निकाल पारित दिनांक 22.03.2013 (द्वारा- श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्य) तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. तक्रारदार हे सन 2004 पासून गैरअर्जदार यांचेकडून पीक कर्ज घेत असून नियमितपणे परतफेड करत आहे. तक्रारदारांनी सन 2007 मध्ये किसान कार्ड योजनेमध्ये घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकले आहेत. तक्रारदार सदरची रक्कम भरण्यास तयार नाहीत. तक्रारदारांनी पीक कर्जाची मागील वर्षाची थकबाकी एकरकमी दि. 19.10.11 रोजी भरणा केली. सदरची रक्कम भरणा केल्यानंतर दुसरे पीक कर्ज देण्याचे गैरअर्जदार यांनी आश्वासन दिले होते. गैरअर्जदार यांनी दि.18.06.12 रोजी तक्रारदाराचे गट नं.5,6,2 येथील जमिनीवर रु.89,000/- पीक कर्ज मंजूर केल्यानंतर पत्र देवून तक्रारदारांच्या जमिनीवर महसूल अभिलेखात इतर हक्कात फेरफार क्र.903 तलाठयाने मंजूर केला. तक्रारदारांनी इतर बँकेचे (2) त.क्र.158/2012 नोडयुज प्रमाणपत्र गैरअर्जदार यांना दिले. अशा परिस्थितीत गैरअर्जदार यांनी कर्ज मंजूर करुनही तक्रारदारांना किसान स्टार कार्ड योजनेची संपूर्ण रक्कम भरणा करण्यास सांगितली व त्यानंतर कर्जाची रक्कम वितरित केली जाईल असे सांगितले. तक्रारदारांनी पीक कर्ज वितरित झाल्यानंतर किसान स्टार कार्डची रक्कम भरणा करण्यास तयार असल्याचे सांगितले परंतू गैरअर्जदार यांनी पीक कर्ज वितरित केले नाही अशी तक्रारदारांची तक्रार आहे. सदर प्रकरणात गैरअर्जदार हजर झाले असून लेखी म्हणणे दि.12.02.13 रोजी दाखल केले आहे. गैरअर्जदार यांच्या लेखी म्हणण्यानुसार तक्रारदारांनी सन 2004 पासून गैरअर्जदार यांचेकडून पीक कर्ज घेतले असून नियमितपणे परतफेड केली नाही. सन 2007 मध्ये घेतलेल्या कर्जाची नियमित व ठरवून दिलेल्या हप्त्यानुसार परतफेड केली नाही. तक्रारदारांनी दि.19.10.12 रोजी पीक कर्जाचा भरणा केला असून मागील शेती कर्ज टर्म लोनमध्ये दोन वर्षापासून हप्ते भरणा केले नाहीत. गैरअर्जदार यांनी तक्रारदारांना मागील कर्ज खाते जे राधाकिसन लक्ष्मण पिंगळे या नावावर असल्यामुळे पूर्णपणे बंद करण्याबाबत सांगितले. तक्रारदारांनी स्वतःचे नाव बदलून राधाकिसन ऐवजी प्रकाश असे केले आहे. तक्रारदारांनी मागील कर्ज खाते नियमित करण्यासाठी इन्कार केल्यामुळे नविन पीक कर्जाची रक्कम वितरित केली नाही. तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्र, गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे, दाखल कागदपत्र, यांचे सखोल वाचन केले. तक्रारदारांचा स्वतःचा युक्तीवाद तसेच गैरअर्जदार यांचे विद्वान वकील श्री.देशमुख यांचा युक्तीवाद ऐकला. तक्रारदार गैरअर्जदार यांचेकडून सन 2004 पासून नियमितपणे पीक कर्ज घेत होते. तक्रारदारांनी सन 2007 साली घेतलेल्या कर्जाची परतफेड दि.19.10.11 रोजी केल्याचे तक्रारीत आलेल्या पुराव्यावरुन दिसून येते. तक्रारदारांनी शेती बाबतचे सवलत कर्ज गैरअर्जदार यांचेकडून “राधाकिसन लक्ष्मण पिंगळे” या नावाने घेतले असून डिसेंबर 2004 मध्ये महाराष्ट्र शासन राजपत्राद्वारे “प्रकाश लक्ष्मण पिंगळे” असे बदलले आहे. तक्रारदारांना रु.89,000/- एवढया रकमेचे कर्ज मंजूर करुन या संदर्भात 7x12 उता-यावर बोजाची नोंद केल्याची बाब गैरअर्जदार यांना मान्य आहे. तक्रारदारांकडे इतर कर्जाची थकबाकी असून कर्ज खाते पूर्वीच्या “राधाकिसन लक्ष्मण पिंगळे” या नावाने असल्यामुळे सदरील (3) त.क्र.158/2012 खाते पूर्णपणे बंद केल्यानंतर नविन कर्जाचे वितरण करणे शक्य होईल असे गैरअर्जदार यांचे म्हणणे आहे. गैरअर्जदार यांचे विद्वान वकील श्री.देशमुख यांनी युक्तीवादात नमुद केल्याप्रमाणे गैरअर्जदार आजही तक्रारदारांना मंजूर केलेल्या कर्जाचे वितरण करण्यास तयार आहे, परंतू पूर्वीच्या कर्ज खात्यामध्ये तक्रारदारांनी रक्कम नियमितपणे भरणा करणे आवश्यक आहे. तक्रारदारांना सदरचा प्रस्ताव मंजूर नसल्याचे त्यांनी युक्तीवादात नमुद केले. तसेच गैरअर्जदार बँकेने कर्ज मंजूर झाल्यानंतर वितरण करण्याच्या कालावधीमध्ये तक्रारदारांचे नुकसान झाले असल्यामुळे नुकसान भरपाईची रक्कम व्याजासहीत देण्यात यावी अशी मागणी केली. गैरअर्जदार यांनी तक्रारदारांचे कर्ज खात्याचा उतारा न्यायमंचात दाखल केला असून खाते क्र.62018000556, 62050484263 तसेच 62025301431 मध्ये थकबाकी असल्यिाचे दिसिून येते. तक्रारदारांना कर्जाची थकबाकी असल्याची बाब मान्य आहे. तक्रारदाराकडे जुन्या कर्ज रकमेची थ्कबाकी असल्यामुळे गैरअर्जदार यांनी नविन कर्जाचे वितरण तक्रारदारांना केले नाही ही बाब तक्रारीत आलेल्या पुराव्यावरुन स्पष्ट होते. अशा परिस्थितीत गैरअर्जदार बँकेची सेवेतील त्रुटी दिसून येत नाही असे न्यायमंचाचे मत आहे. तक्रारदारांनी पूर्वीच्या कर्ज रकमेची परतफेड करण्याची तयारी दर्शविल्यानंतर सदरील कर्जाचे वितरण करण्यास गैरअर्जदार बॅकेने तयारी दाखवली असल्यामुळे तक्रारदारांना सदर तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडले नाही असे न्यायमंचाचे मत आहे. गैरअर्जदार यांनी त्यांचे समर्थनार्थ खालील न्यायनिवाडे दाखल केले आहेत. 1) 2010 (2) Bankers’ Journal 865 2) I (1996) CPJ 75 3) I (1996) CPJ 8 वरील न्यायनिवाडे सदर प्रकरणात लागू होतात असे न्यायमंच नम्रपणे नमुद करत आहे. गैरअर्जदार बँकेने रक्कम रु.89,000/- मंजूर केलेल्या कर्जाचे तक्रारदार थकबाकीदार असल्याचे कारणास्तव वितरण केले नाही ही बाब तक्राकरिीत आलेल्या पुराव्यावरुन स्पष्ट होते. वरील न्यायनिवाडयानुसार कर्ज मंजूर करणे, वाढवून देणे, वितरित करणे या बाबी बँकेच्या अखत्यारीमध्ये (discreation) असून खातेदार थकबाकीदार असल्यामुळे नविन कर्जाचे वितरण केले (4) त.क्र.158/2012 नाही ही बाब सेवेतील त्रुटी होत नाही. गैरअर्जदार बँकेची सेवेतील त्रुटी स्पष्ट झालेली नसल्यामुळे तक्रारदारांची तक्रार रदद करण्यात येते. सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात येते. 2) खर्चाबाबत आदेश नाही. 3) सदस्यांचे संच तक्रारदारास परत द्यावे. श्रीमती माधुरी विश्वरुपे, श्रीमती नीलिमा संत, सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड. |