Maharashtra

Washim

CC/16/2013

Sindhubai Motiram Ingole - Complainant(s)

Versus

Branch Manager, Life Insurance corp. of India- washim - Opp.Party(s)

N.O.Dhut

31 Jul 2014

ORDER

Judgment
Final Order
 
Complaint Case No. CC/16/2013
 
1. Sindhubai Motiram Ingole
At. Jamroad New Sonkhas, Near ITI, Tq. Mangrulpir, Dist. Washim
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Smt. S.M.Untwale PRESIDENT
 HON'BLE MRS. J.G.Khandebharad MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

                                     :::    आ दे श   :::

                                                                             ( पारित दिनांक  : ३१/०७/२०१४ )

 

आदरणीय अध्‍यक्षा, मा. सौ.एस.एम.उंटवाले, यांचे अनुसार  : -

 

 

१.       ग्राहक संरक्षण कायदा १९८६ चे, कलम : १२ अन्‍वये, सादर करण्‍यात   आलेल्‍या, सदर तक्रार प्रकरणातील मजकूर, थोडक्‍यात आढळून येतो तो येणेप्रमाणे,

          तक्रारकर्ती ही वयोवृध्‍द जेष्‍ठ नागरीक असून तिचा मुलगा प्रमोद मोतीराम इंगोले हा महसुल विभागात, तहसील मंगरुळपीर येथे तलाठी या पदावर कार्यरत होता. प्रमोद इंगोले याने विरुध्‍द पक्ष क्र.१ यांचेकडून विमा पॉलिसी क्र. ८२१४३२२३० नुसार विमा किरण ही रु. ६५,०००/- हजाराची पॉलिसी घेतली होती. सदर पॉलिसीचादरमहा हप्‍ता रु.१२५/- हा होता, तक्रारकर्ती या पॉलिसीमध्‍ये नॉमिनी आहे. सदरहू पॉलिसी वेतन कपात देय पॉलिसी होती, म्‍हणजेच विम्‍याचे हप्‍ते हे विरुध्‍द पक्ष क्र. २ व ३ यांनी विरुध्‍द पक्ष क्र.१ यांचेकडे जमा करण्‍याची हमी दिलेली असल्‍यामूळे प्रस्‍तुत प्रकरणात विरुध्‍द पक्ष क्र. २ व ३ यांना आवश्‍यक पक्ष करण्‍यात आलेले आहे. विरुध्‍द पक्ष क्र. ४ हे विरुध्‍द पक्ष क्र. १ चे नियंत्रण अधिकारी आहेत. दिनांक १६.०७.२०१० रोजी प्रमोद मोतीराम इंगोले मोटार सायकलवरुन प्रवास करीत असतांना झालेल्‍या अपघातामुळे त्‍यांच्‍या मेंदुला जबर इजा झाली. त्‍यांना अकोला येथे उपचारार्थ रुग्‍णालयात दाखल केले असता, उपचारादरम्‍यान त्‍यांचा मृत्‍यु झाला. मृत्‍यु नंतर तक्रारकर्तीने मुळ पॉलिसीसह आपला दावा विरुध्‍द पक्ष क्र. १ यांच्‍याकडे जमा केला. कागदपत्रे जमा केल्‍यानंतर त्‍यांनी विरुध्‍द पक्ष क्र. २ यांना दिनांक २३.०३.२०११ च्‍या पत्रानुसार कळविले की, पॉलिसी धारकाचा दिनांक १६.०७.२०१० रोजी अपघाती मृत्‍यु झाला व वरील नमूद पॉलिसीमध्‍ये नऊ हप्‍त्‍यांचे गॅप्‍स आहेत. याबाबत चौकशी करण्‍याकरिता  तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष क्र. २ यांच्‍या कार्यालयात ब-याचशा चकरा मारुन ऑक्‍टोंबर २००१, डिसेंबर २००१, मे २००३ व जाने. २००४  चे विवरणपत्र प्राप्‍त केले व विवरणपत्र, दिनांक ०८.०९.२०११ चे पत्रान्‍वये विरुध्द पक्ष क्र. १ यांना सादर केले व पॉलिसीमध्‍ये कुठलीही गॅप नाही असे कळविले.  माहे मे २०१०  मध्‍ये प्रमोद इंगोले यांची बदली मंगरुळपीर येथून कारंजा लाड येथे झाल्‍याने  त्‍यांचे अंतिम वेतन प्रमाणपत्र अभावी, माहे मे २०१० ते जुलै २०१० चे वेतन त्‍यांच्‍या मृत्‍यु पर्यंत काढण्‍यात आले नव्‍हते. विरुध्‍द पक्ष क्र.३ यांचे म्‍हणण्‍यानुसार प्रमोद इंगोले यांचे मे २०१० ते जुलै २०१० (दि.१६.०७.२०१० पर्यंत) चे वेतन दिनांक २०.०८.२०१० रोजी काढण्‍यात आले. हे वेतन प्रमोद इंगोले यांचे मृत्‍यु नंतर काढण्‍यात आले असल्‍याने, विरुद पक्ष क्र.३ यांनी कदाचित हप्‍ता कपात केला नसावा. परंतु विम्‍याचा हप्‍ता कपात करण्‍याची जबाबदारी विरुध्‍द पक्ष क्र. ३ ची होती. सदर पॉलिसीच्‍या हप्‍त्‍याची रक्‍कम मयताच्‍या पगारातून कपात करण्‍याची जबाबदारी विरुद पक्ष क्र. २ व ३ यांची होती व ती रक्‍कम व्‍यवस्थितरित्‍या जमा झाली किंवा नाही हे पाहण्‍याची जबाबदारी विरुध्‍द पक्ष क्र. १ यांची आहे. विरुध्द पक्ष क्र. १ यांनी माहे ऑक्‍टोंबर २००१, डिसेंबर २००१, मे २००३  व जाने २००४ चे हप्‍ते मिळाले नाहीत असे पत्र विरुध्‍द पक्ष क्र. २ ला तब्‍बल दहा ते बारा वर्षानंतर पाठविले. तक्रारकर्तीने स्‍वतः सदर विम्‍याचे हप्‍ते विरुद पक्ष क्र.२ यांनी कपात करुन ती रक्‍कम विरुध्‍द पक्ष क्र. १ यांचेकडे जमा केल्‍याबाबतची कागदपत्रे मिळवून दि. ०८.०९.२०११ चे पत्रानुसार विरुध्‍द पक्ष क्र.१ यांना सादर करुनही मागील १८ महिन्‍यापासून त्‍यावर कोणतीही कार्यवाही न करण्‍याचे, कोणतेही संयुक्‍तीक कारण आजपर्यंत विरुध्‍द पक्ष क्र. १ ने दिले नाही.  त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्र. १ हे योग्‍यप्रकारे सेवा देण्‍यास असमर्थ ठरले आहे.   तक्रारकर्तीला दिनांक १६.०७.२०१० रोजी देय असलेली रक्‍कम रु.१,३०,०००/- देण्‍यास कुठलेही संयुक्‍तीक कारण न दर्शविता टाळाटाळ केलीआहे. विरुध्‍दपक्ष क्र.१ यांनी सेवेतील न्‍युनता अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केल्‍यामुळे त्‍यांच्‍याकडून तक्रारकर्तीला देय असलेली रक्‍कम रु. १,३०,०००/- व त्‍यावर दिनांक १६.०७.२०१० पासुन द.सा.द.शे.२४ % व्‍याज तसेच तक्रारकर्तीला या वयात झालेल्‍या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.२,००,०००/- व वि. मंचास योग्‍य वाटेल तो दंड याबाबत आदेश करणे न्‍यायसंगत होईल अशी विनंती केली.

          विरुध्‍द पक्ष क्र.१ यांनी मृतक प्रमोद इंगोले यांच्‍या पॉलिसीचा क्‍लेम ३० महिन्‍यांचा कालावधी लोटून सुध्‍दा कुठलाही प्रतिसाद न देणे तसेच आवश्‍यक कागदपत्रांची पुर्तता होवून सुध्‍दा कुठलीही त्रुटी असल्‍याबाबतचा पत्रव्‍यवहार तक्रारकर्ती सोबत न केल्‍याने, शेवटी तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष यांना दिनांक ०८.०२.२०१३ रोजी रजिस्‍टर पोष्‍टाने नोटीस पाठवून, सदर पॉलिसीचा क्‍लेम त्‍वरीत देण्‍याची विनंती केली. सर्व विरुध्‍द पक्षाला नोटीस प्राप्‍त होवूनही त्‍यांनी आजपर्यंत तक्रारकर्तीच्‍या नोटीसची पुर्तता केली नाही.

           तरी तक्रारकर्तीची विनंती की, तक्रार मंजुर करुन, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीस पॉलिसीची संपूर्ण रक्‍कम रु. १,३०,०००/- त्‍यावरील दि.१६.०७.२०१० पासून द.सा.द.शे.२४ % व्‍याजासह, तसेच शारिरिक व मानसिक त्रासापोटी रु. २,००,०००/- देण्‍याचा आदेश व्‍हावा आणि विद्यमान मंचास योग्‍य वाटेल तो दंड विरुध्‍द पक्षास ठोठवावा. वि. न्‍यायमंचास वाटेल तो योग्‍य आदेश तक्रारकर्तीच्‍या  बाजूने करावा ही विनंती.

सदर तक्रार तक्रारकर्तीने शपथेवर दाखल केलेली असून त्‍या सोबत एकुण १० दस्‍तऐवज पुरावे म्‍हणुन दाखल केलेले आहे.

2)   विरुध्‍द पक्ष क्र. १ व ४ यांचा लेखी जवाब :- सदर तक्रारीची नोटिस मंचातर्फे प्राप्त झाल्‍यानंतर विरुध्‍द पक्ष क्र. १ व ४ यांनी लेखी जबाब खालील प्रमाणे दाखल करुन बहुतांश विधाने नाकबूल केली आहे. त्‍यांचा थोडक्‍यात आशय असा,

     कलम १ मधील मजकूर की, तक्रारकर्ती ही वयोवृध्‍द असून तिचा मुलगा प्रमोद मोतीराम इंगोले हा महसुल विभागात तलाठी या पदावर कार्यरत होता व त्‍याने  या विरुध्‍द पक्षाकडून विमा पॉलिसी क्र. ८२१४३२२३० या क्रमांकाची विमा किरण / पॉलिसी रक्‍कम रु. ६५,०००/- घेतली होती हे म्‍हणणे बरोबर आहे.  विमा पॉलिसीचा हप्‍ता रु.१२५/- दरमाह असा होता. सदरहु पॉलिसी मध्‍ये सिंधुबाई ही नॉमिनी आहे हे म्‍हणणे बरोबर आहे. दिनांक १६.०७.२०१० रोजी, प्रमोद इंगोले मोटार सायकल वरुन प्रवास करीत असतांना, झालेल्‍या अपघातामुळे त्‍यांना जबर इजा झाली होती व मेंदुला इजा झाली होती, त्‍यामुळे त्‍यांना अकोला येथे रुग्णालयांत दाखल केले असता उपचारा दरम्‍यान त्‍यांचा मृत्‍यु झाला, हे सर्व माहिती अभावी नाकबुल केले. तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष क्र. २ यांच्‍या  कार्यालयात चौकशी करण्‍याकरीता ऑक्‍टोंबर २००१, डिसेंबर २००१, मे २००३ व जानेवारी २००४ चे विवरणपत्र प्राप्‍त केले व ते विरुध्‍द पक्षास सादर केले हे म्‍हणणे बरोबर आहे. तक्रारकर्ती हिने पॉलीसीमध्‍ये कुठलीही गॅप नाही असे विरुध्‍द पक्षास कळविले, हे म्‍हणणे नाकबूल केले. मे २०१० मध्‍ये मयत प्रमोद इंगोले यांची बदली मंगरुळपीर  येथून कारंजा येथे झाल्‍याने त्‍यांचे अंतिम वेतन प्रमाणपत्रा अभावी मे २०१० ते जुलै २०१० चे वेतन त्‍यांच्‍या मृत्‍यु पर्यंत काढण्‍यात आले नाही व विरुध्‍द पक्ष क्र.३ यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार प्रमोद इंगोले यांचे मे २०१० ते जुलै २०१० चे वेतन दि.२०.०८.२०१० रोजी काढण्‍यात आले हे म्‍हणणे नाकबूल केले. सदर पॉलिसीच्‍या हप्‍त्‍याची रक्‍कम मयताच्‍या पगारातून कपात करण्‍याची जबाबदारी विरुद पक्ष क्र. १ व ३ यांची होती व ती व्‍यवस्थितरित्‍या जमा झाली किंवा नाही हे पाहण्‍याची जबाबदारी विरुध्‍द पक्ष क्र. १ व ४ ची आहे, हे म्‍हणणे खोटे असून नाकबूल केले. माहे ऑक्‍टोंबर २००१,डिसेंबर २००१, मे २००३ व जानेवारी २००४ चे हप्‍ते मिळाले नाहीत असे पत्र विरुध्‍द पक्ष क्र. २ यांना १० ते १२ वर्षांनी पाठविले व तसेच तक्रारकर्ती हीने   विम्‍याच्‍या हप्‍त्‍याची रक्‍कम विरुध्‍द पक्ष क्र. १ कडे जमा केल्‍याबाबतची कागदपत्र सादर करुन सुध्‍दा १८ महिण्‍यापासुन कुठलिही कार्यवाही केली नाही, हे म्‍हणणे नाकबूल केले. विरुध्‍द पक्ष क्र. १ यांनी अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केल्‍यामुळे तक्रारकर्तीला देय असलेली रक्‍कम रु. १,३०,०००/- व त्‍यावर दिनांक १६.०७.२०१० पासुन द.सा.द.शे.२४ %  व्‍याज तसेच तक्रारकर्ती हिला झालेल्‍या शारिरीक तसेच मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. २०००००/- व मंचास योग्‍य वाटेल तो दंड या बाबतचा आदेश व्‍हावा हे म्‍हणणे, पुर्णपणे नाकबूल केले. विरुध्‍द पक्षाने मृतक प्रमोद इंगोले यांचा पॉलिसीचा क्‍लेम ३० महिन्‍याचा कालावधी लोटुन सुध्‍दा व तसेच रजिष्‍टर पोस्‍टाने नोटिस पाठवुन, पॉलिसीचा क्‍लेम देण्‍याची विनंती केली, हे म्‍हणणे नाकबूल केले. तक्रारकर्तीने दाखल केलेली सर्व कागदपत्रे विरुध्‍द पक्षाने नाकबूल केली.

विरुध्‍द पक्षाचे म्‍हणणे आहे की, मयत प्रमोद इंगोले यांनी  काढलेली विमा पॉलिसी ही विमा किरण पॉलिसी म्‍हणुन ओळखण्‍यात येते. त्‍या पॉलिसी अंतर्गत जबाबदारी स्विकारण्‍या बाबत वाद नाही. परंतु सदरहू  पॉलिसी अंर्तगत कोणताही नफा विमा धारकास मिळू शकत नाही कारण सदरहु पॉलिसीत अत्‍यंत कमी हप्‍ता आकारला जातो तसेच अपघात बेनिफिट सुध्‍दा देय नाही. मयत प्रमोद इंगोले यांचे पॉलिसीचे देय हप्‍त्‍यामध्‍ये एकंदरीत ९ गॅप्‍स होत्‍या म्‍हणजेच पॉलिसी धारकाने हप्‍ते हे नियमीत भरले नाही, त्‍यामुळे पॉलिसीची कोणतीही रक्‍कम विमा धारकास देय होवू शकत नाही. विमा कायदया प्रमाणे विमा किरण पॉलिसीत जर एखादया पॉलिसी धारकाने त्‍याच्‍या पॉलिसीचा हप्‍ता नियमीत न भरल्‍यास किंवा एकही विमा हप्‍ता थकल्‍यास सदरहू विमा धारकास पॉलिसीचे कोणतेही फायदे तसेच देय रक्‍कम ही मिळू शकत नाही. विरुध्‍द पक्ष क्र.१ व ४ ने सदरहु विमा पॉलिसी संदर्भात विरुध्‍द पक्ष क्र. २ व ३ यांच्‍याकडे सदरहू पॉलिसीच्‍या हप्‍त्‍याबाबत चौकशी केली असता, त्‍यांनी सुध्‍दा या विरुध्‍द पक्ष क्र.१ यांना कोणतेही संयुक्‍तीक उत्‍तर न देता सदरहु पॉलिसीच्‍या विम्‍याच्‍या  हप्‍त्‍यात ९ गॅप्‍स असल्‍याचे कबुल केले आहे. परंतु  या विरुध्‍द पक्षाच्‍या दि. २३.०३.२०११ च्‍या पत्रास कोणतेही संयुक्‍तीक उत्‍तर दिले नाही. या सर्व कारणांमुळे विरुध्‍द पक्ष क्र. १ ने तक्रारकर्तीस पॉलिसीची रक्‍कम देण्‍याबाबतचा कोणताही निर्णय घेतला नाही. अशा परिस्थितीत तक्रारकर्तीची तक्रार ही खोटी असून खारीज करण्‍यात यावी ही विनंती केली.

 

विरुध्‍द पक्ष २ यांचा लेखी जवाब :- विरुध्‍द पक्ष क्र. २ यांचे म्‍हणणे आहे  की, श्री.पि.एम.इंगोले हे तहसिल कार्यालय, मंगरुळपीर येथे दि. ०१.०७.२००१ पासुन माहे एप्रिल २०१० पर्यंत तलाठी पदावर कार्यरत होते. ते रुजू झाल्‍या पासुन ते माहे एप्रिल २०१० पर्यंत दर माह त्‍यांची कार्यालयीन अभिलेखावरुन विम्‍याची रक्‍कम रु. १२५/- प्रमाणे कपात करण्यात आली आहे. पि.एम. इंगोले यांची बदली तहसिल कार्यालय कारंजा येथे झाल्‍यावर दि. १६.०७.२०१० रोजी झालेल्‍या मोटार सायकल अपघातात मयत झाल्‍यानंतर तक्रारकर्तीने मुळ पॉलिसीसह आपला दावा विरुध्‍द पक्ष क्र.१ यांच्‍याकडे सादर केल्‍यावरुन व विरुध्‍द पक्ष क्र.१ यांनी नमुद पॉलिसीमध्‍ये हप्‍त्‍याचे गॅप्‍स आहेत असे कळविण्‍यानुसार तक्रारकर्ती या कार्यालयात चौकशी करण्‍याकरीता आल्‍या असता त्‍यांना, त्‍यांनी केलेल्‍या दाव्‍यानुसार विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास सोईचे व्‍हावे या दृष्‍टीने माहे आक्‍टोंबर २००१, डिसेंबर २००१, मे २००३ व माहे जानेवारी २००४ चे विवरणपत्र पुरविण्‍यात आले. तक्रारकर्तीच्‍या तक्रारीतील इतर मुद्याबाबत विरुध्‍द पक्ष क्र.२ यांचा कार्यालयीन संबंध नाही, सबब त्‍याबाबत त्‍यांचे काहीही म्‍हणणे नाही.

 

विरुध्‍द पक्ष ३ यांचा लेखी जवाब :- मयत पि.एम.इंगोले तलाठी हे दिनांक ०७.०५.२०१० पासुन या कार्यालयात कार्यरत होते, ते दिनांक १६.०७.२०१० रोजी मयत झाले. त्‍या कार्यकाळामध्‍ये अंतीम वेतन प्रमाणपत्र अप्राप्‍त असल्‍यामुळे मयत इंगोले यांचे वेतन व भत्‍ते काढता आले नाही. परिणामी त्‍यांच्‍या विमा हप्त्‍याची कपात करता आली नाही. मयत इंगोले हे माहे ऑक्‍टोंबर २००१ ते जानेवारी २००४ पर्यत या कार्यालयात कार्यरत नसल्‍यामुळे माहे १०/२००१, १२/२००१, ५/२००३ आणि १/२००४ हे विमा हप्‍ते या कार्यालयाकडून जमा करता येत नाही, कारण मयत इंगोले हे दिनांक ०७.०५.२०१० रोजी या कार्यालयात रुजु झाले होते. तहसिलदार मंगरुळपीर यांच्‍या कार्यालयाकडून अंतिम वेतन प्रमाणपत्र प्राप्‍त झाल्‍यानंतर मयत इंगोले यांचे वेतन व भत्‍ते अदा करण्‍यात आले. त्‍यांच्‍या  विमा पॉलिसी बाबतची माहिती प्राप्‍त नसल्‍यामुळे माहे ५/२०१०, ६/२०१० व ७/२०१० हे विमा हप्‍ते कपात करता आले नाही. 

 

 

3)   कारणे व निष्कर्ष ः-

     या प्रकरणातील तक्रारकर्ती यांची तक्रार, विरुध्‍द पक्ष क्र.१ व ४ यांचा संयुक्‍तीक लेखी जबाब, विरुध्‍द पक्ष क्र. २ व ३ यांचा लेखी जवाब, उभय पक्षाने

दाखल केलेले सर्व दस्‍तऐवज, तक्रारकर्ती  यांचे प्रतिउत्‍तर  उभय पक्षांचा तोंडी युक्‍तीवाद व दाखल केलेले न्‍यायनिवाडे यांचे काळजीपूर्वक अवलोकन मंचाने केले व खालील निष्‍कर्ष कारणे देवुन नमुद केला.

     तक्रारकर्ती व सर्व विरुध्‍द पक्ष यांना मान्‍य असलेल्‍या बाबी म्‍हणजे तक्रारकर्तीचा मुलगा प्रमोद मोतीराम इंगोले हा महसुल विभागात, तहसील मंगरुळपीर येथे तलाठी पदावर माहे मे २०१० पर्यंत कार्यरत होता, त्‍यांनतर  त्‍यांची बदली कारंजा लाड येथे झाली होती, तो जेव्‍हा मंगरुळपीर येथे होता त्‍या वेळेस त्‍याने विरुध्‍द पक्ष क्र. १ व ४ कडून विमा किरण पॉलिसी रक्‍कम रु. ६५,०००/- घेतली होती व या विमा पॉलीसीचा हप्‍ता रु.१२५/- दर महा असा होता.  या पॉलिसीमध्‍ये तक्रारकर्ती सिंधुताई मोतीराम इंगोले या नॉमिनी आहे. ती विमा पॉलिसी, वेतन कपात पॉलिसी होती व विरुध्‍द पक्ष क्र. २ व ३ कडून विरुध्‍द पक्ष क्र.१ यांच्‍याकडे सदरहू हप्‍त्‍याची रक्‍कम जमा होत होती.

     तक्रारकर्तीने दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजांवरुन असे दिसून येते की, तक्रारकर्ती यांचा मुलगा प्रमोद मोतीराम इंगोले यांचा दि. १६.०७.२०१० रोजी अपघाती मृत्‍यु झाला. त्‍यामुळे तक्रारकर्तीने या पॉलिसी अंतर्गत देय रक्‍कम मिळण्‍याकरीता विरुध्‍द पक्ष क्र.१ कडे दावा दाखल केला. परंतु विरुध्‍द पक्ष क्र.१ यांनी विरुध्‍द पक्ष क्र. २ यांना असे कळविले की,  मयत प्रमोद इंगोले यांच्‍या पॉलिसीच्‍या देय हप्‍त्‍यामध्‍ये एकंदर ९ गॅप्‍स्‍ आहेत म्‍हणजेच विरुध्‍द पक्ष क्र. २ व ३ कडून विमा पॉलिसीचे हप्‍ते हे निय‍मीत भरलेले नाहीत. परंतु तक्रारकर्तीने दाव्‍यामध्‍ये त्‍या बदद्लचे विवरण जे विरुध्‍द पक्ष क्र.२ कडून प्राप्त झाले ते दाखल केलेले आहे, त्‍यावरुन व तसेच विरुध्‍द पक्ष क्र.२ व ३ यांच्‍या लेखी जबाबतील कथनावरुन असे दिसते कि विरुध्‍दपक्ष क्र.१ यांनी जे ९ गॅप्‍स दाखविले त्‍यापैकी विरुध्‍दपक्ष क्र.२ यांनी माहे ऑक्‍टोंबर २००१,डिसेंबर २००१,मे २००३ व जानेवारी२००४ या महिण्‍यात मयताच्‍या पगारातुन विम्‍याचा हप्‍ता कपात करुन विरुध्‍दपक्ष क्र.१ यांच्‍या कार्यालयात पाठविले होते. विरुध्‍दपक्ष क्र.३ च्‍या मते मयत इंगोले यांचे अंतिम वेतन प्रमाणपत्र अप्राप्‍त असल्‍यामुळे माहे ५/२०१० ते १६/०७/२०१० पर्यंत चा वेतन व भत्‍ता काढता आला नाही. व विमा पॉलिसीची कपातही या कालावधीत करता आली नाही. म्‍हणजे हे कारण विरुध्‍दपक्ष क्र.२ व ३ यांच्‍या कार्यालया अंतर्गत आहे व ते त्‍यांना सहज दुर करता आले असते परंतु तसे त्‍यांनी तक्रारकर्तीचा अर्ज प्राप्‍त होई पर्यंत केले नाही. उर्वरीत दोन गॅप्‍स बद्दल विरुध्‍दपक्ष क्र.२ यांनी कुठलीही स्‍पष्‍टीकरण दिले नाही. शिवाय विरुध्‍दपक्ष क्र.१ या पॉलिसी गॅप्‍स बद्दल विरुध्‍दपक्ष क्र.२,३ व पॉलिसी धारक यांना सुचना दिल्‍या नाहीत किंवा विमा हप्‍ता रक्‍कम जमा होते कि नाही ?  या बाबत कुठलीही जबाबदारी पार पाडली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्तीने दाखल केलेत्‍या न्‍यायनिवाडयावर भिस्‍त ठेवुन मंचाने असा निष्‍कर्ष काढला आहे. मयत प्रमोद इंगोले यांच्‍या पॉलिसीध्‍ये अटी व शर्ती नुसार तक्रारकर्ती ही दि.१६.०७.२०१० रोजी देय असलेली विमा रक्‍कम रु.१,३०,०००/- व्‍याजासह विरुध्‍दपक्ष क्र.१ ते ४ कडून मिळण्‍यास पात्र आहे. सबब अंतिम आदेश पारित केला.

 

                                                                                          अंतीम आदेश

१.        तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजुर करण्‍यात येत आहे.

२.        विरुध्‍दपक्ष क्र.१ ते ४  यांनी संयुक्‍तपने व वेगवेगळे तक्रारकर्तीस

          पॉलीसीची संपुर्ण रक्‍कम (डेथ बेनिफिट सह) रु.१,३०,०००/-

          (अक्षरी, एक लाख तिस हजार ) इतकी रक्‍कम दि. १६.०७.२०१०

          पासुन ते प्रत्‍यक्ष  अदाई पर्यंत  द.सा.द.शे.८ % व्‍याजासह दयावी. 

३.        विरुध्‍दपक्ष क्र.१ ते ४  यांनी संयुक्‍तपने व वेगवेगळे तक्रारकर्तीस

          शारिरीक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाई पोटी रु.५०००/- व   तक्रारीचा खर्च रु.२०००/- दयावा.      

४.        विरुध्‍दपक्ष क्र.१ ते ४ यांनी सदर आदेशाचे पालन आदेश प्रत

          मिळाल्‍यापासुन ४५ दिवसाचे आत करावे.

५.        उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.

 

               

                                                           मा.श्रीमती.जे.जी.खांडेभराड,     मा.सौ.एस.एम.उंटवाले,  

                                                                                सदस्‍या              अध्‍यक्षा

 

        

 
 
[HON'BLE MRS. Smt. S.M.Untwale]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. J.G.Khandebharad]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.