4. तक्रारकर्त्यांची तक्रार स्विकृत करून विरुध्द पक्ष यांना मंचातर्फे नोटीस काढण्यात आली. वि.प. ने हजर होवून त्यानी आपले लेखी उत्तर दाखल केले. त्यामध्ये तक्रारकर्त्यांचे वि.प.कडे संयुक्त बचत खाते असल्याचे मान्य करून तक्रारकर्त्यांचे तक्रारीतील उर्वरीत कथन नाकबुल करुन पुढे विशेष कथनामध्ये नमुद केले कि, तक्रारकर्त्यांच्या कथनानुसार तक्रारकर्ता क्र.1 ने आपल्या ए टी एम कार्डची माहिती अनोळखी व्यक्तीस दिली व त्यामुळे तक्रारकर्त्यांच्या स्वतःच्या निष्काळजीपणामुळेच त्यांच्या खात्यातून रक्कम काढली गेली. हा एक फसवणूकीचा प्रकार आहे व त्याकरीता तक्रारकर्त्याने पोलीस स््टेशनमध्ये रिपोर्ट देऊन गुन्हा नोंदवायला पाहिजे व वि.प. यांनी तक्रारकर्त्यांना हाच सल्ला दिला. 5. वि.प.यांनी तक्रारकर्त्यांना दिलेल्या सेवेत कोणताही दोष नाही. उलट सदर तक्रार ही फसवणुकीची असल्याने फौजदारी आहे.वि.प.यांनी तक्रारकर्त्यांची तक्रार घेवून त्यास तक्रार क्र.3256796383दिला. याशिवाय तक्रारकर्त्यांची तक्रार ही ग्राहक मंचाचे अधिकारक्षेत्रात येत नसल्यामुळे खर्चासह खारीज होण्यास पात्र आहे. तक्रारकर्त्यांनी बॅंकेला माहिती दिल्यानंतर जर तक्रारकर्त्याचे खात्यातून रक्कम निघाली असती तर वि.प. जबाबदार असते. 6. तक्रारकर्त्यांची तक्रार, दस्तावेज, पुरावा शपथपत्र, वि.प. यांचे लेखी म्हणणे, वि.प.यांचे लेखी कथनालाच पुरावा शपथपत्र समजण्यांत यावे अशी पुर्सीस दाखल तसेच उभय पक्षांच्या तोंडी युक्तिवादावरून तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहे. मुद्दे निष्कर्ष 1. तक्रारकर्ते हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ? होय 2. वि.प. यांनी तक्रारकर्त्यांना सेवा पुरविण्यात कसूर केल्याची बाब तक्रारकर्ता सिद्ध करतात काय ? नाही 3. आदेश काय ? अंतीम आदेशानुसार कारण मिमांसा मुद्दा क्र. 1 बाबत :- 7. तक्रारकर्ता क्र.1 व 2 यांचे वि.प.बॅंकेमध्ये 11368134571 या क्रमांकाचे संयुक्त बचत खाते असल्याचे वि.प.यांनी लेखी कथनात मान्य केले असल्याने तक्रारकर्ते हे वि.प. यांचे ग्राहक आहेत हे सिध्द होते. सबब, मुद्दा क. 1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते. मुद्दा क्र. 2 बाबत :- 8. तक्रारकर्त्यांनी नि.क्र. 2 वर दाखल केलेल्या दस्तावेजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनांस येते की दिनांक 4/8/2017 रोजी तक्रारकर्त्याच्या वि.प.कडे असलेल्या उपरोक्त संयुक्त बचत खात्यातून एकाच दिवशी, रू.9,999/-, रू.5000/-, रू.9,999/-,रू.9,999/-, रू.5000/-,रू.4000/-,रू.4000/-, रू.2000/- अशा वेगवेगळया रकमांद्वारे एकूण रू.49,997/- कमी झाल्याचे तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्त क्र.2 या, वि.प.कडून घेतलेल्या खात्याच्या विवरणपत्रावरून सिध्द होते. तक्रारकर्त्यांनी दिनांक 4/8/2017 रोजी वि.प.यांना तसेच पोलीस स्टेशन, ब्रम्हपूरी यांना दिलेल्या तक्रारीमध्ये, तक्रारकर्त्यांना उपरोक्त संयुक्त बचत खात्याचे नवीन ए.टी.एम.कार्ड प्राप्त झाल्यानंतर ‘’दिनांक 4/8/2017 रोजी दुपारी अंदाजे 12.00 वाजता तक्रारकर्ता क्र.1 यांना 9572528616 व 07079545867 या मोबाईल नंबरवरून फोन आले व कॉल करणा-या व्यक्तीने नवीन एटीएम कार्ड अॅक्टीवेट करण्यासाठी त्यावरील प्रिंटेड नंबर विचारला व एस.बी.आय. मेन शाखेतून बोलत आहे असे सांगितले. त्यामुळे सदर व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास बसून तक्रारकर्ताक्र.1 ने नंबर सांगितले व त्यानंतर लगेच तक्रारकर्त्यांचे उपरोक्त संयुक्त बचत खात्यातून निरनिराळया वस्तु खरेदी केल्याच्या नावाखाली रक्कम रू.50,000/- काढण्यांत आल्याचे मोबाईल मेसेजेस प्राप्त झाले,’’ असे नमूद आहे. यावरून तक्रारकर्ता क्र.1 ने स्वतः निष्काळजीपणे अनोळखी व्यक्तींस ए.टी.एम. कार्ड नंबर सांगितल्यामुळेच त्यांची फसवणूक होवून त्यांच्या खात्यामधून दिनांक 4/8/2017 रोजी रक्कम रू.49,997/- कमी झाले हे दस्तावेजावरूनवरून सिध्द होते. त्यामुळे मंचाचे मते या निष्काळजीपणाकरीता ते स्वतः जबाबदार असून वि.प. यांचा त्यात काहीही दोष नाही. वि.प.यांच्या सेवेत कोणतीही न्युनता नाही.सबब मुद्दा क्र. 2 चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येते. मुद्दा क्र. 2 बाबत :- 9. मुद्दा क्र. 1 व 2 च्या विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश (1) तक्रारकर्त्याची तक्रार क्र.154/2017 खारीज करण्यात येते. (2) उभय पक्षांनी आपआपला तक्रार खर्च सहन करावा. (3) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी . चंद्रपूर दिनांक – 24/09/2018 (श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. श्री.अतुल डी. आळशी) सदस्या सदस्या अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर. |