Maharashtra

Ahmednagar

CC/17/195

Ashok Haribhau Tilekar - Complainant(s)

Versus

Branch Manager, Shree Mahalaxmi Multistate Co-Operative Credit Society Ltd. - Opp.Party(s)

Hendre-Joshi

09 Apr 2021

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Complaint Case No. CC/17/195
( Date of Filing : 17 Jul 2017 )
 
1. Ashok Haribhau Tilekar
Aaroha Nagar Colony, Pipeline Road, Bhistabag, Savedi
Ahmednager
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Branch Manager, Shree Mahalaxmi Multistate Co-Operative Credit Society Ltd.
Branch Zopdi Canteen, Savedi, Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
2. Manager, Shree Mahalaxmi Multistate Co-Operative Credit Society Ltd.
501, Pinnac Gangotri, S.No- 165/1/1/2, Behind Surabhi Enclave, Aundh, Pune
Pune
Maharashtra
3. Chairman, Hema Suresh Supekar
Shree Mahalaxmi Multistate Co-Operative Credit Society Ltd. Zopdi Canteen, Savedi, Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
4. Vice Chairman, Ashok Gangadhar Gaikwad ( Patil )
Shree Mahalaxmi Multistate Co-Operative Credit Society Ltd. Zopdi Canteen, Savedi, Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
5. Director, Rahul Arun Damale
Shree Mahalaxmi Multistate Co-Operative Credit Society Ltd. Zopdi Canteen, Savedi, Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
6. Director, Nagnath Bhimaji Shete
Shree Mahalaxmi Multistate Co-Operative Credit Society Ltd. Zopdi Canteen, Savedi, Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
7. Director, Manish Dattatraya Kute
Shree Mahalaxmi Multistate Co-Operative Credit Society Ltd. Zopdi Canteen, Savedi, Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
8. Director, Rajendra Bansilal Parakh
Shree Mahalaxmi Multistate Co-Operative Credit Society Ltd. Zopdi Canteen, Savedi, Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
9. Director, Ajay Chandrakant Aakde
Shree Mahalaxmi Multistate Co-Operative Credit Society Ltd. Zopdi Canteen, Savedi, Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
10. Director, Madhukar Marutrao Mule
Shree Mahalaxmi Multistate Co-Operative Credit Society Ltd. Zopdi Canteen, Savedi, Ahmednagar
Ahmadnager
Maharashtra
11. Director, Sau. Prajakta Prakash Borude
Shree Mahalaxmi Multistate Co-Operative Credit Society Ltd. Zopdi Canteen, Savedi, Ahmednagar
Ahmadnager
Maharashtra
12. Director, Adv. Vijay Bansilal Munot
Shree Mahalaxmi Multistate Co-Operative Credit Society Ltd. Zopdi Canteen, Savedi, Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
13. Director, Sanjay Chandrakant Khonde
Shree Mahalaxmi Multistate Co-Operative Credit Society Ltd. Zopdi Canteen, Savedi, Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
14. Director, Chandrkant Surajmal Aanecha
Shree Mahalaxmi Multistate Co-Operative Credit Society Ltd. Zopdi Canteen, Savedi, Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
15. Director, Prakash Babulal Bchawat
Shree Mahalaxmi Multistate Co-Operative Credit Society Ltd. Zopdi Canteen, Savedi, Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
16. Director, Machindra Bhikaji Khade
Shree Mahalaxmi Multistate Co-Operative Credit Society Ltd. Zopdi Canteen, Savedi, Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
17. Director, Shamrao Hari Kulkarni
Shree Mahalaxmi Multistate Co-Operative Credit Society Ltd. Zopdi Canteen, Savedi, Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
18. Director, Sunil Rangnath Waghmare
Shree Mahalaxmi Multistate Co-Operative Credit Society Ltd. Zopdi Canteen, Savedi, Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
19. Branch Manager, Shree Mahalaxmi Multistate Co-Operative Credit Society Ltd.
Branch- Pipeline Road, Savedi, Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
PRESENT:Hendre-Joshi, Advocate for the Complainant 1
 
Dated : 09 Apr 2021
Final Order / Judgement

निकालपत्र

निकाल दिनांक – ०९/०४/२०२१

 (द्वारा मा.अध्‍यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)

__________________________________________________________

१.   तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ अंतर्गत सदर  तक्रार दाखल केलेली आहे.

२.    तक्रारदार क्रमांक १ व ३ यांनी सामनेवाले पतसंस्‍थेमध्‍ये खालीलप्रमाणे मुदत ठेव पावतींमध्‍ये रक्‍कम ठेवलेली होती.     

अ.नं.

मुदत ठेव पावती नं.

मुदत ठेव रक्‍कम

दिनांक

व्‍याज दर

मुदततीनंतर  मिळणारी रक्‍कम

(१)

४९६२३

३०,०००.००

१०/०५/१६ ते १०/०६/१७

१३%

३०,०००.००

(२)

४९६२४

३०,०००.००

१०/०५/१६ ते १०/०६/१७

१३%

३०,०००.००

(३)

४९६८४

१,५०,०००.००

१७/०७/१६ ते १७/०८/१७

१३%

१,५०,०००.००

(४)

५०८७०

५०,०००.००

२/१२/१६ ते ०२/०१/१७

१३%

५०,०००.००

(५)

५०८७१

५०,०००.००

०२/१२/१६ ते ०२/०१/१७

१३%

५०,०००.००

(६)

५०९०१

५०,०००.००

२७/१२/१६ ते २७/०१/१७

१३%

५०,०००.००

 

     तक्रारदार क्रमांक २ यांनी सामनेवाले यांचे पाईपलाईनरोडवर असलेल्‍या शाखेमध्‍ये खालीलप्रमाणे मुदत ठेवी ठेवलेल्‍या होत्‍या.

अ.नं.

मुदत ठेव पावती नं.

मुदत ठेव रक्‍कम

दिनांक

व्‍याज दर

मुदततीनंतर  मिळणारी रक्‍कम

(१)

४५२२७

५०,०००.००

०७/१२/१५ ते ०७/१२/१६

१३%

५०,०००.००

(२)

४५२४३

५०,०००.००

२६/१२/१५ ते २६/१२/१६

१३%

५०,०००.००

 

     वर नमुद मुदत ठेवी संपल्‍यावरसुध्‍दा सामनेवालेकडे रकमेची मागणी केली असता त्‍यांनी रक्‍कम दिली नाही. तसेच तक्रारदार क्रमांक २ यांचे नावाने खात्‍यात शिल्‍लक असलेली रक्‍कम रूपये ६,८५७/- दिलेली नाही व तक्रारदार क्रमांक १ व ३ यांचे    संयुक्‍तनावे खात्‍यात शिल्‍लक असलेली रक्‍कम रूपये ७,९९३/- दिलेली नाही. सबब सामनेवाले क्रमांक १ ते ३ यांनी तक्रारदाराप्रती अनुचीत व्‍यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे, म्‍हणुन सदर तक्रार आयोगासमक्ष दाखल करण्‍यात आलेली आहे.

३.    सदर तक्रार स्विकृत करून सामनेवाले यांना नोटीस काढण्‍यात आली. सामनेवाले क्रमांक १,२,३,६,७,९,११,१४,१५,१७,१८ यांना नोटीस प्राप्‍त होऊनही ते हजर झाले नाही म्‍हणुन निशाणी १ वर त्‍यांचेविरूध्‍द प्रकरण एकतर्फा चालविणेचा आदेश पारीत करण्‍यात आला. सामनेवाले क्रमांक ४,५,८,१०,१२,१३ व १६ प्रकरणात हजर झाले. सामनेवाले क्रमांक १२ व १३ यांची कैफीयत प्रकरणात दाखल करण्‍यात आली. सामनेवाले क्रमांक १३ ने निशाणी ५८ वर असे उत्‍तर दाखल केले आहे की, दिनांक २७-१०-२०१४ रोजी त्‍यांनी संस्‍थेच्‍या कार्यकारी मंडळाच्‍या संचालक पदाचा व सर्वसाधारण सभासदत्‍वाचा राजीनामा दिला असल्‍याने त्‍यांना संस्‍थेच्‍या कोणत्‍याही आर्थिक व्‍यवहाराचे जबाबदारीचा संबंध येत नाही. सदर अर्जामध्‍ये  कथन केलेल्‍या व्‍यवहारांचे आर्थिक वर्ष सन २०१५-१६ व २०१६-१७ मध्‍ये झाले असल्‍याने सदर आर्थिक वर्षामधील व्‍यवहारांची जबाबदारी सामनेवाले यांचेवर येत नाही. सदर तक्रार त्‍यांचेविरूध्‍द खारीज करण्‍यात यावी, अशी विनंती करण्‍यात आलेली आहे. सामनेवाले क्रमांक ४,५,८,१०,१६ यांनी त्‍यांचे जबाबात असे नमुद केलेले आहे की, तक्रारदाराने तक्रारीत लावलेले आरोप खोटे असुन त्‍यांना नाकबुल आहे. सामनेवाले क्रमांक १ चे बायलॉज क्‍लॉज क्रमाक ४८ व २४ प्रमाणे सौ.हेमा सुरेश सुपेकर यांना सर्व संचालकांचे वतीने संस्‍थेचे दप्‍तर तपासणे, कॅश संभाळणे, कॅशची गुंतवणूक करणे, कर्ज वसुल करणे, कर्ज देणे त्‍याचप्रमाणे व्‍याजाचा हिशोब संभाळणे व गुंतवणुक असे अधिकार देण्‍यात आलेले असुन, सामनेवाले क्रमांक ४,५,८,१०,१६ यांची कोणतीही जबाबदारी येत नाही. सदर तक्रार सामनेवाले क्रमांक ४,५,८,१० व १६ यांचेविरूध्‍द खारीज करण्‍यात यावी, अशी विनंती करण्‍यात आली आहे.

४.    सामनेवाले क्रमांक १२ यांनी निशाणी ६३ वर सामनेवाले क्रमांक ४,५,८,१० व १६ यांचेसारखाच जबाब दाखल केला आहे.

५.    तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, दस्‍तऐवज, सामनेवालेने दाखल केलेला जबाब व तक्रारदाराचे सरतपासणीचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद व उभय उपक्षांचा तोंडी युक्तिवाद याचे अवलोकन केले असता आयोगासमक्ष खालील मुद्दे विचारात घेण्‍यात येत आहे.

अ.नं.   

मुद्दे

निष्‍कर्ष

(१)

तक्रारदार हे समानेवालेचे ग्राहक आहे आहेत काय ?

होय

(२)

सामनेवालेने तक्रारदाराप्रती न्‍युनतम सेवा दर्शवीली आहे काय ?

होय

(३)

आदेश काय

अंतिम आदेशा प्रमाणे

विवेचन

६.  मुद्दा क्र. (१) :  तक्रारदाराने सामनेवाले पतसंस्‍थेमध्‍ये वर नमुद केलेल्‍या  तपशीलाप्रमाणे मुदत ठेव पावतींमध्‍ये रक्‍कम जमा केली होती व ती मुदत संपल्‍यानंतर व्‍याजसह सामनेवालेकडुन मिळणार होती. परंतु ती रक्‍कम तक्रारदार क्रमांक १ व ३ यांना मिळाली नाही, ही बाब उभयपक्षांना मान्‍य आहे. म्‍हणुन तक्रारदार हे समानेवालेचे ग्राहक आहेत, असे सिध्‍द होते. सबब मुद्दा क्रमांक १ चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

७.  मुद्दा क्र. (२) :  सामनेवाले क्रमांक १,२,३,६,७,९,११,१४,१५,१७,१८ यांचेविरूध्‍द  प्रकरण एकतर्फा चालविणेचा आदेश पारीत करण्‍यात आला व बचाव पक्षात कोणतेही कथन आले नसल्‍याने त्‍यांचेविरूध्‍द तक्रार सिध्‍द होत आहे. सामनेवाले क्रमांक १३ ने त्‍याचे जबाबात असे नमुद केलेले आहे की, दिनांक सामनेवाले क्रमांक १३ ने निशाणी  ५८ वर असे उत्‍तर दाखल केले आहे की, दिनांक २७-१०-२०१४ रोजी त्‍यांनी संस्‍थेच्‍या   प्राथमिक सदस्‍यत्‍वाचा राजीनामा दिलेला आहे. सदर बाब सिध्‍द करणेसाठी सामनेवाले क्रमांक १३ यांनी कोणताही दस्‍तऐवज पुरावा प्रकरणात सादर केलेला नाही. सबब त्‍याचे बचाव पक्षात लावलेले कथन ग्राह्य धरता येत नाही. सामनेवाले क्रमांक ४,५,८,१०,१२ व १६ यांनी त्‍यांचे बचाव पक्षात असे नमुद केले आहे की, बायलॉज क्‍लॉज प्रमाणे सामनेवाले पतसंस्‍थेच्‍या कामी पुर्ण अधिकार सौ.हेमा सुरेश सुपेकर यांना देण्‍यात आलेले होते. परंतु पतसंस्‍था असतांना दिलेले अधिकार दुस-यांना दिले असले तरी संस्‍थेची जबाबदारी टाळता येत नाही, असे आयोगाचे मत ठरले आहे. म्‍हणुन सामनेवाले क्रमांक ४,५,८,१०,१२ व १६ यांनी दाखल केलेला जबाब योग्‍य व कायदेशीर नाही. तसेच सामनेवाले क्रमांक ४,५,८,१०, १२ व १६ हे तक्रारदाराने पतसंस्‍थेमध्‍ये ठेवलेली रक्‍कम देण्‍यास जबाबदार ठरतात. सामनेवाले क्रमांक १ ते १९ यांनी तक्रारदार क्रमांक १ ते ३ यांचे मुदत ठेवीची रक्‍कम व्‍याजासह परत केली नाही, ही बाब सिध्‍द झालेली आहे व तक्रारदार क्रमांक १ ते ३ यांचे प्रति अनुचीत व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला असुन न्‍युनतम सेवा दिली आहे. सबब मुद्दा क्रमांक २ चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

८. मुद्दा क्र.(३) :  मुद्दा क्रमांक १ व २ च्‍या विवेचनावरून खालीलप्रामाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

अंतीम आदेश

१.  तक्रारदार यांची तक्रार अंशतः मंजुर करण्‍यात येत आहे.

२. सामनेवाले क्र.१ ते १९ यांनी वैयक्तिकरित्‍या किंवा संयुक्तिकरीत्‍या मुदत ठेव पावती क्रमांक ४९६२३ मधील रक्‍कम रूपये ३०,०००/- व या रकमेवर दिनांक १०-०५-२०१६ पासुन संपुर्ण रक्‍कम देईपर्यंत द.सा.द.शे. १३ टक्‍के प्रमाणे व्‍याज तक्रारदार क्रमांक ३ व १ यांना द्यावे.

३. सामनेवाले क्र.१ ते १९ यांनी वैयक्तिकरित्‍या किंवा संयुक्तिकरीत्‍या मुदत ठेव पावती क्रमांक ४९६२४ मधील रक्‍कम रूपये ३०,०००/- व या रकमेवर दिनांक १०-०५-२०१६ पासुन संपुर्ण रक्‍कम देईपर्यंत द.सा.द.शे. १३ टक्‍के प्रमाणे व्‍याज तक्रारदार क्रमांक ३ व १ यांना द्यावे.

४. सामनेवाले क्र.१ ते १९ यांनी वैयक्तिकरित्‍या किंवा संयुक्तिकरीत्‍या मुदत ठेव पावती क्रमांक ४९६८४ मधील रक्‍कम रूपये १,५०,०००/- व या रकमेवर दिनांक १७-०७-२०१६ पासुन संपुर्ण रक्‍कम देईपर्यंत द.सा.द.शे. १३ टक्‍के प्रमाणे व्‍याज तक्रारदार क्रमांक ३ व १ यांना द्यावे.

५. सामनेवाले क्र.१ ते १९ यांनी वैयक्तिकरित्‍या किंवा संयुक्तिकरीत्‍या मुदत ठेव पावती क्रमांक ५०८७० मधील रक्‍कम रूपये ५०,०००/- व या रकमेवर दिनांक ०२-१२-२०१६ पासुन संपुर्ण रक्‍कम देईपर्यंत द.सा.द.शे. १३ टक्‍के प्रमाणे व्‍याज तक्रारदार क्रमांक ३ व १ यांना द्यावे.

६. सामनेवाले क्र.१ ते १९ यांनी वैयक्तिकरित्‍या किंवा संयुक्तिकरीत्‍या मुदत ठेव पावती क्रमांक ५०८७१ मधील रक्‍कम रूपये ५०,०००/- व या रकमेवर दिनांक ०२-१२-२०१६ पासुन संपुर्ण रक्‍कम देईपर्यंत द.सा.द.शे. १३ टक्‍के प्रमाणे व्‍याज तक्रारदार क्रमांक ३ व १ यांना द्यावे.

७. सामनेवाले क्र.१ ते १९ यांनी वैयक्तिकरित्‍या किंवा संयुक्तिकरीत्‍या मुदत ठेव पावती क्रमांक ५०९०१ मधील रक्‍कम रूपये ५०,०००/- व या रकमेवर दिनांक २७-१२-२०१६ पासुन संपुर्ण रक्‍कम देईपर्यंत द.सा.द.शे. १३ टक्‍के प्रमाणे व्‍याज तक्रारदार क्रमांक ३ व १ यांना द्यावे.

८. सामनेवाले क्र.१ ते १९ यांनी वैयक्तिकरित्‍या किंवा संयुक्तिकरीत्‍या मुदत ठेव पावती क्रमांक ४५२२७ मधील रक्‍कम रूपये ५०,०००/- व या रकमेवर दिनांक ०७-१२-२०१५ पासुन संपुर्ण रक्‍कम देईपर्यंत द.सा.द.शे. १३ टक्‍के प्रमाणे व्‍याज तक्रारदार क्रमांक २ यांना द्यावे.

९. सामनेवाले क्र.१ ते १९ यांनी वैयक्तिकरित्‍या किंवा संयुक्तिकरीत्‍या मुदत ठेव पावती क्रमांक ४५२४३ मधील रक्‍कम रूपये ५०,०००/- व या रकमेवर दिनांक २६-१२-२०१५ पासुन संपुर्ण रक्‍कम देईपर्यंत द.सा.द.शे. १३ टक्‍के प्रमाणे व्‍याज तक्रारदार क्रमांक २ यांना द्यावे.

१०. सामनेवाले क्र.१ ते १९ यांनी वैयक्तिकरित्‍या किंवा संयुक्तिकरीत्‍या बचत खाते क्रमांक SB/(SB-GEN)/732 मधील शिल्‍लक रक्‍कम रूपये ७,९९३/- व या रकमेवर दिनांक ३१-०३-२०१७ पासुन संपुर्ण रक्‍कम देईपर्यंत द.सा.द.शे. ११ टक्‍के प्रमाणे व्‍याज तक्रारदार क्रमांक ३ व १ यांना द्यावे.

११. सामनेवाले क्र.१ ते १९ यांनी वैयक्तिकरित्‍या किंवा संयुक्तिकरीत्‍या बचत खाते क्रमांक SB/(SB-GEN)/68 मधील शिल्‍लक रक्‍कम रूपये ६,८५७/- व या रकमेवर दिनांक ३१-१२-२०१६ पासुन संपुर्ण रक्‍कम देईपर्यंत द.सा.द.शे. ११ टक्‍के प्रमाणे व्‍याज तक्रारदार क्रमांक २ यांना द्यावे.

१२.  सामनेवाले क्र.१ ते १९ यांनी व्‍यक्तिगतरित्‍या किंवा संयुक्तिकरीत्‍या  तक्रारदार यांना शारीरीक मानसिक त्रासापोटी  प्रत्‍येकी रूपये ५,०००/- व तक्रारीचा खर्च  रूपये ३,०००/- द्यावे. 

१३. वर नमुद आदेशाची पुर्तता सामनेवालेने आदेशाची प्रत मिळाल्‍यापासुन ३० दिवसांचे आत करावी.

१४.  आदेशाची प्रत उभयपक्षांना विनामुल्‍य देण्‍यात यावी.

१५.  सदर प्रकरणाची ‘क’ व ‘ब’ फाईल तक्रारदार यांना परत करण्‍यात यावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.