::: आ दे श :::
( पारित दिनांक : ३०/०१/२०१५ )
आदरणीय अध्यक्षा, मा.सौ.एस.एम.उंटवाले, यांचे अनुसार : -
१. ग्राहक संरक्षण कायदा १९८६ चे, कलम : १२ अन्वये, सादर करण्यात
आलेल्या, सदर तक्रार प्रकरणातील मजकूर, थोडक्यात आढळून येतो तो येणेप्रमाणे,
..२.. तक्रार क्र.०२/२०१४
तक्रारकर्ते हे वाशिम ता.जि.वाशिम येथील रहीवाशी असुन, दि.२३.१२.२०१२ रोजी वेळ ३.४५ वाजता ट्रक क्र.MH -३७-B१३४४ चा चालक वाशिम वरुन कोल्हापूरला जात होता. जेव्हा ट्रक हा औसा तुळजापूर रोडवर सिंडला शिवार जवळ पोचला त्यावेळस विरुध्द दिशेने ट्रक क्र.MH -२६-H ७६६९ येत होता. त्यावेळेस दोन्ही ट्रक आपसात धडकले. या अपघातामध्ये ट्रक क्र.MH -३७-B १३४४ चे भरपुर नुकसान झाले. सदर ट्रक पूर्णता: नादुरुस्त झाले. तसेच ट्रक क्र.MH -३७-B १३४४ चा चालक अपघातामध्ये मरण पावला. ट्रकचे समोरील भाग,काच इंजिन, क्याबीन, स्टेरीग, ट्रोली इत्यादी नुकसान झाले.
तक्रारकर्त्यानी ट्रकचा विमा, विरुध्दपक्ष विमा कंपनीकडे काढलेला होता. त्याची पॉलीसी क्र. १८२२०२/३१/२०१३/१७ असुन विमा कालावधी दि. ०२.०४.२०१२ ते ०१.०४.२०१३ पर्यंत आहे. त्याची नुकसान भरपाई रु.४,००,०००/- रिक्स कवर आहे.
सदर ट्रकची नुकसान भरपाई मिळण्या करिता तक्रारकर्त्याने पूर्ण कागदपत्रासह क्लेम फॉर्म भरुन अर्ज केलेला आहे. तसेच वेळोवेळी केलेल्या कागदपत्राची सुध्दा पूर्तता केलेली आहे. तक्रारकर्ते अनेकवेळा प्रत्यक्ष विमा कंपनीमध्ये शाखाधिकारी यांना सुध्दा भेटले. परंतू आजपर्यंत विमा कंपनीने तक्रारकर्त्यास विमा लाभ न देता फक्त टाळाटाळ केली आहे.
तक्रारकर्त्याच्या ट्रकचे पूर्ण नुकसान झालेले आहे. तक्रारकर्ते यांचे ट्रक लातूर येथून उचलून दुस-या वाहनातून आणण्याचे काम पडले. तक्रारकर्त्याने अपघाताची माहिती दिली. श्री.एस.व्ही.कुलकर्णी (सर्व्हेअर) ने दि. २५.१२.२०१२
..३.. तक्रार क्र.०२/२०१४
रोजी सर्व्हे रिपोर्ट पाठवीला. त्या रिपोर्ट मध्ये सर्व्हेअरने टोटल लॉस दाखवले आहे.
विम्याचा लाभ घेण्याकरीता तक्रारकर्त्याने विमा कंपनीकडे सर्व कागदपत्रासह अर्ज केला होता. तसेच विमा कंपनीला नोटीस सुध्दा हया अगोदर दिली आहे परंतू कंपनी हि तक्रारकर्ता याच्या हिताचा विचार न करता फक्त नफा कमविण्यासाठी व्यवसाय करीत आहे. व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करीत आहे. विरुध्दपक्षाकडून आजपर्यंत तक्रारकर्ते यांना कोणताही लाभ न मिळाल्यामूळे सदर तक्रार वि.न्यायमंचामध्ये दाखल करावी लागत आहे.
तरी तक्रारकर्त्याची विनंती आहे की, सदर तक्रार मंजुर करुन ट्रकची नुकसान भरपाई रु.४,००,०००/- तसेच तक्रार दाखल केल्यापासुन १८ % द.सा.द.शे.व्याज देण्यात यावे तसेच शारिरीक, मानसिक,आर्थिक त्रासाबद्दल रु.१००००/- व तक्रार खर्च रु.५०००/- विरुध्दपक्षाकडून देण्यात यावेत.
सदर तक्रार तक्रारकर्ते यांनी शपथेवर दाखल केलेली असुन त्या सोबत एकुण ११ दस्ताऐवज पुरावे म्हणुन दाखल केलेले आहे.
२) विरुध्द पक्षाचा लेखी जवाब ः- सदर तक्रारीची मंचा तर्फे नोटिस प्राप्त झाल्या नंतर विरुध्दपक्षाने त्यांचा लेखी जवाब सादर करुन तक्रारकर्त्याचे सर्व कथन फेटाळुन अधिकच्या कथनात असे नमुद केले आहे की,
तक्रारकर्त्याने सदर विमा दावा संबंधी आवश्यक ती कागदपत्रे त्याला वारंवार कळवूनही विमा कंपनीला आजपर्यंत पुरविलेली नाही. त्यासंबंधी विमा कंपनीने तक्रारकर्त्यास दि. ०३.०९.२०१३ व ०३.१०.२०१३ रोजी आवश्यक कागदपत्रे पाठविण्याबद्दल पत्र पाठविले परंतु तक्रारकर्त्याने आजपर्यंत विमा
..४.. तक्रार क्र.०२/२०१४
कंपनीला कागदपत्रे पुरविली नाही. तसेच विमा कंपनीने तक्रारकर्त्याचा दावा नाकारला नसल्यामूळे कथीत तक्रार मुदतपुर्व असल्यामूळे प्रतिपालनीय नाही.
विरुध्दपक्षाचे असेही म्हणणे आहे की, विरुध्दपक्षाने व्ही.एस.कुलकर्णी (सर्व्हेअर) यांची नियुक्ती फक्त स्पॉट सर्व्हेअर म्हणून केली होती. तसेच स्पॉट सर्व्हे केल्यानंतर त्यांनी देखील तक्रारकर्त्यास व सर्व्हे रिपोर्ट मध्ये Not to dismantle any parts of IV till the final survey to enable the final surveyor to assess the exact loss असे स्पष्टपणे म्हटले आहे. तरी देखील तक्रारकर्त्याने आपले वाहन फायनल सर्व्हेअर च्या वाहन तपासणीपूर्वीच अपघातग्रस्त वाहन pre-dismantle केले आहे. श्री. व्ही.एस.कुलकर्णी (सर्व्हेअर) यांची नियुक्ती फक्त स्पॉट सर्व्हेअर म्हणुन केली होती. तसेच त्यांनी आपल्या सर्व्हे रिपोर्टमध्ये टोटल लॉस बद्दल कुठेही सांगीतलेले नाही. तसेच गाडीची किंमत ठरविण्याचे काम स्पॉट सर्व्हेअरचे नसुन ते विमा कंपनीव्दारे नियुक्त केलेल्या फायनल सर्व्हेअरचे आहे.
तक्रारकर्त्याने वाहनाचे pre-dismantle केल्यानंतर ही विमा कंपनीने श्री.प्रविण जी.मोहता (IRDA Licensed Surveyor) यांची वाहनाची Assessment Value ठरविण्यासाठी फायनल सर्व्हेअरची नियुक्ती केली असुन त्यांच्या सर्व्हे रिपोर्टनुसार वाहन दुरुस्त होवू शकते. विमा कंपनीच्या पॉलीसीधील शर्ती व अटीनुसार सर्व खर्च वजा जाता सर्व्हेअर ने आपल्या रिपोर्टमध्ये रु.१,५०,०००/- वाहनाची किंमत ठरविली आहे.
विमा पॉलीसीच्या अटी व शर्तीनुसार जर विमा कंपनीने इंन्शुरन्स पॉलिसीमध्ये ठरविलेल्या वाहनाच्या किंमतीपेक्षा ७५ %पेक्षा जास्त वाहनाचे
..५.. तक्रार क्र.०२/२०१४
नुकसान झाले असेल तरच Total Loss देता येते. तसेच जर वाहनाचे ७५ % पेक्षा कमी असेल तर वाहनांच्या दुरुस्तीनुसार वाहनाची किंमत ठरविल्या जाते.
सर्व्हेअर मोहता यांनी वाहनाची ठरविलेल्या किंमतीबद्दल तक्रारकर्त्यास कळविले असुन, त्यासंबंधी वाहन दुरुस्ती करुन विमा कंपनीत बिल दाखल करण्यास सांगीतले असता तक्रारकर्ता हा अवास्तव व अवाजवी नुकसान भरपाईची मागणी करीत आहे व ट्रक दुरुस्त करण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे तक्रारकर्ता हा अवास्तव नुकसान भरपाई वि.मंचाकडे मागणी करीत आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याचा दावा खर्चासह खारीज करण्यात यावा.
3) कारणे व निष्कर्ष ः-
या प्रकरणातील तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्दपक्षाचा लेखी जबाब,
उभयपक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, तसेच उभयपक्षांचा लेखी युक्तीवाद व विरुध्दपक्षाने दाखल केलेले न्याय निवाडे यांचे मंचाने काळजीपूर्वक अवलोकन करुन पूढील निष्कर्ष कारणे देऊन आदेश पारित केला तो येणे प्रमाणे.
या प्रकरणात उभय पक्षांना मान्य असलेल्या बाबी अश्या आहेत की, तक्रारकर्त्याचा ट्रक क्र.MH-३७-B १३४४ चा विमा विरुध्दपक्षाकडे दि. ०२.०४.२०१२ ते ०१.०४.२०१३ पर्यंत काढलेला असून त्याची IDV रक्कम रु.४,००,०००/- आहे सदरहु ट्रकचा दि.२३.१२.२०१२ रोजी अपघात झाला व या अपघाताचा स्पॉट सर्व्हे विरुध्दपक्षाचे सर्व्हेअर श्री.व्ही.के.कुलकर्णी यांचे मार्फत केला गेला होता.
तक्रारकर्त्याच्या मते श्री.कुलकर्णी यांच्या रिपोर्ट मध्ये सदरहू वाहनाचा टोटल लॉस दर्शवून नुकसान भरपाई दर्शविलेली आहे,त्यामुळे विरुध्दपक्षाकडून रु.४,००,०००/- ही रक्कम व्याजासहीत तक्रारकर्त्यास द्यावी. विरुध्दपक्षाने जे
..६.. तक्रार क्र.०२/२०१४
दस्तऐवज रेकॉर्डला दाखल केले आहे त्यामध्ये श्री.कुलकर्णी यांचा सर्व्हे रिपोर्ट दाखल आहे परंतू त्या रिपोर्टमध्ये सर्व्हेअरने टोटल लॉस दाखविलेला नसून त्या स्पॉट सर्व्हे रिपोर्टमध्ये असे नमूद केले होते की, “Not to dismantle any parts of IV till the final survey to enable the final surveyor to assess the exact loss”
विरुध्दपक्षाने दाखल केलेल्या दस्तऐवजावरुन असा बोध होतो की, विरुध्दपक्षाने सदरहू वाहनाचा फायनल सर्व्हे करण्याकरिता श्री.प्रविण जी.मोहता यांची नियुक्ती केली होती व त्यांच्या दाखल सर्व्हे रिपोर्ट नुसार त्यांनी आपल्या रिपोर्ट मध्ये सॅलवेज व्हॅल्यू वजा जाता रु. १,५०,०००/- इतकी वाहनाची किंमत ठरविली आहे. तक्रारकर्त्याने त्यांच्या लेखी युक्तीवादात या फायनल सर्व्हे रिपोर्ट बद्दल कोणतेही कथन केलेले नाही. तसेच या सर्व्हेअरचा सर्व्हे रिपोर्ट मंचाने का स्वीकारु नये ? याबद्दल देखील ठोस कारण मंचा समोर ठेवले नाही. त्यामूळे विरुध्दपक्षाने दाखल केलेल्या न्यायनिवाडयांनुसार या फायनल सर्व्हेअरच्या सर्व्हे रिपोर्ट मधील वाहन नुकसान भरपाईची किंमत मंचाने मान्य केली आहे. विरुध्दपक्षाने दाखल केलेल्या दस्त ऐवजांवरुन असा बोध होतो कि, तक्रारकर्त्याने सदरहू अपघातग्रस्त वाहन फायनल सर्व्हेअरच्या तपासणी पुर्वीच प्री-डिसमेंटल केले होते. त्यामुळे देखील तक्रारकर्त्याची रु.४,००,०००/- नुकसान भरपाई मिळण्याबद्दलची मागणी मान्य करता येणार नाही.
सबब अंतिम आदेश पारित केला. तो येणे प्रमाणे
अंतिम आदेश
१. तक्रारकर्ते यांची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
२. विरुध्दपक्षाने तक्रारकर्ते यांचे अपघात ग्रस्त वाहन ट्रक क्र.MH -३७-
..७.. तक्रार क्र.०२/२०१४
B १३४४ च्या विमा नुकसान भरपाई पोटी फायनल सर्व्हेअरने नमूद केलेली रक्कम रु. १,५०,०००/- (अक्षरी एक लाख पन्नास हजार) इतकी द.सा.द.शे. ९% व्याज दराने दिनांक २८.०१.२०१४ (प्रकरण दाखल दिनांक) पासुन तर प्रत्यक्ष रक्कम अदाई पर्यंत व्याजासहीत तक्रारकर्त्याला द्यावी.
३. विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाई पोटी व प्रकरणाचा न्यायीक खर्च मिळून एकत्रीत रक्कम रु. १०,०००/- (अक्षरी दहा हजार) तक्रारकर्त्याला द्यावी
४. विरुध्दपक्ष यांनी सदर आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासुन ४५ दिवसाचे आत करावे.
६. उभयपक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
मा.सौ.एस.एम.उंटवाले,
अध्यक्षा
मा.श्री.ए.सी.उकळकर, मा.श्रीमती.जे.जी.खांडेभराड,
सदस्य सदस्या
दि�. ३०.०१.२०१५
स्टेनो/गंगाखेडे