Maharashtra

Ahmednagar

CC/16/332

Rohidas Gabaji Wabale - Complainant(s)

Versus

Branch Manager, Sundram Finance Limited - Opp.Party(s)

Ghodake A.K.

26 Mar 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/16/332
( Date of Filing : 13 Dec 2016 )
 
1. Rohidas Gabaji Wabale
R/o.Plot No.X 1, M.I.D.C., Nagapur,Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Branch Manager, Sundram Finance Limited
209, Second Floor, Adesh Plaza, Near Doule Hospital, Savedi, Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
2. Manager, Sundaram Finance Limited
206, Swastik Chambers, Sion Trombay Road, Chembur, Mumbai 400 071
Mumbai
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Ghodake A.K., Advocate
For the Opp. Party: Adv.s.P.Meher, Advocate
Dated : 26 Mar 2019
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा-श्री.विजय सी.प्रेमचंदानी-मा.अध्‍यक्ष)

1.   तक्रारकर्ता यांनी सदरील तक्रार कलम 12 ग्राहक संरक्षण कायदा 1986 अन्‍वये दाखल केली आहे.

2.   तक्रारकर्ताने तक्रारीत असे कथन केलेले आहे की, तक्रारकर्ता यास त्‍याचे व्‍यवसायासाठी जे.सी.बी. मशीनची आवश्‍यता होती. तक्रारकर्ताने त्‍यांचे नावे दिनांक 22.09.2013 रोजी एकुण रक्‍कम रुपये 24,50,000/- मध्‍ये जे.सी.बी.मशीन खरेदी केले. सदर जे.सी.बी.मशीन खरेदी करते वेळी तक्रारकर्ताने रक्‍कम 5,00,000/- रुपये भरुन सामनेवाला कडून रुपये 19,50,000/- चे कर्ज मंजुर केले. सदरचे कर्जाची परतफेड दरमहा 53,300/-  असा ठरला होता. तक्रारकर्ताने पुढे असे कथन केलेले आहे की, सामनेवाला यांचेकडून कर्ज घेतेवेळीचा करारनामा झालेला आहे त्‍याचे अटी अत्‍यंत जाचक व एकतर्फा होत्‍या. व सदर करारनामा हा प्रिंटेड फॉर्ममध्‍ये असल्‍याने तक्रारकर्ताने कर्ज घेतेवेळी करारनाम्‍यावर सह्या केलेल्‍या होत्‍या. सदरचे जे.सी.बी.मशीन मध्‍ये आधुनिकीकरण करण्‍याकरीता तक्रारकर्ताने रक्‍कम 2,00,000/- रुपये अतिरिक्‍त खर्च केलेले आहेत. तक्रारकर्ताने पुढे असे कथन केलेले आहे की, मध्‍यंतरी व्‍यवसाय व शेतीतील अनैसर्गिक वातावरणामुळे सदरचा जे.सी.बी.मशीन नादुरुस्‍त झाला व सदर दुरुस्‍तीसाठी सदर कंपनीचे सर्व्‍हीस स्‍टेशन जवळ नसल्‍यामुळे व सदर जे.सी.बी.मशीनचे स्‍पेअर पार्ट लवकर उपलब्‍ध न झाल्‍यामुळे तीन ते चार महिने जे.सी.बी.मशीन नादुरुस्‍त राहिले. सदर जे.सी.बी.मशीन दुरुस्‍तीसाठी तक्रारकर्ताला रक्‍कम रु.3,00,000/- खर्च आला. त्‍यामुळे सामनेवाला फायनान्‍स कंपनीचे काही हप्‍ते भरणे शक्‍य झाले नाही. व त्‍या संदर्भात सामनेवाला यांना कल्‍पना दिलेली आहे. सामनेवाला कंपनी यांनी तक्रारकर्ताने कर्जाची रक्‍कम जमा केली नाही तर त्‍यांचे वाहन ताब्‍यात घेण्‍यात येईल. व लिलावाव्‍दारे त्‍याची विक्री करुन कर्जाची रक्‍कम वसुल करण्‍यात येईल असे तक्रारकर्तास लेखी कळविलेले आहे. तक्रारकर्ताने दिनांक 19.09.2016 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठविली व अॅग्रीमेंट व खाते उता-याची मागणी केली. सामनेवालाने तक्रारकर्ताला नोटीसला खोटे उत्‍तर दिले. सामनेवालाने तक्रारकर्ताचे जे.सी.बी.मशीन दिनांक 08.09.2016 रोजी कोणतीही पुर्व सुचना न देता दोन अनोळखी इसमांचे मदतीने तक्रारकर्ताचे जे.सी.बी.मशीन बेकायदेशिररित्‍या, अनाधिकृतपणे, जबरदस्‍ती करुन त्‍यांचे ताब्‍यात घेतले. सदर कृत्‍य सामनेवालाचे तक्रारकर्ताप्रति अनुचित व्‍यवहार प्रथेची अवलंबना आहे. तक्रारकर्ताला जे.सी.बी. मशीन अनाधिकृपणे ताब्‍यात घेतले असल्‍याने तक्रारकर्ताला दिवसाला रक्‍कम 2,000/- रुपये नुकसान होऊ लागले. सामनेवालाने तक्रारकर्ताचे नोटीसला खोटे उत्‍तर पाठवून रक्‍कम रु.11,70,300/-  ची मागणी केलेली आहे ही बाब सामनेवालने तक्रारकर्ताप्रति अनुचित व्‍यवहार प्रथेचा अवलंबना आहे. म्‍हणून तक्रारकर्ताने सदरची तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे.   

3. तक्रारकर्ताने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, सामनेवालाने तक्रारकर्ताला जे.सी.बी.मशीन तक्रारकर्ताचे ताब्‍यात देण्याचा आदेश व्‍हावा. तसेच तक्रारकर्ताला झालेल्‍या नुकसान भरपाईपोटी व तक्रारीचा खर्च तसेच खाते उतारा व अॅग्रीमेंटरची प्रत देण्‍याचा आदेश पारीत करण्‍यात यावा अशी विनंती केली आहे.

4. तक्रारकर्ताची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीस काढण्‍यात आली. सदरहू नोटीस प्राप्‍त झाल्‍यावर सामनेवाला प्रकरणात हजर झाले. व निशाणी क्र.12 वर लेखी उत्‍तर दाखल केले. सामनेवाला यांनी लेखी उत्‍तरात असे कथन केलेले आहे की, तक्रारकर्ताने सामनेवालाकडून जे.सी.बी.मशीन करीता एकुण रक्‍कम 19,50,000/- रुपयाचे कर्ज घेतले आहे. तसेच तक्रारकर्ताला फायनान्‍स शुल्‍क रक्‍कम रु.5,55,126/- अशी एकुण तक्रारकर्ताला सामनेवालाने रक्‍कम 25,05,216/- रुपयाची परतफेड करावयाची ठरलेली आहे. व त्‍या अनुषंगाने तक्रारकर्लाला 47 महिन्‍यात प्रत्‍येक हप्‍ता 53,300/- असा ठरलेला होता. तक्रारकर्लाला सामनेवालाचे झालेल्‍या कराराप्रमाणे अट क्र.13 नुसार तक्रारकर्ताला प्रत्‍येक महिन्‍यात परतफेड रक्‍कम करावयाची होती. परंतू ती चुकल्‍यावर सामनेवाला जे.सी.बी. मशीन ताब्‍यात घेण्‍याचा अधिकार आहे असे नमुद आहे. सदर बाब तक्रारकर्ताला मान्‍य आहे. तक्रारकर्ताने 26 महिन्‍याचे हप्‍त्‍याची रक्‍कम भरणा केली. त्‍यानंतर त्‍यात हप्‍ता रक्‍कम भरणा केलेली नाही. म्‍हणून सामनेवालाने तक्रारकर्ताला त्‍याकरीता वारंवार हप्‍ता मागणी करुनसुध्‍दा त्‍यावर दुर्लक्ष केले. म्‍हणून सामनेवालाने योग्‍य रितीने व नियमाप्रमाणे तक्रारकर्ताचा जे.सी.बी.मशीनचा ताबा घेतला. यात सामनेवालाचा कोणताही अनुचित व्‍यवहार प्रथेची अवलंबना तक्रारकर्ताप्रति केलेली नाही. म्‍हणून सदर तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केली आहे.

5. तक्रारकर्ताने दाखल तक्रार, दस्‍तावेज, सामनेवालानी दाखल केलेला जबाब, दस्‍तावेज, तक्रारकर्ताचे लेखी युक्‍तीवाद व उभय पक्षकारांनी दाखल केलेले मा.वरीष्‍ठ न्‍यायालयाचे न्‍याय निवाडयाच्‍या प्रति व तोंडी युक्‍तीवादावरुन मंचासमक्ष खालील मुद्दे विचारार्थ येतात.

    

             मुद्दे  

      उत्‍तर

1.

तक्रारकर्ता हा सामनेवालाचा “ग्राहक” आहे काय.?                    

 

... होय.

2.

सामनेवाला यांनी तक्रारकर्ताप्रति अनुचित व्‍यापार प्रथेची अवलंबना केलेली आहे काय. ?

 

... नाही.

3.

आदेश काय ?

...अंतीम आदेशानुसार.

का र ण मि मां सा

6.   मुद्दा क्र.1  – तक्रारकर्ता यांनी सामनेवाला यांचेकडून जे.सी.बी.मशीन खरेदी करण्‍याकरीता रक्‍कम रुपये 19,50,000/- चे कर्ज घेतलेले आहे ही बाब उभय पक्षकारांनी मान्‍य असून तक्रारकर्ता हे सामनेवालाचे “ग्राहक” आहेत असे सिध्‍द होते. सबब मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

7.   मुद्दा क्र.2 – तक्रारकर्ताने तक्रारीत स्‍वतः मान्‍य केलेले आहे की, तक्रारकर्ताची जे.सी.बी.मशीन नादुरुस्‍त असल्‍याने तक्रारकर्ताने सामनेवालाकडे काही हप्‍त्याची रक्‍कम भरणा केलेली नाही. सामनेवालाने निशाणी 21 वर तक्रारकर्ताचा कर्ज खाते उतारा दाखल केलेला आहे. त्‍या उता-याची पडताळणी करतांना असे दिसून आले की, तक्रारकर्ताने सामनेवालाकडून कर्ज खात्‍याचे दिलेले धनादेश ब-याच वेळा परत केलेले आहेत. दिनांक 17.04.2016 पासून दिनांक 17.08.2016 पर्यंत तक्रारकर्ताने सामनेवालाकडे कोणत्‍याही हप्‍त्‍याचे रकमेंचा भरणा केलेला नाही. तसेच सामनेवालाने निशाणी 21 वर दाखल दस्‍तावेजाची पडताळणी करतांना असे दिसून आले की, सामनेवालाने रक्‍कम कर्ज परतफेडी पोटी हप्‍ता रक्‍कम भरणा करण्‍याकरीता नोटीस दिलेली आहे. सदर नोटीस तक्रारकर्ताला प्राप्‍त झाली आहे. तसेच दिनांक 08.09.2016 रोजी तक्रारकर्ताने स्‍वतः सामनेवालाकडे जे.सी.बी.मशीन ताब्‍यात दिलेली आहे. सदर जे.सी.बी.मशीन ताब्‍यात घेण्‍यापुर्वी व नंतर सामनेवालाने पोलीस स्‍टेशनमध्‍ये त्‍या संदर्भात पत्र लिहून कळविलेले आहे. परत ताबा घेतल्‍यानंतर तक्रारकर्ताला रक्‍कम भरणा करण्‍याकरीता नोटीस देण्‍यात आलेली होती.

(I)   मा.सर्वोच्‍च न्‍यायालय यांनी दिलेल्‍या Suryapal Singh Vs. Siddha Vinayak Motors & Anr. या न्‍याय निवाडयात खालील बाबी नमुद केलेले आहेत.

“ 2. This Court vide its judgment in Trilok Singh & Ors. V. Satya Deo Tripathi, AIR 1979 SC 850, has categorically held that under the Hire Purchase Agreement, the financier is real owner of the vehicle, therefore, there cannot be any allegation against him for having the possession of the vehicle. This view was again reiterated in K.A. Mathai @ Babu & Anr. V. Kora Bibbikutty & Anr., 1996 (7) SCC 212 ; Jagdish Chandra Nijhawan V. S.K. Saraf, IX (1998) SLT 477=IV (1998) CCR 118 (SC) = 1999 (1) SCC 119; Charanjit Singh Chadha & Ors. V.Sudhir Mehra, VI (2001) SLT 883=III(2001) CCR 232 (SC) // 11 // = 2001 (7) SCC 417, following the earlier judgment of this Court in Sundaram Finance Ltd. V. The State of Kerala & Anr., AIR 1966 SC 1178; Smt.Lalmuni Devi v. State of Bihar & Ors., I (2001) SLT 26 = I (2001) CCR 9 (SC) = 2001 (2) SCC 17 and Balwinder Singh v. Asstt.Commissioner, V (2005) SLT 195= III (2005) CCR 8 (SC)CCE 2005 (4) SCC 146. ”

(II) मा.राष्‍ट्रीय आयोग, नवि दिल्‍ली यांनी दिलेल्‍या Jaleshwar Shah V.s M/s. Cholamandalam Investment & Finance या न्‍याय निवाडयात खालील बाबी नमुद आहेत. 

“ Taking possession of vehicle on ground of not payment of instalment is legal right of financer ”

(III) मा.राष्‍ट्रीय आयोग, नवि दिल्‍ली यांनी दिलेल्‍या Joginder Pal Malhotra V.s Deepak Mittal, Managing Director, International Autotrac Finance Ltd. And Ors. या न्‍याय निवाडयात खालील बाबी नमुद आहे. 

“ Loan once taken has to be repaid ”

वरील नमुद न्‍याय निवाडयाचे तथ्‍य सदर प्रकरणात तंतोतंत लागू पडतात. सदर प्रकरणात तक्रारकर्ता हे सिध्‍द करु शकले नाही की, सामनेवालाने तक्रारकर्ताचे जे.सी.बी.मशीन झोड जबरदस्‍तीने किंवा अनाधिकृतपणे ताब्‍यात घेतलेली आहे. या उलट सामनेवालाने सदर प्रकरणात हे सिध्‍द केलेले आहे की, तक्रारकर्ता यांनी कर्ज परतफेड करीता वेळोवेळी हप्‍त्‍याची रकमेंचा भरणा केलेला नाही. व तक्रारकर्ताला कर्जाची परतफेड करणे आवश्‍यक आहे. व त्‍यावर सामनेवालाने करण्‍यात आलेली कारवाई तक्रारकर्ता व सामनेवालाचे झालेल्‍या करारानुसार योग्‍य व नियमाप्रमाणे आहे, यात सामनेवालाने कोणताही अनुचित व्‍यवहार प्रथा तक्रारकर्ताप्रति केलेली नाही असे सिध्‍द होते. सबब मुद्दा क्र.2 चे उत्‍तर नकारार्थी नोंदविण्‍यात येते.

8.   मुद्दा क्र.3 - मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन मंचाचे असे निदर्शनास आले आहे की, तक्रारकर्ताने सामनेवालाकडे हप्‍त्‍याचे रक्‍कमेचा भरणा केलेला नाही. म्‍हणून तक्रारकर्ताची जे.सी.बी.मशीन सामनेवालाने ताब्‍यात घेतलेली आहे, ही बाब ग्राहय धरुन तसेच सामनेवालाने निशाणी 27 वर तक्रारकर्ता व सामनेवाला यांचेमध्‍ये झालेले आरबीट्रेशन प्रकरणात झालेल्‍या आदेशाची प्रत दाखल केलेली आहे. त्‍यात तक्रारकर्ता यांचे विरुध्‍द आदेश पारीत झालेला आहे, सदर आदेशाचे विरुध्‍द आदेश या मंचाला करता येत नाही व अधिकार क्षेत्रही नाही. ही बाब ग्राहय धरुन खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

- अं ति म आ दे श

1.   तक्रारकर्ताची तक्रार नामंजूर करण्‍यात येते.

2.   उभय पक्षकार यांनी या तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

3.   या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.  

4.   तक्रारकर्ता यांना या प्रकरणाची “ब” व “क” फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.