Maharashtra

Chandrapur

CC/13/157

Vishwanath Madhav Bankar Age76 - Complainant(s)

Versus

Branch Manager, M/s. Chandrapur Janta Nagri Sah. Patsanstha Maryadit. - Opp.Party(s)

Adv. Linge

12 Sep 2017

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL FORUM
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/13/157
 
1. Vishwanath Madhav Bankar Age76
Jod Deool, Pathanpura Ward Dist. Chandrapur
...........Complainant(s)
Versus
1. Branch Manager, M/s. Chandrapur Janta Nagri Sah. Patsanstha Maryadit.
Pathanpura Ward, Chandrapur
2. Prabhakar Pandurang Channe, President, M/s. Chandrapur JantaNagri Sah. Pat Sanstha Maryadit
Pathanpura Ward
Chandrapur
3. Lalitabai Panjabrao Kamble, Dy. Presidend, M/s. Chandrapur Janta Nagri Sah. Patsanstha Maryadit
Pathanpura Ward
Chandrapur
4. Sanjay Murlidhar Pavanikar, Secretary, M/s. Chandrapur Janta Nagri Sah. Patsanstha Maryadit
Pathanpura Ward
Chandrapur
5. Subhash Pandurang Tekam, Director, M/s. Chandrapur Janta Nagri Sah. Patsanstha Maryadit
Pathanpura Ward
Chandrapur
6. Laxman Chide, Director, M/s. Chandrapur Janta Nagri Sah. Patsanstha Maryadit
Pathanpura Ward
Chandrapur
7. Vijay Kavduji Urkunde,Director, M/s. Chandapur Janta Nagri Sah. Patsanstha Maryadit
Pathanpura Ward
Chandrapur
8. Shankar R. Garpalliwar, Director, M/s. Chandrapur Janta Nagri Sah. Patsanstha Maryadit
Pathanpura Ward
Chandrapur
9. Nitin S. Akojwar, Director, M/s. Chandrapur Janta Nagri Sah Patsanstya Maryadit
Pathanpura Ward
Chandrapur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. UMESH V.JAWALIKAR PRESIDENT
 HON'ABLE MRS. Kirti Gadgil (Vaidya) MEMBER
 HON'BLE MRS. MRS.Kirti Gadgil Vaidya MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 12 Sep 2017
Final Order / Judgement

::: नि का ल प ञ:::

(मंचाचे निर्णयान्‍वये,  मा. सौ. किर्ती गाडगीळ (वैदय) )

(पारीत दिनांक :- १२/०९/२०१७)

1. अर्जदार हा चंद्रपूर येथील रहिवासी असून गरअर्जदारक्र.1 ही पतसंस्‍था व गैरअर्जदार क्र.2 ते 9 हे तिचे पदाधिकारी आहेत. गैरअर्जदार पतसंस्‍थेच्‍या बचत योजना व आवर्त ठेव योजनांमधील आश्‍वासनांवर विश्‍वास ठेवून अर्जदाराने त्‍याची जमा पूंजी विरूध्‍द पक्ष क्र.1 यांच्‍याकडे खालीलप्रमाणे गुंतविली.

अ.क्र.

मुदतठेव प्रमाणपत्र क्रमांक

दिनांक

भरलेली रक्‍कम

मुदत संपल्‍याचा

दिनांक

मिळणारी रक्‍कम

1.

1454

11/4/2012

73,390/-

11/4/2013

82,197/-

2.

1455

29/6/2012

73,390/-

29/6/2013

82,197/-

3.

1456

29/6/2012

73,390/-

29/6/2013

82,197/-

4.

1457

28/4/2012

39,577/-

28/4/2013

44,326/-

5.

1497

29/6/2012

14,678/-

29/6/2013

16,439/-

6.

1498

29/6/2012

58,712/-

29/6/2013

65,757/-

7.

1499

10/7/2012

73,398/-

20/7/2013

82,197/-

8.

1500

10/7/2012

73,390/-

10/7/2013

82,197/-

 

सदर गुंतवणुकींची मुदत संपल्‍यानंतर परिपक्‍वता रक्‍कम देण्‍याचे गैरअर्जदार यांनी वचन दिले होते. परंतु मुदतीनंतर मागणी करूनही अर्जदाराला गैरअर्जदारांकडून परिपक्‍वता रक्‍कम मिळाली नाही. सबब अर्जदाराने दिनांक 19/10/2013 रोजी गैरअर्जदारांना लेखी पत्र पाठवून रकमेची मागणी केली. परंतु गैरअर्जदारांनी रक्‍कम परत न करून अर्जदारांस सेवा पुरविण्‍यात कसूर केल्‍याने प्रस्‍तूत तक्रार मंचात दाखल केली आहे.

2. तक्रारकर्त्‍याने विनंती केली आहे की गैरअर्जदार क्र.1 ते 9 यांच्‍याकडून मुदत ठेवीची एकूण रक्‍कम रू.5,37,507/- त्‍यावर द.सा.द.शे. 12 टक्‍के व्‍याजासह परत मिळावी तसेच शारिरीक व मानसीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च तक्रारकर्त्‍याला देण्‍याबाबत आदेश व्‍हावेत.

 

३. गैरअर्जदार क्र.1 ते 9 यांना मंचाचा नोटीस पाठविण्‍यांत आला. परंतु सर्व गैरअर्जदार क्र.1 ते 9 यांना नोटीस प्राप्‍त होवूनदेखील ते मंचात उपस्‍थीत न झाल्‍याने दि.17/2/2014 रोजी त्‍यांच्‍याविरूध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश नि.क्र.1 वर पारीत करण्‍यांत आला. गैरअर्जदार क्र.1 ते 9 यांच्‍याविरूध्‍द पारीत करण्‍यांत आलेला एकतर्फी कारवाईचा आदेश आजतागायत अबाधीत आहे.

 

4. तक्रारदारांची तक्रार, दस्‍ताऐवज, शपथपत्र, तसेच तक्रारदाराचा तक्रारअर्ज व शपथपत्र लेखी युक्‍तीवाद समजण्‍याबाबत दाखल केलेली पुरसीस यांचे अवलोकन केले असता तक्रार निकालकामी खालील मुद्दे तयार करण्‍यांत येतात.

मुद्दे                                               निष्‍कर्ष

 

1)    तक्रारकर्ता विरूध्‍द पक्षांचा ग्राहक आहे काय ?                       :  होय  

2)    विरूध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याप्रती अनुचित व्‍यापार पध्‍दतीची        :  होय     

      अवलंब केला आहे काय ? 

3)    विरूध्‍द पक्षाने तक्रारकर्ता प्रति न्‍युनता पूर्ण सेवा दिली आहे

      काय ?                                                :  होय

4)    तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्‍यास पाञ आहे काय ?  :  अंतिम आदेशाप्रमाणे.

 

कारण मिमांसा

मुद्दा क्रं. 1  ः- 

5. तक्रारकर्त्‍याने वरील विवरणात नमूद केल्‍यानुसार रकमा गैरअर्जदार पतसंस्‍थेत जमा केल्‍या आहेत ही बाब तक्रारकर्त्‍याने प्रकरणात दाखल केलेल्‍या मुदतीठेव प्रमाणपत्रांवरून सिध्‍द होत आहे. त्‍यामुळे तक्रारकर्ता हा गैरअर्जदार क्र.1 ते 9 यांचा ग्राहक आहे असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्‍तर हे होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

मुद्दा क्रं. 2 व 3  ः- 

6. तक्रारकर्त्‍याने वरील विवरणात नमूद केल्‍यानुसार रकमा गैरअर्जदार पतसंस्‍थेत जमा केल्‍या बाबतची मुदतीठेव प्रमाणपत्रे प्रकरणात दाखल केली असून सदर प्रमाणपत्रांवर गैरअर्जदार संस्‍थेचे अध्‍यक्ष, सचीव व व्‍यवस्‍थापक यांच्‍या स्‍वाक्ष-या आहेत. सदर सर्व मुदती ठेवीं प्रमाणपत्रांचे अवलोकन केले असता सर्वच मुदतीठेवी विवरणांत दर्शविलेल्‍या दिनांकांना परिपक्‍व झाल्‍याचे निदर्शनांस येते. मात्र परिपक्‍वता तिथीनंतरदेखील गैरअर्जदार पतसंस्‍थेने अर्जदाराला मुदतीठेवींची परिपक्‍वता रक्‍कम मागणी करूनही दिलेली नाही असे अर्जदाराने शपथत्रावर नमूद केले आहे. गैरअर्जदार क्र.1 ते 9 यांनी मंचासमक्ष येवून वा लेखी उत्‍तर दाखल करून तक्रारकर्त्‍याचे वरील म्‍हणणे नाकबूल केलेले नाही. त्‍यामुळे गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या मुदतीठेवींच्‍या रकमा परिपक्‍वता तिथीनंतरदेखील परत केलेल्‍या नाहीत व अर्जदाराप्रती अनुचीत व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब करून त्‍याला त्रुटीपूर्ण सेवा दिली आहे हे अर्जदाराचे म्‍हणणे ग्राहय धरण्‍यायोग्‍य आहे असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्रं. 2 व 3 चे उत्‍तर हे होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

मुद्दा क्रं. 4  ः- 

7. गैरअर्जदार यांनी अर्जदाराप्रती अनुचीत व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब करून त्‍याला न्‍युनतापूर्ण्‍ सेवा दिली हे सिध्‍द होत असल्‍यामुळे मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

अंतीम आदेश

            (1) अर्जदाराची तक्रार क्र.157/2013 अंशतः मंजूर करण्‍यात येते.

 

            (2) गैरअर्जदार क्र.1 ते 9 यांनी वैयक्तिक वा संयुक्‍तरीत्‍या वरील विवरणातील नमूद मुदतीठेवींच्‍या परिपक्‍वता रकमा, संबंधीत मुदत ठेवींच्‍या परिपक्‍वता दिनांकापासून अर्जदारास रक्‍कम प्राप्‍त होईपर्यंत त्‍यावर द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने व्‍याजासह अर्जदारांस परत कराव्‍यात.  

(3) गैरअर्जदार क्र.1 ते 9 यांनी वैयक्तिक वा संयुक्‍तरीत्‍या अर्जदारांस शारिरीक व मानसीक त्रासापोटी नुकसान भरपाईदाखल रू.10,000/- व तक्रार खर्चापोटी रु.5,000/- आदेश प्राप्‍त झाल्‍याचे दिनांकापासून 30 दिवसांत द्यावे.   

(4) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्‍काळ पाठविण्‍यात यावी .

 

चंद्रपूर

दिनांक – 12/09/2017

 

                             

( अधि.कल्‍पना जांगडे (कुटे) ) ( अधि. किर्ती गाडगिळ (वैदय) ) ( श्री उमेश व्‍ही.जावळीकर)

         मा.सदस्या.                     मा.सदस्या.               मा. अध्‍यक्ष

                जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.

 

 

 

 
 
[HON'BLE MR. UMESH V.JAWALIKAR]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Kirti Gadgil (Vaidya)]
MEMBER
 
[HON'BLE MRS. MRS.Kirti Gadgil Vaidya]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.