Maharashtra

Beed

CC/12/134

Mubin Vakil shaikh - Complainant(s)

Versus

Branch Manager, (Tata Motors) Marathwada Auto Agencies - Opp.Party(s)

03 Dec 2013

ORDER

 
Complaint Case No. CC/12/134
 
1. Mubin Vakil shaikh
R/o Talwada Ta georai
Beed
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Branch Manager, (Tata Motors) Marathwada Auto Agencies
Gut No 50,Jalna Road Ghosapuri,Beed
Beed
Maharashtra
2. Vihang Enterprises,(Dealer)Bafna Motors C/O Branch Manager,Chetna Plaza,
Samarth Nagar,Shanoorwadi Aurangabad
Aurangabad
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Vinayak Raoji Londhe PRESIDENT
 HON'ABLE MRS. Manjusha Chitalange MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

                                     निकाल
                      दिनांक- 03.12.2013
                  (द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्‍यक्ष)
            तक्रारदार मुबीन वकील शेख यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये सामनेवाले यांनी सेवेत त्रूटी ठेवली आहे म्‍हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
             तक्रारदारांची तक्रार थोडक्‍यात खालील प्रमाणे, तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.2 बाफना मोटार्स यांचेकडून दि.15.2.2012 रोजी टाटा कंपनीची मॅजीक मॉडेलचे वाहन विकत घेतले. सदर वाहनाचा रजिस्‍ट्रर नंबरएम.एच.-23-डी-39 असा आहे. बाफना मोटार्स मार्फत सामनेवाले क्र.1 सर्व्‍हीस स्‍टेशन चालवतात. सामनेवाले क्र.3 हे स्‍टार्टर उत्‍पादित करणारी कंपनी आहे. तक्रारदार यांनी सदरील वाहन खरेदी केले त्‍यावेळी सामनेवाले यांनी एक वर्षाची वॉरंटी दिली आहे. तक्रारदार यांनी घेतलेले वाहन साधारणपणे 5000 किलोमिटर अंतर चालल्‍यानंतर सदरील वाहनाचा आय.आय.आय.एस. स्‍टार्टर (लोकस टीव्‍हीएस) हा नादूरुस्‍त झाला. तक्रारदार यांनी सदरील बाब सामनेवाले क्र.1 यांचें निदर्शनास आणली. दि.27.4.2012 रोजी वाहन सर्व्‍हीस स्‍टेशन मध्‍ये हजर केले. सामनेवाले यांनी वाहनाचा स्‍टार्टरचा पार्ट बदलून देऊ असे आश्‍वासन दिले. सामनेवाले क्र.1 यांना वेळोवेळी विनंती करुनही त्‍यांनी स्‍टार्टर बदलून दिला नाही.वाहन बंद पडल्‍यामुळे तक्रारदार यांचे उपजिवीकेचे साधन बंद झाले व त्‍यांचे कूटूंबावर उपासमारीची पाळी आली. सामनेवाले यांनी स्‍टार्टर बदलू देण्‍यास 34 दिवस विलंब केला आहे. सामनेवाले यांनी सेवेत कसूर व त्रूटी ठेवली आहे. सदर वाहन बंद राहिल्‍यामुळे तक्रारदार यांचे रु.85,000/- चे नुकसान झाले आहे. तक्रारदार यांना जाण्‍यायेण्‍याचा खर्च रु.4,000/- आलेला आहे.सबब, तक्रारदार यांना सामनेवाले यांचेकडे सेवेत त्रूटी ठेवली आहे. सामनेवाले यांनी रु.99,000/- व त्‍यावरील व्‍याज दयावे  अशी मागणी केली आहे.
            सामनेवाले क्र.1 हे मंचा समोर हजर झाले व त्‍यानी नि.10 अन्‍वये लेखी म्‍हणणे सादर केले. सामनेवाले यांनी तक्रारीतील मजकूर जशास तसा नाकारला आहे. सामनेवाले यांचे कथन की, तक्रारदार यांनी सदरील वाहन सामनेवाले क्र.1 यांचेकडून खरेदी केले नाही. सामनेवाले क्र.1 हा टाटा कंपनीचा डिलर नाही. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांना कोणतीही वॉरंटी दिलेली नाही. तक्रारदारास हा सामनेवाले यांचा ग्राहक नाही. तक्रारदार यांना ज्‍या डिलरकडून वाहन खरेदी केलेले आहे, त्‍या डिलरला तक्रारीत समाविष्‍ट केलेले नाही. तक्रारदार व सामनेवाले यांचेमध्‍ये कोणत्‍याही स्‍वरुपाचा व्‍यवहार झालेला नाही. सामनेवाले यांचे कथन की, तक्रारदार यांनी खरेदी केलेले वाहनामध्‍ये वेगवेगळे कंपनीचे पार्टस असतात. त्‍या पार्टसची वॉरंटी पार्ट बनविणा-या कंपनीच्‍या नियमास अधीन राहून टाटा मोटर्स देत असत.टाटा कंपनीने लोकस कंपनीच्‍या नियमास अधीन राहून वॉरंटी दिलेली आहे.स्‍टार्टर मध्‍ये काही दोष असल्‍यास संबंधीत कंपनीचे सर्व्‍हीस स्‍टेशनला तपासणीसाठी पाठविला जातो व त्‍यांचे अहवालानुसार पुढील कार्यवाही करण्‍यात येते. सामनेवाले यांनी पुढे असे कथन केले आहे की,टाटा कंपनीचे अधिकृत सर्व्‍हीस स्‍टेशन सामनेवाले क्र. 1 यांचेकडे आहे.तक्रारदार यांनी दि.5.5.2012 रोजी त्‍यांचे वाहन जमा केले. स्‍टार्टर सदोष असून चालत नाही अशी तक्रार केली. सामनेवाले क्र.1 यांनी जॉब कार्ड बनवले व सदरील स्‍टार्टर संबंधीत कंपनीचे  सर्व्‍हीस स्‍टेशन औरंगाबाद येथे दूरुस्‍तीसाठी पाठविले. त्‍या बाबत संगणकीय कार्ड बनविण्‍यात आले. सामनेवाले क्र.1 यांनी सामनेवाले क्र.2 यांचेकडे स्‍टार्टर पाठवून योग्‍य ती कारवाई केली आहे. सामनेवाले क्र.2 यांनी स्‍टार्टर दूरुस्‍त करुन दि.24.5.2012 रोजी सामनेवाले क्र.1 यांचेकडे पाठविला आहे. तक्रारदार हे दि.25.5.2012 रोजी सदरील वाहन परत घेऊन केलेले आहेत. सामनेवाले क्र.1 यांनी सेवेत कोणतीही त्रूटी ठेवली नाही.
            सामनेवाले क्र.2 हे या मंचासमोर हजर झाले व त्‍यांनी नि.12 अन्‍वये आपले लेखी म्‍हणणे सादर केले. सामनेवाले क्र.2 यांचे कथन की, तक्रारदार हे सामनेवाले क्र.2 यांचे ग्राहक नाहीत. सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदार यांना वाहनातील कोणत्‍याही पार्टची विक्री केलेली नाही. सामनेवाले क्र.2 हे टाटा कंपनीचे वितरक नाहीत. सामनेवाले क्र.2 यांचे टाटा कंपनीशी कोणत्‍याही प्रकारचा संबंध नाही. सामनेवाले क्र.2 विहंग इंटरप्रायजेस ही संस्‍था, जालना रोड,घोसापूरी बीड या पत्‍त्‍यावर कधीही कार्यान्‍वीत नव्‍हती. सामनेवाले क्र.2 ही संस्‍था औरंगाबाद येथे कार्यरत आहे. सामनेवाले क्र.2 यांचे बीड येथे कूठेही शाखा नाही. सामनेवाले क्र.2 यांचेकडे लोकस टीव्‍हीएस कंपनीचे भागाची विक्री व सेवा पुरविण्‍याचे काम औरंगाबाद जिल्‍हया पुरतेच मर्यादित आहे.बीड येथे लोकस टीव्‍हीएस कंपनीचे वितरक नसल्‍यामुळे सामनेवाले क्र.1 सेवा पुरविण्‍यासाठी सामनेवाले क्र.2 यांची मदत घेतात. सामनेवाले क्र.1 यांचे विनंतीस मान देऊन सामनेवाले क्र.2 यांनी स्‍टार्टर दूरुस्‍त करुन देण्‍याचे मान्‍य केले. सामनेवाले क्र.1 यांनी दिलेले पत्र नियमानुसार नसल्‍याने व माहीती विवरण नसल्‍याने सामनेवाले क्र.2 यांनी स्‍टार्टर सामनेवाले क्र.1 कडे पाठविले. सामनेवाले क्र.1 यांचेकडून पुन्‍हा स्‍टार्टर प्राप्‍त झाल्‍यानंतर सामनेवाले क्र.2 यांना तो स्‍टार्टर पुणे येथे विभागीय कार्यालयात दुरुस्‍तीसाठी पाठविले.पुणे येथून विभागीय कार्यालयात दूरुस्‍त होऊन आले व लगेच तो सामनेवाले क्र.1 यांचेकडे पाठविण्‍यात आले. सामनेवाले क्र.2 यांनी फक्‍त मध्‍यस्‍थाची भमिका केलेली आहे.तक्रारदार यांनी स्‍टार्टर मध्‍ये दोष आहे या बाबत कोणताही पुरावा दिलेला नाही. सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदार यांना कोणतीही सेवा पुरवलेली नाही अगर तो सामनेवाले क्र.1 यांचा ग्राहक नाही. सबब, तक्रार रदद करावी अशी विनंती सामनेवाले क्र.2 यांनी केले आहे.
            सामनेवाले क्र.3 यांना नोटीस मिळाली ते हजर नाही, सबब, सामनेवाले क्र.3 यांचे विरुध्‍द एकतर्फा आदेश करण्‍यात आला.
            तक्रारदार यांनी स्‍वतःचे शपथपत्र नि.19 अन्‍वये दाखल केले आहे. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत बाफना मोटार्स यांचेकडून सदरील वाहन खरेदी केल्‍या बाबत दस्‍ताऐवज हजर केले आहेत. तसेच सदरील वाहन खरेदी करिता कर्ज काढलेले आहे. त्‍यासंबंधी कागदपत्र हजर केले आहे. तक्रारदार यांनी जॉब कार्ड दाखल केलेले आहे. सामनेवाले क्र.1 यांनी स्‍वतःचे शपथपत्र नि.11 अन्‍वये दाखल केले आहे. सामनेवाले क्र.2 यांनी डिलरशिप प्रमाणपत्र, मुंबई दुकाने व संस्‍था अधिनियम अंतर्गत परवाना, जॉब कार्ड, दाखल केलेले आहे.तक्रारदार यांचे वकील श्री.काकडे यांचा युक्‍तीवाद ऐकला. सामनेवाले क्र.1 यांचे वकील श्री.जगताप यांचा यूक्‍तीवाद ऐकला. सामनेवाले क्र.2 यांचे वकील श्री.सिरसाट यांचा यूक्‍तीवाद ऐकला.
            तक्रारदार यांनी दाखल केलेला पुरावा व कागदपत्र यांचे अवलोकन केले. सामनेवाले यांनी दिलेला पुरावा व कागदपत्र यांचे अवलोकन केले. न्‍यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
            मुददे                                            उत्‍तर
1.     तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत ही बाब
      तक्रारदार यांनी शाबीत केली आहे काय ?                     नाही.
2.    सामनेवाले यांनी तक्रारदार यांना देण्‍यात येणा-या सेवेत
      त्रूटी ठेवली आहे काय ही बाब तक्रारदार यांनी शाबीत
       केली आहे काय ?                                       नाही.
3.    तक्रारदार हे तक्रारीत नमूद केलेली दाद मिळण्‍यास पात्र
      आहेत काय ?                                           नाही.
4.    काय आदेश                               अंतिम आदेशाप्रमाणे.
                              कारणमिंमासा
मुददा क्र.1 ते 3 ः-
            तक्रारदार यांचे वकील श्री.काकडे यांनी असा युक्‍तीवाद केला की, तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.2 यांचेकडून सदरील वाहन खरेदी केलेले आहे. सदरील वाहन खरेदी केल्‍यानंतर थोडयाच दिवसात वाहनाचा स्‍टार्टर खराब झाला, तो दूरुस्‍त करण्‍याकामी सामनेवाले क्र.1 यांना देण्‍यात आला. सामनेवाले क्र.1यांना तो स्‍टार्टर मुदतीत बदलून दिला नाही अगर दूरुस्‍त करुन दिला नाही त्‍यामुळे तक्रारदार याचे वाहन 34 दिवस बंद राहिले व त्‍यांचे उपजिवीकेवर परिणाम झाला. उपजिविकेचे साधन ठप्‍प झाले. सामनेवाले यांनी सेवेत त्रूटी ठेवली आहे. तक्रारदार हे तक्रारीत नमूद केलेली नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र आहेत.
            सामनेवाले क्र.1 व 2 यांचे वकिलांनी असा यूक्‍तीवाद केला की, तक्रारदार हे सामनेवाले क्र.1 व 2 यांचे ग्राहक नाहीत. तक्रारदार यांनी सदरील वाहन सामनेवाले क्र.1 व 2 यांचेकडून विकत घेतले नाही. तक्रारदार यांनी सदरील वाहन हे बाफना मोटार्स प्रा.लि. नांदेड हया डिलरकडून विकत घेतले आहे. सदरील विक्रेत्‍यास तक्रारीत पक्षकार म्‍हणून सामील केलेले नाही. तक्रारदार यांनी दिलेले स्‍टार्टर सामनेवाले क्र.1 यांचे मार्फत सामनेवाले क्र.2 यांना देण्‍यात आले व त्‍यांनी तो स्‍टार्टर पूणे येथे पाठवून दूरुस्‍त करुन परत केलेला आहे. सामनेवाले क्र.1 व 2 हे लोकस प्रा.लि. कंपनीचे अगर टाटा मोटार्सचे वितरक नाहीत. सामनेवाले यांनी असा यूक्‍तीवाद केला की, सदरील स्‍टार्टर मध्‍ये काय दोष होता ही बाब तक्रारदार यांनी शाबीत केलेली नाही. तक्रारदार यांनी सदरील स्‍टार्टर या मंचापूढे हजर केला नाही. सदरील स्‍टार्टर तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्‍ये पाठविला नाही. त्‍यामुळे त्‍या स्‍टार्टर मध्‍ये दोष आहे ही बाब तक्रारदार शाबीत करु शकलेले नाही. सबब, सदरील तक्रार रदद होण्‍यास पात्र आहे.
            संपूर्ण पुराव्‍याचे अवलोकन केले असता या मंचाचे मत की, तक्रारदार हे सामनेवाले क्र.1 व 2 यांचे ग्राहक नाहीत. तक्रारदार यांनी सदरील वाहन बाफना मोटर्स नांदेड यांचेकडून घेतलेले आहे.सदरील मोटार विक्रेत्‍यास तक्रारीत पक्षकार म्‍हणून सामील केलेले नाही. सामनेवाले क्र. 1व 2 यांनी सदरील स्‍टार्टर पूणे येथे दूरुस्‍तीसाठी पाठविले. तो दूरुस्‍त होऊन आल्‍यानंतर तो तक्रारदार यांना देण्‍यात आला त्‍यामुळे त्‍यांनी सेवेत त्रूटी ठेवली आहे ही बाब तक्रारदार शाबीत करु शकलेले नाहीत. तक्रारदार यांनी सदरील स्‍टार्टर या मंचापूढे हजर केलेले नाही.सदरील स्‍टार्टर मध्‍ये काय दोष होता ही बाब तक्रारदार यांनी शाबीत केलेली नाही. सामनेवाले क्र.2 यांचे वकील श्री.शिरसाट यांनी असा यूक्‍तीवाद केला की, तक्रारदार यांचा निष्‍काळजीपणा सदरील स्‍टार्टर नादूरुस्‍त झालेला आहे. त्‍यांचे यूक्‍तीवादाचे प्रित्‍यर्थ त्‍यांनी मा. राष्‍ट्रीय आयोग नवी दिल्‍ली यांनी दिलेला न्‍यायनिर्णय 2013 STPL (CL)877 NC   TATA Engineering Vs. Surjit Kaur and others    यांचा हवाला दिला आहे. तक्रारदार यांनी सदरील वाहन निष्‍काळजीपणे वापरले व त्‍यामुळे स्‍टार्टर खराब झाले हे सिध्‍द करण्‍यासाठी या मंचासमोर सबळ पुरावा नाही. तक्रारदार यांनी सदरील स्‍टार्टर मध्‍ये उत्‍पादित दोष आहे ही बाबही सिध्‍द केलेली नाही. तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक नाहीत. तक्रारदार यांनी सदरील वाहन सामनेवाले यांचेकडून खरेदी केलेले नाही. त्‍यामुळे तक्रारदार हे सामनेवाले यांचेकडून नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र नाहीत.
मुददा क्र.1 ते 3 चे उत्‍तर नकारार्थी देण्‍यात येते.
            सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
                     आदेश
1.     तक्रारदाराची तक्रार खारीज करण्‍यात येते.
2.    खर्चाबददल आदेश नाही.
      3.    ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
                       (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
 
 
 
                       श्रीमती मंजुषा चितलांगे             श्री.विनायक लोंढे                                      
                                सदस्‍य                    अध्‍यक्ष     
                                                        जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.
 
 
जयंत पारवेकर
लघुलेखक
 
 
[HON'ABLE MR. Vinayak Raoji Londhe]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Manjusha Chitalange]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.