Maharashtra

Gadchiroli

CC/12/10

Suresh Vasudeo Kuthe - Complainant(s)

Versus

Branch Manager, Life Insurance corporation of India - Opp.Party(s)

Adv. Nitin N. Kamdi

28 Aug 2013

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum, Gadchiroli, Barac No. 1, Room No. 17 To 20, Complex, Gadchiroli
Maharashtra
 
Complaint Case No. CC/12/10
 
1. Suresh Vasudeo Kuthe
Age 54 yres, Post Kurkheda, Tah Kurkheda
Gadchiroli
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Branch Manager, Life Insurance corporation of India
Branch Gadchiroli
Gadchiroli
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Manohar G. Chilbule PRESIDENT
 HON'BLE MRS. Adv. Kirti P. Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Adv. Kalpana K. Jangade MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

(मंचाचे निर्णयान्‍वये, श्री मनोहर गो. चिलबुले, अध्‍यक्ष)

(पारीत दिनांक : 28 ऑगष्‍ट 2013)

                                      

                  अर्जदार सुरेश वासुदेव कुथे यांनी सदरचा अर्ज ग्राहक हक्‍क संरक्षण अधिनियम, 1986 च्‍या कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे.

 

            अर्जदाराची संक्षिप्‍त तक्रार अशी की,

 

1.           अर्जदाराची पत्‍नी मय्यत वर्षा सुरेश कुथे ही शिक्षिका म्‍हणून पंचायत समिती कुरखेडा येथे नोकरीस होती.  हिने गैरअर्जदार विमा कंपनीकडे दि.28.03.2010 रोजी जिवन विमा पॉलिसी क्र.973739902 काढली होती.  सदर विमा पॉलिसीचा मासिक हप्‍ता रुपये 817/- तिच्‍या मासिक पगारातून संवर्ग विकास अधिकारी, कुरखेडा हे कपात करुन गैरअर्जदाराकडे भरणा करीत होते. 

 

2.          अर्जदाराची पत्‍नी दि.14.07.2011 रोजी कर्करोगाने निधन पावली.  त्‍यानंतर, अर्जदाराने दि.24.11.2011 व दि.4.10.2012 रोजी गैरअर्जदारास पञ पाठवून आणि दि.8.10.2012 रोजी अधिवक्‍ता श्री नितीन कामडी यांचे मार्फत नोटीस पाठवून मृत्‍यु दावा निकाली काढण्‍यास विनंती केली.  परंतु गैरअर्जदाराने अर्जदाराने सादर केलेला मृत्‍यु दावा मंजूर न करता रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ चालविली आहे.  म्‍हणून, अर्जदाराने सदर तक्रार अर्जात अर्जदाराच्‍या पत्‍नीच्‍या मृत्‍यु दाव्‍याबाबत रुपये 2,00,000/- द.सा.द.शे.18 टक्‍के व्‍याजासह, तसेच अर्जदारास झालेल्‍या शारिरीक व मानसिक ञासाबाबत रुपये 20,000/- नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च देण्‍याचा गैरअर्जदाराविरुध्‍द आदेश व्‍हावा, अशी मागणी केली आहे. 

 

3.          गैरअर्जदार विमा कंपनीने नि.क्र.12 प्रमाणे लेखी बयाण दाखल केले असून, अर्जदाराची मागणी फेटाळली आहे.  गैरअर्जदाराचे म्‍हणणे असे कि, अर्जदाराची मृतक पत्‍नी वर्षा कुथे ही पंचायत समिती कुरखेडा येथे प्राथमिक शिक्षिका म्‍हणून कार्यरत होती.  तक्रार अर्जात नमुद केल्‍याप्रमाणे तिने गैरअर्जदाराकडे जिवन विमा पॉलिसी काढली होती. माञ, सदर पॉलिसीचा मासिक हप्‍ता एप्रिल 2011 ते जून 2011 या कालावधीचा गैरअर्जदारास न मिळाल्‍यामुळे सदर पॉलिसी कालातीत (Laps) झाली होती.  महिन्‍याचे मासिक हप्‍ते गैरअर्जदारास मिळाले नसल्‍याने पॉलिसीच्‍या अटी प्रमाणे मृत्‍यु दिनांकास पॉलिसी कालातीत झाली असल्‍याने पॉलिसीतील अटी व शर्ती प्रमाणे मृत्‍यु दाव्‍याची रक्‍कम देय नाही, असे अर्जदारास दि.20.3.2012 रोजीच्‍या पञान्‍वये कळविण्‍यांत आले होते. 

 

4.          आपल्‍या विशेष कथनात गैरअर्जदाराने नमुद केले आहे कि, अर्जदाराने तक्रार अर्जासोबत दाखल केलेल्‍या दि.24.11.2011 च्‍या पञात नमुद केलेल्‍या विमा पॉलिसी क्रमांक 1) 972906760, 2) 972752418, 3) 973650884, 4) 972316118, 5) 973292752, 6) 973403308 चे माहे एप्रिल ते जून 2011 चे मासिक हप्‍ते गैरअर्जदाराला प्राप्‍त झाले नव्‍हते.  परंतु, सदर पॉलिसीमध्‍ये पॉलिसी धारकाने दिलेल्‍या हप्‍त्‍यांचा कालावधी लक्षात घेवून पॉलिसीतील अटी व शर्ती नुसार व नियमानुसार क्‍लेम कन्‍सेशन/ पेडअप क्‍लेम या अनुषंगाने पॉलिसीतील मृत्‍यु दाव्‍याची रक्‍कम नॉमिनिला देण्‍यांत आली.  परंतु, या तक्रारीचा विषय असलेली पॉलिसी केवळ 1 वर्ष 1 महिना या कालावधीतच चालू राहिल्‍याने सदर पॉलिसीतील अट क्र.4 नुसार ती पूर्णरुपे कालातीत धरली जाते, म्‍हणून मृत्‍यु दावा देय राहात नाही.  अर्जदाराच्‍या पत्निची पॉलिसी पूर्ण कालातीत झाल्‍याने अर्जदारास पॉलिसीची रक्‍कम देता येत नाही.  अर्जदाराने चुकीचा तक्रार अर्ज दाखल केल्‍याने खर्चासह खारीज करावा, अशी मागणी केली आहे.

 

5.          अर्जदाराने सुरेश वासुदेव कुथे यांनी स्‍वतःची साक्ष शपथपञ नि.14 प्रमाणे दिली असून, त्‍यांत अर्जा प्रमाणे कथन केले आहे.  आपल्‍या साक्षिच्‍या पुष्‍ठ्यर्थ यादी नि.क्र.4 सोबत दस्‍त क्र.अ-1 ते अ-10 दाखल केले आहेत.  गैरअर्जदाराने शपथपञावरील लेखी बयाणा शिवाय वेगळी साक्ष दिली नाही.  आपल्‍या कथनाचे पुष्‍ठ्यर्थ यादी नि.क्र.13 सोबत दस्‍त क्र.ब-1 ते ब-3 दाखल केले आहेत.  गैरअर्जदारातर्फे लेखी युक्तिवाद नि.क्र.17 प्रमाणे दाखल केलेला आहे. लेखी बयाणात गैरअर्जदाराने जरी अर्जदाराची मागणी नाकारली असली तरी लेखी युक्तिवादात ‘‘पॉलिसीच्‍या शर्ती व अटी नुसार पॉलिसी पूर्णपणे कालातीत झाल्‍याने मृत्‍युदावा देता येत नसला तरी मानविय दृष्‍टीकोनातून अर्जदारास सम अशुअर्ड एक्‍सग्रेसिया या आधारे पॉलिसीची रक्‍कम देण्‍याची तयारी दर्शविली आहे.’’ अर्जदाराने देखिल आपल्‍या लेखी युक्तिवादात गैरअर्जदाराने मान‍वीय दृष्‍टीकोनातून बेसिक सम अश्‍युअर्ड एक्‍स ग्रेसिया या आधारे रक्‍कम देण्‍याचे कबूल केल्‍यामुळे अर्जदाराचा अर्ज मंजूर करावा असे म्‍हटले आहे.

 

6.          वरील प्रमाणे दोन्‍ही पक्षांचे परस्‍पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचापुढे विचारार्थ घेण्‍यात आले.  त्‍यावरील, मंचाने निष्‍कर्ष आणि त्‍याबाबतची कारणे मिमांसा पुढीलप्रमाणे.

 

            मुद्दे                             :           निष्‍कर्ष

 

1)    गैरअर्जदाराने सेवेत न्‍युनतापूर्ण व्‍यवहार केला         

आहे काय ?                                                                 :     नाही.

2)    अर्जदार पत्‍न‍िच्‍या मृत्‍युदाव्‍याची रक्‍कम मिळण्‍यास

पाञ आहे काय ?                                                         :     होय.

3)    अंतीम आदेश काय ?                                             :     अंतीम आदेशाप्रमाणे

                                                      अर्ज अंशतः मंजूर.

 

  कारणे मिमांसा 

 

7. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत :- सदर प्रकरणात अर्जदाराची मय्यत पत्‍नी वर्षा सुरेश कुथे हिने गैरअर्जदाराकडे जिवन विमा पॉलिसी क्र.973739902 दि.28.3.2010 रोजी काढली होती व त्‍या पॉलिसीचा मासिक हप्‍ता रुपये 817/- मार्च 2011 पर्यंत संवर्ग विकास अधिकारी कुरखेडा यांनी तिच्‍या पगारातून कपात करुन गैरअर्जदाराकडे भरणा केला, याबद्दल दोन्‍ही पक्षात वाद नाही.  सदर पॉलिसीची प्रत गैरअर्जदाराने यादी नि.क्र.13 सोबत दस्‍त क्र.अ-1 वर दाखल केली आहे.  एप्रिल 2011 पासून जून-2011 या काळात अर्जदाराची पत्‍नी कॅन्‍सरने आजारी असल्‍याने वैद्यकिय रजेवर होती व म्‍हणून सदर काळात संवर्ग विकास अधिकारी कुरखेडा यांनी तिच्‍या पगारातून विम्‍याचा हप्‍ता कपात केला नाही आणि गैरअर्जदाराकडे जमा केला नाही.  याबाबत, गट शिक्षणाधिकारी कुरखेडा यांनी दि.24.2.2012 रोजी दिलेले प्रमाणपञ अर्जदाराने यादी नि.क्र.4 सोबत दस्‍त क्र.अ-8 वर दाखल आहे.  अर्जदाराच्‍या पत्‍न‍िनेही एप्रिल 2011 ते जून 2011 या कालावधीची मासिक हप्‍त्‍याची रक्‍कम स्‍वतः गैरअर्जदाराकडे जमा केली नाही.  वर्षा कुथे यांनी संवर्ग विकास अधिकारी कुरखेडा यांना पगारातून विमा हप्‍त्‍याची रक्‍कम परस्‍पर कपात करुन गैरअर्जदाराकडे जमा करण्‍यासाठी दिलेल्‍या अधिकार पञाची प्रत यादी नि.क्र.13 ब-2 वर आहे.  त्‍यांत खालीलप्रमाणे उल्‍लेख आहे.

 

“ I agree that your liability will be confined to making arrangement for deduction of premium from my salary wherever this can be made and remitting the amount to the Corporation in time.  I shall be entirely responsible for any consequences on account of non-payment of premium of my Policy for reasons beyond your control, such as in the event of my proceeding on leave without pay or my drawing advance salary without deduction of premium or my cancelling this authorization for a deduction of premium or my leaving your  employment in any such case or in case of withdrawal of the Salary Saving Scheme with you by the Life Insurance Corporation of India for any reason whatsoever, it will be my responsibility to make arrangement for remittance of the premium directly to the Corporation at the increased rate specified in the Policy to prevent my policy from going   in a lapsed condition.” 

 

8.          पगारातून हप्‍त्‍याची रक्‍कम परस्‍पर गैरअर्जदाराकडे जमा केली नाही तर

 त्‍याबाबत पॉलिसीत काय तरतुद आहे हे पाहणे आवश्‍यक आहे.  गैरअर्जदाराने यादी नि.क्र.13 सोबत दस्‍त क्र.ब-3 वर पॉलिसी क्‍लॉज नं.22 Annexure II B दाखल केला आहे.  त्‍यात Clause No. 4  खालीलप्रमाणे आहे.

 

            4)         It is also declared that this policy shall stand lapsed if the due premium is not received by the Corporation within 15 days of the due date as mentioned above and the Life Assured/Proposer, being primarily responsible to keep the policy in force, shall remit the defaulted premium dues together with the additional charges applicable for monthly payment of premiums. In the event of the premium dues not remitted to the Corporation either by the employer or by Life Assured/ Proposer, and the policy becoming lapsed, the liability of the Corporation under the within mentioned policy will be restricted to the extent of the premiums actually received by it and to the provisions of the conditions and privileges governing the policy and no further relief for any claim shall lie with the corporation.”

 

            सदर अट मंजूर असल्‍याबाबत विमा काढणारी अर्जदाराची पत्‍नी वर्षा कुथे हिने सही केली आहे.

 

9.          वरील तरतुदीप्रमाणे संवर्ग विकास अधिकारी कुरखेडा यांनी वर्षा कुथे यांच्‍या पगारातून माहे एप्रिल 2011 ते जून 2011 या कालावधीत पॉलिसीचे हप्‍ते कपात केले नाही आणि गैरअर्जदाराकडे भरले नाही म्‍हणून ते हप्‍ते भरण्‍याची जबाबदारी विमा धारक वर्षा यांची होती.  परंतु, त्‍यांनी ती भरली नाही म्‍हणून पॉलिसी क्‍लॉज 22 च्‍या सब क्‍लॉज 4 प्रमाणे पॉलिसी कालातीत म्‍हणजे Lapsed झालेली आहे. म्‍हणून सदर तरतुदी प्रमाणे पॉलिसी धारकाच्‍या वारसानांना पॉलिसीच्‍या भरलेल्‍या हप्‍त्‍या इतकीच राशी देण्‍याची जबाबदारी विमा कंपनीची असून, त्‍याशिवाय अन्‍य लाभ मिळू शकत नाही.

 

10.         वरील प्रमाणे पॉलिसी कालातीत झाल्‍याने अशुअर्ड सम मिळण्‍यास अर्जदार पाञ नसतांना त्‍यांनी सदर पॉलिसीच्‍या अशुअर्ड सम रुपये 2 लाखाची मागणी केली.  गैरअर्जदारांनी सदर मागणी पॉलिसीसच्‍या अटी व शर्ती प्रमाणे नाकारली असल्‍याने गैरअर्जदारांची कृती विमा धारक किंवा लाभ धारकाप्रती सेवेतील न्‍युनतापूर्ण व्‍यवहार आहे असे म्‍हणता येणार नाही.  म्‍हणून मु द्या क्र.1 वरील निष्‍कर्ष नकारार्थी नोंदविला आहे.

 

11.          सदरच्‍या प्रकरणात जरी पॉलिसीतील अटी व शर्ती प्रमाणे अर्जदारास पॉलिसीची अशुअर्ड सम मिळण्‍याचा हक्‍क नाही या निर्णयाप्रत मंच आले असले तरी गैरअर्जदार यांनी आपल्‍या लेखी युक्तिवादात मानवतेच्‍या दृष्‍टीकोनातून अर्जदारास अशुअर्ड सम इतकी विमा राशी देण्‍याची तयारी दर्शविली असल्‍याने अर्जदार सदर पॉलिसीची अशुअर्ड सम रुपये 2,00,000/- मिळण्‍यास पाञ आहे.  म्‍हणून मुद्या क्र.2 वरील निष्‍कर्ष त्‍याप्रमाणे नोंदविला आहे. 

 

12.         पॉलिसीच्‍या अटी व शर्ती प्रमाणे जरी पॉलिसी कालातीत झाल्‍यामुळे हक्‍क म्‍हणून अर्जदार अशुअर्ड सम मिळण्‍यास पाञ नसला तरी गैरअर्जदाराने मानवतेच्‍या दृष्‍टीकोनातून सदर रक्‍कम अर्जदारास देण्‍याची तयारी दर्शविली असल्‍याने अर्जदारास पॉलिसीची रक्‍कम रुपये 2,00,000/- देण्‍याचा आदेश देणे योग्‍य असले तरी या प्रकरणांची एकंदर वस्‍तुस्थिती लक्षात घेता शारीरीक व मानसिक ञासाबाबत नुकसान भरपाई आणि प्रकरणाचा खर्च मिळण्‍यास अर्जदार पाञ नाही. 

 

            वरील निष्‍कर्षास अनुसरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

                 

  आदेश 

 

अर्जदाराचा अर्ज खालीलप्रमाणे अंशतः मंजूर करण्‍यांत येत आहे.

 

(1)   गैरअर्जदाराने अर्जदारास मयत वर्षा सुरेश कुथे हिच्‍या जिवन विमा पॉलिसी क्र.973739902 बद्दल अशुअर्ड सम रुपये 2,00,000/- द्यावी.  

 

(2)   वरील आदेशाची पुर्तता आदेशाचे तारखेपासून 1 महिन्‍याचे आंत करावी.  मुदतीचे आंत गैरअर्जदाराने वरील रक्‍कम न दिल्‍यास 1 महिन्‍यानंतर रक्‍कम अर्जदाराचे हातात पडेपर्यंतच्‍या काळासाठी गैरअर्जदार द.सा.द.शे.12 टक्‍के प्रमाणे व्‍याज देण्‍यास पाञ राहील.

 

(3)   या प्रकरणाचा खर्च ज्‍याचा त्‍याने सहन करावा.

 

(4)   सदर आदेशाची प्रत उभय पक्षास विनामुल्‍य पुरवावी.   

 

     

गडचिरोली.

दिनांक :- 28/8/2013

 
 
[HON'BLE MR. Manohar G. Chilbule]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Adv. Kirti P. Gadgil]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Adv. Kalpana K. Jangade]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.