::: नि का ल प ञ:::
मंचाचे निर्णयान्वये किर्ती गाडगीळ (वैदय) मा.सदस्या
१. सामनेवाले यांनी, तक्रारदारांस ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे.
२. अर्जदार हा चंद्रपुर येथिल रहिवासी असुन त्यांची नौकरी गडचिरोली येथे आहे. दिनांक ०६ किंवा ०७ फेब्रुवारी २०१४ रोजी गैरअर्जदार २ यांचे कार्यालयातुन अर्जदाराच्या भ्रमणध्वनीवर गैरअर्जदार कंपनीची माहिती देत सेल्स मॅनेजर निखील कपुर यांचेकउे फोन दिला. मॅनेजर निखील कपुर यांनी कंपनीने Direct to Consumer या योजनेअतर्गंत एक पॉलीसी काढली आहे. त्यामध्ये रक्कम रु. ३५,०००/- प्रती वर्ष सलग पाच वर्ष जमा केल्यास त्यानंतर रक्कम भरावी लागणार नाही. तसेचपाच वर्षानंतर रक्कम दुप्पट होईल, सदर पॉलीसीमध्ये Death & Maturity Benefit असेल पहिल्या वर्षीच्या प्रिमीयम च्या ४० टक्के म्हणजे रक्कम रु. ३५,०००/- पैकीअंदाजे रक्कम रु. १४,०००/- पॉलीसी सुरु झाल्याच्या तारखेपासुन ४५ दिवसाच्या आत परत मिळते, संपुर्ण कुंटूब वैद्यकिय खर्चाच्या प्रतिपुर्तीमध्ये अंतरभुत असले तसेच 80C प्रमाणे आयकर अंतर्गत रक्कम रु. १,००,०००/- बच मर्यादेवर फायदे मिळतील अशी माहिती दिल्याने अर्जदाराने दिनांक ०८.०२.२०१४ रोजी दुपारी १२.०० वाजता गैरअर्जदार अधिकारी यांचे सोबत विमा करार केला व रक्कम रु. ३५,०००/- चा धनादेश व इतर आवश्यक कागदपत्रे व संपुर्ण माहिती अर्जदाराने भरुन दिली. यानंतर २ दिवसांनी गैरअर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या सेल्स मॅनेजर यांचे संपर्कात राहण्यास सांगीतले. मार्च २०१४ मध्ये विमा कागदपत्रे अर्जदारास मिळाले. अर्जदार हा गडचिरोली येथे राहत असल्याने सदर कागदपत्रे मार्च २०१४ च्या शेवटच्या आठवड्यात आयकर सुट संदर्भात पाहिले असताविमा करारामध्ये एकुण कालावधी १० वर्षाचा असुन निश्चीत रक्कम रु. २,३०,४०,०००/- असुन वार्षीक हप्ता ३५,०१०.३९/- ऐवढा होता विमा करार सुरु होण्याची तारीख १७.०२.२०१४ होती व कुमारी मानसी अग्रवाल यांचे नांव विमा अभिकर्ता म्हणुन नमुद करण्यात आले होते. आयकर अंतर्गत कुठलेही फायदे अर्जदारास न मिळाल्याने तसेच रक्कम रु. १४,०००/- जमा न झाल्याने गैरअर्जदार यांना संपर्क साधला असता गैरअर्जदार यांनी दस्ताऐवज पाठविण्यास वेळ लागेल असे सांगीतले. दरम्यान अर्जदाराला IRDA या संस्थेचे कर्मचारी यांनी कपुर यांनी अनेकांना फसविले आहे असे सांगीतल्याने अर्जदाराने सदर विमा करार ताबडतोब रद्दकरण्याबाबत विनंती केली. परंतु सदर करार रद्द होऊ शकत नाही असे गैरअर्जदार यांनी सांगीतले. अर्जदार यांनी दिनांक २२.०४.२०१४ रोजी गैरअर्जदार यांच्या कस्टमर केअरला २ ई-मेल व्दारे तक्रार केली. तरी देखील त्याचे निराकरण झाले नाही. अर्जदार उपरोक्त विमाकरारामध्ये फेब्रुवारी २०१५ पासुन नियमीत मासीक हप्ता भरत असुन स्टेट बॅकेतुन ECS व्दारे कपात होत असुन अर्जदाराचे आर्थीक नुकसान होऊ नये म्हणुन अर्जदार विमा हप्ता भरत आहे. अशाप्रकारे गैरअर्जदार कंपनीने अर्जदाराला खोटी माहिती देवुन सेवेत न्युनता दर्शविलेली आहे
३. सामनेवाले यांना मंचाची नोटीस पाठविली असता, सामनेवाले यांनी तक्रारीतील मुद्द्यांचे खंडन करुन, प्राथमीक आक्षेप घेतला की, अर्जदाराने सदर विमा करार कुमारी मानसी अग्रवाल यांचे सोबत केल्यानेते तक्रारीत आवश्यक पक्ष आहे. विमा अभिकर्ता यांना IRDA यांचे प्रमाणपत्र असल्याने तो त्याच्या सोईप्रमाणे विमा करार करतो, अर्जदार हा विधी स्नातक व्यक्ती असुन अर्जदाराने स्वत: विमा करार केला आहे. व त्यातील सर्व माहिती अर्जदारास कबुल आहे. गैरअर्जदाराने दिलेल्या तोंडी आश्वासनाला काहीही अर्थ नसुन अर्जदार हा ग्राहक कायद्यानुसार त्रुटीपुर्ण सेवासिध्द करण्यास असमर्थ ठरला असल्याने कलम २६ अन्वये तक्रारखर्चासह अमान्य करावी तसेच विमा करार प्राप्त झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत विमा करार रद्द करणे आवश्यक होते. अर्जदारांनी रक्कम रु. ३५,०१०.३९/- प्रती वर्ष प्रमाणे एकुण १० वर्ष भरावयाचे होते परंतु गैरअर्जदाराकडे फक्त २ प्रिमीयमचे रक्कम रु. ७६,९२३/- अदा केलेले आहे. त्यामुळे अर्जदाराचा विमा करार संपुष्टात आला आहे. अर्जदाराची पहिली तक्रार दिनांक २२.०४.२०१४ रोजी प्राप्त झाली. त्याचे उत्तर दिनांक २३.०४.२०१४ रोजी अर्जदारास कळविले आहे. दिनांक २१.०४.२०१५ रोजी अर्जदाराने मासीक विमा हप्ता रक्कम रु. २,९९०/- गैरअर्जदार यांचेकडे जमा केला आहे. अर्जदारास गैरअर्जदार यांच्या विमा कराराच्या सर्व अटी व शर्ती मान्य असुन त्याबाबत आक्षेप घेवुन विमा करार रद्द करणे आवश्यक होते. सदर बाब अर्जदारांनी न केल्याने विमा कराराच्याअटी व शर्ती बाहेर जाऊन कोणतीही कृती करणे न्यायोचीत नसल्याने तक्रार अमान्य करण्यात यावी अशी विनंती गैरअर्जदार यांनी केली आहे. ४. तक्रारदाराची तक्रार कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद, गैरअर्जदार यांचे कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद यांचे अवलोकन केले असता तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहे.
मुद्दे निष्कर्ष
१. तक्रारदार सामनेवाले यांचा ग्राहक आहे काय ? होय
२. सामनेवाले यांनी तक्रारदारास विमा कराराप्रमाणे
सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब
तक्रारदार सिद्ध करतात काय ? नाही
३. सामनेवाले तक्रारदारास नुकसानभरपाई अदा
करण्यास पात्र आहेत काय ? नाही
४. आदेश ? अमान्य
कारण मिमांसा
मुद्दा क्र. १ :
५. अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे तक्रारीत नमुद केलेला विमा करार केलेला आहे. ही बाब उभय पक्षाना मान्य असल्याने व कागदपत्रे तक्रारीत दाखल असल्याने अर्जदार हा गैरअर्जदार क्र. १ व २ चा ग्राहक आहे हि बाब सिध्द होते.सबब अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे, सबब मुद्दा क्र. १ होकारार्थी नोंदविण्यात येतो.
मुद्दा क्र. २ व ३ :
६. अर्जदाराने गैरअर्जदार कंपनीसोबत विमा करार केला होता हि बाब निर्वीवाद आहे. गैरअर्जदारचे प्रतिनिधी अर्जदाराकडे आले असता अर्जदाराने स्वत: विमा फॉर्म भरला ही बाब अर्जदाराने मान्यकेलेली आहे. कागदोपत्री पुराव्यावरुन विमा करारामधील परिच्छेद क्र. १० चे अवलोकन केले असता विमा कराराचा कालावधी १० वर्ष नमुद आहे. अर्जदाराने विमा करारामध्ये चंद्रपुर येथिल पत्ता दिलेला असुन अर्जदाराने विमा करारातीलसर्व अटी व शर्ती मान्य असल्याबाबत स्वाक्षरी केली आहे. अर्जदाराने विमाकराराची प्रत प्राप्त झाल्याबाबतची बाब कबुल केली आहे. त्यामुळे सदर विमा करार प्राप्त झाल्यानंतर १५ दिवसाच्या आत सदर करार रद्द करण्याबाबत योग्य ती न्यायोचीत कार्यवाही अर्जदाराने न केल्याची बाब सिध्द झाल्याने विमा करारातील अटी व शर्ती प्रमाणे गैरअर्जदारांनी अर्जदाराप्रती सेवेत कोणतीही त्रुटी केली नाही ही सिध्द होत असल्याने मुद्दा क्र. २ व ३ चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
मुद्दा क्र. ४ :
६. मुद्दा क्रं. १ ते ३ वरील विवेचनावरुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
आदेश
१. ग्राहक तक्रार क्र. २०/२०१६ अमान्य करण्यात येते.
२. खर्चाबाबत आदेश नाही.
३. न्यायनिर्णयाची प्रत उभय पक्षाना तात्काळ पाठविण्यात यावी.
श्रीमत श्रीमती.कल्पना जांगडे श्री.उमेश वि. जावळीकर श्रीमती. किर्ती गाडगीळ
(सदस्या) (अध्यक्ष) (सदस्या)