना सात, आकस्मित मृत्यूची खबर, पत्र, उपजिल्हा रुग्णालय उदगीर पत्र, मरणोत्तर पंचनामा, प्रेत पाहेच पावती, जबाब, घटनास्थळ पंचनामा, दंडाधिका-यांच्या अभिलेखासाठी पत्र, स्टेटमेंट(6 प्रती), पी.एम रिपोर्ट, केमीकल ऑनलायझर पत्र, दि न्यु एश्योरन्स कंपनी लि. इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
अर्जदार याने सदर केसमध्ये डेक्कन इन्शुरन्स कंपनीला पार्टी केली नाही. गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांच्या म्हणण्यानुसार अर्जदाराच्या क्लेमचा विचार करता पोटामध्ये विषारी औषध सापडल्यामुळे त्याने पॉलीसीच्या अट क्र; 8 III (1) b नुसार स्वत: आत्महत्या केलेली आहे. त्यामुळे सदरच्या केसमध्ये अर्जदार हा स्वच्छ हाताने आलेला दिसुन येत नाही. व त्याने रितसर सर्व कागदपत्रे डेक्कन विमा कंपनीला पाठवलेले नाही. त्या सर्व कागदोपत्री पुराव्याचा विचार करता शवविच्छेदन अहवालात मयताच्या पोटात 200 ते 300 एम.एल विषारी औषध सापडलेले आहे. त्यामुळे अर्जदार हा सदरची विमा पॉलीसी देण्यास पात्र नाही म्हणून अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळावा.
मुद्दे उत्तरे
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? नाही
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? नाही
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असून अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक होतो. त्याची गट क्र. 171 मध्ये 1 हेक्टर 47 आर मौजे हैबतपुर येथे शेतजमीन आहे. म्हणून तो शेतकरी होता हे सिध्द होते.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर नाही असून अर्जदार हा दि. 01/11/11 रोजी तुरीच्या पिकावर फवारणी करत असताना ते औषध त्याच्या पोटामध्ये श्वासावाटे गेले म्हणून तो काम बंद करुन संध्याकाळी 6.30 वाजता घरी आला व अर्जदारास म्हणाला की माझे नाका तोंडात औषध गैल्याने मला मळमळ होत आहे असे सांगून तो झोपी गेला. व घरच्या नातेवाईकांनी त्याला रात्री कोणत्याही दवाखान्यात न नेता तसेच झोपू दिले. व सकाळी उठल्यावर त्यास सरकारी दवाखाना येथे तो बोलत नाही उठत नाही म्हणून नेऊन अॅडमिट केले. व त्याचा पी.एम. करुन त्याची कागदपत्रे तयार करण्यात आली. यातील नातेवाईक सदर अर्जदाराच्या पतीच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचे स्पष्ट होत आहे अर्जदार ही पत्नी असून तिला जेव्हा आपल्या पतीस मळमळ होते तेव्हा ताक पाजून त्याच्याकडून उल्टया करुन घेवून त्याला झोपू न देता तात्काळ दवाखान्यात अॅडमिट करायला पाहिजे होते. परंतु मुलांनी त्यांच्याकडे लक्ष न देता सदर बाब अर्जदाराच्या पतीने सांगितल्यावर त्याला झोपू दिले. दुसरीबाब म्हणजे अर्जदाराच्या पतीच्या पोटात 200 ते 300 एम.एल एवढे औषध पांढ-या प्रकारचे मिळून आले. सदरचे विषारी औषध हे नाकात व तोंडात फवारणी करताना जाणे शक्य नाही. नुसत्या वासाने चक्कर आली असे समजू शकलो असता व ईलाजासाठी तात्काळ अर्जदारानी दवाखान्यात नेले असते तर अर्जदाराच्या क्लेम बाबत विचार केला गेला असता. मात्र सदर मयत व्यक्तीकडे अर्जदार व त्याच्या मुलानेच FIR वरुन दुर्लक्ष केलेले स्पष्ट दिसुन येत आहे. अर्जदाराचा मृत्यू हा अपघाती दिसुन येत नाही त्याला बीपी व शुगरची बिमारी होती ही बाब देखील अर्जदार व मुलगा यांना माहिती असून सुध्दा सदर विषारी औषध फवारण्यासाठी पाठवावे ही बाब पटत नाही. तसेच त्यांच्याकडे वाहनही उपलब्ध असताना 6.30 वाजता त्याला त्रास होत असताना झोपू दिले व सकाळी उठून वाहनाने सरकारी दवाखान्यात नेले हे पटत नाही. सदरच्या मयत याला 2002 पासुन शुगर व बीपीचा त्रास होता ही बाब नातेवाईकांच्या जबाबामध्ये आलेले दिसुन येत आहे. त्यामुळे या मयताचा मृत्यू अपघाती स्वरुपाचा नसुन आत्महत्या असल्याचे दिसुन येत आहे. त्यांनी दिलेल्या कागद क्र. 33 वर क्र. 10 थोडक्यात मजकुर या सदराखाली असे लिहिले आहे की, यातील खबर दिली की मयत हा दि 02/11/11 रोजी विषारी औषध पिल्याने उपचार कामी दाखल झाला होता हे पत्र केमीकल ऑनलायझर यांना तेथील पोलीस स्टेशन उदगीरच्या पोलीस अमलदार यांनी लिहिलेले दिसुन येते. यावरुन सदरचा मृत्यू आत्महत्या आहे. तो अपघाती नाही. तसेच शवविच्देदन अहवालात अर्जदारचा मृत्यू हा death due to unknown poisoning असे लिहीले आहे. तो सीए कडे पाठवलेला आहे. शेतकरी अपघात विम्या अंतर्गत मिळणा-या अनुतोषास अर्जदार ही पात्र नाही.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार रद्द करण्यात येत आहे.
2) खर्चाबाबत काही आदेश नाही.
(श्री. अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते)
सदस्य अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर.