Maharashtra

Ahmednagar

CC/16/257

Suman Ashok Bangar - Complainant(s)

Versus

Branch Manager ,Life Insurance Corporation of India - Opp.Party(s)

G.N.Ghalm

05 Mar 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/16/257
( Date of Filing : 29 Aug 2016 )
 
1. Suman Ashok Bangar
At.Raytewadi,Post. Waghapur, Tal. Sangamner,
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Branch Manager ,Life Insurance Corporation of India
Vidyanagar, Sangamner, Tal.Sangamner,
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:G.N.Ghalm, Advocate
For the Opp. Party: Sadafal V. G., Advocate
Dated : 05 Mar 2019
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा- श्रीमती.चारु वि.डोंगरे, मा.सदस्‍या)

1.   तक्रारदार हिने सदरील तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये सामनेवाला यांनी द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे. म्‍हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केलेली आहे.

2.   तक्रारदार हिची तक्रार थोडक्‍यात येणे खालील प्रमाणेः-

     तक्रारदार ही मु.रायतेवाडी पो.वाघापूर ता.संगमनेर जि.अहमदनगर येथील रहिवासी आहे. तक्रारदार ही मयत अशोक निवृत्‍ती बांगर यांची पत्‍नी आहे. तक्रारदार हिचे मयत पती दिनांक 27.03.2010 रोजी मौजे खांडगांव ता.संगमनेर जि.अहमदनगर या ठिकाणी सायंकाळी 17.30 वाजता इलेक्ट्रिक पोलवर इलेक्ट्रिक लाईनची दुरुस्‍ती करीत असताना ते पोलवरुन खाली जमीनीवर पडून त्‍यांचे कमरेला व पाठीच्‍या मणक्‍याला मार लागून ते जखमी झाले होते व त्‍यांना 75 टक्‍के कायमस्‍वरुपी अपंगत्‍व आले होते. त्‍यांना दिनांक 27.03.2010 ते दिनांक 29.03.2010 या कालावधीमध्‍ये डॉ.तांबे हॉस्पिटल, संगमनेर येथे दाखल करण्‍यात आले होते व त्‍यानंतर डॉ.संचेती हॉस्पिटल पुणे येथे दिनांक 29.03.2010 ते दिनांक 23.07.2010, त्‍यानंतर युनिटी हॉस्पिटल संगमनेर येथे दिनांक 18.09.2010 ते दिनांक 25.09.2010 व त्‍यानंतर डॉ.पानसरे हॉस्पिटल संगमनेर येथे दिनांक 04.01.2011 ते दिनांक 15.01.2011 या कालावधीमध्‍ये दाखल केले होते. व त्‍यानंतर डॉ.कुटे हॉस्पिटल, संगमनेर येथे दिनांक 06.06.2011 ते 11.06.2011 व त्‍यानंतर त्‍याच हॉस्पिटलमध्‍ये दिनांक 27.08.2011 ते दिनांक 18.09.2011 पर्यंत दखल केले होते. परंतू उपचार चालु असतांना दिनांक 22.09.2011 रोजी ते मयत झाले. मयत अशोक निवृत्‍ती बांगर हे हयात असतांना त्‍यांनी सामनेवाला यांचेकडे (1) पॉलीसी क्रमांक 9522814978 प्रमाणे कालावधी दिनांक 01.02.2002 ते 01.02.2013 या कालावधीसाठी रुपये 60,000/- ची कव्‍हरेज पॉलीसी घेतलेली होती. (2) पॉलीसी क्रमांक 952283437 प्रमाणे कालावधी दिनांक 10.10.2003 ते 10.10.2012 या कालावधीसाठी रुपये 80,000/- ची कव्‍हरेज पॉलीसी घेतली होती. (3) पॉलीसी क्रमांक 955710300 प्रमाणे कालावधी दिनांक 10.10.2003 ते 10.10.2012 या कालावधीसाठी रुपये 80,000/- ची कव्‍हरेज पॉलीसी घेतलेली होती. तसेच (4) पॉलीसी क्रमांक 955711803 प्रमाणे कालावधी दिनांक 01.05.2004 ते 01.05.2012 या कालावधीसाठी रुपये 60,000/- ची कव्‍हरेज पॉलीसी घेतली होती. अशा प्रकारे त्‍यांनी चार पॉलीसी सामनेवालाकडे उतरविल्‍या होत्‍या. तक्रारदार हिला अनुक्रमे रक्‍कम रुपये 60,000/- व रक्‍कम रुपये 80,000/- प्रत्‍येकी दोन पॉलीसी होत्‍या. त्‍यात त्‍यांच्‍या या पॉलीसी अपघात बाबत असल्‍यामुळे तक्रारदार हिला त्‍या पॉलीसीचे फायदे व पॉलीसीच्‍या दुप्‍पट रक्‍कम मिळणे गरजेचे होते. परंतु सदरच्‍या रकमा मंजुर करताना सामनेवाला यांनी नैसर्गिक मृत्‍यू समजून सामनेवाला यांनी रक्‍कम मंजूर केली आहे. सामनेवालानी विमा देताना सदर कव्‍हरेजप्रमाणे विम्‍याचा हप्‍ता स्विकारला व सदर बदल्‍यात सामनेवाला हे सदर विमाधारकाचा अपघाती मृत्‍यू झाल्‍यास अथवा कायमस्‍वरुपी अंपगत्‍व आल्‍यास रक्‍कम देण्‍याची हमी सामनेवाला यांनी दिलेली आहे. परंतु सामनेवाला यांनी तक्रारदार हिला दिनांक 28.08.2014 रोजीचे पत्राने सदरच्‍या विमा पॉलीसीची रक्‍कम नाकारुन सेवेत त्रुटी केलेली आहे. त्‍यामुळे तक्रारदार हिने वकीलामार्फत दिनांक 25.07.2016 रोजी वकीलामार्फत रजिस्‍टर पोस्‍टाने नोटीस पाठवून नुकसान भरपाई रकमेची मागणी करुनही रक्‍कम दिली नाही. त्‍यामुळे तक्रारदार हिने मंचात तक्रार दाखल करुन परीच्‍छेद क्र.11 प्रमाणे मागणी केली आहे.

3.   सामनेवाला यांनी त्‍यांची लेखी कैफियत निशाणी क्र.11 वर दाखल केली आहे. सामनेवाला यांनी असे कथन केले की, तक्रारदार हिने विमा दावा सादर केल्‍यानंतर संपुर्ण रक्‍कम अदा करण्‍यात आली आहे. ती रक्‍क्‍म तिने स्विकारलेली आहे. तक्रारदार हिचे पतीचा अपघात दिनांक 27.03.2010 रोजी झाला. आणि मृत्‍यू दिनांक 22.03.2011 रोजी झाला. अपघात ते मृत्‍यूच्‍या दिनांक यांत दीड वर्षाचा कालावधी उलटलेला आहे. अपघाती विमाचे लाभ मिळण्‍यासाठी अपघाताचे दिनांकापासून 180 दिवसांच्‍या आत मृत्‍यू झाला तर देय होतो. 180 दिवसापेक्षा जास्‍त कालावधी नंतर मृत्‍यू झाल्‍यांस विमा पॉलीसीचे अटी व शर्ती प्रमाणे दिलेली नाही. त्‍यामुळे सामनेवाला हे अपघाताची रक्‍कम देण्‍यासाठी जबाबदार नाहीत. सामनेवाला यांनी तक्रारदार हिला मिळणारी सर्व रक्‍कम दिलेली आहे. त्‍यामध्‍ये सामनेवाला यांनी कोणतीही सेवेत त्रुटी केली नाही. सदरची तक्रार ही खर्चासह खारीज करण्‍यात यावी अशी सामनेवाला यांनी मंचाला विनंती केली आहे.

4.   तक्रारदार हिने दाखल केलेली तक्रार, कागदपत्रे, शपथपत्र तसेच तक्रारदार हिचे वकील श्री.घालमे यांनी केलेला युक्‍तीवाद यांचे अवलोकन केले. तसेच सामनेवाला यांनी दाखल केलेले जबाब, शपथपत्र, व त्‍यांचे वकील श्री.सदाफळे यांनी केलेला युक्‍तीवाद यांचे अवलोकन केले. व न्‍याय निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.  

    

             मुद्दे  

      उत्‍तर

1.

तक्रारदार ही सामनेवाला यांची ग्राहक होते काय.?                                                         

 

... होय.

2.

सामनेवाला यांनी त्‍यांचे सेवेत त्रुटी केली आहे काय.?                                                         

 

... होय.

3.

तक्रारदार ही सामनेवाला यांचेकडून विमा दावा अपघाताची रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहे काय.?                                                         

 

... होय.

4.

आदेश काय ?

...अंतीम आदेशानुसार.

 

का र ण मि मां सा

5.   मुद्दा क्र.1 ः- तक्रारदार ही मयत अशोक निवृत्‍ती बांगर यांची पत्‍नी असून ती कायदेशिर त्‍यांची वारसदार आहे. तक्रारदार हिचे मयत पतीने सामनेवाला यांचेकडे (1) पॉलीसी क्रमांक 9522814978 प्रमाणे कालावधी दिनांक 01.02.2002 ते 01.02.2013 या कालावधीसाठी रुपये 60,000/- ची कव्‍हरेज पॉलीसी घेतलेली होती. (2) पॉलीसी क्रमांक 952283437 प्रमाणे कालावधी दिनांक 10.10.2003 ते10.10.2012 या कालावधीसाठी रुपये 80,000/- ची कव्‍हरेज पॉलीसी घेतली होती. (3) पॉलीसी क्रमांक 955710300 प्रमाणे कालावधी दिनांक 10.10.2003 ते 10.10.2012 या कालावधीसाठी रुपये 80,000/- ची कव्‍हरेज पॉलीसी घेतलेली होती. तसेच (4) पॉलीसी क्रमांक 955711803 प्रमाणे कालावधी दिनांक 01.05.2004 ते 01.05.2012 या कालावधीसाठी रुपये 60,000/- ची कव्‍हरेज पॉलीसी घेतली होती. अशा प्रकारे त्‍यांनी चार पॉलीसी सामनेवालाकडून घेतलेल्‍या आहेत. त्‍याबाबतच्‍या पॉलीसीच्‍या प्रिमीयमच्‍या रकमा सामनेवाला यांचेकडे भरलेल्‍या आहेत. तक्रारदार हिचे मयत पतीचे अपघातात ते मरण पावल्‍यानंतर किंवा त्‍यांचा मृत्‍यू झाल्‍यानंतर त्‍यांचे वारसदार म्‍हणून त्‍यांची पत्‍नी असल्‍यामुळे ती सामनेवाला यांची ग्राहक आहे ही बाब स्‍पष्‍ट होते. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देण्‍यात येते.

6.   मुद्दा क्र.2 व 3   तक्रारदार हिचे मयत पतीने सामनेवाला यांचेकडे चार कव्‍हरेज पॉलीसी उतरविल्‍या होत्‍या. त्‍याचा कालावधी हा तक्रारीमध्‍ये नमुद केला आहे. तसेच तक्रारदार हिने दाखल केलेल्‍या पॉलीसीची कव्‍हर नोट त्‍यामध्‍ये सुध्‍दा नमुद आहे. तसेच ही बाब सामनेवाला यांनी त्‍यांचे लेखी कैफियतीमध्‍ये नाकारलेले नाही. पॉलीसी चालू असताना दिनांक 27.03.2010 रोजी मौजे खांडगांव ता.संगमनेर जि.अहमदनगर या ठिकाणी सायंकाळी 17.30 वाजता इलेक्ट्रिक पोलवर इलेक्ट्रिक लाईनची दुरुस्‍ती करीत असताना ते पोलवरुन खाली जमीनीवर पडून त्‍यांचे कमरेला व पाठीच्‍या मणक्‍याला मार लागून ते जखमी झाले होते व त्‍यांना 75 टक्‍के कायमस्‍वरुपी अपंगत्‍व आले होते. त्‍यांना दिनांक 27.03.2010 ते दिनांक 29.03.2010 या कालावधीमध्‍ये डॉ.तांबे हॉस्पिटल, संगमनेर येथे दाखल करण्‍यात आले होते व त्‍यानंतर डॉ.संचेती हॉस्पिटल पुणे येथे दिनांक 29.03.2010 ते दिनांक 23.07.2010, त्‍यानंतर युनिटी हॉस्पिटल संगमनेर येथे दिनांक 18.09.2010 ते दिनांक 25.09.2010 व त्‍यानंतर डॉ.पानसरे हॉस्पिटल संगमनेर येथे दिनांक 04.01.2011 ते दिनांक 15.01.2011 या कालावधीमध्‍ये दाखल केले होते. व त्‍यानंतर डॉ.कुटे हॉस्पिटल, संगमनेर येथे दिनांक 06.06.2011 ते 11.06.2011 व त्‍यानंतर त्‍याच हॉस्पिटलमध्‍ये दिनांक 27.08.2011 ते दिनांक 18.09.2011 पर्यंत दखल केले होते. परंतू उपचार चालु असतांना दिनांक 22.09.2011 रोजी ते मयत झाले. ही बाब तक्रारदार हिने नमुद केल्‍याबाबत उपचाराबाबतची कागदपत्रे प्रकरणात दाखल केलेली आहेत. तसेच ही घटना घडली त्‍याबाबतचा पंचनामा प्रकरणात दाखल केलेला आहे. कार्यकारी अधिकारी संगमनेर यांचा पोलीस निरीक्षकांना लिहिलेले पत्र प्रकरणात दाखल केलेले आहे. तक्रारदाराचे पतीस 75 टक्‍के अंपगत्‍व आले ही बाब स्‍पष्‍ट करण्‍यासाठी तक्रारकदार हिने प्रकरणात अंपगत्‍वाचा दाखला दाखल केलेला आहे. मयत अशोक निृतत्‍ती बांगर यांचेवर उपचार चालू असतांना दिनांक 22.09.2011 रोजी ते मयत झाले. तक्रारदार हिने त्‍याचे पत्‍नीचे अपघातात मृत्‍यू झाल्‍यामुळे पॉलीसीमध्‍ये नमुद असलेल्‍या क्‍लॉजनुसार अपघात मृत्‍यू लाभ (benefit) तक्रारदार हिला मिळालेली नाही. म्‍हणून तिने विमा दावा सामनेवाला यांचेकडे दाखल केला आहे. सामनेवाला यांनी विमा पॉलीसीनुसार समअॅश्‍युअर्ड रक्‍कम व त्‍यावरील व्‍याजाची रक्‍कम तक्रारदार हिला दिनांक 23.12.2011 ला दिलेली आहे ही बाब सामनेवाला यांनी त्‍यांच्‍या लेखी कैफियतीमध्‍ये नमुद केलेले आहे. सदरची रक्‍कम तक्रारदार हिला प्राप्‍त झाली आहे ही बाब तक्रारदार हिने मान्‍य केली आहे. अपघात झाल्‍यानंतर अपघाती लाभ (benefit) म्‍हणून पॉलीसीमध्‍ये नमुद असलेल्‍या  रकमा तक्रारदार हिला मिळणे गरजेचे होते. परंतू ती मिळालेली नाही. म्‍हणून तिने सामनेवाला यांचेकडे मागणी केली. मात्र सामनेवाला यांनी त्‍यांचे लेखी कैफियतीमध्‍ये असा बचाव घेतला की, तक्रारदार हिचे मयत पती अशोक निवृत्‍ती बांगर यांचा दिनांक 27.03.2010 रोजी अपघात झाला आणि दिनांक 22.09.2011 रोजी मृत्‍यू झाला. अपघात व मृत्‍यू यामध्‍ये दीड वर्षाचा कालावधी उलटला आहे. व अपघात दिनांका पासून 180 दिवसांच्‍या आत मृत्‍यू झाल्‍यांस विमा पॉलीसीचे अटी व शर्तीप्रमाणे रक्‍कम देय होते. असे नमुद केलेले आहे. परंतु तक्रारदार हिचे मयत पतीचा मृत्‍यू 180 दिवसापेक्षा जास्‍त कालावधीनंतर  झाला त्‍यामुळे विमा पॉलीसीचे अटी व शर्ती प्रमाणे 10 / 2 ब (ब) प्रमाणे अपघाती विमा लाभ देता येणार नाही असे कथन केलेले आहे. परंतू या कथनाचे पृष्‍टयर्थ कोणताही कागदोपत्री पुरावा प्रकरणात दाखल केलेला नाही किंवा पॉलीसीची अटी व शर्ती दाखल केलेले नाही. व केवळ लेखी कैफियमतीमध्‍ये कथन केलेले आहे. आणि केवळ कथन हा पुरावा होऊ शकत नाही. सामनेवाला यांनी अटी व शर्ती प्रकरणात दाखल केले नसल्‍यामुळे मंचासमक्ष त्‍यांनी घेतलेला बचाव सिध्‍द होऊ शकला नाही. तक्रारदार हिने दाखल केलेली पॉलीसी कव्‍हर नोटवर अपघाती लाभ देण्‍याचे नमुद केलेले आहे. सामनेवालाने ही बाब नाकारली नाही. परंतु मृत्‍यू व अपघात यामध्‍ये 180 दिवसापेक्षा जास्‍त कालावधी गेल्‍यामुळे तक्रारदार हिला अपघाती लाभ देता येणार नाही असे नमुद केले आहे. मात्र कोणत्‍याही अटी व शर्ती प्रकरणात दाखल केले नाही. त्‍यामुळे सामनेवालाने सदरची बाब सिध्‍द करण्‍यात असमर्थ ठरले आहेत. तक्रारदार हिने केलेली मागणी योग्‍य आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सदरची तक्रार ही मंजुर करण्‍याचे निष्‍कर्षाप्रत येते. सबब मुद्दा क्र.2 व 3 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

6.   मुद्दा क्र.4 मुद्दा क्र.1 ते 3 चे विवेचनावरुन मुद्दा क्र.4 चे उत्‍तरार्थ खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

- अं ति म आ  दे  श –

1)   तक्रारदार हिची तक्रार अंशत: मंजूर करण्‍यात येते.

2)   सामनेवाला यांनी वादातील नमुद पॉलीसी क्रमांक 9522814978 या पॉलीसीचा मिळणारा अपघाती लाभ तक्रारदार हिस द.सा.द.शे.12 टक्‍के व्‍याज दराने दिनांक 23.12.2011 पासून रक्‍कम अदा होईपर्यत तक्रारदार हिस द्यावा.  

3)   सामनेवाला यांनी वादातील नमुद पॉलीसी क्रमांक 9522833437, या पॉलीसीचा मिळणारा अपघाती लाभ तक्रारदार हिस द.सा.द.शे.12 टक्‍के व्‍याज दराने दिनांक 23.12.2011 पासून रक्‍कम अदा होईपर्यत तक्रारदार हिस द्यावा.  

4)   सामनेवाला यांनी वादातील नमुद पॉलीसी क्रमांक 955710300 या पॉलीसीचा मिळणारा अपघाती लाभ तक्रारदार हिस द.सा.द.शे.12 टक्‍के व्‍याज दराने दिनांक 23.12.2011 पासून रक्‍कम अदा होईपर्यत तक्रारदार हिस द्यावा.   

5)   सामनेवाला यांनी वादातील नमुद पॉलीसी क्रमांक 955711803 या पॉलीसीचा मिळणारा अपघाती लाभ तक्रारदार हिस द.सा.द.शे.12 टक्‍के व्‍याज दराने दिनांक 23.12.2011 पासून रक्‍कम अदा होईपर्यत तक्रारदार हिस द्यावा.  

6)   सामनेवाला यांनी तक्रारदार हिस शारीरीक व मानसिक त्रासापोटी रक्‍कम  रु.5,000/- [रक्‍कम रुपये पाच हजार फक्‍त] व या तक्रारीचा खर्च रक्‍कम  रु.5,000/- [रक्‍कम रुपये पाच हजार फक्‍त] तक्रारदार हिस दयावा.

7) वरील नमुद आदेशाची पुर्तता सामनेवाला यांनी या आदेशापासून 30 दिवसाचे आत करावी.

8)   या आदेशाची प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क दयावी.

9)   या प्रकरणाची  “ ब ” व “ क ” फाईल तक्रारकर्तीस परत दयावी.  

 

 

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.