Maharashtra

Dhule

CC/11/72

Rajendra Chatarsingh Rajput 42Sushil Nagar Jamnagiri Raod Dhule - Complainant(s)

Versus

Branch Manager Stat Bank Of India Opi 2 P Dhule - Opp.Party(s)

S M Kulkarni

26 Feb 2014

ORDER

DISTRICT CONSUMER FORUM DHULE
 
Complaint Case No. CC/11/72
 
1. Rajendra Chatarsingh Rajput 42Sushil Nagar Jamnagiri Raod Dhule
...........Complainant(s)
Versus
1. Branch Manager Stat Bank Of India Opi 2 P Dhule
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. V.V. Dani PRESIDENT
 HON'ABLE MR. S.S. Joshi MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.


 

 


 

                                  ग्राहक तक्रार क्रमांक  –   ६६/२०१२


 

                                  तक्रार दाखल दिनांक – २५/०४/२०१२


 

                                 तक्रार निकाली दिनांक – २६/०२/२०१४


 

   श्री. बिजलाल नामदेव सोनार


 

   उ.व. ७८ धंदा – सेवानिवृत्‍त पो.नि.


 

    राहणार-प्‍लॉट नं.३५ गोपाल नगर


 

    प्रसाद बंगला तो.जि. धुळे.                          …........ तक्रारदार


 

    


 

      विरुध्‍द


 

 


 

१.    श्री. पी.के. अण्‍णा पाटील जनता सह.बॅंक


 

लि. नंदुरबार


 

म. अवसायक सो.


 

श्री. पी.के. अण्‍णा पाटील जनता सह.बॅंक


 

लि. नंदुरबार ता.जि. नंदुरबार


 

२.    सौ. कमलाबेन पुरूषोत्‍तम पाटील प्रेसिडेंट


 

श्री. पी.के. अण्‍णा पाटील जनता सह.बॅंक


 

लि. नंदुरबार ता.जि. नंदुरबार


 

७२, विद्याविहार कॉलनी शहादा


 

ता.शहादा जि. नंदुरबार


 

३. श्री. पी.के. अण्‍णा पाटील जनता सह.बॅंक


 

लि. नंदुरबार ता.जि. नंदुरबार


 

 शाखाधिकारी


 

  श्री. पी.के. अण्‍णा पाटील जनता सह.बॅंक


 

लि. नंदुरबार ता.जि. नंदुरबार


 

 शाखा कार्यालय धुळे दत्‍त मंदिर तो.जि. धुळे        ........... जाबदेणार  


 

  


 

 


 

 


 

न्‍यायासन  


 

 (मा.अध्‍यक्षा – सौ.व्‍ही.व्‍ही. दाणी)


 

 (मा.सदस्‍य – श्री.एस.एस.जोशी)


 

उपस्थिती


 

(तक्रारदारा तर्फे – अॅड. श्री.के.आर. लोहार)


 

(जाबदेणार नं.१ व ३ तर्फे – अॅड.श्री. अनिल पाठक)


 

(जाबदेणार नं.२ तर्फे – एकतर्फा)


 

 


 

निकालपत्र


 


 (द्वाराः मा.अध्‍यक्षा – सौ.व्‍ही.व्‍ही. दाणी)


 

 


 

१.     तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्‍या बॅंकेत मुदत ठेव पावती अन्‍वये गुंतवलेली रक्‍कम मागणी करुनही परत दिली नाही म्‍हणून त्‍यांनी सदरची तक्रार दाखल केली आहे.


 

 


 

२.   तक्रारदार यांची थोडक्‍यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी जाबदेणार श्री. पी.के. अण्‍णा पाटील जनता सह.बॅंक लि. नंदुरबारया बॅंकेत मुदत ठेव पावतीत रक्‍कम गुंतविली होती. त्‍याचा तपशीलखालील प्रमाणे.


 






















































अ.

नं.

मुदत ठेव पावती नं.

ठेव तारीख

देय

तारीख

व्‍याज दर द.सा.द.शे.

ठेव रक्‍कम

देय

रक्‍कम

१.

१०९१३६

१९/०७/०७

१९/०८/०८

१०.५

५०,०००/-

५०,००० + व्‍याज

२.

१०१६६९

१९/०६/०६

१४/०४/०७


३०,०००/-

३०,००० + व्‍याज

३.

१०१६७०

१९/०६/०६

०३/०६/०७


३०,०००/-

३०,००० + व्‍याज

४.

१०१६७१

१९/०६/०६

१९/०७/०७

८.५

५०,०००/-

५०,००० + व्‍याज

५.

१०१६७२

१९/०६/०६

१९/०७/०७

८.५

५०,०००/-

५०,००० + व्‍याज

एकूण

,,०००+व्‍याज


 

 


 

३.   तक्रारदार यांची थोडक्‍यात तक्रार अशी आहे की, त्‍यांनी जाबदेणार यांच्‍याकडे वरील देय रक्‍कमेची वेळोवेळी मागणी केली असता जाबदेणार यांनी तक्रारदार यांच्‍या मूळ मुदत ठेव पावत्‍या स्विकारून दि.२३/०१/२०१०  रोजी  रूपये २,१०,०००/- पैकी फक्‍त रूपये १,००,०००/- दिले. सबब तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्‍याकडून मुदत ठेव पावतींमधील उर्वरीत रक्‍कम रूपये १,१०,०००/- व त्‍यावर देय तारखेपासून संपूर्ण रक्‍कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. १८ टक्‍के प्रमाणे व्‍याज. तसेच मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासापोटी रक्‍कम रूपये २५,०००/- आणि अर्जाचा खर्च रक्‍कम रूपये ५,०००/- जाबदेणार यांचेकडून मिळावा, यासाठी सदरचा तक्रार अर्ज दाखल करण्‍यात आला. 


 

 


 

४.  तक्रारदार यांनी आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍ट्यर्थ नि.४/१ ते नि.४/५ वर मुदत ठेव पावतींच्‍या छायांकित प्रती दाखल केलेल्‍या आहेत.


 

 


 

५.   जाबदेणार नं.१ व ३ यांनी आपल्‍या खुलाशात असे म्‍हटले आहे की, तक्रारदारने महाराष्‍ट्र सहकारी संस्‍था अधिनियमातील कलम १०६,१०७,१६०,१६३, १६४ प्रमाणे कोणतीही कायदेशीर कार्यवाही केलेली नाही. त्‍यामुळे जाबदेणार विरूध्‍द सदर तक्रार किंवा वसुली अर्ज चालविण्‍याचा अधिकार मंचास नाही. सबब सदरचा अर्ज खर्चासह रद्द करण्‍यात यावा.


 

 


 

६. जाबदेणार नं.२ यांना पाठविलेल्‍या मंचाच्‍या नोटीसीच्‍या पाकीटावर ‘सदर मालक बेमुदत बाहेरबावी’ असा शेरा लिहून परत आल्‍यामुळे त्‍यांचे विरूध्‍द ‘एकतर्फा’ आदेश पारित करण्‍यात आला आहे.


 

 


 

७.   तक्रारदार यांनी जाबदेणार विरूध्‍द ग्राहक मंच धुळे येथे दावा चालविण्‍यास/ दाखल करणेस व निबंधक या नात्‍याने परवानगी देण्‍यास हरकत नसल्‍याचे मा. विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्‍था, नाशिक विभाग, नाशिक यांचे पत्र (जा.क्र.५९८८ दि.०६/१२/२०१३) दाखल केले आहे.


 

 


 

 


 

८.   तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, शपथपत्र, पुराव्‍यासाठी दाखल कागदपत्रे पाहता व तक्रारदार यांनी स्‍वतः केलेला युक्तिवाद ऐकल्‍यानंतर, आमच्‍यासमोर निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे  उपस्थित होतात. त्‍याची उत्‍तरे आम्‍ही सकारण देत आहोत.


 

 


 

 


 

 


 

 


 

              मुददे                                   निष्‍कर्ष


 

अ.  तक्रारदार हे जाबदेणार यांचे ग्राहक आहेत काय ?             होय


 

ब.     जाबदेणार  यांनी तक्रारदार यांना सेवा देण्‍यात    


 

 कसूर केली आहे काय ?                                                      होय


 

क.  तक्रारदार हे जाबदेणार यांच्‍याकडून देय रक्‍कम


 

 व त्‍यावरील व्‍याज मिळण्‍यास पात्र आहेत काय ?           होय


 

ड.      तक्रारदार हे जाबदेणार  यांच्‍याकडून मानसिक


 

 त्रास व तक्रार अर्जाच्‍या खर्चापोटी भरपाई


 

 मिळण्‍यास पात्र आहेत काय ?                           होय


 

ई. अंतिम आदेश ?                                 खालीलप्रमाणे


 

 


 

विवेचन


 

९.   मुद्दा -  तक्रारदार यांनी मुदत ठेव पावतींच्‍या छायांकित प्रती नि.४/१ ते नि.४/५ वर दाखल केलेल्‍या आहेत. जाबदेणार यांनी तक्रारदार यांची मुदत ठेव पावतींमधील रक्‍कम नाकारलेली नाही. मुदत ठेव पावतींमधील रक्‍कमेचा विचार होता तक्रारदार हे जाबदेणार यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे  मत  आहे.  म्‍हणून  मुद्दा चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.



 

१०. मुद्दा - तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्‍यांनी पतसंस्‍थेत मुदत ठेव पावती अन्‍वये रक्‍कम गुंतविली होती ही बाब सिध्‍द होते. तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्‍याकडे गुंतवलेली रक्‍कम परत करणे हे पतसंस्‍थेचे कर्तव्‍य होते. परंतु मागणी करुनही रक्‍कम न देणे ही जाबदेणार यांची तक्रारदार यांना द्यावयाच्‍या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे. म्‍हणून मुद्दा चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.


 

 


 

११. मुद्दा - तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या मुदत ठेव पावत्‍यांमधील व्‍याजासह होणारी रक्‍कम जाबदेणार क्र.१ ते ३ यांचेकडून वैयक्‍तीक व संयुक्‍तीकरित्‍या मिळावी अशी मागणी केलेली आहे. परंतू या संदर्भात मा.मुंबई उच्‍च न्‍यायालय खंडपिठ औरंगाबाद यांनी रिट याचिका क्र.५२२३/०९ सौ.वर्षा रविंद्र ईसाइ विरुध्‍द राजश्री राजकुमार चौधरी या न्‍यायिक दृष्‍टांतामध्‍ये पुढील प्रमाणे मत व्‍यक्‍त केले आहे.


 

 


 

        As has been recorded above, I am of the view that a society registered under the provision of Maharashtra Co-operative Societies Act 1960, although can be proceededagainst and a complaint under the provision of Consumer Protection Act is entertain ableagainst the society, the Directors of members of the managing committee cannot be heldresponsible in view of the scheme of Maharashtra              Co-operative Societies Act. To holdthe Directors of the banks/members of the managing committee of the societiesresponsible, without observing the procedure prescribed under the Act, would also beagainst the principles of   co-operation, which is the very foundation of establishment oftheco-operative societies.


 

 


 

     वरील न्‍यायिक दृष्‍टांतामध्‍ये संचालकांना रक्‍कम देण्‍यासाठी  वैयक्‍तीकरित्‍या जबाबदार ठरविता येणार नाही असे तत्‍व विषद करण्‍यात आले आहे. त्‍यामुळे जाबदेणार नं.२ यांना वैयक्तिकरित्‍या जबाबदार ठरविता येणार नाही. या सर्व बाबींचा विचार होता तक्रारदार हे जाबदेणार श्री.पी.के. अण्‍णा पाटील जनता सह.बॅंक लि. नंदुरबार यांचेकडून मुदत ठेव पावतींमधील मुदतीअंती तक्रारदार यांना मिळालेली रक्‍कम वजा जाता उर्वरित रक्‍कम रूपये १,१०,०००/- व त्‍यावर देय तारखेपासून संपूर्ण रक्‍कम फीटेपर्यंत द.सा.द.शे. ६ टक्‍के दराप्रमाणे व्‍याजासह, अशी एकूण रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. म्‍हणून मुद्दा चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.


 

 


 

१२. मुद्दा तक्रारदार यांनी दाखल केलेली मुदतठेव पावतींमधील व्‍याजासह होणारी रक्‍कम जाबदेणार यांच्‍याकडून परत मिळावी म्‍हणून तक्रारदार यांना जाबदेणार श्री. पी.के. अण्‍णा पाटील जनता सह.बॅंक लि. नंदुरबार यांच्‍या विरुध्‍द या मंचात दाद मागावी लागली आहे. त्‍यामुळे त्‍यांना मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व अर्ज दाखल करण्‍यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. सबब तक्रारदार हे जाबदेणार यांच्‍या कडून मानसिक त्रासापोटी रु.१०००/-  व  अर्जाच्‍या खर्चापोटी रक्‍कम रू.५००/- भरपाई मिळण्‍यास पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. म्‍हणून मुद्दा ‘ड’ चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.


 

 


 

 


 

१३. मुद्दा - वरील सर्व विवेचनावरून पुढील प्रमाणे आदेश करण्‍यात येत आहे.


 

आ दे श


 

 


 

१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करण्‍यात येत आहे.


 

 


 

२. जाबदेणार श्री.पी.के. अण्‍णा पाटील जनता सह.बॅंक लि. नंदुरबार यांनी, सदर आदेशाचे तारखेपासून पुढील तीस दिवसांचे आत, तक्रारदारांना खालील प्रमाणे रक्‍कमा दयाव्‍यात.


 

 


 

(अ)        मुदतठेव पावती क्रमांक १०९१३६, १०१६६९, १०१६७०, १०१६७१,    १०१६७२ मधील मुदती अंती देय रकमेपैकी तक्रारदार यांना मिळालेली रक्‍कम वजा जाता उर्वरित रक्‍कम रूपये १,१०,०००/- (अक्षरी रूपये एक लाख दहा हजार) व त्‍यावर दि.२३/०१/२०१० पासून द.सा.द.शे. ६ टक्‍के प्रमाणे व्‍याज संपूर्ण रक्‍कम फिटेपर्यंत दयावे.


 

 


 

    (ब) मानसिक त्रासापोटी रक्‍कम रू.१,०००/- (अक्षरी रूपये एक हजार            मात्र) व  अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रू.५००/- (अक्षरी रूपये पाचशे मात्र)


 

       दयावेत.


 

 


 

३.  वर नमूद आदेशाची अमंलबजावणी (अध्‍यक्ष/संचालक/व्‍यवस्‍थापक/अवसायक)      यापैकी वेळोवेळी जे कोणी पतसंस्‍थेचा कारभार पाहात असतील त्‍यांनी      करावी.  तसेच आदेश २ (अ) मधीलरकमेपैकीकाहीरक्‍कम अगर व्‍याज दिले असल्‍यास,  कर्ज दिले असल्‍यास सदरची रक्‍कम वजावट करुन  उर्वरित रक्‍कम अदा करावी.  


 

 


 

धुळे.


 

दि.२६/०२/२०१४.


 

             (श्री.एस.एस. जोशी)  (सौ.व्‍ही.व्‍ही. दाणी)


 

                    सदस्‍य            अध्‍यक्षा


 

              जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
 
 
[HON'ABLE MRS. V.V. Dani]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. S.S. Joshi]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.