(मंचाचे निर्णयान्वये, श्री सादीक मोहसीनभाई झवेरी, सदस्य)
(पारीत दिनांक : 27 फेब्रूवारी 2015)
तक्रारकर्त्याने सदर तक्रार, दि.11.10.2013 ला स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा गडचिरोलीचे ए.टी.एम. मशीनमध्ये अडकलेली रक्कम रुपये 3000/- परत मिळण्याबाबत दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. तक्रारकर्त्याचा युनियन बँकेचे खाते क्र.59270201004617 आहे. दि.11.10.2013 ला 12-00 वाजता स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखे समोरील ए.टी.एम. मशीन मधून अर्जदाराचे कार्ड क्र.4213675928036303 ने शाखा गडचिरोली येथून रुपये 3000/- काढली असता रक्कम ए.टी.एम. मशीनमध्ये अडकली व खात्यातून तेवढी रक्कम वजा झाली. स्टेट बँकचे अधिका-यांनी युनियन बँक शाखा गडचिरोली येथे त्याबाबत अर्ज करण्यास सांगितले. त्यानुसार, अर्जदाराने दि.11.10.2013 ला तक्रार करण्यात आली. पुन्हा दि.1.11.2013 ला लेखी तक्रार युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा गडचिरोली येथे केली. तसेच युनियन बँक ऑफ इंडियाचे ग्राहक सेवक कक्षाशी संपर्क साधून दि.29.1.2014 ला तक्रार नोंदविली व त्यांनी तक्रार क्र.5973171 दिले. त्यांनी पूर्ण चौकशी करुन रक्कम जमा करण्याचे आश्वासन दिले. अर्जदार युनियन बँकेशी दर आठवडयाला संपर्क साधत होते. परंतु, त्यांचेकडून उडवाउडवीची उत्तरे दिल्या गेली. अर्जदाराने स्टेट बँक इंडियामध्ये चौकशी केली असता त्यांनी युनियन बँक ऑफ इंडियामध्ये पैसे ट्रान्सफर केले व त्याचा Taxation नंबर सुध्दा अर्जदारास दिला व तो नंबर अर्जदाराने युनियन बँक ऑफ इंडिया ला दाखविला असता, त्यांनी अशी रक्कम जमा झालेली नाही तुंम्ही पुन्हा स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये चौकशी करा, असे सांगितले. त्यामुळे, अर्जदाराचे हक्काचे रुपये 3000/- परत करावे, तसेच मानसिक व शारिरीक ञासापोटी रुपये 50,000/-, तक्रार खर्चापोटी रुपये 2000/- देण्यात यावे अशी प्रार्थना अर्जदाराने केली.
2. अर्जदाराने नि.क्र.2 नुसार 5 दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारांविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.5 नुसार लेखी उत्तर व सोबत 1 दस्ताऐवज दाखल केले. गैरअर्जदार क्र.2 ने नि.क्र.9 नुसार लेखी उत्तर व नि.क्र.10 नुसार 4 दस्ताऐवज दाखल केले.
3. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.10 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरात नमूद केले की, दि.11.10.2013 चे व्यवहारानुसार रुपये 3000/- ही रक्कम गैरअर्जदार क्र.1 चे बँकेतून दि.17.10.2013 ला वळती करण्यात आली.
4. गैरअर्जदार क्र.2 ने नि.क्र.9 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरात नमूद केले आहे की, अर्जदाराचे युनियन बँकेचे खाते क्र.59270201004617 आहे, याबाबत कोणताही वाद नाही. गैरअर्जदार क्र.2 ने लेखी उत्तरातील विशेष कथनात पुढे नमूद केले की, अर्जदाराने गैरअर्जदाराकडे दि.11.10.2013 व दि.1.11.2013 रोती तक्रार नोंदविल्यानंतर गैरअर्जदार क्र.2 चे वतीने मध्यवर्ती प्रणालीकडे संगणकाव्दारे गैरअर्जदार क्र.1 चे ए.टी.एम.मधील लॉगरोल तपासणीकरीता ऑनलाईन तक्रार केली होती, त्यानुसार अर्जदाराला सदरची रक्कम प्राप्त होवून व्यवहार पूर्ण झाल्याचे गैरअर्जदारास सुचित करण्यात आले. त्यासोबत मध्यवर्ती प्रणालीव्दारा गैरअर्जदारास असे सुचित करण्यात आले की, दि.19.10.2013 रोजी अर्जदाराचे तक्रारीनुसार केलेली मागणी घेण्यास नकार दर्शविला त्यामुळे अर्जदाराने केलेला व्यवहार पुर्णत्वास गेलेला आहे. अर्जदारास ए.टी.एम. कार्डव्दारे गैरअर्जदार क्र.1 चे ए.टी.एम.मशीनमधून काढलेली रक्कम मिळालेली आहे. गैरअर्जदार क्र.1 व्दारा दाखल केलेल्या उत्तरावरुन असे दिसते की, त्यांनी लेखीउत्तरात रक्कम रुपये 3000/- दि.17.10.2013 ला वळती करण्यात आली असे नमूद केले आहे. परंतु, अर्जदाराचा व्यवहार पूर्ण झाल्याचे मध्यवर्ती प्रणालीने सुचित केलेले आहे. गैरअर्जदार क्र.1 ने सदर रक्कम गैरअर्जदार क्र.2 च्या कोणत्या खात्यात किंवा अर्जदाराचे कोणत्या खात्यात किंवा इतर कोणत्या खात्यात वळती केली याबाबत कोणतेही कथन केलेले नाही. गैरअर्जदार क्र.1 ने गैरअर्जदार क्र.2 ला रुपये 3000/- कधीही वळती केलेली नाही. अर्जदारास गैरअर्जदार क्र.2 विरुध्द तक्रार अर्ज दाखल करण्याचे कोणतेही कारण घडले नाही. गैरअर्जदार क्र.2 ने अर्जदाराचे तक्रारीवरुन मध्यवर्ती प्रणालीकडे ऑनलाईन केलेली तक्रार रद्द केल्याचे अर्जदारास दस्ताऐवज देवून कळवीले होते, सदरची बाब अर्जदारास माहिती असून देखील लपवून ठेवली. गैरअर्जदार बँकेकडून सेवेत कोणतीही ञुटी नसल्यामुळे अर्जदाराची तक्रार खर्चासहीत खारीज करण्यात यावा.
5. अर्जदाराने दाखल केलेली तक्रार शपथपञ समजण्यात यावे अशी पुरसीस नि.क्र.11 व नि.क्र.13 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केले. गैरअर्जदार क्र.1 सतत गैरहजर असल्यामुळे शपथपञ दाखल करण्याकरीता संधी मिळूनही शपथपञ दाखल केले नाही, त्यामुळे नि.क्र.1 वर दि.8.1.2015 ला गैरअर्जदाराचे शपथपञाविना प्रकरण पुढे चालविण्यात यावे असा आदेश पारीत करण्यात आला. तसेच, गैरअर्जदार क्र.1 ला ब-याच संधी देवूनही लेखी युक्तीवाद दाखल केले नाही, त्यामुळे नि.क्र.1 वर दि.24.2.2015 ला गैरअर्जदाराचे लेखी युक्तीवादाशिवाय प्रकरण पुढे चालविण्यात यावे असा आदेश पारीत करण्यात आला. गैरअर्जदार क्र.2 ने दाखल केलेले लेखीउत्तर शपथपञ समजण्यात यावे अशी पुरसीस नि.क्र.12 व नि.क्र.15 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केला. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले लेखी बयान, दस्ताऐवज, शपथपञ व लेखी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? : होय
2) गैरअर्जदार क्र.2 ने अर्जदाराप्रती न्युनतमपूर्ण सेवा दिली : होय
आहे काय ?
3) आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
- कारण मिमांसा –
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
6. तक्रारकर्त्याने युनियन बँकेचे खाते क्र.59270201004617 आहे. दि.11.10.2013 ला 12-00 वाजता स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखे समोरील ए.टी.एम. मशीन मधून अर्जदाराचे कार्ड क्र.4213675928036303 ने शाखा गडचिरोली येथून रुपये 3000/- काढण्यास गेले होते व रुपये 3000/- ए.टी.एम. मशीनमधून काढण्याचा प्रयत्न केला ही बाब दोन्ही पक्षाना मान्य असून, अर्जदार ही गैरअर्जदाराचा ग्राहक आहे असे सिध्द होत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 2 बाबत :-
7. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.5 च्या वर सदर प्रकरणात पञ दाखल केले. त्या पञाव्दारे मंचाला असे कळविले की, दि.11.10.2013 च्या व्यवहारानुसार रुपये 3000/- ही रक्कम गैरअर्जदार क्र.1 च्या बॅकेंतून दि.17.10.2013 ला वळती करण्यात आलेली आहे. सदर व्यवहाराची प्रत पञाव्दारे प्रकरणात दाखल केलेली आहे. यावरुन, असे सिध्द होते की, गैरअर्जदार क्र.1 चे बँकेने गैरअर्जदार क्र.2 चे बँकेला रुपये 3000/- वरील नमूद असलेले ए.टी.एम.मधून निघाले नसल्याने व रुपये 3000/- खातेदाराचे खात्यातून कमी झाल्याने वळती करण्यात आले. म्हणून गैरअर्जदार क्र.2 चे असे म्हणणे की, वरील नमूद असलेले ए.टी.एम.मशीन मधून तक्रारदाराने रुपये 3000/- काढले होते हे ग्राह्य धरण्यासारखे नाही. गैरअर्जदार क्र.2 ला गैरअर्जदार क्र.1 कडून तक्रारदाराचे ए.टी.एम. मशीनमधून व्यवहार पूर्ण झाला नसल्याने रुपये 3000/- मिळून सुध्दा अर्जदाराचे खात्यात जमा केले नाही ही, गैरअर्जदार क्र.2 ची अर्जदाराप्रती न्युनतम सेवा दर्शविली आहे असे सिध्द होते. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 3 बाबत :-
8. मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
- अंतिम आदेश -
(1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
(2) गैरअर्जदार क्र.2 ने अर्जदाराचे खात्यात रुपये 3000/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांचे आत जमा करावे.
(3) गैरअर्जदार क्र.2 ने अर्जदाराला झालेल्या मानसिक व शारिरीक ञासाबद्दल रुपये 2500/- व तक्रारीच खर्च म्हणून रुपये 2000/- अर्जदाराचे खात्यात आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांचे आत जमा करावे.
4) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 27/2/2015