निकालपत्र (दि.30.04.2015) व्दाराः- मा. सदस्या - सौ. रुपाली डी. घाटगे
1 प्रस्तुतची तक्रार तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-12 प्रमाणे सामनेवाले यांनी तक्रारदारांना दयावयाच्या सेवेत त्रुटी ठेवल्यामुळे नुकसानभरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे.
2 प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाले यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाले यांना नोटीस लागू झाली. सामनेवाले हे उपस्थित राहून त्यांनी त्यांचे म्हणणे दाखल केले. तक्रारदार तर्फे वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकला. सबब, या कामी गुणदोषावर खालीलप्रमाणे निकाल पारीत करण्यात येतो.
3 तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की,
तक्रारदार हे बारवे, ता.भुदरगड येथील रहिवासी असून तेथे ते शेती व शेती पुरक जोडधंदा म्हणून ट्रॅक्टरचा व्यवसाय करतात. सामनेवाले बँकेकडून शिवाजी कृष्णा सुतार यांनी ट्रॅक्टर व्यवसायाकरीता ट्रॅक्टर व ट्रॉली खरेदीकरीता कर्ज रक्कम रु.5,50,000/- घेतले व सदर कर्जाची परतफेड न झालेने सामनेवाले यांनी ट्रॅक्टर क्र.एम.एच.-09-ए.एल.-7639 तसेच ट्रॉली क्र.एम.एच.-09-ए.एल.-1907 ही तारण असल्यामुळे थकीत कर्जदाराकडून कर्ज वसुलीकरीता जप्त करुन शाखेसमोर ठेवली व सदरचे थकीत कर्ज रक्कम न भरलेने सदरचे वाहन जाहीर लिलावाने विक्री करण्याचे आहे म्हणून जाहीर नोटीस प्रसिध्द केली. सदरची नोटीस तक्रारदारांनी वाचून सामनेवाले यांचे नियमास अधीन राहून जाहीर लिलाव बोली रक्कम रु.3,16,00/-निश्चित करुन व सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन तक्रारदारांनी सदरची रक्कम दि.13.08.2011 रोजी सामनेवाले शाखेकडे अदा केली. सदरची रक्कम भरल्यानंतर सामनेवाले यांनी सदर वाहन ताबडतोब तक्रारदारांचे नांवे आर.सी.टी.सी.बुकास नोंद करुन देण्याचे ठरले होते. परंतु दि.04.08.2012 रोजी पर्यंत तक्रारदारांचे नांव नोंद करुन दिले नाही. त्या कारणाने सदरचे वाहन तक्रारदारास आपल्या दारात उभा करावे लागले. तसेच तक्रारदारांचे दररोजचे रु.700/- व दरमहा ड्रायव्हर पगार रु.7,000/- चे नुकसान होऊ लागले. सदरच्या नुकसानीस सामनेवाले जबाबदार आहेत. त्याकारणाने तक्रारदारांनी सामनेवाले यांचे चुकीमुळे तक्रारदारांचे वार्षिक नुकसान रक्कम रु.3,48,500/- इतके झाले असलेने सदर नुकसानभरपाईपोटी तक्रार या मंचात दाखल केलेली आहे. सबब, सामनेवाले यांचेकडून तक्रारदारांना नुकसानभरपाईपोटी रक्कम रु.3,48,500/- इतकी मिळावी व तसेच सदरची रक्कम सामनेवाले यांनी परतफेड करीत नाहीत तोपर्यंत सामनेवाले बँकेच्या कर्ज व्याजदराप्रमाणे रक्कम वसुली होवोपर्यंत सामनेवाले यांचेकडून व्याज मिळावे अशी मागणी केलेली आहे.
4 तक्रारदाराने तक्रार अर्जासोबत एकूण 5 कागदपत्रे दाखल केलेली असून सामनेवाले यांचे सर्टिफिकेट ऑफ सेलने सदरचे वाहन तक्रारदारांना विक्री केलेबाबतचे पत्र, तक्रारदारांनी सामनेवाले यांना वकीलामार्फत पाठविलेली नोटीस व सदर नोटीसीची पोहचपावती, सामनेवाले यांनी आर.टी.ओ.ऑफीस, कोल्हापूर यांना सदरचे वाहन तक्रारदारांना ट्रान्सफर करुन दिलेचे पत्र, तक्रारदार व ट्रॅक्टर वरील ड्रायव्हर यांचेमधील पावती करारपत्र, तक्रारदारांचे दि.31.07.2014 रोजीचे पुराव्याचे शपथपत्र, इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहे.
5 सामनेवाले यांनी तक्रारदारांच्या तक्रारीस दि.21.04.2014 रोजी म्हणणे दाखल केलेले असून तक्रारदारांची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. तक्रारदारांच्या तक्रारीतील कलम-3 ते 6 मधील संपूर्ण मजकूर खोटा व चुकीचा असून त्यातील सर्व कथनांचा स्पष्टपणे इन्कार केलेला आहे. तक्रारदारांनी सदर लिलावात भाग घेऊन ट्रॅक्टर क्र.एम.एच.-09-ए.एल.-7639 तसेच ट्रॉली क्र.एम.एच.-09-ए.एल.-1907 लिलावप्रक्रियेव्दारे खरेदी केलेला आहे. सदरचे वाहन लिलावात घेतलेनंतर तक्रारदारांनी सामनेवाले बँकेकडे पैसे भरुन सदर वाहनाचा कब्जा घेऊन त्याचा वापर केलेला आहे. सदरचे वाहन स्वत:चे नावे करुन घेण्याची जबाबदारी तक्रारदारांची होती. सदरचे वाहन तक्रारदारांचे नांवावर होणेकरीता सामनेवाले बँकेने आर.टी.ओ. ऑफीस यांना पत्र व्यवहार करुन लेखी स्वरुपात कळविलेले होते. आर.टी.ओ. ऑफीस यांचेकडून नांव बदल करण्याचे प्रक्रियेमध्ये विलंब झाला. त्यात सामनेवाले बँकेचा काहीही संबंध नव्हता. तक्रारदार हा सामनेवाले बँकेचा ग्राहक नव्हता व नाही. सदरच्या वाहनाचा कब्जा मिळाल्यानंतर त्याचा वापर स्वत:चे व्यवसायासाठी व व्यापारासाठी केलेला असून त्यातून आर्थिक उत्पन्न मिळविले होते व आहे. त्या कारणाने सदर वाहनाचा ड्रायव्हर कधीही बसून नव्हता. त्यामुळे कोणतेही आर्थिक नुकसान झालेले नाही. तक्रारदारांनी ते बँकेचे ग्राहक होतात, या व्याख्येमध्ये बसत नसताना सुध्दा खोटी तक्रार करुन बेकायदेशीर नुकसान भरपाईची रक्कम मागणी केलेली आहे. त्याकारणाने तक्रारदारांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात यावा.
6 तक्रारदारांचा तक्रार अर्ज व सामनेवाले यांचे लेखी म्हणणे, दाखल केलेली अनुषांगिक कागदपत्रे, तक्रारदारांचे पुराव्याचे शपथपत्र यांचा विचार करता, प्रस्तुत कामी सामनेवाले बॅंकेकडून शिवाजी कृष्णा सुतार यांनी ट्रॅक्टर व्यवसायाकरीता ट्रॅक्टर व ट्रॉली खरेदी करता कर्ज रक्कम रु.5,50,000/- घेतले. सदरचे कर्जाची परतफेड शिवाजी सुतार यांचेकडून न झालेने सामनेवाले यांनी ट्रॅक्टर क्र.एम.एच.-09-ए.एल.-7639 तसेच ट्रॉली क्र.एम.एच.-09-ए.एल.-1907 ही तारण असल्यामुळे थकीत कर्जदाराकडून कर्ज वसुलीकरीता सदरचे वाहन जप्त केले. सदरचे वाहनाचे थकीत कर्ज रक्कम सुतार यांनी न भरलेने सदरचे वाहन जाहीर लिलावात बोली रक्कम रु.3,16,000/- इतक्या किंमतीस तक्रारदारांनी सर्व त्या कागदपत्रांची पुर्तता करुन विकत घेतले. तथापि सामनेवाले यांनी दि.04.08.2012 रोजी पर्यंत सदरचे लिलावात विकलेल्या वाहनाची नोंद तक्रारदारांचे नांवे न केलेने तक्रारदारास सदरचे वाहनाकडून कोणतेही काम करता आले नाही. त्याकारणाने, सदर नुकसानभरपाईपोटी तक्रारदारांने सदरची तक्रार दाखल केलेली आहे. सामनेवाले यांनी त्यांचे म्हणणेमध्ये सदरचे लिलावातील वाहनाचा कब्जा तक्रारदाराने घेतलेला होता. त्याकारणाने स्वत:चे वाहन नावावर करुन घेणेची जबाबदारी तक्रारदारांची आहे. सदरचे वाहन लिलावात घेतलेनंतर तक्रारदारांनी सामनेवाले बँकेकडे पैसे भरुन सदर वाहनाचा कब्जा घेऊन त्याचा वापर केलेला आहे. सदरचे वाहन स्वत:चे नावे करुन घेण्याची जबाबदारी तक्रारदारांची होती. सदरचे वाहन तक्रारदारांचे नांवावर होणेकरीता सामनेवाले बँकेने आर.टी.ओ. ऑफीस यांना पत्र व्यवहार करुन लेखी स्वरुपात कळविलेले होते. आर.टी.ओ. ऑफीस यांचेकडून नांव बदल करण्याचे प्रक्रियेमध्ये विलंब झाला. त्यात सामनेवाले बँकेचा काहीही संबंध नव्हता. तक्रारदार हा सामनेवाले बँकेचा ग्राहक नव्हता व नाही. सदरच्या वाहनाचा कब्जा मिळाल्यानंतर त्याचा वापर स्वत:चे व्यवसायासाठी व व्यापारासाठी केलेला असून त्यातून आर्थिक उत्पन्न मिळविले होते व आहे. त्या कारणाने सदर वाहनाचा ड्रायव्हर कधीही बसून नव्हता. त्यामुळे कोणतेही आर्थिक नुकसान झालेले नाही. तक्रारदारांनी ते बँकेचे ग्राहक होतात, या व्याख्येमध्ये बसत नसताना सुध्दा खोटी तक्रार करुन बेकायदेशीर नुकसान भरपाईची रक्कम मागणी केलेली आहे असे म्हणणे सामनेवाले यांनी दाखल केलेले आहे. त्या अनुषंगाने, तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे, या मंचाने अवलोकन केले असता, अ.क्र.1 कडे सामनेवाले यांनी तक्रारदारांना सदरचे वाहन जाहीर लिलावापोटी विक्री केलेबाबतचे सेल सर्टिफिकेट असून सदरचे प्रमाणपत्राचे अवलोकन केले असता, the following movable property secured in favour of State Bank of India by Shivaji Krishna Sutar (Borrower) towards the finance facility Tractor and Trolley offered by State Bank of India असे नमुद असून त्यावर सामनेवाले यांच्या सहयां व शिक्का आहे. तसेच तक्रारदारांनी पुराव्याचे शपथपत्रामध्ये सदरचे वाहन सामनेवाले शाखेत नेमले तारीख लिलावाच्या नियमास अधिन राहून जाहीर लिलावाची बोली रक्कम रु.3,16,000/- अदा करुन विकत घेतलेचे मान्य केले आहे. तसेच सामनेवाले यांनी त्यांचे म्हणणेमध्ये सदरचे वाहन सामनेवाले यांनी लिलाव प्रक्रियेव्दारे विकलेली आहे असलेचे नमुद केले आहे. त्या अनुषंगाने, हे मंच प्रस्तुत न्यायनिवाडयाचा आधार घेत आहे.
I (2015) CPJ 117 (Chha)
Vijay Lal Mourya Versus Bank of Baroda
Auction-Complainant is auction purchaser and he purchased house in auction in outright sale-therefore, he is not consumer of the OP bank.-the dispute between the Complainant and the OP bank is not maintainable because the complainant is not consumer of the OP bank but actual fact is that authorized officer of the OP (1) by using power has invited auction of sale of mortgaged property.
7 वरील न्यायनिवाडयाचा आधार घेता, सदरचे वाहन तक्रारदारांनी लिलाव प्रक्रियेव्दारे खरेदी केल्याने तक्रारदार हे Auction Purchaser असलेने सामनेवाले बँकेचे ग्राहक होत नाहीत हे स्पष्ट होते. तसेच तक्रारदारांनी त्यांचे तक्रारीमध्ये व पुराव्याचे शपथपत्रामध्ये त्यांचा व्यवसाय शेती (ट्रॅक्टर व्यवसाय) नमुद असून शेतीस पुरक जोडधंदा म्हणून ट्रॅक्टर व्यवसाय करतो असे नमुद केलेले असून सदरचे वाहनावर दरमहा ड्रायव्हर पगार रक्कम रु.7,000/- असे कथन केलेले व त्या अनुषंगाने ड्रायव्हरसोबतचे पावती करारपत्र दाखल केलेले आहे. यावरुन तक्रारदारांनी सदरचे वाहन हे व्यापारी कारणाकरीता (Commercial Purpose) करीता खरेदी केले असलेचे स्पष्ट दिसुन येते. तसेच तक्रारदारांनी त्यांचे पुराव्याचे शपथपत्रामध्ये सदर वाहन त्यांनी स्वत:चे उपजिविकेसाठी खरेदी केलेचे नमुद केलेले नाही. त्या अनुषंगाने, हे मंच प्रस्तुत निवाडयाचे,
IV (2014) CPJ 348 (NC)
Bachan Narayan Singh Versus Eicher Plan and Marketing Head Quarter Eicher Motors Ltd. & ors.
Consumer- purchase of vehicle –commercial purpose- merely because it has been mentioned in complaint that his business closed- it can’t be inferred that he was earning his livelihood by means of self employment –complainant is not consumer.
Consumer Protection Act, 1986 –Definition of Consumer
Section-2-1(d) consumer means any person who-
(ii) [hires or avails of] any services for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment and includes any beneficiary of such services other than the person who [hires or avails of] the services for consideration paid or promised, or partly paid and partly promised, or under any system of deferred payments, when such services are availed of with the approval of the first mentioned person [but does not include a person who avails of such services for any commercial purpose];
8 ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदी तसेच ग्राहकाची व्याख्या व वरील कागदपत्रांचा / न्यायनिवाडयाचा या मंचाने बारकाईने अवलोकन केले असता, तक्रारदारांनी सदरचे वाहन हे सामनेवाले यांचेकडून लिलाव प्रक्रियेव्दारे ट्रॅक्टर व्यवसायचे कारणाकरीता विकत घेतलेचे स्पष्ट होते. त्याकारणाने, तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम-2-1(d) प्रमाणे सामनेवाले यांचे ग्राहक होत नाहीत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. वरील सर्व बाबींचा सखोलतेने विचार करता, प्रस्तुत तक्रारीतील तक्रारदार हे Auction Purchaser असलेने सामनेवाले यांचे कलम-2-1(d) प्रमाणे ग्राहक संज्ञेअंतर्गत ग्राहक होत नाहीत त्या कारणाने तक्रारदार हे तक्रार अर्जात नमुद केलेली नूकसानभरपाईची रक्कम मिळणेस पात्र नाहीत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. हे मंच या पुढे असेही स्पष्ट करते की, तक्रारदारानी त्यांचे इच्छेनुसार योग्य त्या न्यायालयात अथवा अॅथॅारिटीकडे प्रस्तुतचा अर्ज दाखल करावा. प्रस्तुत प्रकरणी व्यतित झालेला कालावधी हा मुदत माफीसाठी ग्राहय धरणेत यावा. सबब, तक्रारदारांची तक्रार काढून टाकणेत यावी या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
9 सबब, आदेश
आदेश
- तक्रारदारांची तक्रार काढून टाकणेत येते.
- खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
- आदेशाच्या प्रमाणीत प्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.