::: निकालपत्र :::
(घोषित द्वारा: श्री.अजय भोसरेकर, मा.सदस्य.)
तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
तक्रारदार हा बोडका ता. लातूर येथील रहिवाशी असून, तक्रारदाराच्या मालकीचा आयशर टेम्पो क्र. एम.एच.24 / जे.5189 याचा विमा सामनेवाला यांच्याकडून दि. 01.10.2010 ते 30.09.2011 या कालावधीसाठी रक्कम रु. 16288/- चा हप्ता भरणा करुन रक्कम रु. 7,32,456/- चे विमा संरक्षण घेतला होता.
दि. 23.08.2011 रोजी रात्री 10.00 च्या सुमारास मालाने भरलेला सदर टेम्पो चोरी गेला. सदर चोरीची सुचना सामनेवाला यांना दिली व पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा केला. त्यानंतर अ-समरी न्यायालयाने मंजुर केली. तक्रारदाराने सामनेवाला यांना दि. 26.12.2012 रोजी सदर वाहन चोरी गेल्याची माहिती देवुन नुकसान भरपाईची मागणी केली. सामनेवाला यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही, म्हणुन तक्रारदाराने सामनेवाला यांना दि. 10.01.2013 रोजी कायदेशीर नोटीस पाठवली. सदर नोटीसचे उत्तर दिले नाही म्हणुन तक्रारदाराने सदर तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे. तक्रारदाराने चोरी गेलेल्या वाहनाची रक्कम रु. 7,32,456/- त्यावर घटनेच्या तारखे पासुन 12 टक्के व्याज, शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु. 10,000/- , नोटीसचा खर्च रु. 1000/- , तक्रारीचा खर्च रु. 2000/- , वाहतुक खर्चरु. 5000/- मिळण्याची मागणी केली आहे.
तक्रारदारोन आपले तक्रारीचे पुष्टयर्थ शपथपत्र व एकुण 15 कागदपत्रे दाखल केली आहेत.
सामनेवाला यांना न्यायमंचाची नोटीस प्राप्त असून, त्यांचे लेखी म्हणणे दि. 17.02.2014 रोजी दाखल झाले आहे. त्यांनी तक्रारदाराच्या चोरी गेलेल्या वाहनाचा विमा घेतल्याचे मान्य केले असून, तक्रारदाराचे दि. 23.08.2011 रोजी वाहन चोरीला गेले असतांना, तक्रारदाराने दि. 26.12.2012 पर्यंत कोणतीही सुचना आम्हास दिली नाही. दि. 26.12.2012 रोजी तक्रारदाराने नोंदणीकृत टपालाद्वारे एका पत्राने चोरी गेलेल्या गाडीच्या रक्कमेची मागणी केली.
तक्रारदाराने एफ.आय.आर. करण्यासाठी 2 दिवस उशीर केला असून, विमा कंपनीच्या अटी व नियमानुसार वाहन चोरी गेल्या बरोबर त्वरीत विमा कंपनीस कळवणे बंधनकारक असतांना, तक्रारदाराने दि. 26.12.2012 पर्यंत कधीही आम्हास वाहन चोरी गेल्या बाबत सुचना केलेली नाही. त्यामुळे तक्रारदाराचा विमा प्रस्ताव न देवुन आम्ही कोणतीही सेवेत त्रूटी केली नसल्या कारणाने तक्रारदाराची तक्रार रु. 10,000/- खर्चासह खारीज करावी, अशी मागणी केली आहे.
तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, सोबतची कागदपत्रे , सामनेवाला यांनी दाखल केलेले लेखी म्हणणे आणि सामनेवाला यांनी दि.20.03.2015 रोजी केलेला तोंडी युक्तीवाद व तक्रारदाराने दि. 23.03.2015 रोजी केलेला तोंडी युक्तीवाद यांचे बारकाईने अवलोकन केले असता, तक्रारदाराने दाखल केलेल्या कागदपत्रात सामनेवाला यांनी दि. 27.12.2012 रोजी तक्रारदारास विमा प्रस्ताव नाकारल्याचे कळवले असल्याचे पत्र तक्रारदाराने सदर तक्रारीत उल्लेख केलेला नाही.
सामनेवाला यांनी दि. 26.12.2012 पर्यंत तक्रारदाराने वाहन चोरी तारीख 23.08.2011 पासुन कधीही कळवले नाही, या म्हणण्यावर कोणतीही हरकत घेतलेली नाही. म्हणजे तक्रारदाराने विमा कंपनीच्या नियम व अटी नुसार घटना घडल्या पासुन त्वरीत कळवणे आवश्यक असतांना ते कळवले नाही. सामनेवाला यांनी तक्रारदारास दि. 27.12.2012 रोजी पत्राद्वारे वाहन चोरी गेलेल्या तारखेपासुन 14 दिवसाच्या आत माहिती देणे आवश्यक आहे असे कळवले, तक्रारदारास सदर पत्र मिळाले आहे. तक्रारदाराची गाडी दि. 23.08.2011 रोजी चोरी गेली असून, तक्रारदाराने सामनेवाला यांना दि. 26.12.2012 रोजी कळवले असल्याचे म्हटले आहे, म्हणजेच तक्रारदाराने सामनेवाले यांना 1 वर्ष 4 महिने उशिरा वाहन चोरी गेल्याची माहिती दिली आहे. हे तक्रारदाराने अप्रत्यक्षपणे मान्य केले आहे.
सामनेवाला यांनी मा. राष्ट्रीय आयोग यांचे निकालपत्र 3719/2011 ता. 03 जुलै 2012, 2683/2012 दि.16.04.2013, 2534/2012 चे दि. 7 नोव्हेंबर 2012 , 3548,3539/2013 चे दि. 13 जानेवारी 2014 चे निकालपत्र दाखल केले आहेत. सदर निकालपत्रांचे बारकाईने अवलोकन केले असता, सामनेवाला यांनी तक्रारदाराचा विमा प्रस्ताव मंजर न करुन, सेवेत त्रूटी केली आहे हे सिध्द करणारे कोणतेही पुरावा कायदयानुसार योग्य असणारे असे पुरावे तक्रारदाराने दाखल केले नसल्यामुळे तक्रारदाराची तक्रार रद्द करणे योग्य व न्यायाचे होईल, असे या न्यायमंचाचे मत आहे.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार रद्द करण्यात येत आहे.
- खर्चा बाबत कोणतेही आदेश नाहीत.