::: आ दे श :::
( पारित दिनांक : 22/09/2014 )
माननिय अध्यक्षा सौ. एस. एम. उंटवाले, यांचे अनुसार : -
1. ग्राहक संरक्षण कायदा १९८६ चे, कलम : १२ अन्वये, तक्रारकर्त्याने ही तक्रार विरुध्द पक्षाकडून त्यांचे वाहन अॅपे लोडींग क्रमांक : एम एच-37/बी-1420 चे
“ ना हरकत प्रमाणपत्र ” ( एन.ओ.सी.) मिळण्याकरिता दाखल केली आहे.
2. सदरहू तक्रारीची नोटीस मंचातर्फे विरुध्द पक्षास प्राप्त झाल्यानंतर देखील विरुध्द पक्षाने त्यांचा लेखी जवाब दाखल केला नाही. सबब प्रकरण विरुध्द पक्षाच्या लेखी जवाबाशिवाय पुढे चालविण्यांत आले. परंतु दिनांक 15/04/2013 रोजी विरुध्द पक्षाने एक पुरसिस व त्यासोबत 100/- रुपयाच्या गैर न्यायिक मुद्रांक लेखावरील तक्रारकर्त्याचे कथन दाखल करुन, मंचास असे कळविले की, सदरहू प्रकरण उभय-पक्षात वि. न्याय मंचाबाहेर आपसात झालेले आहे. तसेच विरुध्द पक्षाने निशाणी-12 प्रमाणे पुरसिस दाखल करुन, मंचासमक्ष तक्रारकर्त्यास त्याचे वरील वाहनाचे “ ना हरकत प्रमाणपत्र ” ( एन.ओ.सी.) दिले व या पुरसिसवर तक्रारकर्त्याचे अधिवक्ता यांची प्रत मिळाल्याची सही आहे.
3) या प्रकरणात तक्रारकर्ता जरी गैरहजर असला तरी, उभय पक्षांमधील वाद मंचाबाहेर मिटला आहे, याची खात्री मंचाला झाली आहे. अशा परीस्थितीत, हे प्रकरण नस्तीबध्द करणे क्रमप्राप्त ठरते व या प्रकरणात पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यांत येतो.
अंतिम आदेश
- तक्रारकर्ते यांची तक्रार नस्तीबध्द करण्यांत येते.
- न्यायिक खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
- उभय पक्षांना या आदेशाच्या प्रती निशुल्क पुरवाव्या.
(श्रीमती जे.जी. खांडेभराड) (श्री. ए.सी.उकळकर) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्या. सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.