जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, गडचिरोली
ग्राहक तक्रार क्रमांक :- 2/2015 तक्रार नोंदणी दि. :- 29/1/2015
तक्रार निकाली दि. :-24/3/2015
निकाल कालावधी:-1 महीना 25 दि.
अर्जदार/तक्रारकर्ती :- आशा नंदाजी मेश्राम,
वय 35 वर्ष, धंदा – नोकरी,
पत्ता – रा. मेडिकल कॉलनी क्वॉ.नं.ई-53,
जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली,
ता.जि. गडचिरोली.
- विरुध्द -
गैरअर्जदार/विरुध्दपक्ष :- (1) शाखा व्यवस्थापक,
स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा गडचिरोली,
ता.जि. गडचिरोली
अर्जदार तर्फे वकील :- अधि. श्री संजय एल. जनबंधू
गैरअर्जदार :- स्वतः
गणपूर्ती :- (1) श्री विजय चंद्रलाल प्रेमचंदानी, अध्यक्ष
(2) श्री सादीक मोहसीनभाई झवेरी, सदस्य
(3) श्रीमती रोझा फुलचंद्र खोब्रागडे, सदस्या
- आ दे श -
(मंचाचे निर्णयान्वये, श्री विजय चं. प्रेमचंदानी, अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 24 मार्च 2015)
1. सदर तक्रार तक्रारकर्तीच्या पगारी खात्यातून दि.19.10.2014 रोजी एकूण रुपये 12,000/- स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा वर्धा चे ए.टी.एम. मधून अज्ञात इसमाने रक्कम गहाळ केल्याबाबत दाखल केली.
2. सदर तक्रार अर्ज नोंदणी करुन, गैरअर्जदार यांना नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार यांनी नि.क्र.7 नुसार लेखीउत्तर व सोबत दस्ताऐवजाचे झेरॉक्स प्रती दाखल केले. तक्रार मंचात न्यायप्रविष्ठ असतांना, अर्जदार यांनी दि.4.3.3015 ला सदर प्रकरण मागे घेण्याबाबत अर्ज नि.क्र.8 नुसार व पुरसीस नि.क्र.9 नुसार दाखल केली. अर्जदारास सदर तक्रार मागे घेवून यापुढे चालवायची नाही, त्यामुळे सदर मामला बंद करुन तक्रार मागे घेण्याची परवानगी मिळण्याबाबत नि.क्र.8 चे अर्जा नुसार विनंती केली, तसेच पुरसीस नि.क्र.9 दाखल केली. तसेच अर्जदारास मंचासमोर नि.क्र.8 व 9 बाबत विचारणा केली असता, गैरअर्जदाराविरुध्द सदर प्रकरण यापुढे चालवायचे नाही असे सांगीतले.
3. नि.क्र.8 वरील अर्ज व नि.क्र.9 पुरसीस नुसार अर्जदारास तक्रार यापुढे चालवायची नसल्याने, सदर प्रकरण निकाली काढणे योग्य होईल, असे आमचे मत आहे. सबब, पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
// नि.क्र.1 वर आदेश //
- अर्जदाराचे नि.क्र.9 वर दाखल पुरसिसचे अनुषंगाने अर्जदारास सदर
प्रकरण मागे घेण्यास परवानगी देऊन तक्रार अर्ज खारीज करण्यात येते.
(Complaint disposed by way of withdraw)
- तक्रारीची मुळ प्रत सोडून उर्वरीत प्रती अर्जदाराला परत देण्यात याव्या.
- उभय पक्षांनी तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावा.
गडचिरोली.
दिनांक :- 24/3/2015
(रोझा फु. खोब्रागडे) (सादीक मो. झवेरी) (विजय चं. प्रेमचंदानी)
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, गडचिरोली.