- आदेश निशाणी क्र.1 वर -
(मंचाचे निर्णयान्वये, श्री विजय चं. प्रेमचंदानी, अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 24 जुन 2015)
1. अर्जदाराने सदर तक्रार, स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा गडचिरोली येथे अर्जदाराचे सिडीयम मशीन मधून रुपये 10,000/- गहाळ केल्यामुळे दाखल केली आहे.
2. सदर तक्रार अर्ज नोंदणी करुन, गैरअर्जदार यांना नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार यांनी नि.क्र.8 नुसार लेखीउत्तर दाखल केले. तक्रार मंचात न्यायप्रविष्ठ असतांना, अर्जदार यांनी दि.24.6.2015 ला सदर प्रकरण मागे घेण्याबाबत अर्ज नि.क्र.9 नुसार अर्ज दाखल केला. अर्जदारास मंचासमोर 9 बाबत विचारणा केली असता, गैरअर्जदाराविरुध्द सदर प्रकरण यापुढे चालवायचे नाही असे सांगीतले.
3. नि.क्र.9 वरील आदेशान्वये अर्जदाराची सदर तक्रार मागे घेण्याची परवानगी देवून खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येते.
- अंतिम आदेश -
(1) अर्जदाराच्या तक्रारीची मुळ प्रत सोडून इतर प्रती व मुळ दस्ताऐवज अर्जदाराला परत करण्यात येते.
(2) सदर तक्रार अर्जदाराने मागे घेतली असल्याने नस्तीबध्द करण्यात येते.
(3) उभय पक्षांनी आप-आपला खर्च सहन करावा.
(4) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 24/6/2015