ग्राहक तक्रार क्र. 60/2015
अर्ज दाखल तारीख : 20/01/2015
अर्ज निकाल तारीख: 13/07/2015
कालावधी: 0 वर्षे 05 महिने 24 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. शेख अख्तर खाजामियॉं,
वय - 60 वर्षे, धंदा – सेवानिवृत्त,
रा.जुना एस.टी.डेपो जवळ,
खाजानगर, उस्मानाबाद,
ता.जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. धनंजय गुंडेराव कुलकर्णी,
वय – 44 वर्षे, धंदा- नौकरी,
शाखाधिकारी तथा वसुली अधिकारी समर्थ
अर्बन को. ऑप. बँक लि. काळया मारुती जवळ, उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री.एस.पी.हराळे.
विरुध्द पक्षकारा विरुध्द एकतर्फा आदेश पारीत.
न्यायनिर्णय
मा.अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा:
अ) तक्रारकर्ता (तक) यांने विरुध्द पक्षकार (विप ) बॅकेने जप्ती मिळकतीचा काढलेला लिलाव घेतला मात्र विप ने मिळकतीचा ताबा दिला नाही म्हणून भरपाई मिळावी म्हणून ही तक्रार दिलेली आहे.
तक चे तक्रारीतील कथन थोडक्यात पूढीलप्रमाणे आहे.
1) तक हा एस.टी. आगार उस्मानाबाद येथे नोकरीला होता व दि.30.09.2013 रोजी निवृत्त झाला. त्यानंतर तक ला खात्याकडून रु.16,00,000/- मिळाले. विप यांनी दि.7.03.2014 रोजी दैनिक सामना या वृत्तपत्रात गणेश नगर उस्मानाबाद येथील सिटी सर्व्हे क्र.47/11 प्लॉट क्र.64 घर क्र.13/24 क्षेत्र 134 चौरस मिटर व त्यावरील आर.सी.सी. बंगला जाहीर लिलावाने विकण्याबाबत प्रगटन दिले. विप हा बॅकेचा शाखाधिकारी तथा वसूली अधिकारी आहे. जाहीराती प्रमाणे झालेल्या दि.11.02.2014 चे जाहीर लिलावास तक हजर राहिला. त्यांने जास्तीत जास्त रु.13,75,000/- बोली बोलली. 15 टक्क्याप्रमाणे रु.2,10,250/- त्याच दिवशी तक ने विप कडे भरले. दि.14.3.2014 रोजी उर्वरित रक्कम रु.11,68,750 /- तसेच खरेदीचा खर्च रु.85,000/- तक ने भरले.
-
-
ब) विप यांना तक्रारीची नोटीस मिळाली. पण विप मंचात हजर झाले नाहीत. दि.25.03.2015 रोजी विप विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आलेला आहे.
-
-
- ? होय
- ? होय.
- ? अंतिम आदेशाप्रमाणे
- कारणमिमांसा
मुद्दा क्र.1 व 2 -
1. सहकार कायदा कलम 101 अन्वये विप बॅकेचे हक्कात त्यातील जबाबदाराकडून रु.5,24,889/- वसूल करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. कलम 156 खाली जिल्हा उपनिबंधक यांनी अधिसूचना काढून विप यांला वसूली अधिकारी म्हणून नेमलेले आहे. दैनिक सामना मध्ये दि.07.01.2014 रोजी जाहीर नोटीस काढून गणेश नगर येथील घर जागा विक्रीची नोटीस काढली. विक्री तारीख दि.11.02.2014 ठेवली. लिलावाचे प्रोसेडींग प्रमाणे तक ने जास्तीत जास्त बोली रु.13,75,000/- बोलली. त्यामुळे लिलाव त्यांचे हक्कात मंजूर करण्यात आला.
2. विप ने तक च्या नांवे खरेदीचा दाखला दिला तो हजर करण्यात आलेला आहे. खरेदी पत्र रजिस्ट्रर झाल्याचे दिसून येते. खरेदी पत्रावर तक यांला जागेचा कब्जा दिला असे नमूद करण्यात आलेले नाही. सिटी सर्व्हे रेकार्ड मध्ये तक चे नांवाची नोंद करण्यात आलेली नाही. विप यांनी हजर होऊन कोणताही बचाव मांडलेला नाही.
3. विप हे वसूली अधिकारी असल्यामुळे त्यांनी तक्रारीतील मिळकत लिलावात काढली. तक ने लिलावात ती मिळकत घेतली व तिचे पैसेही भरले. यामुळे विक्रीचा दाखला विप ने तक चे हक्कात करुन दिला. मात्र विप ने तक ला मिळकतीचा कब्जा दिलेला नाही. मिळकतीचा कब्जा देणे ही विप ची जबादारी आहे. मिळकत विक्री करुन सुध्दा मिळकतीचा कब्जा न देऊन विप ने सेवेत त्रूटी केली आहे. त्यामुळे तक हा अनुतोषास पात्र आहे. म्हणून आम्ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देतो व खालील प्रमाणे आदेश करतो.
आदेश
-
-
-
-
- (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
4) वरील आदेशाची पुर्तता करुन विप यांनी 45 दिवसात तसा अहवाल मा. मंचासमोर
सादर करावा. सदर कामी उभय पक्षकारांनी मंचासमोर हजर रहावे. सदर आदेशाची
पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदार यांनी आदेशाची पुर्तता केली नसल्याबाबत
मंचात अर्ज द्यावा.
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष.
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.