Exh.No.
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
वसुली प्रकरण क्रमांक 04/2010
श्री संजीव बाळकृष्ण शिरसाट
रा.बांदा, ता. सावंतवाडी,
जिल्हा सिंधुदुर्ग ... तक्रारदार
विरुध्द
शाखाधिकारी,
दि न्यु इंडिया ऍश्युरंस कंपनी लि.
कुडाळ, ता.कुडाळ, जि. सिंधुदुर्ग. .. सामनेवाला
गणपूर्तीः-
1) श्री. एम.डी. देशमुख, अध्यक्ष
2) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
3) श्रीमती उल्का राजेश गावकर, सदस्या
तक्रारदार - गैरहजर
सामनेवाला – गैरहजर.
(मंचाच्या निर्णयाद्वारे मा. श्री एम्. डी. देशमुख, अध्यक्ष)
निकालपत्र
(दि.19/06/2012)
1) प्रस्तुत प्रकरणी तक्रारदार व सामनेवाला तसेच दोन्ही बाजूचे वकील यांना पुकारले असता गैरहजर आहेत. तक्रारदाराने प्रस्तुत प्रकरण ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 27 अन्वये दाखल केलेले आहे. परंतु त्यांच्या विनंती अर्जामध्ये तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 तसेच कलम 27 अन्वये कार्यवाही करुन मागीतलेली आहे. मात्र तक्रारदारांना दोन्ही प्रकारची अशी एकत्रितपणे मूळ आदेशाची अंमलबजावणी करुन मागता येणार नाही. प्रस्तुत प्रकरण ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 25 व 27 अन्वये एकत्रित विनंती केली असल्यामुळे प्रस्तुतचे प्रकरण चालवण्यास पात्र नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. हे मंच यापूढे असेही स्पष्ट करीत आहे की, न्यायाच्या दृष्टीने तक्रारदाराने त्यांनी त्यांच्या इच्छेनुसार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 25 अथवा कलम 27 अन्वये पुन्हा अंमलबजावणीसाठी अर्ज दाखल करावा असेही आदेशीत करण्यात येते. सदर विवेचनास खालील पूर्वाधाराचा हे मंच आधार घेत आहे.
Order dtd. 07/12/2009 passed by Hon’ble State Cosumer Disputes Redressal Commission, Maharashtra, Mumbai in First Appeal No.1000/2009 @ M.A.121/2009-
1. Chimanlal Keshavlal Shah and ors V/s 1. Shashikant Balwantrao Shinde and ors.
What is required to be noted that if the complaints/respondents desired to invoke the jurisdiction u/s 27 he should have prayed for imposing the punishment for a term which shall not be less than one month but which may extend to three years, or with fine which shall not be less than two thousand rupees but which may extend ten thousand rupees of with both as prayed u/s 27 (1) of said Act. However, in the prayer clause, we do not find a such prayer.
The Proceeding u/s27 is a criminal proceeding while the proceeding u/s 25(3) is not a criminal proceeding but it is recovery proceeding of an amount stated in the order of District Forum. These two remedies provided by the statue for the execution of the order passed by District Forum are distinct and separate. These remedies have different implications provided under the law. Even the powers of District Forum in view of different jurisdiction vested in the District Forum is different. Therefore, District Forum or the complainant cannot club these procedures and proceed or execute the orders passed by District Forum. What we find that the complaint has made a composite application under Section 25 & 27. Clubbing the remedies together resulted into misconceived execution application.
Order dtd. 26.04.2010 passed by Hon’ble State Consumer Disputes Redressal Commission, Maharashtra, Mumbai in Revision Petition No.59 of 2010. Shri Dattatray Shankarrao Desai and others V/s Shri Mangesh Damodar Belvankar and others.
Considering the prayer clause, there is no prayer in respect of entertaining or taking the proceeding under Section 27 of Consumer Protection Act, 1986. If it is so, the impugned order also cannot be faulted with on that ground. It may be observed that if the complainants/decree holders wanted to take execution u/s 27 wherein a trial is expected, they can always file a separate application.
वरील विवेचन व पूर्वाधाराचा विचार करता हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
- आदेश -
1) प्रस्तुतचे दरखास्त प्रकरण काढून टाकण्यात येते.
2) खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
3) सदरचा आदेश ओपन कोर्टामध्ये अधिघोषित करणेत आला.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 19/06/2012
sd/- sd/- sd/-
(वफा खान) (एम.डी. देशमुख) (उल्का गावकर)
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग