प्रकरण पंजीबध्द करण्यांत आले दि.03/06/2010 विरुध्दपक्षास नोटीस लागून हजर राहण्याची तारीख :- 13/07/2010 मा. अध्यक्ष, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बुलडाणा यांचे समक्ष प्रकरण क्रमांक :- सी.सी. /126/2010 निकाल तारीख :- 09/11/2010 श्रीमती निर्मला मधुकर पंधाडे, : वय 62 वर्षे, धंदा – घरकाम, : तक्रारकर्ती रा.विवेकानंद नगर, बुलडाणा, ता. जि.बुलडाणा. : --विरुध्द-- शाखा व्यवस्थापक, : दि बुलडाणा जिल्हा केंद्रीय सह.बँक मर्या. बुलडाणा : शहर शाखा, बुलडाणा, ता.जि.बुलडाणा. : विरुध्दपक्ष जिल्हा मंचाचे पदाधिकारी :- 1) श्री.राजीव त्रिं. पाटील - अध्यक्ष 2) श्रीमती नंदा लारोकर - सदस्या तक्रारकर्त्यातर्फे वकील :- श्री.शरद राखोंडे विरुध्दपक्षातर्फे वकील :- श्री.मनोज चोरडीया (मा.सदस्या श्रीमती नंदा लारोकर यांनी निकाल कथन केला) आ दे श प त्र 1.. तक्रारकर्तीच्या पतीच्या नावे असलेले बचत खाते क्र.143 मधे जमा असलेली रक्कम रु.22,109/-व त्यावर 12% दराने व्याज मिळावे हया मागणीकरीता तक्रारकर्तीने विरुध्दपक्षा विरुध्द ही तक्रार दाखल केली आहे. 2. विरुध्दपक्षाने या प्रकरणी हजर होऊन त्यांचा लेखी जवाब दाखल केलेला आहे. 3.. त्यानंतर तक्रारकर्तीने या प्रकरणी पुरसीस दाखल करुन तक्रारीत नमूद केलेले पैसे मिळाल्यामुळे तिला हे प्रकरण यापुढे चालवण्याचे नाही व प्रकरण काढून टाकण्यांत यावे असे नमूद केले आहे. ..2... ...2... 4.. तक्रारकर्तीने या प्रकरणी दाखल केलेल्या पुरसीसवरुन तक्रारकर्तीला तिच्या पतीच्या बचत खाते क्र.143 मधे जमा असलेली रक्कम रु.22,109/- मिळालेली असल्यामुळे तिला विरुध्दपक्षा विरुध्द ही तक्रार यापुढे चालविणे नसल्यामुळे सदरचे प्रकरण नस्तीबध्द करण्यांत येते. सबब खालील अंतीम आदेश पारीत करण्यांत येतो. अं ती म आ दे श 1) तक्रारकर्तीच्या तक्रारातील वादाचे निवारण झालेले असल्यामुळे तिची तक्रार नस्तीबध्द करण्यांत येते. 2) न्यायीक खर्चाबाबत कोणताही आदेश नाही. (श्रीमती नंदा लारोकर) (राजीव त्रिं. पाटील) सदस्या अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, बुलडाणा. स्थळ :- बुलडाणा दिनांक :- 09/11/2010 सपघु/-
| [HONORABLE Mrs Nanda Larokar] Member[HONORABLE R T Patil] PRESIDENT | |