ग्राहक तक्रार क्र. : 03/2015
दाखल तारीख : 01/01/2015.
निकाल तारीख : 26/11/2015
कालावधी: 01 वर्षे 10 महिने 26 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. चत्रुभुज तुळजीराम पवार,
वय – 48 वर्षे, धंदा – शेती,
रा.वाशी, ता.वाशी, जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. शाखाधिकारी,
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,
लि. उस्मानाबाद शाखा वाशी, ता.वाशी,
जि. उस्मानाबाद.
2. मुख्य कार्यकारी अधिकारी,
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.
मुख्य शाखा उस्मानाबाद, ता.जि. उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री.बी.बी.देशमुख.
विरुध्द पक्षकारा क्र.1 व 2 तर्फे विधीज्ञ : श्री.एस.पी.दानवे.
न्यायनिर्णय
मा.अध्यक्ष, श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे द्वाराः
1) विरुध्द पक्षकार (विप) बँकेकडे मुदत ठेव ठेवली असतांना मुदत ठेवल्यानंतर रक्कम परत न देऊन सेवेत त्रुटी केली म्हणून तक्रारकर्ता (तक) यांनी हि तक्रार दिली.
तक चे तक्रारीतील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे.
2) तक ने विप कडे मुदत ठेव ठेवली होती. तक चे विप कडे बचत खाते क्रमांक 13834 असे आहे. ठेवीची मुदत ठेवल्यानंतर विप ने तक ला ती रक्कम देणे जरुर होते. विप ने ती रक्कम बचत खात्यामध्ये दि.18/11/2014 रोजी जमा केली. तक ला आपल्या मुलीचे लग्नासाठी रकमेची आवश्यकता होती. परंतु विप ने तक ला रक्कम दिली नाही व सेवेत त्रुटी केली. तक ने विप ला दि.01/12/2014 रोजी नोटीस पाठवली. विप ने पुर्तता केली नाही म्हणून तक ने ही तक्रार दि.01/01/2015 रोजी दाखल केली.
3) तक ने तक्रारीसोबत पासबुक नोटीस ची स्थळप्रत व पोष्टाची पावती इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
4) विप ने हजर होऊन दि.09/04/2015 रोजी लेखी म्हणणे दिलेले आहे. तक चे खाते असल्याचे मान्य आहे. विप ने उडवाउडवीची व बेजबाबदार उत्तरे दिली हे अमान्य आहे. तक ला मुदत ठेवीमध्ये पुर्नगुंतवणूक करणेबाबत विनंती करण्यात आली होती. विप च्या अडचणीबद्दल त्याला अवगत करण्यात आले होते. विप वर प्रशासकाची नियुक्ती झाली आहे. कारण बँक अडचणीत आली आहे. त्यामुळे तक ची रक्कम देण्यास विप ला सुयोग्य हप्ते मिळावे.
5) तक ची तक्रार त्यानी दिलेली कागदपत्रे व विप चे म्हणणे यांचे अवलोकन करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात. त्यांची उत्तरे आम्ही त्यांचे समोर खाली दिलेल्या कारणांसाठी लिहिली आहे.
मुद्दे उत्तरे
1) विप ने सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय.
2) तक अनुतोषास पात्र आहे काय ? होय.
3) आदेश कोणता ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमिमांसा
मुद्दा क्र. 1 व 2
6. तक ने विप कडे मुदत ठेव ठेवली होती व ठेवीची मुदत संपलेली आहे हे तक चे म्हणणे विप ने अमान्य केलेले नाही. ठेवीची रक्कम विप ने तक च्या बचत खात्यामध्ये हस्तांतरीत केली हे म्हणणे सुध्दा विप ने अमान्य केले नाही. बचत खात्याचे पासबुक पाहता शिल्लक रु.16,904/- होती. दि.18/11/2014 रोजी रक्कम रु.4,04,500/- जमा दाखवली आहे. ती रक्कम मुदत ठेवीची असावी. तक ने असा स्पष्टपणे उल्लेख केला नाही, त्यानंतर शिल्लक रु.4,21,404/- झाली. तक ने विप कडे त्या रकमेची मागणी केली. त्याबद्दल नोटीस पाठवल्याचे दिसते. विप ने आपली अडचण असल्याचे म्हंटले आहे. मात्र संचालक अगर अधिकारी यांचे दुष्कृत्यामुळे विप अडचणीत असेल तरी त्याचा तोटा ठेवीदारांनी सोसणे योग्य नाही. विप ने ठेवीदारांची रक्कम परत दिलीच पाहिजे. तसे न करुन विप ने सेवेत त्रुटी केली आहे. म्हणून आम्ही मुद्दा क्र.1 व 2 च उत्तर होकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
तक ची तक्रार खालीलप्रमाणे मंजूर करण्यात येते.
1) विप यांनी तक ला रक्कम रु.4,21,404/- (रुपये चार लक्ष एकवीस हजार चारशे चार फक्त) जे की बचत खात्यावरील एकूण जमा रक्कम आहे. त्यावर सदर रक्कम बचत खात्यावर जमा झालेल्या तारखेपासून म्हणजेच दि.18/11/2014 पासून नियमानुसार बचत खात्याचे व्याज द्यावे.
2) सदर रक्कम ही एकत्रितरित्या तक्रारदारास एक महिन्याच्या आत द्यावी न दिल्यास त्यावर त्या नंतरच्या कालावधीसाठी सदरची रक्कम प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंत 9 टक्के व्याज राहील.
3) विरुध्द पक्षकार यांनी तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी व कागदपत्राच्या
(तक्रारीच्या) खर्चापोटी रु.2,000/- (रुपये दोन हजार फक्त) द्यावे.
4) वरील आदेशाची पुर्तता करुन विप यांनी 45 दिवसात तसा अहवाल मा. मंचासमोर
सादर करावा. सदर कामी उभय पक्षकारांनी मंचासमोर हजर रहावे. सदर आदेशाची
पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदार यांनी सदरबाबत मंचात अर्ज द्यावा.
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (मा.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.