::: आ दे श :::
( पारित दिनांक : 29/06/2017 )
आदरणीय सदस्य, श्री. कैलास वानखडे, यांचे अनुसार : -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, विरुध्द पक्षाने द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला, म्हणून तक्रारकर्त्याने नुकसान भरपाई मिळण्यासाठी ही तक्रार दाखल केली आहे.
तक्रारकर्ते यांची सदर तक्रार, विरुध्द पक्षाचा लेखी जबाब व उभय पक्षाने दाखल केलेल्या दस्तऐवजावरुन निकाल पारित केला. कारण रोजनाम्यावरुन असे दिसते की, प्रकरणात उभय पक्ष अनेक तारखेपासुन गैरहजर आहेत.
उभय पक्षाने जे दस्त दाखल केले, त्यावरुन असे दिसते की, तक्रारकर्त्याने या तक्रारीआधी वि. मंचात तक्रार प्रकरण क्र. 41/2013 या विरुध्द पक्षाविरुध्द दाखल केले होते. त्यामध्ये वि. मंचाने दिनांक 26/02/2015 रोजी खालीलप्रमाणे आदेश पारित केला होता.
“ या प्रकरणात विरुध्द पक्षाने त्यांचा लेखी जबाब दाखल केल्यानंतर तक्रारकर्ता सतत मंचात गैरहजर राहिले आहे. त्यामुळे तक्रारकर्त्यातर्फे प्रकरणात त्यांचा युक्तिवाद दाखल नाही. त्यामुळे तक्रारकर्ता यांना या प्रकरणात स्वारस्य नाही, असे दिसते. सबब तक्रारकर्ता यांची तक्रार खारिज करण्यात येते. ”
सदर आदेश पारित झाल्यानंतर तक्रारकर्त्याने विहित मुदतीत योग्य तो अर्ज दाखल न करता पुन्हा नविन हे प्रकरण दिनांक 01/09/2015 रोजी
( प्रकरण क्र. 69/2015 ) विरुध्द पक्षाविरुध्द दाखल केले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत तक्रार प्रतिपालनिय नाही. म्हणून बाकीचे मुद्दे तपासले नाही.
सबब अंतिम आदेश पुढीलप्रमाणे पारित केला.
अंतिम आदेश
- तक्रारकर्ते यांची तक्रार, खारिज करण्यांत येते.
- न्यायिक खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
- उभय पक्षांना या आदेशाच्या प्रती निशुल्क पुरवाव्या.
( श्री. कैलास वानखडे ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri