Maharashtra

Bhandara

CC/16/43

Shri Sourabh Chandramohan Gupta - Complainant(s)

Versus

Branch Manager, State Bank of India - Opp.Party(s)

Adv. Gupta

21 Sep 2018

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
 
Complaint Case No. CC/16/43
( Date of Filing : 28 Apr 2016 )
 
1. Shri Sourabh Chandramohan Gupta
R/o. Gupta Clinic, At. village Saori,, PO. Jawaharnagar, Dist. Bhandara
Bhandara
maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Branch Manager, State Bank of India
Ordnance Factory Estate, Jawaharnagar Branch, Po. Jawaharnagar, Dist. Bhandara
Bhandara
maharashtra
2. The Chief Branch Manager, State Bank of India
Dharampeth Branch, WHC Road, Dharampeth, Nagpur 440010
nagpur
maharashtra
3. The Deputy General Manager, State Bank of India
Administrative Office, SV Patel Marg, Kingsway, Nagpur 440001
nagpur
maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MS. SMITA N. CHANDEKAR MEMBER
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
For the Complainant:Adv. Gupta, Advocate
For the Opp. Party:
Dated : 21 Sep 2018
Final Order / Judgement

                                                                                :: निकालपत्र ::

     (पारीत व्‍दारा श्रीमती स्मिता निळकंठ चांदेकर, मा.सदस्‍या. )

                                                                 (पारीत दिनांक21 सप्‍टेंबर, 2018)

  

01.  तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द स्‍टेट बँक ऑफ इंडीया विरुध्‍द दोषपूर्ण सेवे संबधाने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली दाखल केलेली आहे.

 

02.   तक्रारीचा आशय थोडक्‍यात खालील प्रमाणे-

     तक्रारकर्त्‍याचे स्‍टेट बँक ऑफ इंडीया मध्‍ये विरुध्‍दपक्ष क्रं-1) जवाहरनगर, भंडारा आणि विरुध्‍दपक्ष क्रं-2) धरमपेठ, नागपूर येथील शाखे मध्‍ये दोन स्‍वतंत्र बचत खाते आहेत कारण तक्रारकर्त्‍याचे कार्यालय नागपूर येथे आहे  असून घर हे जवाहरनगर भंडारा येथे आहे. विरुध्‍दपक्ष क्रं-1) जवाहर नगर, भंडारा येथील बँकेचे  जवाहरनगर भंडारा येथे स्‍थानिक बँक ग्राहक सुविधा केंद्र असून ते केंद्र श्री लखनलाल एच.चौरे, शाखा कोड-2156 यांना दिलेले असून सदर बँकेचे सुविधा केंद्र विरुध्‍दपक्ष क्रं-1) बँकेशी संगणकाव्‍दारे जोडलेले असून केंद्रावरील व्‍यवहारासाठी कोणतेही शुल्‍क आकारल्‍या जात नाही. सदर बँकेच्‍या ग्राहक सुविधा केंद्रातून दैनंदिन बँकेचे व्‍यवहार केल्‍या जातात. तक्रारकर्त्‍याने इंटरनेट बँकींग सुविधा घेतलेली आहे.

     तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, त्‍याने दिनांक-21.05.2015 रोजी विरुध्‍दपक्ष क्रं-1) बँक शाखेत स्‍थानिक ग्राहक सुविधा केंद्रामधून रुपये-10,000/- जमा केले असता Intercity Charges म्‍हणून रुपये-100/- ची कपात करण्‍यात आली, त्‍याने बँकेच्‍या स्‍थानिक ग्राहक सुविधा केंद्रा मध्‍ये या बाबत विचारणा केली असता असे सांगण्‍यात आले की, तक्रारकर्त्‍याचे बँक खाते विरुध्‍दपक्ष क्रं-1) जवाहर नगर, भंडारा येथील बँकेच्‍या शाखे ऐवजी, विरुध्‍दपक्ष क्रं-2) धरमपेठ, नागपूर येथील बँकेच्‍या शाखेचे अकाऊंट संगणकावर दिसत असल्‍याने सदर रक्‍कम रुपये-100/- ची कपात झालेली असावी. तक्रारकर्त्‍याने या बाबत विरुध्‍दपक्ष क्रं-1) जवाहर नगर बँकेच्‍या शाखेत दिनांक-22.05.2015 रोजी ऑन लाईन तक्रार नोंदविली असता सदर इंटरसिटी शुल्‍क अटी व शर्ती नुसार योग्‍य प्रकारे वसुल करण्‍यात आले असे उत्‍तर पाठविले. दिनांक-22.07.2015 रोजी तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं-1) जवाहर नगर भंडारा येथील बँकेच्‍या शाखेतील कर्मचारी श्री चौरेसिया यांचेशी संपर्क साधला असता त्‍यांनी योग्‍य माहिती दिली नाही व विरुध्‍दपक्ष क्रं-2) धरमपेठ शाखा नागपूर येथील बँकेत संपर्क साधावा असे सुचित केले किंवा एक खाते बंद करण्‍याचा सल्‍ला दिला. दिनांक-05/06/2015 रोजी तक्रारकर्त्‍याने विरुध्‍पक्ष क्रं-2) धरमपेठ शाखा नागपूर बँकेतील कर्मचा-याशी सपंर्क साधून माहिती दिली व लेखी तक्रार दिली. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने पुन्‍हा दिनांक-25.07.2015 रोजी विरुध्‍दपक्ष क्रं-1) जवाहर नगर भंडारा बँकेत स्‍थानिक ग्राहक सुविधा  केंद्रातुन रुपये-3000/- जमा केले असता Intercity Charges म्‍हणून रुपये-60/- ची कपात करण्‍यात आली, यावरुन तक्रारकर्त्‍याचे तक्रारीची योग्‍य दखल घेण्‍यात आली नसल्‍याचे स्‍पष्‍ट होते. तक्रारकर्त्‍याने दिनांक-28.07.2015 रोजी त्‍याचे दोन्‍ही बँकेतील खात्‍या वरील 06 महिन्‍याचे व्‍यवहाराचे उतारे संगणकावरुन घेतले असता दोन्‍ही बचतखात्‍या वरील पत्‍ता विरुध्‍दपक्ष क्रं-2) बँकेचा दाखविण्‍यात येत होता, यावरुन असा निष्‍कर्ष निघतो की, विरुध्‍दपक्ष क्रं-1) बँकेच्‍या शाखेतील खाते हे विरुध्‍दपक्ष क्रं-2) बँकेच्‍या शाखेशी जोडल्‍या गेलेले आहे वा एकमेकाशी संलग्‍न (Interlinked झालेले आहे. विरुध्‍दपक्ष क्रं-1) व क्रं-2) बँकेच्‍या शाखां तर्फे तांत्रिक अडचणीवर कोणताही पर्याय शोधण्‍यात आलेला नाही. दोन्‍ही ठिकाणच्‍या बँकेतील बचतखाते हे एकमेकांशी संलग्‍न झाल्‍या बद्दल तक्रारकर्त्‍याने ज्‍या तक्रारी केल्‍यात त्‍या संबधी विरुध्‍दपक्ष क्रं-1) ते 3) तर्फे कोणतेही उत्‍तर देण्‍यात आले नाही. अशाप्रकारे विरुध्‍दपक्षांचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्‍याला शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. शेवटी तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षांना दिनांक-28.07.2015 रोजी कायदेशीर नोटीस पाठवून त्‍याव्‍दारे नुकसान भरपाईची मागणी करुन 24 तासाचे आत त्‍याची तक्रार निकाली काढण्‍यास सुचित केले, सदर नोटीस विरुध्‍दपक्षांना प्राप्‍त झाल्‍याची पोच मिळूनही त्‍याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. विरुध्‍दपक्ष क्रं-2) धरमपेठ बँकेच्‍या शाखाधिका-यांनी दिनांक-05.08.2015 रोजी तक्रारकर्त्‍याचे भ्रमणध्‍वनीवर संपर्क साधून त्‍याची तक्रार लवकरात लवकर निकाली काढण्‍याचे आश्‍वासन दिले व दिनांक-06.08.2015 रोजी लेखी उत्‍तर दिले.  परंतु तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीचे निराकरण करण्‍यात आले नाही. अशाप्रकारे विरुध्‍दपक्ष बँकेतील कार्यरत कर्मचा-यांना तांत्रिक ज्ञान नसून त्‍याचे बँकेतील खात्‍यातून विनाकारण कमीशन कपात करुन विरुध्‍दपक्ष बँकेनी अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे. म्‍हणून तक्रारकतर्याने विरुध्‍दपक्षां विरुध्‍द प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन त्‍याव्‍दारे खालील प्रमाणे मागण्‍या केल्‍यात.

      तक्रारकर्त्‍याचे विरुध्‍दपक्ष क्रं-1) कडील बँक खात्‍यामधून दिनांक-21.05.2015 रोजी कपात केलेले शुल्‍क रुपये-100/- आणि दिनांक-27.05.2015 रोजी कपात केलेले शुल्‍क रुपये-60/-  व्‍याजासह परत करण्‍याचे विरुध्‍दपक्षांना आदेशित व्‍हावे. विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 बँकेच्‍या कार्यालयात अनेक वेळा तक्रारकर्त्‍याला भेटी द्दाव्‍या लागल्‍यामुळे त्‍यापोटी रुपये-5000/- कायदेशीर नोटीस बाबत रुपये-5000/- तक्रारखर्च म्‍हणून रुपये-10,000/-, शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-50,000/- असे मिळून एकूण रुपये-70,160/- नुकसान भरपाई तक्रार दाखल दिनांका पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो वार्षिक-24% व्‍याज दराने मिळावे. विरुध्‍दपक्ष क्रं-3) बँके तर्फे, विरुध्‍दपक्ष क्रं-1) व क्रं-2) बँकेवर नियंत्रण ठेवण्‍याचे आदेशित होऊन तक्रारकर्त्‍याचे दोन्‍ही बचतखाते हे स्‍वतंत्र राहतील याकडे लक्ष देऊन स्‍थानिक बँकेच्‍या ग्राहक सुविधा केंद्रा मधून होणा-या व्‍यवहारावर विरुध्‍दपक्ष क्रं 1) व क्रं-2) बँके तर्फे कमीशन आकारल्‍या जाणार नाही याची दक्षता घ्‍यावी. तसेच तक्रारीचा खर्च मिळावा.

  

03.   स्‍टेट बँक ऑफ इंडीया तर्फे विरुध्‍दपक्ष क्रं-1) ते 3) यांनी एकत्रित लेखी उत्‍तर पान क्रं-56 ते 60 वर अभिलेखावर दाखल करण्‍यात आले.  विरुध्‍दपक्षाने विरुध्‍दपक्ष क्रं-1) जवाहर नगर, भंडारा येथील बँक ही स्‍थानिक बँकेच्‍या ग्राहक सुविधा केंद्राशी संगणकाव्‍दारे जोडल्‍या गेल्‍याची बाब मान्‍य केली, मात्र तक्रारकर्त्‍याचे  विरुध्‍दपक्ष क्रं-1) कडील बँकेतील खात्‍या मधून विरुध्‍दपक्ष क्रं-1) बँकेच्‍या स्‍थानिक ग्राहक सुविधा बँक केंद्रा मधून दिनांक-21.05.2015 रोजी  केलेल्‍या व्‍यवहारा बाबत रुपये-100/-कमीशन (Intercity Charges)  व दिनांक-25.07.2015 रोजी विरुध्‍दपक्ष क्रं-1) जवाहर नगर भंडारा बँकेच्‍या स्‍थानिक ग्राहक सुविधा  केंद्रात रुपये-3000/- जमा केले असता Intercity Charges म्‍हणून रुपये-60/- ची कपात करण्‍यात आल्‍याची बाब  नामंजूर केली. तक्रारकर्त्‍याचे विरुध्‍दपक्ष क्रं-1) बॅकेतील खाते हे विरुध्‍दपक्ष क्रं-2) बँकेतील शाखेशी संलग्‍न झाले असल्‍याची बाब सुध्‍दा नामंजूर केली. विरुध्‍दपक्ष क्रं-1) ते 3) यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीतील ईतर परिच्‍छेदनिहाय कथन अमान्‍य केले आहे.

      विरुध्‍दपक्षानीं पुढे असे नमुद केले की, तक्रारकर्त्‍याचे विरुध्‍दपक्ष क्रं-1) जवाहर नगर भंडारा येथील शाखेत खाते असून त्‍याचा क्रमांक-11517245423 असा आहे  तर विरुध्‍दपक्ष क्रं-2) धरमपेठ, नागपूर येथील बँकेतील खाते क्रं-10984089780 असून दोन्‍ही खाते हे स्‍वतंत्ररित्‍या दोन्‍ही विरुध्‍दपक्ष बँके कडून हाताळण्‍यात येतात. स्‍टेट बँक ऑफ इंडीयाचे ग्राहकांसाठी जारी केलेल्‍या मार्गदर्शक सुचनां नुसार ज्‍या ग्राहकाचे बचत खाते स्‍टेट बँकेत असेल परंतु तो ग्राहक बँकेच्‍या स्‍थानिक ग्राहक सुविधा केंद्रा मधून बँकींग व्‍यवहार करुन सुविधा घेत असेल तर त्‍याला बँकेच्‍या स्‍थानिक सुविधा केंद्रास सेवाशुल्‍क द्दावे लागते. रिझर्व्‍ह बँकेच्‍या मागदर्शक सुचनां नुसार एखादा ग्राहकाचे अनेक खाते एका बँकेत असेल तरी त्‍याचा CIF Code हा एकसारखाच राहिल, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे जरी दोन बँकेच्‍या शाखेत दोन वेगवेगळे बचतखाते असले तरी रिझर्व्‍ह बँकेच्‍या मार्गदर्शक सुचने नुसार तक्रारकर्त्‍याचा CIF Number एकच राहिल. बँक कधीही दोन वेगवेगळे खाते एकमेकांशी संलग्‍न (Interlinked) करीत नाही. तक्रारकर्त्‍या कडून कपात केलेले रुपये-100/ आणि रुपये-60/- हे  बँकेच्‍या स्‍थानिक ग्राहक सुविधा केंद्रा मधून व्‍यवहार केल्‍या बाबत आकारलेले सेवा शुल्‍क (Service Charges) आहे, बँक सदर व्‍यवहारा बाबत कोणतीही रक्‍कम घेत नाही. बँकेच्‍या स्‍थानिक ग्राहक सुविधा केंद्रा तर्फे कपात करण्‍यात आलेले शुल्‍क हे Intercity Charges नसून ते बँकेच्‍या स्‍थानिक ग्राहक सुविधा केंद्रातून व्‍यवहारा संबधी सुविधा घेतल्‍याने आकारण्‍यात आलेले सेवाशुल्‍क (Service Charges) आहे. बँकेच्‍या स्‍थानिक ग्राहक सुविधा केंद्रा तर्फे कपात करण्‍यात आलेले  सेवाशुल्‍क हे बँकेच्‍या नियमा नुसार योग्‍य असल्‍याचे विरुध्‍दपक्षाने नमुद केले. तक्रारकर्ता बँकेच्‍या स्‍थानिक ग्राहक सुविधा केंद्रावरुन बँकींग व्‍यवहाराची सुविधा घेत असलयाने त्‍याला सेवाशुल्‍क हे द्दावेच लागेल. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष बँके विरुध्‍द दुषित हेतूने आणि बँकेची प्रतिमा मलीन करण्‍याचे दृष्‍टीने ही तक्रार दाखल केली असल्‍याने ती खर्चासह खारीज करण्‍याची विनंती विरुध्‍दपक्ष बँक क्रं-1) ते 3) तर्फे करण्‍यात आली.     

 

04.   तक्रारकर्त्‍याने पान क्रं-18 व 19 वरील दस्‍तऐवज यादी नुसार एकूण 18  दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍या आहेत, ज्‍यामध्‍ये विरुध्‍दपक्ष क्रं-1) बँकेच्‍या स्‍थानिक ग्राहक सुविधा केंद्रातून दिनांक-21.05.2015 रोजी कपात केलेले शुल्‍क रुपये-100/- आणि दिनांक-25.07.2015 रोजी कपात केलेले शुल्‍क रुपये-60/- च्‍या पावत्‍यांच्‍या प्रती, विरुध्‍दपक्ष क्रं-1) बँकेच्‍या स्‍थानिक ग्राहक सुविधा केंद्रातील  दिनांक-31.07.2015 रोजीचा Screen Shot ज्‍यामध्‍ये विरुध्‍दपक्ष क्रं 2) नागपूर बँकेचा पत्‍ता दिसत आहे,  विरुध्‍दपक्ष क्रं-1) जवाहर नगर, भंडारा येथील बँकेच्‍या शाखेत अन्‍य ग्राहक श्रीमती सुचिता गुप्‍ता  यांचे खाते असताना त्‍यांनी बँकेच्‍या स्‍थानिक सुविधा केंद्रातून दिनांक-21.05.2015 रोजी व्‍यवहार केला असताना त्‍यांचे खात्‍यातून कोणतेही शुल्‍क कपात केले नसल्‍या बाबतचा दस्‍तऐवज,  तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष बँकेत केलेली ऑन लाईन तक्रार, दिनांक-23.05.2015 रोजी विरुध्‍दपक्ष बँके तर्फे तक्रारकतर्याचे ऑन लाईन तक्रारीला दिलेले उत्‍तर, तक्रारकर्त्‍याने वि.प.बँकेत दिनांक-05.06.2015 रोजी केलेली तक्रार,  विरुध्‍दपक्ष क्रं-1) बँकेच्‍या स्‍थानिक सुविधा केंद्रातील व्‍यवहाराचा दिनांक-25.07.2015 रोजीचा दस्‍तऐवज, विरुध्‍दपक्ष क्रं-1) बँकेशी संलग्‍न असलेल्‍या स्‍थानिक सुविधा केंद्राची यादी, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षांना पाठविलेल्‍या दिनांक-28.07.2015 रोजीच्‍या कायदेशीर नोटीसची प्रत व रजिस्‍टर पोस्‍टाच्‍या पावत्‍यांच्‍या प्रती,  विरुध्‍दपक्ष क्रं-2) बँकेने तसेच स्‍थानिक सुविधा केंद्रा तर्फे नोटीसला दिलेली उत्‍तरे,  तक्रारकर्त्‍याचा विरुध्‍दपक्ष क्रं-1) जवाहर नगर भंडारा येथील बँकेचा खाते उतारा,  तक्रारकर्त्‍याचा विरुध्‍दपक्ष क्रं-2) बँकेतील खात्‍याचा उतारा अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रतींचा समावेश आहे. तक्रारकर्त्‍याने पान क्रं-62 ते 65 वर प्रतीउत्‍तर दाखल केले.

 

05.   स्‍टेट बँक ऑफ इंउीया तर्फे विरुध्‍दपक्ष क्रं 1 ते 3 यांनी कोणतेही दस्‍तऐवज दाखल केले नाहीत. विरुध्‍दपक्षां तर्फे पान क्रं 66 वर पुरसिस दाखल करुन त्‍यांचे लेखी उत्‍तर हेच त्‍यांचे पुराव्‍याचे शपथपत्र समजण्‍यात यावे असे नमुद केले.

 

06.   तक्रारकर्त्‍याची  तक्रार, स्‍टेट बँक ऑफ इंडीया तर्फे  विरुध्‍दपक्ष क्रं-1) ते 3) यांचे लेखी उत्‍तर, दाखल दस्‍तऐवज यांचे मंचा तर्फे काळजीपूर्वक अवलोकन करण्‍यात आले. तसेच तक्रारकर्त्‍याचा व विरुध्‍दपक्षांचे वकील श्री आर.के.सक्‍सेना यांचा मौखीक युक्‍तीवाद यावरुन मंचाचा निष्‍कर्ष पुढील प्रमाणे-

                                                                          :: निष्‍कर्ष   ::

07.    तक्रारकर्त्‍याचे विरुध्‍दपक्ष क्रं-1) बँकेत खाते क्रमांक- 11517245423 तर विरुध्‍दपक्ष क्रं-2) बँकेत खाते क्रं-10984089780 आहेत हे वादातीत नाही, त्‍यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्‍दपक्ष क्रं-1) ते क्रं-3) यांचा ग्राहक ठरतो. तसेच विरुध्‍दपक्ष क्रं-1) ने त्‍यांची शाखा ही स्‍थानिक ग्राहक सुविधा केंद्राशी जोडली आहे हे देखील वादातीत नाही.

 

08.  विरुध्‍दपक्ष क्रं-1) ते 3) चे वकीलांनी त्‍यांचे मौखीक युक्‍तीवादाचे दरम्‍यान तक्रारकर्त्‍याने वादातीत बँक व्‍यवहार हे स्‍थानिक ग्राहक सुविधा केंद्रातून केले असल्‍यामुळे सदर स्‍थानिक ग्राहक सुविधा केंद्र प्रकरणात आवश्‍यक पक्ष आहेत परंतु तक्रारकर्त्‍याने सदर आवश्‍यक पक्षास प्रकरणात सामिल न केल्‍यामुळे  प्रकरण खारीज करण्‍यात यावे असा आक्षेप घेतला.

    अभिलेखाचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, विरुध्‍दपक्ष क्रं-1) बॅकेनी त्‍यांची शाखा स्‍थानिक स्‍टेट बँक ग्राहक सुविधा केंद्रास संलग्‍न/जोडली केली आहे. सदर स्‍थानिक सुविधा केंद्र हे विरुध्‍दपक्ष स्‍टेट बँकेची लघु शाखा असून तिची विरुध्‍दपक्ष क्रं-1) ही मुख्‍य शाखा (Home Branch) आहे, त्‍यामुळे सदर स्‍थानिक सुविधा केंद्रा मार्फत विरुध्‍दपक्ष बँकेचे मर्यादित व्‍यवहार केल्‍या जातात. म्‍हणजेच स्‍थनिक सुविधा केंद्र हे स्‍वतंत्र नसून विरुध्‍दपक्ष बँकेची लघु शाखा आहे, त्‍यामुळे तेथून होणारे सर्व व्‍यवहार हे मुख्‍य शाखेतून Computer Software व्‍दारे करण्‍यात येतात, म्‍हणून बँकेचे स्‍थानिक ग्राहक सुविधा केंद्र हे  आवश्‍यक पक्ष नाही त्‍यामुळे  विरुध्‍दपक्षाने घेतलेल्‍या सदरचे आक्षेपात  मंचास कोणतेही तथ्‍य दिसून येत नाही.

 

09.   अभिलेखावर तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन केले असता, तक्रारकर्त्‍याने दिनांक-21.05.2015 व दिनांक-25.07.2015 रोजी विरुध्‍दपक्ष क्रं-1) शाखेत स्‍थानिक सुविधा केंद्रातून अनुक्रमे रुपये-10,000/- व रुपये-3000/- जमा केले असता  रुपये-100/- व रुपये-60/- असे शुल्‍क कपात करण्‍यात आल्‍याचे स्‍पष्‍ट होते. तक्रारकर्त्‍याने  त्‍या बाबत अभिलेखावरील पृष्‍ठ क्रं-25 व 26 वर विरुध्‍दपक्ष क्रं-1) ने त्‍याच्‍या ऑन लाईन तक्रारीस दिलेल्‍या उत्‍तराच्‍या प्रती दाखल केल्‍या आहेत, त्‍यामध्‍ये विरुध्‍दपक्ष बँकेनी रुपये-100/- हे आंतरशहरीय शुल्‍क (Intercity charges) असून ते योग्‍य प्रकारे घेण्‍यात आल्‍याचे नमुद केले आहे परंतु विरुध्‍दपक्ष बँकेनी त्‍यांचे लेखी उत्‍तरात तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यातून सदर कपात करण्‍यात आलेली रक्‍कम रुपये-100/- व रुपये-60/- ही Intercity charges नसून सेवाशुल्‍क (Service charges) आहे असे नमुद केले आहे.  बँकेच्‍या अधिवक्‍त्‍यांनी असाही युक्‍तीवाद केला की, सदर कपात करण्‍यात आलेली रक्‍कम ही बँकेनी घेतली नसून ती स्‍थानिक ग्राहक सुविधा केंद्रास प्राप्‍त झाली आहे. असे जरी असले तरी अभिलेखावरुन ही बाब स्‍पष्‍ट होते की, सदर शुल्‍क हे तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यातून कपात करण्‍यात आलेले आहे, सदर शुल्‍क ज्‍या व्‍यवहारा बाबत कपात करण्‍यात आले तो व्‍यवहार तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं-1) बँकेच्‍या शाखेत केला आहे, हे अभिलेखावरील पृष्‍ठ क्रं-20,21 आणि क्रं-24 वरुन स्‍पष्‍ट होते. पृष्‍ठ  क्रं-21 वरील कागदपत्राचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, तक्रारकर्त्‍याने त्‍याचे विरुध्‍दपक्ष क्रं-1) बँकेतील खाते क्रं-11517245423 नुसार व्‍यवहार केला असता त्‍याचा पत्‍ता हा नागपूर येथील Branch Code-04872 असा दर्शविण्‍यात येतो, जेंव्‍हा की, तक्रारकर्त्‍याच्‍या जवाहरनगर येथील पत्‍ता व विरुध्‍दपक्ष क्रं-1) बँक शाखेचे Branch Code  हे Screen वर दर्शविणे आवश्‍यक होते. तक्रारकर्त्‍याने अभिलेखावरील पृष्‍ठ क्रं-22 व 23 वर विरुध्‍दपक्ष क्रं-1) बँकेच्‍या शाखेत  त्‍याची पत्‍नी सौ.सुचिता गुप्‍ता यांच्‍या खात्‍यातील व्‍यवहारा बाबत कागदपत्र दाखल केले, त्‍यामध्‍ये तक्रारकर्त्‍याच्‍या पत्‍नीचा भंडारा येथील अचूक पत्‍ता दर्शविण्‍यात आला असून बँकेचा कोड-02158 असा दिसून येतो. तसचे तक्रारकर्त्‍याच्‍या पत्‍नीच्‍या व्‍यवहारा दरम्‍यान बँकेचा अचुक पत्‍ता असल्‍यामुळे कुठलेही शुल्‍क कपात करण्‍यात आलेले नाही असे दिसते. तक्रारकर्त्‍याने याच अनुषंगाने इतर स्‍थानिक ग्राहकां कडूनही त्‍यांनी स्‍थानिक  सुविधा केंद्रातून केलेल्‍या व्‍यवहारां बाबत कुठलेही शुल्‍क कपात केले नसल्‍या बाबतचा दस्‍तऐवज पृष्‍ठ क्रं-30 व 31 अनुसार दाखल केले आहेत. तक्रारकर्त्‍याने अभिलेखाचे पृष्‍ठ क्रं-42 प 48 वर अनुक्रमे त्‍याचे विरुध्‍दपक्ष क्रं-1) जवाहर नगर, भंडारा तसेच विरुध्‍दपक्ष क्रं-2) धरमपेठ नागपूर येथील दोन्‍ही शाखेत असलेल्‍या वेगवेगळया खात्‍याचे खाते उतारे (On line Banking Account Statements) दाखल केलेत, सदर दोन्‍ही खाते हे जरी वेगवेगळया ठिकाणचे असले तरी दोन्‍ही खात्‍यातील उता-यांवर तक्रारकर्त्‍याचा नागपूर येथील पत्‍ता नमूद करण्‍यात आल्‍याचे दिसून येते. वरील सर्व कागदपत्रांचे सुक्ष्‍म निरिक्षण केले असता असे दिसून येते की, विरुध्‍दपक्ष बँकेनी तक्रारकर्त्‍याच्‍या विरुध्‍दपक्ष क्रं-1) कडील खात्‍यावर त्‍याचा पत्‍ता जवाहर नगर येथील टाकण्‍या ऐवजी नागपूर धरमपेठ शाखोतील खात्‍यावर नमुद असलेलाच पत्‍ता नमुद केला आहे. विरुध्‍दपक्ष बँकेनी त्‍यांचे संगणकीय प्रणाली मध्‍ये (Software System) वरील प्रमाणे चुकीची नोंद केल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं-1) जवाहर नगर, भंडारा येथील बँकेच्‍या शाखेतून व्‍यवहार केल्‍या वरही नागपूर येथील पत्‍ता दर्शविण्‍यात  येत होता व त्‍यानुसार शुल्‍क कपात करण्‍यात येते. विरुध्‍दपक्ष बँकेनी कार्यान्वित केलेली संगणकीय प्रणाली (Software System) ही जरी खाजगी कंपनी हाताळत असली तरी त्‍यावर विरुध्‍दपक्ष बँकेचे नियंत्रण आहे कारण सदर खाजगी कंपनी  ही बँके करीता कार्य करते.

 

10.   तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं-1) ते 3) यांचेकडे वारंवार तक्रारी करुनही विरुध्‍दपक्ष बँकेनी त्‍याच्‍या तक्रारींचे योग्‍य निरसन केले नसल्‍याचे अभिलेखावरुन दिसून येते. उपरोक्‍त विवेचना वरुन हे स्‍पष्‍ट होते की, तक्रारकर्त्‍याने त्‍याचे विरुध्‍दपक्ष क्रं-1) जवाहर नगर, भंडारा येथील बँकेच्‍या शाखेतील असलेल्‍या खात्यामध्‍ये बँकेच्‍या स्‍थानिक ग्राहक सुविधा केंद्राचे मार्फतीने व्‍यवहार केल्‍यावर त्‍याचे कडून अयोग्‍य पध्‍दतीने शुल्‍क कपात केले आहे व सेवेत त्रृटीपूर्ण व्‍यवहार केला आहे. विरुध्‍दपक्ष बँकेची सेवेतील त्रृटी सिध्‍द होत असल्‍यामुळे  तक्रारकर्ता हा त्‍याचे खात्‍यातून कपात झालेली रक्‍कम अनुक्रमे रुपये-100/- व रुपये-60/- कपात करण्‍यात आलेल्‍या दिनांका पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो बँकेच्‍या बचत खात्‍यातील प्रचलीत असलेल्‍या व्‍याज दरा नुसार व्‍याजासह परत मिळण्‍यास पात्र आहे या निष्‍कर्षाप्रत मंच येते.  त्‍याच प्रमाणे विरुध्‍दपक्ष बँकेच्‍या सेवेतील त्रृटीमुळे तक्रारकर्त्‍याला सदरची तक्रार मंचात दाखल करावी लागली व निश्‍चीतच शारिरीक व मानसिक त्रास झाला आहे. तक्रारकर्त्‍याने तक्रारीत त्‍या बाबत केलेली मागणी ही अवास्‍तव आहे तरी शारिरीक व मानसिक त्रासा करीता रुपये-1000/- व तक्रारीचा खर्च रुपये-500/- मिळण्‍यास तो पात्र आहे, असे मंचाचे मत आहे.      

11.       वरील सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन, मंच तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-

                                            :: आदेश ::

1)     तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2)    विरुध्‍दपक्ष क्रं-1) ते क्रं-3) यांना आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याचे  बँकेच्‍या खात्‍यातून कपात केलेली रक्‍कम अनुक्रमे रुपये-100/- व रुपये-60/- कपात करण्‍यात आल्‍याच्‍या दिनांका पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो बँकेच्‍या बचतखात्‍यातील प्रचलीत असलेल्‍या व्‍याज दरा नुसार व्‍याजासह तक्रारकर्त्‍याला परत करावी.

3)   विरुध्‍दपक्ष क्रं-1) ते 3) यांनी तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या  शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-1000/- (अक्षरी रुपये एक हजार फक्‍त)तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये-500/-(अक्षरी रुपये पाचशे फक्‍त द्दावेत‍.

4)   सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं-1) ते 3) यांनी  वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या निकालपत्राची प्रत प्राप्‍त झाल्‍या पासून 30 दिवसांचे आत करावे.

5)   निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन देण्‍यात याव्‍यात.

6)    तक्रारकर्त्‍याला फाईल्‍स परत करण्‍यात याव्‍यात.

 

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
[HON'BLE MS. SMITA N. CHANDEKAR]
MEMBER
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.