निकालपत्र (पारित दिनांक 18 मार्च, 2011) व्दारा श्रीमती प्रतिभा बा. पोटदुखे, अध्यक्षा. 1. तक्रारकर्ता श्रीनारायण नरसिंग राजपुरोहीत यांनी एटीएम कार्डचा उपयोग करुन रुपये 25,000/- ही रक्कम काढली असता ती रुपये 40,000/- अशी दाखविण्यात आली यासाठी सदर ग्राहक तक्रार दाखल केली असून मागणी केली आहे की, रुपये 15,000/- ही रक्कम त्यांना व्याजासह मिळावी व शारीरिक व मानसिक त्रासाकरीता रुपये 50,000/- मिळावेत. 2. विरुध्दपक्ष क्रमांक 1 त्यांचे लेखी उत्तरात म्हणतात की, तक्रारकर्ता यांना रुपये 15,000/- ही उर्वरीत रक्कम देण्यात आली आहे व तक्रार ही कालबाहय असल्यामुळे ती खारीज करण्यात यावी. 3. विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांचे विरोधात दिनांक 03/03/2011 रोजी प्रकरण एकतर्फी पुढे चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला. ..2.. ..2.. 4. ग्राहक तक्रार व लेखी उत्तर, तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी रेकॉर्डवर दाखल केलेली शपथपत्रे, दस्ताऐवज, इतर पुरावा व केलेला युक्तीवाद यावरुन असे निदर्शनास येते की, तक्रारकर्ता यांनी रुपये 25,000/- ही रक्कम विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांच्या बंगलोर शाखेतून दिनांक 18/10/2008 रोजी विरुध्दपक्ष क्रमांक 1 च्या एटीएम कार्डच्या माध्यमातून काढले असता चुकीने ती रक्कम रुपये 40,000/- अशी दाखविण्यात आली मात्र विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांच्या यशस्वी मध्यस्तीनंतर दिनांक 20/01/2011 रोजी रुपये 15,000/- ही रक्कम तक्रारकर्ता यांच्या खात्यामध्ये वळती करण्यात आली आहे व आता ग्राहक तक्रारीचे कारण उरलेले नाही. असे तथ्य व परिस्थिती असतांना सदर आदेश पारित करण्यात येत आहे. आदेश 1. तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार ही खारीज करण्यात येत आहे.
| [HONORABLE Smt. Patel] Member[HONORABLE Smt. Potdukhe] PRESIDENT[HONORABLE Shri. Ajitkumar Jain] Member | |