निकाल
दिनांक- 02.06.2014
(द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष)
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2) सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदार यांना
कापसाची नुकसान भरपाई रक्कम रु.9,24,755/-(अक्षरी रुपये
नऊ लाख चौविस हजार सातशे पच्चावन फक्त) निकाल
कळाल्यापासून 30 दिवसांचे आंत दयावेत, न दिल्यास
तक्रार दाखल दि.12.03.2013 पासून पुर्ण रक्कम वसुल होईलपर्यत
द.सा.द.शे 10 टक्के व्याज दराने संपूर्ण रक्कम दयावी.
3) सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदार यांना शारिरीक
व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारीच्या
खर्चापोटी रककम रु.5,000/- दयावेत.
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड